अण्णांचे लोकपाल बिल v/s सरकारी लोकपाल बिल

Submitted by उदयन. on 16 August, 2011 - 02:52

http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=9619669

अण्णांचे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल हे दोन्ही यात आहे...
दोघांचे अवलोकन करण्यात यावे..
यात मुख्यतः संघर्ष खालील प्रमाणे
१) प्रकरण ७ मधे....
पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल..
अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा..

२) प्रकरण ८ मधे..
अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराची झडती कोणत्याही वेळी घ्यायला लावु शकतो
सरकारी लोकपाल मधे.. लोकपाल ला आधी एक नोटीस बजावावी लागेल..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीला दिक्षित, जयपाल रेड्डी). मायावतीवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत>>>>>>>... अहो आरोप हे आरोप असतात ते तर तुम्ही सुध्दा करु शकतात........ Happy जे सिध्द झाले त्या वेळेला नक्कीच पाय उतार करायला लावतात....( राजा, कलमाडी, अशोक चव्हाण, येदुरप्पा.( याला तर बळेच खेचावे लागले Happy )

हे सगळे होउ नये म्हणुनच त्यांना निवडणुक लढवण्याचा सल्ला दिला........सरकार स्वतःचे आल्यावर न रहेगा बास न बजेगी बांसुरी............

काही ही करु शकतात ना ते.........

>>>> मुळात एखादी व्यक्ती पदावर आहे का नाही याचा व त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारवाई करायची का नाही याचा संबंध काय? <<<<
तोच तर कळीचा मुद्दा हे ना मास्तुरे!
अहो या कॉन्ग्रेसीन्ना पदे म्हणजे कवचकुन्डले! "सन्सदसदस्य" येवढ्या एका बिरुदाच्या कवचावर मग काहीही करायला मोकळे!
तेच तर पब्लिकला डाचू लागलय, अन का? तर अण्णानी विषय मान्डला म्हणून, मान्डलाच नस्ता तर अजुन काही दशके आहे तसेच सुखनैव चालू राहिले अस्तेच

भाजप आणि कम्युनिस्ट यांना लोकहिताचा खूप पुळका आला असेल तर (तो आला असावा कारण अणांच्या आंदोलनाला ते पाठिंबा देत आहेत) ते या गोष्टी संसदेत लोकपाल विधेयकात दुरुस्त्या म्हणून सुचवू शकतील. तसे शक्य असताना न करता बाहेर तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचे उद्योग करण्याची गरज नाही. हे पक्ष अण्णांना "उपोषण करू नका, आम्ही हे विधेयक दुरुस्तीशिवाय संमत होऊ देणार नाही" असे सांगू शकले असते. पण त्यांनाही नौटंकीत जास्त रस आहे.

>>>> जे सिध्द झाले त्या वेळेला नक्कीच पाय उतार करायला लावतात....( राजा, कलमाडी, अशोक चव्हाण, येदुरप्पा.( याला तर बळेच खेचावे लागले )

आरोप सिध्द होण्यासाठी त्यावर खटला चालावा लागतो. जर अमुक व्यक्ती पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री आहे म्हणून त्याच्यावर कुठल्या तरी कायद्याचा आधार घेउन खटला चालवायची परवानगीच नसेल तर ती व्यक्ती अनिर्बंध भ्रष्टाचार करत राहील.

बादवे, राजा/कलमाडी/येडाप्पा/चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे अजून न्यायालयात सिध्द झालेले नाही. आपले तथाकथित स्वच्छ पंतप्रधान सिंग यांनी राजा व कलमाडी यांना वाचविण्याचा व येडाप्पाला भाजपने वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण जनमताच्या रेट्यामुळे, विरोधी पक्षांनी लावून धरल्यामुळे व सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राजा व कलमाडी यांना अटक झाली.

मायावतीवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप आहेत (उदा. ताज कॉरिडॉर, स्वत:चे पुतळे, स्वत:चा वाढदिवस इ.). सध्याच्या घटनेत एक अन्यायी तरतूद आहे. मुख्यमंत्री किंवा राज्यातील मंत्री यांवर खटला भरण्यासाठी राज्यपालाची परवानगी लागते. २००७ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी काँग्रेसला मायावतीचा पाठिंबा हवा होता. त्यामुळे तिच्या पक्षाच्या पाठिंबाच्या बदल्यात तिच्यावर खटला भरायला तत्कालीन राज्यपालांनी परवानगी नाकारली.

जर लोकपाल असता तर तिच्यावर २००७ मध्येच खटले भरले गेले असते.

>>> भाजप आणि कम्युनिस्ट यांना लोकहिताचा खूप पुळका आला असेल तर (तो आला असावा कारण अणांच्या आंदोलनाला ते पाठिंबा देत आहेत) ते या गोष्टी संसदेत लोकपाल विधेयकात दुरुस्त्या म्हणून सुचवू शकतील. तसे शक्य असताना न करता बाहेर तापल्या तव्यावर पोळी भाजण्याचे उद्योग करण्याची गरज नाही.

प्रत्येक विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्याची संधी घेणारच. त्यात चूक काय? त्यांचे कामच आहे ते. त्यांचा पाठिंबा आहे म्हणून अण्णा कसे चुकीचे ठरतात?

>>> हे पक्ष अण्णांना "उपोषण करू नका, आम्ही हे विधेयक दुरुस्तीशिवाय संमत होऊ देणार नाही" असे सांगू शकले असते. पण त्यांनाही नौटंकीत जास्त रस आहे.

