आधीच्या चारोळीत आपण आपल्या नावडत्या विषयावर आरोळ्या ठोकल्यात ना?
मग आता इथे संधी आहे ती आपल्या आवडत्या विषयावर आरोळ्या ठोकायला. जेवण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण त्यातल्या त्यातही काही जास्त आवडणारे पदार्थ असतात. कोणाला पावभाजी आवडते, कोणाला श्रीखंड, तर कोणाला मॅगी!!!
कुरकुरीत काकड्या, लालभडक टोमॅटो
ताजे, लुसलुशीत ब्रेडचे स्लाईस
बटर अन चटणी चव वाढवाया
माझं व्हेज सँडविच व्हेरी नाईस!
काही का आवडेना, आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढून आरोळ्या ठोकणार ना???
श्रीबालाजीचीसासू दिसताच
हसू येई चेहर्यावर
चारोळीला विषय तोंपासु
तर ताबा राहील का तोंडावर?
चला तर मंडळी, करा सुरूवात भोजनाला ......
******************************************
सर्वसाधारण नियम:
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.
******************************************
केळीच मऊशार, हिरवं हिरवं
केळीच मऊशार, हिरवं हिरवं पान
त्यावर घातली भाताची मूद गोल
पिवळं धम्मक वरण, लिंबू नि तुपाची धार
घास घेताच सुखावला माझा सोल!
नारळाचं काढलं दूध
नारळाचं काढलं दूध निर्मळ
त्यात घातलं इटकुस्सं आगळ
लसूण-मिरचीचा खर्डा किंचित
सोलकढी चापा सुजन तात्काळ!
सगळे मेले खादाड ठोकताहेत
सगळे मेले खादाड
ठोकताहेत चविष्ट आरोळ्या
चाखून पहा श्रीखंड
त्यावर पेरून चारोळ्या
वाचतेय. वाचतेय. लिवा.
वाचतेय. वाचतेय. लिवा. लिवा.
गो मामी, अरुंधती, जामोप्या, मंजू, भरत
बासुंदी अस्सावी दाट
बासुंदी अस्सावी दाट सुगंधी
आटीव, खरपूस, मलईवाली
केशर पिस्ते चारोळ्यांची
वरतुनी सुंदरशी रांगोळी
तेलावर टाकले लसूण, खोबर्याचं
तेलावर टाकले लसूण, खोबर्याचं वाटण दाट
आलं-लसूण, हळद, तिखट, मीठ माशांत मस्त मुरलं आत
सुरमईच्या तुकड्या ताज्या, तिखट कालवणात लागल्या तरंगू
गरमागरम कालवणासंगे खाते मी आंबेमोहराचा गुरगुट्या भात
सैपाकाचे माजवू नये स्तोम |
सैपाकाचे माजवू नये स्तोम | काय गोम कळेना |
चव, रसना, तृप्ती | मोह मज सोडवेना !
देवा तूच तार | मायबापा आता |
वदनीकवळघेता | विसर मज पडो नये |
जे भावे करावे | ते प्रेमे अर्पावे |
स्वाद तो भरला | पदार्थांसी ओतप्रोत |
साधेसे तरीही | तृप्त गणगोत |
वदनीकवळघेता | विसर मज पडो नये |
चमचाभर लोण्यात परतलं
चमचाभर लोण्यात परतलं कॉर्नफ्लोअर जरासं
त्यावर ओतलं कपभर दूध निरसं
उकळी आणली ढवळत त्या सॉसला व्हाईट
वर घातले चीज म्हणता झाला की हो दाट!!
आई येताना चॉकलेट आणशील? प्लस
आई येताना चॉकलेट आणशील?
प्लस दोन्दोन लॉलीपॉप
घरी आल्यावर पिझ्झा करशील?
चिझ ऑन टॉप
आई उद्या शिर्रा कर
खूऽऽप किसमिस टाक
पाहता पाहता संपवून टाकु
यम्मीयम्मी , चट्टाक मट्टाक
भारी आहेत सगळ्याच पोस्ट!
भारी आहेत सगळ्याच पोस्ट!
जगातल्या सगळ्या वाहिन्यांवर
जगातल्या सगळ्या वाहिन्यांवर साऽरखे स्वैपाक करतात, घरी मेला तोच
पार्सलीचेरीटॉपिंगलेंटिलसुप, कुठेतरी ठेवा पोच
पहातरी एकदा आरशात, सैपाकघरात, स्वप्नात
विचारुन पहा स्वतःला, हेच हवय आपल्याला एकुणात?
मनीमानसी रुजलेले पदार्थ चाराठ, अन आईचा हात
टीव्हीतल्या पदार्थांची चव, करील एकदा घात
रांधावाढाउष्टी काढा, पिढ्यानुपिढ्यांचा वारसा
शतकानुशतके बाईच्या जन्मांचा आरसा
दहीदूधतूपलोणी, सार्यांची उस्तवार
त्यात कुळाचारांचा भडीमार
त्यात पडली आणिक वर्ल्डक्युझिनची भर
चूलखंड ते इलेक्ट्रिक कॉईल, अखंड सुगरणज्वर
आई, दुधाला विरजण
आई, दुधाला विरजण लावताना
विचार केलास कधी ?
