अण्णांचे लोकपाल बिल v/s सरकारी लोकपाल बिल

Submitted by उदयन. on 16 August, 2011 - 02:52

http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=9619669

अण्णांचे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल हे दोन्ही यात आहे...
दोघांचे अवलोकन करण्यात यावे..
यात मुख्यतः संघर्ष खालील प्रमाणे
१) प्रकरण ७ मधे....
पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल..
अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा..

२) प्रकरण ८ मधे..
अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराची झडती कोणत्याही वेळी घ्यायला लावु शकतो
सरकारी लोकपाल मधे.. लोकपाल ला आधी एक नोटीस बजावावी लागेल..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अण्णांसह 'टीम अण्णां'ची रवानगी तिहार तुरुंगात
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9623189.cms

दुर्देवी योगायोग म्हणजे माजी आयपीएस अधिकारी असलेल्या किरण बेदी यांनी ज्या तिहार तुरुंगाचा कायापालट केला, त्याच तुरुंगात त्यांना कैदी म्हणून राहावं लागणार आहे. तसेच भ्रष्टाचारविरोधी आणि भ्रष्टाचारी या दोघांनाही एकाच तुरुंगाच्या भितींमध्ये राहावे लागणार, हे वास्तवही यातून सामारे आले आहे.

सध्या च्या स्थिती मधे अण्णा हे स्वता: भरकटलेले आहे...नेमका कशावर व का उपोषन करत आहे हेच कळत नाही आहे.....उदा. काही मुद्दे
१) पंतप्रधान आणि इतर संसदिय सदस्य कक्षेत नाही आहेत..... ( ठीक आहे नसु दे..नंतर आणता येतील.)
२) सार्वजनिक संस्था जी श्री. केजरीवाल यांची आहे तिने जो मसुदा तयार केलेला आहे. तो मानण्यात यावा..( काही महत्वाचे जर मुद्दे आलेले असतील तर काही आक्षेप नसावा..कारण नेमके भविष्यात या कायद्याचे काय होणार आहे हे अजुन काही कोणीच स्पष्ट करु शकले नाही.)
३) लोकपाल कोण व्हावे हेच अजुन काही स्पष्ट झाले नाही..नाही अण्णांनी केले नाही सरकार ने केले..( उद्या पंतप्रधान लोकपाल झाले तर ते स्वतःचे आधी कामे करतील की या तक्रारी बघत बसतील...एकाच व्यक्ती कडे किती कामे द्यावी या वर सुध्दा काही मर्यादा आहेत..)
४) महत्वाचा मुद्दा जर हे अण्णांचे विधेयक आणले तर खरच भ्रष्टाचार कमी होईल का...(नाही..आधी बघावे लागेल काय प्रतिक्रिया येते जनते कडुन..कारण कायदा आणायला जशी पाठींबा देत आहे तिच जनता कायदा पाळाण्यात सुध्दा एवढाच पाठिंबा देयील काय >????????? ) म्हणुन काही महीने सरकारी लोकपाल ला मंजुरी देउन त्यात ज्या काही त्रुटी आहेत त्या अण्णांनी समिती वर काम करुन एक एक करुन दुर कराव्यात.....)

सध्या च्या स्थिती मधे अण्णा हे स्वता: भरकटलेले आहे...<<<<
मला ही तसेच वाटतेय कारण आता अण्णांची रवानगी थेट 'तिहार तुरूंगात' केलीय व तो लुंगीपुचट गृहमंत्री म्हणतोय 'अण्णांनी खुशाल कोर्टात जावे'
या वरून तरी हा बनवलेला मामला होता. ज्यात अण्णा बरोबर सापडलेत.

http://www.youtube.com/watch?v=2CHcKlIsvAQ&feature=related उदय हा विडीओ बघा. फार विचार आणि अभ्यास करुन जन लोकपाल बिल ड्राफ्ट केले आहे.

सध्याची गरज आहे ह्या आंदोलनाला सपोर्ट करण्याची गरज आहे. कोणी तरी आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी झगडत आहे. त्यात चुका काढण्यात अर्थ नाही. मुद्दे मांडायची वेळ नाही ही.

