Submitted by मंदार-जोशी on 14 September, 2011 - 05:11
तुझ्या फोटोंसारखीच
तुझी सगळी पत्र केव्हाच
फाडून, तुकडे करुन
फेकून दिली
तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती मात्र
जीवापाड जपली आहे
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली
तुझी सगळी पत्रं
केव्हाच
इतिहासात जमा झाली आहेत
पण मी आजही
ती पावती 'वाचतो'
तुझ्या पत्रांसारखी
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकात आणि ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
गुलमोहर:
शेअर करा
मंदार, कवितेबद्दल बोलण्याचे
मंदार, कवितेबद्दल बोलण्याचे धाडस माझ्यात नाही,
पण वरिल प्रतिसाद वाचून रहावलं नाही, म्हणून फक्त
अहो बेफी, तो प्रश्न
अहो बेफी, तो प्रश्न परिसंवादाच्या पानावर विचारा ना! हे म्हणजे पर्फ्युम घ्यायचं एका ठिकाणी आणि पावती मागायची भलतीकडेच, असं झालंय.

अहो बेफी, तो प्रश्न
अहो बेफी, तो प्रश्न परिसंवादाच्या पानावर विचारा ना! हे म्हणजे पर्फ्युम घ्यायचं एका ठिकाणी आणि पावती विचारायची भलतीकडेच, असं झालंय. >>>
अहो पण तिथली माणसं पुढे काय झालं हे अजिबात न सांगता येथे तर्गो करून प्रतिसाद देतायत म्हंटल्यावर आम्हा गरीबांनी काय करावे?
एक वेळ कविता फालतू आहे असं
एक वेळ कविता फालतू आहे असं म्हणाली असती मंडळी तर परवडलं असतं
एक वेळ कविता फालतू आहे असं
एक वेळ कविता फालतू आहे असं म्हणाली असती मंडळी तर परवडलं असतं>>
म्हणजे? तेच तर म्हणतायत सगळे
एक वेळ कविता फालतू आहे असं
एक वेळ कविता फालतू आहे असं म्हणाली असती मंडळी तर परवडलं असतं >> अरे पण त्या पलिकडचे मात्र असेच कम्युनिकेट करतात बहुधा!!
(हघेरे)
एक वेळ कविता फालतू आहे असं
एक वेळ कविता फालतू आहे असं म्हणाली असती मंडळी तर परवडलं असतं>>
असं डायरेक्ट कसं बोलेल कुणी?? म्हणुन हा प्रतिसादप्रपंच.
(No subject)
कविता तर मस्त च पण
कविता तर मस्त च पण प्रतिक्रिया जास्तच मस्त

भुंग्या दोन्ही हात जोडुन नमस्कार
त्या पावतीवर इतरांना दिसते ती
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली
पावतिवरचा डिस्काउंट दिसत नाही का? : D
प्रेमाची निशाणीच आहे ती
प्रेमाची निशाणीच आहे ती
प्रतिसाद मात्र

पत्र फाडण्याआधी झेरॉक्स काढून ठेवल्या होत्या का ?
pulchritudinous
pulchritudinous
जबराट..!
जबराट..!
सुंदर कविता.
सुंदर कविता.
Pages