अण्णांचे लोकपाल बिल v/s सरकारी लोकपाल बिल

Submitted by उदयन. on 16 August, 2011 - 02:52

http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=9619669

अण्णांचे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल हे दोन्ही यात आहे...
दोघांचे अवलोकन करण्यात यावे..
यात मुख्यतः संघर्ष खालील प्रमाणे
१) प्रकरण ७ मधे....
पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल..
अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा..

२) प्रकरण ८ मधे..
अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराची झडती कोणत्याही वेळी घ्यायला लावु शकतो
सरकारी लोकपाल मधे.. लोकपाल ला आधी एक नोटीस बजावावी लागेल..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते बरयापैकी सफल होवो >> म्हणजे काय झालं पाहिजे? त्यांनी कोणकोणते प्रश्ने (बेकारी, रोगराई, अन्नपाणी टंचाई, गरीबी) सुटणार आहे? भ्रष्टाचार ही किड कायदे करून नव्हे तर प्रत्येक नागरिकानी आचरण करूनच नष्ट होणार!

अण्णा हे खरे समाजसेवक आहे... पण प्रत्येकजण त्यांच्यासारखे वागेल का? मी तर बोलेल जेवढेजण अण्णांना सपोर्ट देतात आहेत, त्यांनी जरी भ्रष्टाचार (देणं-घेणं दोन्ही) सोडला तरी या देशाचे भले होईल...

ANNA NA PATHIMBA MAAYBOLIKARANCHA AAHECH...YAAD VAD BAHI AAHE...
PAN... SWATH CHE MAGANE MAGANYACHA HA KONTA PRAKAR AAHE...
SARAKAR MADHE SHAMIL HOUN SUDDHA SUDHARNA KARU SHAKTAT..MAG NIVADNUK LADHAVYA SATHI MAAGE KA HOT AAHET...
YAACH JAGI MAGE GELE TAR PARAT SARAKAAR TYANNA KADHICH DOKE KADHAYALA DENAR NAHI..........

>> म्हणजे काय झालं पाहिजे? त्यांनी कोणकोणते प्रश्ने (बेकारी, रोगराई, अन्नपाणी टंचाई, गरीबी) सुटणार आहे? भ्रष्टाचार ही किड कायदे करून नव्हे तर प्रत्येक नागरिकानी आचरण करूनच नष्ट होणार!
-- निदान सुरुवात तरी झाली आहे ना का अजुन कोणाची वाट बघत राहायची. परीवर्त्न काय कोणी १ का रात्रीत मागत नाहीय. ती एक प्रोसेस आहे. निदान भारतातलील जनाता जागी तरी झाली आहे आणि ही चांगली सुरुवात आहे

>>SWATH CHE MAGANE MAGANYACHA HA KONTA PRAKAR AAHE
ही वेळ सरकारच्या अरेरावी कारभारानेच आणली आहे.भ्राष्टाचार संपवायची जर सरकारची मानसीकता असेल तर भारतीय जनता आण्णांना नाही तर सरकारला स्वतःहुन पाठींबा देईल.

अण्णांच्या आंदोलनामागे विदेशी शक्ती... Happy

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अटकेवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवेदन करताना अण्णांच्या आंदोलनामागे विदेशी शक्तींचा हात आहे, असा आरोपच आज केला. पंतप्रधानांनी यावेळी देशाच्या विकासात काही विदेशी शक्ती खोडा घालत असल्याचे सांगत अण्णा हजारेंसारख्या सचोटीच्या समाजसेवकाने त्या शक्तींच्या हातचे बाहुले बनू नये, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.....
http://www.saamana.com/2011/August/18/Link/Main2.htm

>>> पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अटकेवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत निवेदन करताना अण्णांच्या आंदोलनामागे विदेशी शक्तींचा हात आहे, असा आरोपच आज केला. पंतप्रधानांनी यावेळी देशाच्या विकासात काही विदेशी शक्ती खोडा घालत असल्याचे सांगत अण्णा हजारेंसारख्या सचोटीच्या समाजसेवकाने त्या शक्तींच्या हातचे बाहुले बनू नये, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.....

अण्णांच्या आंदोलनामागे विदेशी शक्ती? काहीतरीच काय. सोनिया गांधी अण्णांच्या मागे आहेत किंवा अण्णा सोनियांच्या हातचं बाहुलं बनले आहेत असं मला तरी वाटत नाही.