आपली स्वप्नच विरजून
येतात कधीमधी
अगं आमच्या स्वप्नांचे दहीच झाले
तुमची होऊ देत बाई सत्य
आम्ही आमचीच लाकडे चुलीत सारली
तेव्हा असायचे गं दैत्य
ओके.. लास्ट टीपी. आय प्रॉमिस.
मी कल्टी. तुम्ही लिहा
अगं अगं रैना नको होऊस अशी
अगं अगं रैना नको होऊस अशी गंभीर
पाकातले लाडू करण्यास होऊ आपण खंबीर
साजूक तुपात भाजू रवा, घालून खोबरं आणि बदाम
पाकात मुरवून गट्टम करू, त्यातच आहे राम
वरण आमटीचा कंटाळा
वरण आमटीचा कंटाळा आला.
पिठल्याचाही आला वात.
मुळ्याचे काप घाला आणि करा
बोलाची कढी अन बोलाचा भात
मंजू
मंजू
(No subject)
पिझ्झा , चिकन, बर्गर तसलं
पिझ्झा , चिकन, बर्गर
तसलं सगळं सोडा..
गरम गरम भाकरी
आणि खा संगे खर्डा
मायबोलीवर मनोगत उपक्रम आहे
मायबोलीवर मनोगत
उपक्रम आहे चांगला
मराठीसृष्टीचा झेंडा मात्र
मिसळपावलाच शोभला !
दोन आयडी दोन ब्राउजर खेळ माझा
दोन आयडी दोन ब्राउजर
खेळ माझा चांगला
मेदू वडा आणि इडली असा
डब्बल डाव रंगला..
टण्या म्हणतो लावा खाणावळ;
टण्या म्हणतो लावा खाणावळ; झुगारूनी द्या गुलामगीरी
डीजे म्हणते व्हावे ऋजू; ओन्ली ताजे, हेल्दी, केलेले घरी
आम औरत को दोनो नामुंम्कीन, आ.औ आपल्या काठाकाठावर
समटाईम्स करिती पदार्थ सुंदर, आदळिती कधी वरणभाताचा कुकर
टण्या आणि डीजे दोन्ही फिक्टीशियस आहेत. योगायोग समजावा अँड ऑल दॅट.
मामे धन्स गो माझ्या तर्फे
मामे धन्स गो माझ्या तर्फे चारोळी टाकल्या बद्द्दल.
मामी नी साधनाला बोंबिल तळलेले
लारा आणि ऐशूसाठी झणझणीत कोलंबीचे
दिनेशदांसाठी बिरडे नी फतफते
जिप्स्यासाठी आळूवड्या पण कालवणही थोडे टेस्ट केले.
काय च्या काय
नाकाने कांदे सोलून केली
नाकाने कांदे सोलून
केली भज्यांची प्लेट
पोटभर खा राव
वाढेना का थोडे वेट
फ्रीजमध्ये अवघी आठवड्याची
फ्रीजमध्ये अवघी आठवड्याची शिळाई
हलवायाच्या दुकानातील तमाम (असली!!) मिठाई
ऋजुता अंगी अवतरेल तर ताजी फळे खाई
हॉटेलांची सरते काही दिसातच नवलाई!!
(तर मग खाण्याचे ह्या काय करावे बा(भा)ई?? :हाहा:)
मोदक, करंजी नी पुरणाची
मोदक, करंजी नी पुरणाची पोळी
बेसनची गुंडाळली सुरळीची वडी
वडीवर ओतली राईची फोडणी
पहील्या ओळीशी जुळत नाही मांडणी
खाऊन खाऊन सणावारी पोट झाले
खाऊन खाऊन सणावारी पोट झाले जड
काही पदार्थ कचरट काही होते होऽ वातड
सुगरणींच्या कवतिके रचली गेली गं कवने
खाऊच्या आरोळ्यांची बघा किती भरली पाने!!!
आई गं... सुट्लेत सगळे... मस्त
आई गं... सुट्लेत सगळे... मस्त
वाचुनच फक्त तोपासुं
सुरेख सुगंधी बासमती
सुरेख सुगंधी बासमती तांदूळ
लवंग, वेलची, खोबरे आणि गूळ
खमंग परतले साजूक तुपात
सुंदर चविष्ट नारळीभात
देख के इसको भूख मेरी
देख के इसको
भूख मेरी जागी
खायला भारी
यम्मी मॅगी!
या विशया वर सगलेच लिहितात
या विशया वर सगलेच लिहितात मस्त
प्रसादाचे मोदक खाउन मी झाले सुस्त
बहु असोत पुलाव, बिर्याणी की
बहु असोत पुलाव,
बिर्याणी की रिसोटो महा
प्रिय अमुचा एक
असे वरणभात हा
Pages