छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय २ : "मुझे जिने दो"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:13

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम (बदलून) :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय २: "मुझे 'जिने' दो...."

jina_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत पायर्‍या, जिने इ इ

गाणे /शीर्षक - कळीचे शब्द: उपर, नीचे, मंजिल, पुढे, वर, खाली, चढ, उतार, चलते चलते, चालताना .. इ इ उदा. "...वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंगलोर ~

Bangalore" title="Bangalore">

"तेरे लिए आये हम आये कहॉंसे गाते
ओ दूर के मुसाफिर चलते चलते"

सगळेच फोटो एकसे एक!

ह्यावेळी सगळे फोटो मी भारतातच ठेवून आल्याचे भयंकर दु:ख होतेय मला.
हा खेळ मनसोक्त खेळता येत नाहीये.

होठों पे सच्चाई रहती है
जहाँ दिल में सफ़ाई रहती है
हम उस देश के वासी हैं, हम उस देश के वासी हैं
जिस देश में गंगा बहती है

"ओला असल्याने इफेक्ट"

~ हो. परवाच्याच पावसात काढलेला हा फोटो. त्या शेवटच्या पायरीपुढेही आणखीन दहाबारा पायर्‍या अंधुकशा दिसत होत्या; पण तेथील पाण्याचा तो खळखळाट आणि वरील कमालीचा एकांतपणा अंगावर येत होता. [Conjurer या भयपटाची आठवण व्हावी असे वातावरण].

.

अशोक,
मस्तं फोटो आणि फोटो एकदम मार्जिन फोडून बाहेर पसरलेत :).
नलिनी,
झब्बु बीबी चुकला का Happy ?

IMG_4326.JPG

Rock Climbing - माझ्या पिल्लुचा आवडता खेळ.
कदम कदम बढाये जा खुशीके गीत गाये जा!!! Happy

दुसरे कोणते जास्त समर्पक गाणे नाही सापडले. Sad

प्रज्ञा आणि मेधा मस्त फोटो आहेत.
धनश्री, मस्त फोटो
फोटो पाहून मला हे गाणे आठवले
रुक जाना नहीं...तू कही हारके

Pages