छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय २ : "मुझे जिने दो"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:13

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियम (बदलून) :

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

टीपः

आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.

************************************************************************


"छाया-गीत" : विषय २: "मुझे 'जिने' दो...."

jina_0.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत पायर्‍या, जिने इ इ

गाणे /शीर्षक - कळीचे शब्द: उपर, नीचे, मंजिल, पुढे, वर, खाली, चढ, उतार, चलते चलते, चालताना .. इ इ उदा. "...वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_6420_0.JPG

हिमालयासम आमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरती निशाण

ब्लॉक केलेले दिस्तायेत.. दुपार पर्यन्त तर दिसत होते सर्व>> Sad
कि फक्त भारतातले हवेत>> चीन मधले नॉट अलाऊड????????????

मानस मंदिर (शहापुर)

उंचे नीचे रास्ते और मंझिल तेरी दूर
राह में राही रूक ना जाना हो कर तू मजबूर

आसावला आसमंत, अमृताने चिंब नाहवा... हे शिवा

श्रीक्षेत्र हरीहरेश्वर - प्रदक्षीणा मार्ग
ह्या पायर्‍या थेट समुद्रात जाउनच संपतील असं वाटतं...

वर्षूताई, तुझा एकपण फोटो दिसत नाहीये. चीनमधून बॅन केलं की काय फोटो टाकणं Happy

सगळ्यांचे फोटो मस्त.
हरिहरेश्वरच्या पायर्‍या खास लक्षात राह्यलेल्या आहेत. भोवळ आणणार्‍या म्हणून Happy

उरण चिरनेर येथिल डोंगरावरील दगडी वाट.

जिंदगी हर कदम इक नयी जंग है
जीत जायेंगे हम जीत जायेंगे हम
तु अगर संग है.....

मानी, जिप्सि मस्त आहेत फोटो.

योगेश तुझा आधीचा पण गोल पायर्‍यांचा भारीच आहे.

यस्स!!! नी मलापण तसच वाटतंय..
पहिले टाकलेले दोन्ही भारतातले आहेत अजून इथेच Happy
छोड जाने दे!!!

अ‍ॅमेझॉन जंगलातील "ब्राझिल नट" चे झाड. ४०-५० मिटर उंच.
त्याला लावलेल्या शिडी वरून वर गेल्यास
आज मै उपर, आसमा नीचे, हे गाण सार्थ करणारं.

Brazil nut.jpg

संयोजकाचे कौतूक वाटतेय, नाहितर इतक्या सगळ्या लोकांनी जिन्याचे काढलेले फोटो, आपल्याला कसे दिसले असते.

एच एच, मामी, आर्च, तुम्ही टाकलेले फोटो आणि शिर्षकं खूप आवडली.
जिप्सीचे ही सर्व फोटो सुरेख.. Happy

सर्व शिकागो जनतेला आणि प्रेमींना अर्पण... Wink

जीना यहां मरना यहां... इसके सिवा जाना कहां ??

jeena.jpg

Pages