TYANNA VAACHAYLA DILE AANI TYANNI VAACHUN DAKHAVLE....HE SAGLYANNA MAHIT AAHE...MAG TYA BHASHANALA KA GRUHIT DHARAT AAHE... Happy

>>> MAG TYA BHASHANALA KA GRUHIT DHARAT AAHE. <<<<
कारण ते देशाच्या "पन्तप्रधानान्नी" केल आहे म्हणून! कुणा गल्लीतल्या वा अमक्या बुद्रुक गावच्या फुडार्‍याने नै केलेले.

>>>>MAG TYA BHASHANALA KA GRUHIT DHARAT AAHE.<<<<
उदय ते भाषण मनमोहन केल नाहीतर अरुण जेटलीने (BJP) केलय, पंतप्रधानाच्या भाषणाला उत्तर म्हणून.
ते बघ आधी..आणि मग बोलू.

are VETAALA....mi uttar maasturenna dile...tumhala nahi.....manmohan singh yanni je bolale tya var aahe...

evadhe sadhe lihile sun suddha tumhala te kalale nahi.... Happy

ji gosht limbu bhau yanna kalali ti gosht tumhala tyannchya nantar 5 min post lihitana suddha kalali nahi... Happy

महेश साहेब.........इथे अन्ना चे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल यांच्या तील मुद्दे आणि ते बरोबर आहेत की नाही...यावर चालु आहे.........आणि त्या धाग्यावर एकुणच जो काय प्रपंच चालु आहे त्यावर फक्त म्हणने मांडले जात आहे......
हा धागा वाहत गेलेला नक्कीच आहे ...तो मायबोलीवरचे हे काय नविन नाही आहे...पण मुख्य म्हणजे मुद्दे काय आहे...ते आपल्या सार्वजनिक जीवनात काय घडामोडी आणतील हा अभिप्रय होता.......

असो................

सन २०११---- जन लोकपाल विधेयक मंजूर.

सन २०१५---- लोकपालाने भ्रष्टाचार केल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी म्हणून अण्णांचे जंतरमंतरवर प्राणांतिक उपोषण सुरु.

काही माझे मुद्दे.........जाणकार यावर प्रकाश टाकतीलच..... स्मित
१) गो. रा. खैरनार यांनी अण्णा हजारेंची बाजु का सोडली..?
२) जर उपोषणालाच बसायचे आहे तर त्यासाठी जंतर मंतर, रामलीला मैदान इत्यादी इवेंट सारखे मोठ मोठी मैदाने का घ्यायची आहे..?
३) जर आंदोलन मोठे जनव्यापी करायचे आहे ते फक्त असे मोठ मोठ्या मैदानावरच होउ शकते तर...गांधींनी आपले उपोषण कोणत्या मॉल मधे केलेले होते.. की कोणत्या शिवाजी पार्क सारख्या , पानिपत सारख्या मैदानावर केले होते..? जेणे करुन ते विश्वव्यापी ठरले..?
४) लोकशाही लोकशाही म्हणुन आपले म्हणने पुढे रेटवताना भले ते बरोबर आहे तरी ही समोरच्याची बाजु चुकच माझे जे आहे तेच लाल बाकीच्यांचे पिवळे... असे का ? लोकशाही मधे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे तर तुम्ही समोरच्याचे का नाही ऐकुन घेत..?
५) पोलींसांनी अटक केली होती ती का केली होती याचे भान नियम परवानगी घेताना बेदीं यांना नव्हते का..? दिल्ली सारख्या प्रदेशात जिथे आधिच कोंडी असते तिथे अजुन कोंडी करण्याची परवानगी का घ्यावी... आंदोलन तर देशाच्या कोणत्याही प्रदेशात केले तरी चालले असते...मिडीया हायिप ही मिळणारच होती त्याद्वारे तुम्ही देशभर तुमचे आंदोलन पोहचणारच होते..
६) जर तुमचे म्हणने जर फक्त संसद मधे सादर करण्याचे आहे तर ते तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या द्वारे सादर करु शकला असतात...किंवा राज्यसभेत विशेष परवाणगी घेउन तिथे सिविल सोसायटी चे सदस्य जाउन चर्चा करु शकला असतात.. उद्या जर तुमचे बिल संसद मधे आले आणि पास नाही झाले तर काय तुम्ही संसदच बरखास्त करणार आहात का ????
७) देश सुधारणा करायची आहे .....खरच फार आम्हाला देखील तळमळ आहे ...पण त्यासाठी तुम्ही निवडणुका लढवुन मुख्य प्रवाहात का नाही येत...उंटावर बसुन शेळ्या हाकण्यात काय अर्थ आहे..? सगळेच जर राजकारणी १००% भ्रष्टाचारी आहेत तर मग फक्त संसद मधे बिल सादर करे पर्यंतच का हट्ट..? ते तर पास होणारच नाही आहे हे अण्णांना सुध्दा माहीत आहे...!!
८) इतके मोठे आंदोलन करताना जर उद्या सरकार पडले तर त्यानंतर च्या परिस्थिती ला सामोरे जाण्यासाठी काय उपाय केलेले आहेत..?
९) सरकार पडल्यानंतर नविन सरकारने सुध्दा जर तुमच्या तोंडाला पाने पुसलीत तर...?