@सत्यजित ...........अहो बोलने सोपे असते.............
कारण कायदा आणायला जशी पाठींबा देत आहे तिच जनता कायदा पाळाण्यात सुध्दा एवढाच पाठिंबा देयील काय>>>>>>>>>>>>>. हे महत्वाचे आहे इथे.......
जो आहे तो कायदे पाळत नाही........नविन कायद्याचे काय घेउन बसलात

अण्णांनी निवडणुक खरच लढावी....
देशाची निवडणुक नंतर आधि मुंबई महानगर पालिके ची निवडणुक लढवुन मुंबई सुधारावी....म्हणजे एक तर आपले विचार हे नुसते विचार नसुन कृतीत देखील येउ शकतात..हे एक सिध्द होइल ( ज्या वर सारखे सरकार बोलत असते की असे बोलने सोपे आहे करणे नाही) त्याच बरोबर केंद्र सरकार ला एक प्रकारचा संदेश सुध्दा जाईल.......

लोक कायदा का पाळत नाही ह्याचा एकदा विचार करा. जर राजा चोर तर प्रजेने किती दिवस सोसायच? लोकपाल बिल नक्की काय आहे हे वरील यूट्यूब मध्ये ऐका.
जनता म्हणजे कोण? टॅक्स भरता ना, टोल भरता ना, वॅट भरताना हा पण कायदाच आहे. आयटी रिटर्न करताना? एक पाउल पुढे उचलायच म्हंटल तर आपण पुस्तक काढुन समिक्षा करायला बसतो. ईमर्जन्सीची केस आल्यावर डॉक्टर ने पुस्तक काढुन वाचण्या सारखं आहे हे. असो मी सध्या माझ्या हक्का साठी लढतो आहे, जनता काय करेल ह्याच्याशी मला घेणदेण नाही. तुम्हालाही असं वाटत असेल तर उतरा.

This may be the last chance in my lifetime to think about it. Am I doing right thing to give better life to my children and coming generations? I know I am working hard, I know I am sacrificing my personal ambitions; I know I am not enjoying all the luxury that I can afford. I am not much bother about my health but wealth, I am investing in insurance policy, I will try to give best education to my kids so that they live better life, I am not giving enough time to my kids because I need to work and make sure that their future is secure and they live better life. I know I am not living the way I wanted to live. Today really don’t know how much is really enough for my kids to live better life? my parents did the same thing and now I am doing. The only problem I see is “financial instability”.
Do I really scare about recession? Do I really scared about I am being incapable or would be incapable? NO.. really!!!. Then, am I working hard? Am I working for extra hours? Am I earning enough to live better life? Yes obviously… Yes... Am I doing anything wrong or illegal? No, I live honest life, I regularly pay taxes, I regularly pay my bills, I pay hefty sum for my kid’s education, I invest in insurance, I regularly pay my Home loan and other EMI’s and I also pay good amount of Toll. I regularly file my IT return. Am I spending lavishly? Am I enjoying luxurious holiday every year? No.
Then where is my money going? At least 20-30% of my salary goes as Income tax; at least 30-40% of remaining is EMI for home loan (where principle component is only 2%), 10-15% for education per child, then utility payments (gas, electricity, water, property taxes, phone, internet, etc.) are 5-10%. Then petrol, road tolls and basic commuting needs is 10-5%, Basic grocery 30%, finally some investments 6-10% (majorly on insurance where returns are negligible). Remaining 5% - 10% is medical, 0.5-1% saving or other expenditures. On top of that I have to pay bribe…
If you really look at all above components, I pay minimum 20% to 35% as taxes on everything spend. So 50% to 65% of my earning is return to government which is most corrupt. If so, are poor in this country getting benefit from my hard work? No. It`s all corrode by dirty politicians. They are making money by selling natural and national resources which is property of each and every Indian so again my money. Every politician is thinking about his next 10-20 generations, they are trying to build empire on my hard earn money. And what I get in return is insecurity, worst lifestyle, mental stress, unhealthy lifestyle, no time for family and more and harder work. I have plenty more questions which are linked to corruption and I know I am directly linked and affected by corruption.
Now, do I need to support Anna Hazare or myself? Join the protest for yourself and our generations to come. Please join the campaign join and protest against corruption. This may be a last chance in our lifetime if we miss it we may never get it again. Let’s Fight Corruption, kill corruption!!!
Come down to streets… that’s the only way and not by creating online causes and campaigns… Or die earning for corrupt politicians and their generations.