काँग्रेस व मित्रपक्षांना लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे विरोधक हे विधेयक हाणून पाडू शकणार नाहीत व काँग्रेस बहुमताच्या जोरावर सर्व दुरूस्त्या फेटाळून लावेल. हे अण्णांनाही माहित आहे. त्यामुळेच आवश्यक त्या तरतुदींसाठी आंदोलन व जनमताचा रेटा आवश्यक आहे.

अण्णांच्या म्हणण्यानुसार लोकपाल बिल आणा. खालील लोक लोकपाल बनतील

१. डी राजा
२. सुरेशभाई कलमाडी
३. बंगारू लक्ष्मण
४. कपिल सिब्ब्बल
५. येडियुरप्पा
६. नितीन गडकरी

११

काँग्रेस व मित्रपक्षांना लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे विरोधक हे विधेयक हाणून पाडू शकणार नाहीत व काँग्रेस बहुमताच्या जोरावर सर्व दुरूस्त्या फेटाळून लावेल.>>>>>>..
हे काँग्रेसला नाही माहीती असणार का......जर उद्या हे विधेयक नाही मंजुर झाले तर खापर त्यांच्यावरच फुटणार आहे.....मग ????????

>>> हे काँग्रेसला नाही माहीती असणार का......जर उद्या हे विधेयक नाही मंजुर झाले तर खापर त्यांच्यावरच फुटणार आहे.....मग ????????

म्हणूनच मुळातच बिलात आपल्याला अडचणीत आणणार्‍या तरतुदी आणूनच द्यायच्या नाहीत (म्हणजे त्यावर चर्चाच नको) व आहे त्या स्वरूपात (म्हणजे दात, नखे इ. नसलेला लोकपाल) ते मंजूर करून घ्यायचे व आम्ही लोकपाल कायदा केला म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची अशी काँग्रेसची योजना आहे.

मला कोणत्याही परिस्थितील लालू, जयललिता, पवार, करूणानिधी, मायावती, देशमुख, चव्हाण, देवेगौडा, कुमारस्वामी, येडाप्पा, जगनमोहन रेड्डी, राजा, कलमाडी, चिदंबरम, सिब्बल, शीला दिक्षित इ. ना लोकपाल बनलेले पहायचे आहेत.

काँग्रेसची योजना आहे>>>>>>>>>>>>> मी उद्या लंडन ला चाललोय..सोनियांजीची भेट घेतो...सत्तेवरुन पायउतार होण्यास सांगतो..भाजपाचे सरकार येयील आणि आपल्या अपेक्षे नुसार हे विधेयक पास करेल........ ठीक आहे .....?

>>> सोनियांजीची भेट घेतो...सत्तेवरुन पायउतार होण्यास सांगतो..

सोनियाजी सत्तेवर आहेत कुठे? त्यांनी तर सत्तेचा केव्हाच त्याग केलेला आहे. Biggrin

नवीन मंत्रिमंडळ

अण्णा - पंतप्रधान
बाबा रामदेव - आरोग्य व कुटूंबकल्याण
केजरीवाल - अर्थ
किरण बेदी - गृह
गो रा खैरनार - खाण व उत्खनन
अरूण भाटिया - संसदीय कामकाज

भर टाका

मेघा पाटकार.= पाणी पुरवठा मंत्री
मनिष सिसोदिया = परराष्ट्रीय मंत्री
अग्निवेश= सांस्कृतीक मंत्री..

अजुन सापडलीत की टाकतो...... Happy

हे मन्त्री झाले, पण "आत" कुणाकुणाला टाकायच त्या नावान्ची जन्त्री देखिल येऊद्यात की Lol

आत कशाला कुणाला टाकायचं ? त्यांना लोकपाल बनवायचं ना ? आणि जेपी पार्कात उपोषणाला डिग्गी राजा बसतील.

बा. ठाकरे .. रादर सगळेच ठाकरे गप्प्प्प्प बसले आहेत. बा ठा नी एकदा आण्णाना वाकड्या तोंडाचा गांधी म्हटले होते.

नको..........त्याला कमी प्रतिसाद मिळेल..............डिग्गी फॅन क्लब भारी ठरेल

>>> बा. ठाकरे .. रादर सगळेच ठाकरे गप्प्प्प्प बसले आहेत.

कालच उध्दव ठाकर्‍यांनी घेतलेली पत्रकार परिषद दूरदर्शनवर दाखवत होते. त्यात त्यांनी अण्णांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे.

>>> पवार मंडळीपण मूग गिळून आहेत

त्यांची अवस्था "सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही" अशी झालेली आहे. ते तूर्तास काँग्रेसची मजा बघत आनंद लुटत आहेत.

अण्णा हजारेंच्या अटकेबाबत आज राज्यसभेत जोरदार वादळी चर्चा झाली. चर्चेत बोलताना अरूण जेटली यांनी जबरदस्त भाषण केले. आवाजात योग्य त्या ठिकाणी चढउतार करून, अतिशय प्रभावी मुद्दे व शब्द वापरून केलेले त्यांचे भाषण ऐकणे हा एक वेगळाच अनुभव होता.

त्यांचे संपूर्ण भाषण -

http://www.outlookindia.com/article.aspx?278035

वरील आण्णा हजारेंच्या आंदोलनाबद्द्लची काही माबो करांच्या प्रतीक्रिया बघुन आश्चर्य वाटतय. एखादी व्यक्ती काहीतरी देशासाठी चांगल करण्याचा आटापीटा करतेय आणि त्या चांगल्या गोष्टीला पाठींबा देता येत नाहीय तर ठीक आहे निदान विरोध तरी करु नका. स्वतः देशासाठी काही करायच नाहीच पण कोणी काहीतरी करु बघतय तर त्याला विरोध करण्याचा करंटेपणा करायचा. असो जे काही देशभर आंदोलन चाललय देव करो आणि ते बरयापैकी सफल होवो.

Pages