जाणकार लोक भावना मधे न आणता मुद्द्याने बोलतील अशी अपेक्षा........... स्मित

इथे फक्त मी माझी पोष्ट आहे म्हणुन टाकली आहे......... Happy

ह्यांना माफ करा रे... हे झालं तर ते झालं तर.. करात बसायच आणि काहीच करायच नाही.

काही नाही करायच म्हंटल की १०० कारणं लागतात आणि करायच म्हंटल तर एक कारण पुरेस असत. लोकशाही आहे मान्या आहे पण एखाद्याला समज द्यायला बाकी सगळे बांधिल असल्या सारखे का वागता आहेत? कुणी वेड्याच सोंग घेणार्‍याला शहाणा करु शकत नाही.

१) गो. रा. खैरनार यांनी अण्णा हजारेंची बाजु का सोडली..? ते गोरान्ना विचारले पाहिजे, काहीही असले तरी जर गोरान्नी बाजु सोडली म्हणजे हजारेन्ची बाजू चूकीची अशी टेस्ट मी लावत नाही. सबब मला असा प्रश्नच पडत नाही. गोरान्नी बाजू घेतली म्हणून मी अण्णान्ना पाठीम्बा दिला नव्हता, व त्यान्नी बाजू सोडली म्हणून माझ्या निर्णयात फरक पडण्याचा बुद्धीभेद कुणी करू शकणार नाही Proud
२) जर उपोषणालाच बसायचे आहे तर त्यासाठी जंतर मंतर, रामलीला मैदान इत्यादी इवेंट सारखे मोठ मोठी मैदाने का घ्यायची आहे..? घ्यायची नाहीत असा काही कायदा आहे का? :डोमा:
३) जर आंदोलन मोठे जनव्यापी करायचे आहे ते फक्त असे मोठ मोठ्या मैदानावरच होउ शकते हे तुमचे म्हणणे तर...गांधींनी आपले उपोषण कोणत्या मॉल मधे केलेले होते.. की कोणत्या शिवाजी पार्क सारख्या , पानिपत सारख्या मैदानावर केले होते..? जेणे करुन ते विश्वव्यापी ठरले..? गान्धीन्पुरते बोलायचे तर दाण्डीयात्रेत साबरमती ते दाण्डी किती किलोमीटर लाम्बीचे "मैदान" वापरले होते ते मोजुन सान्गावे लागेल
४) लोकशाही लोकशाही म्हणुन आपले म्हणने पुढे रेटवताना भले ते बरोबर आहे तरी ही समोरच्याची बाजु चुकच माझे जे आहे तेच लाल बाकीच्यांचे पिवळे... असे का ? लोकशाही मधे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे तर तुम्ही समोरच्याचे का नाही ऐकुन घेत..? शेण्डा ना बुडखा असा आक्षेप आहे हा! Proud
५) पोलींसांनी अटक केली होती ती का केली होती याचे भान नियम परवानगी घेताना बेदीं यांना नव्हते का..? दिल्ली सारख्या प्रदेशात जिथे आधिच कोंडी असते तिथे अजुन कोंडी करण्याची परवानगी का घ्यावी... आंदोलन तर देशाच्या कोणत्याही प्रदेशात केले तरी चालले असते...मिडीया हायिप ही मिळणारच होती त्याद्वारे तुम्ही देशभर तुमचे आंदोलन पोहचणारच होते.. जिथे संसद आहे त्याच शहरात आन्दोलन होणार ना? की राजस्थानच्या वाळवण्टात करावे असे तुमचे मत आहे?