अण्णांनी खुशाल कोर्टात जावे, गृहमंत्र्याचे आव्हान
१९७५-७६ च्या सुमारास तत्कालीन प्रधान मंत्री श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी त्यांच्या सत्तेला विरोध करणाऱ्या सर्व लोकांना तुरुंगात डांबले होते व देशात आणीबाणी जाहीर केली होती. ह्याची प्रकर्षाने आठवण झाली. अण्णा हजारेंना अटक होणे हे कॉंग्रेस पक्षाच्या सरकारच्या ध्येय व धोरणांना अनुसरून नक्कीच आहे. त्यात विशेष ते काय?
देखते हे बंदर किताना नाचता हे.....

उदय, अण्णा भरकटलेत की काय ते कळेलच, पण तू असे का लिहितोस?
लोक आहे ते कायदे पाळत नाहीत म्हणून नविन करायचेच नाहीत? लोक झेब्रा क्रॉसिन्ग मानत नाहित म्हणुन ते आखायचेच नाहित? लोक फुटपाथवरुन चालत नाहित फुटपाथ विक्रेते व्यापतात म्हणून फुटपाथच करायचे नाहीत? तस असेल तर मला वीजपाणी इत्यादीन्चे बीलच भरायचे नाहीये....... Proud झालच तर इन्कम्ट्याक्स देखिल भरायचा नाहीये.... मलाच काय, जवळपास प्रत्येकाची सूप्त भावना हीच असेल. पण म्हणून मीटर बसवूच नयेत? बीले पाठवूच नयेत?
अन जे कायदे पाळतात त्यान्चे काय? की त्यान्नी उठून सरळ अमेरिकादी राष्ट्रात चालू पडावे?

लोक आहे ते कायदे पाळत नाहीत म्हणून नविन करायचेच नाहीत? लोक झेब्रा क्रॉसिन्ग मानत नाहित म्हणुन ते आखायचेच नाहित? लोक फुटपाथवरुन चालत नाहित फुटपाथ विक्रेते व्यापतात म्हणून फुटपाथच करायचे नाहीत? तस असेल तर मला वीजपाणी इत्यादीन्चे बीलच भरायचे नाहीये....... झालच तर इन्कम्ट्याक्स देखिल भरायचा नाहीये.... मलाच काय, जवळपास प्रत्येकाची सूप्त भावना हीच असेल. पण म्हणून मीटर बसवूच नयेत? बीले पाठवूच नयेत?
अन जे कायदे पाळतात त्यान्चे काय? की त्यान्नी उठून सरळ अमेरिकादी राष्ट्रात चालू पडावे? >> लिम्बुटिम्बु यांना प्रचंड अनुमोदन... मला जे म्हणावे वाटत होते, ते तुम्ही अगदी तंतोतंत मांडलेत..

लिंबु भाउ...आधी शांतपणे माझ्या सर्व पोष्टी वाचा... माझा नेमका आक्षेप कशावर आहे हे आधी समजुन घ्या..मग पुढचे बोला...
अन्ना म्हणजे देव आणि सरकार म्हणजे राक्षस ...असे जे चित्र डोळ्यापुढे आणु न देता सर्व बाबींवर आधी नीट चर्चा करावी..
एखादा राष्ट्रगीत गात गात खड्ड्यात पडणार असेल तर तुम्ही तो राष्ट्रगीत गात आहे म्हणुन त्याचे कौतुक करत बसणार की त्याचे गीत मधेच थांबवुन त्याला पडण्यापासुन वाचवणार..?

माझा जनलोकपाल बिल ला बिल्कुल ही विरोध नाही आहे पण त्यासाठी जे काही चालु आहे ते बरोबर नाही वाटत आहे..

