खजुराचे लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 August, 2011 - 14:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा किलो सिडलेस खजुर किंवा आख्या खजुराच्या बिया काढून
दिड ते दोन वाट्या सुक्या खोबर्‍याचा किस.
५० ग्रॅम बदाम
२ छोटे चमचे खसखस
३ चमचे तुप

क्रमवार पाककृती: 

खजुराचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या.

बदाम कापुन घ्या. खसखस निवडून घ्या.

खोबर्‍याचा किस मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या.

आता भांड्यात तुप घालुन ते गरम झाले की खसखस घाला. मग त्यावर बाकिचे सगळे साहित्य म्हणजे खजुर, बदाम आणि भाजलेल खोबर घाला.

आता हे सगळ मिश्रण ५ ते ७ मिनिटे म्हणजे चांगले गरम होईपर्यंत मिडीयम गॅसवर ठेवा. जास्त शिजवण्याची गरज नाही.

भांडे खाली उतरवा व लाडू वळा. झाले लगेच तय्यार पौष्टीक, लज्जतदार, सोप्पे खजुराचे लाडू.

वाढणी/प्रमाण: 
एका वेळी एक.
अधिक टिपा: 

ह्याच साहित्याच्या खजुराच्या वड्या व रोलही करु शकता.

हे लाडू करायला अगदी सोप्पे असतात. थंड गरम कसेही वळता येतात. खजुराच्या मऊपणामुळे ते पटकन वळतात.

तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकु शकता.

बाळींतिणिंसाठी पौष्टीक.

माहितीचा स्रोत: 
वहिनी.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू तु खरचं किती आणी काय काय करतं असतेस. आणी सगळ्याचे व्यवस्थित फोटो काढून पण इथे शेअर करतेस, तुझं खुपच कौतुक वाटतं कि कसं काय इतकं सगळ जमवतेस. तुझा दिवसाचा दिनक्रम एकदा इथे टाक. आम्ही सगळे अगदी इन्स्पायर होउन वाचू.

मी पण केले हे लाडु परवा पण ते फोटोत दाखवल्याप्रमाणे छान वळले नाही गेले. म्हणजे सुबक गोल नाही दिसत आहेत. मोडत नाहीत, पण अगदी एकसंध पण नाही दिसत...

वाव.........मला लाडू म्हटलं की पाकाचं भारी टेन्शन यायचं. आता हे खायला मस्त आणि बनवायला सोप्पे लाडू लगेच बनवणार. तेसुद्धा बाप्पा च्या आगमनाच्या दिवशीच!:) हा सोपा पण अगळावेगळा प्रसाद सर्वाना विशेषतः छोट्याना खिलवायला नक्की आवडेल:)

अखी, माशा, लीना फोटो पण टाका ना इथे.

टोकीकुरा तु गणपतीच्या दिवशी बनवत आहेस म्हणून मी एक सजेशन देते. बाजारात मोदकांचा साचा मिळतो. तो घे आणि त्यात लाडू कर. वळायलाही नाही लागणार आणि मोदकांचाही शेप येईल. मी एकदा संकष्टीला असे केले होते.

अखी Happy

जाईजुई पुत्री नाही काही विशेष नाही बदलणार तसे केलेस तर तु माझा उपवास धरुन ते उपवासाच्यादिवशीही खाऊ शकतेस. Lol

Happy

खसखस खाण्याचे कारण नाही.. म्हणून स्टोरेज नाही.. त्यामुळे लाडवात घालण्यासाठी इथल्या मेरीकाकूच्या मागे सेन्सबरीत कुठे भटकू? म्हणून विचारलं Wink

जाई चालेल ग तसा काही फरक पडत नाही खसखसने. तू ड्रायफ्रुट अजुन हवे ते घालू शकतेस.

मनिशा छान दिसतायत लाडू.

आज केले हे लाडु. खुप आवडले. खजुर अति गोड होता. त्यामुळे जरा खोबर्‍याचे प्रमाण मी वाढवायला हव होत अस वाटल.
धन्यवाद जागू इतक्या छान रेसीपीबद्दल.

मी शनिवारी केले होते. खजुर जरा मिक्सर मधुन काढला, म्हणजे अगदी बारीक नाही, जरासाच. पण त्यामुळे चांगले झाले. आणी हो, मी त्याला आकार लाडु ऐवजी मोदकांचा दिला.... फोटो साठी उरलेच नाहीत.. धन्यवाद जागु रेसिपी बद्द्ल...

मी दुसर्‍या पद्धतीने करते हे लाडू.
बिया काढलेल्या खजूराच्या तुकड्यांवर पातळ तूप घालून ठेवायचे २-३ दिवस. खजूर छान मऊ होतो. मग हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाही. मग त्यात बाकीचे जिन्नस घालून लाडू वळायचे. माझ्या मुलीला फार आवडतात हे लाडू.

केले एकदाचे आज हे लाडू. एक आठवडा नुसती ठरवत होते. खरच सोपे आणि सुंदर आहेत. मला पोर्णिमा म्हणते त्याप्रमाणे कोमट मिश्रण मिक्सर मधून काढावे लागले. त्यानंतर मात्र सुरेख लाडू वळले गेले.

धन्यवाद !

लीना Happy

प्राची खजुर गरम केला की नरम पडतो. म्हणजे जर वाट बघायची नसेल तर गरम करुन तुला पटकन करता येतील.

तराना मला वाटत ह्या खजुरांमध्येही प्रकार असतील. काही खजुर सुकत आलेले पण असतात. त्यांना मग बारीक करावे लागत असेल. मी करते तेंव्हा मला नाही मिक्सरमधून काढावे लागत. गरम केले की वळतात. पण छान वाटल तुम्ही केलेत म्हणून थोडे मला टेस्टला पण पाठवा.:स्मित:

जागुतै, आज हे लाडू बनवले. तुम्ही दिलेले प्रमाण व क्रुती तंतोतंत पाळली. लाडू खूप छान झाले आहेत. पाकृ साठी मनःपूर्वक धन्यवाद.

मस्तच , मी खजूर परतून घेत नाही . सगळे मिश्रण मिक्सर मधून काढते आणि लाडू वळते . खजूर मऊ असल्याने बारीक होते छान .

दुबई एअरपोर्ट वर स्टफ्ड खजुर पाहिले. त्यावरून स्फुर्ती घेवून ,गुलकंद, सुके खोबरे, ड्रायफुट्स आवळजवळ करून , वेलदोडा बारीक करुन अस सगळ एकत्र केल आणि खजुरामध्ये भरल. एकदम जबरी लागतं. खसखस पण घालता येईल.
यावेळी संक्रांतीला गुळ,खोबर भाजुन, तीळ भाजुन , शेंगदाणे आवळजवळ करून ,हे सगळ एकत्र करून ते खजुरामध्ये भरावेत असा विचार आहे.
जागुटली भयंकर कामाला लावते . तरी बरं व्हेजीटेरिअन आहे म्हणुन नाहीतर सुगरण वगैरे काहीतरी झाले असते. : LOL :

मस्त लाडु.. नक्की करून पाहणार आहे. पण एक प्रश्न.. डायबेटीसवाले लोक खजूर खाऊ शकतात का?

Pages