६) जर तुमचे म्हणने जर फक्त संसद मधे सादर करण्याचे आहे तर ते तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या द्वारे सादर करु शकला असतात...किंवा राज्यसभेत विशेष परवाणगी घेउन तिथे सिविल सोसायटी चे सदस्य जाउन चर्चा करु शकला असतात.. उद्या जर तुमचे बिल संसद मधे आले आणि पास नाही झाले तर काय तुम्ही संसदच बरखास्त करणार आहात का ???? होय, पुढल्या विलेक्शनला चालू सरकार जावे अशी माझी (लिम्ब्याची) इच्छा आहे - एकतर विधेयक पास करुन भ्रष्टाचारी साथीदारान्ना उघड्यावर आणा नैतर घोडामैदान लाम्ब नाहिये Proud
७) देश सुधारणा करायची आहे .....खरच फार आम्हाला देखील तळमळ आहे ...पण त्यासाठी तुम्ही निवडणुका लढवुन मुख्य प्रवाहात का नाही येत...उंटावर बसुन शेळ्या हाकण्यात काय अर्थ आहे..? सगळेच जर राजकारणी १००% भ्रष्टाचारी आहेत तर मग फक्त संसद मधे बिल सादर करे पर्यंतच का हट्ट..? कारण संसदच कायदा करु शकते, राळेगणबुद्रुकचा सरपन्च वा गावकरी ते करु शकत नाही ... ते तर पास होणारच नाही आहे हे अण्णांना सुध्दा माहीत आहे...!! तुम्ही काय अण्णान्च्या मनातच नव्हे तर डोक्यातील मेन्दूत देखिल डोकावुन आतिल वाचू शकता काय? भारिच्चे बुवा! Wink
८) इतके मोठे आंदोलन करताना जर उद्या सरकार पडले तर त्यानंतर च्या परिस्थिती ला सामोरे जाण्यासाठी काय उपाय केलेले आहेत..? म्हणजे? घटने मधे एक सरकार पडले तर पुढे काय करायचे याची प्रशासनिक तजवीज नाहीच्चे असे म्हणता की काय तुम्ही? मला नव्हते बुवा हे माहित
९) सरकार पडल्यानंतर नविन सरकारने सुध्दा जर तुमच्या तोंडाला पाने पुसलीत तर...? तर आहेच की जन्तरमन्तर!

बाकी या जन्तरमन्तरची जादू भारीच दूरवर आसेतूहिमालय लागू पडते बर का! Lol

मस्त उत्तर दिलय. लिंबूदा.....:हहगलो:
उगाच कैच्याकै प्रश्न विचारतायत मुर्खासारखे.

Proud

हा धागा आता एक करमणुक झालाय त्यामुळे ईथे प्रतिक्रिया देण्यात काहीही अर्थ नाहीय. पण एक गोष्ट अधोरेखीत करावीशी वाटते की माबोवर धागा काढणार्या लोकांनी जरा त्यांच्या प्रतिक्रिया अभ्यासपुर्वक आणि विषयाच्या गांभीर्याप्रमाणे तरी टाकाव्यात. धाग्याचा विषय आणि त्यांच्या प्रतिक्रिया यांमध्ये थोडतरी तार्किक अस लीहाव जेणे करुन त्यांचे मुद्देतरी पटतील.
असो आणि भारतातील जनता ईथे आण्णंना नाही तर त्यांच्या आंदोलना मागच्या उद्देशाला पाठींबा देत आहे.

लिंबूदा, Lol

बंडोपंत, मूळ धागा अतिशय योग्य आहे... ती फाईल वाचलीत का?
"माबोवर धागा काढणार्या लोकांनी जरा त्यांच्या प्रतिक्रिया अभ्यासपुर्वक आणि विषयाच्या गांभीर्याप्रमाणे तरी टाकाव्यात" ही अनावश्यक टिप्पणी आहे!

Pages