समजा..काँग्रेस ने राजीनामा दिला...सरकार पडले..निवडणुका झाल्या तर..जे सरकार सत्तेवर येयील ते त्रिशंकु असेल नाही तर भाजपाचे असेल..आणि हे दोन्ही सरकार अन्नांचे बिल पास करणार नाहीत..आज भाजप किती ही पाठिंबा दाखवत असला तरी...कोण आपली चामडी सोलण्यासाठी दुसर्‍याच्या हातात हत्यार देते का?

एक जवानाला तुम्ही बाहेर सुरक्षीत जागी बसुन म्हणालात लढाइ चालु असताना " की बाबा रे तु गोळी चुकीच्या दिशेने चालावतोय..इकडे नको तिकडे जास्त धोका आहे तिकडे चालव..!!" भले तुम्ही जे बोलत आहात ते बरोबरच बोलत आहात..पण शेवटी तो त्याच्या मर्जीनेच गोळी चालवणार..वर तुम्हाला म्हणेल हवी तिथे गोळी चालवायची असेल तर या लढाई च्या मैदानात उचला ती बंदुक आणी घाला गोळ्या हव्या तिथे..!!

आता टिम अन्नांना मैदानात उतरायचे सुध्दा नाही पण समोरच्याला गोळी चालावण्यासाठी जबरदस्ती सुध्दा करायची आहे.. हे कसे होणार..?

ज्या गांधीजीं च्या नावाने चालु केले आहे..त्या गांधींनी सुध्दा ब्रिटीश सरकार विरुध्द लढा चालवण्या आधी प्रत्यक्ष सरकार चालवण्याची स्वतः मधे हिंमत असलेले लोक उभे केले त्यांना प्रशासकिय अनुभव घ्यायला लावला..विविध परिस्थीनीचा सामना करायला लावला..नेहरु पटेल इत्यादी लोकांची मजबुत फळी उभी केली मगच पुढे गेले...जेणे करुन उद्या काही झाले तर सांभाळायला माणसांकडे अनुभव आहे..गोंधळाची परीस्थिती निर्माण होणार नाही..
उद्या सरकार जर पडले आणि नविन आलेल्या सरकार ने सुध्दा तोंडाला पाने पुसलीत तर मग कोणाकडे जाणार?
कारण अन्नांच्या मते सगळे राजकारणी चोर आहेत..

म्हणुन उगाच सरकार अस्थीर करुन काही ही फायदा होणार नाही...स्थानिक संस्थांमधल्या महापालिके मधल्या निवडुकांमधुन स्वतःचा पक्ष उभा करायला हवा..इतका पाठींबा आहे की ते आरामात निवडुन येउ शकतात..मग हवी ती सुधारणा करु शकतात...

कोणते ही सरकार अन्नाच्या बिला ला त्यांना हवी तशी पास करुन देनार नाही..........

उदयवन यांच्याशी सहमत

अण्णा निष्कलंक आहेत. प्रामाणिक आहेत आणि त्यांची कळकळही भिडतेय. त्याच वेळी एका मागोमाग उघडकीस येणा-या घोटाळ्यांनी आणि रोजच्या भ्रष्टाचाराने जनता त्रस्त आहे. आपण एक आदर्श राज्यव्यवस्था स्विकारली आहे. हुकूमशाहीचे उदाहरण आपण बांगलादेश आणि पाकिस्तानात पाहीलेय. अफगाणिस्तानमधले अराजक पाहीलेय. त्यामुळे आपल्या राज्यव्यवस्थेचं महत्व कळून येतं. पण राज्यव्यवस्थेचा रथ हाकणारे हात हे समाजातूनच येत असतात. राजकारण हा समाजाचा आरसा असतो. राजकारण्यांना लाच कोण देतं, देणग्या कोण देतं, आपण लाच का देतो ? कारण चिरीमिरी नाही दिली तर दुसरा ती देईल ही भीती असते. या समाजातून कशा प्रकारचे लोक राजकारणात येऊ शकतात ?

उद्या लोकपाल कुठून येणार आहे ? तो या व्यवस्थेशी जुळवून घेणार नाही हे कशाच्या आधारावर म्हटलं जातं याचं उत्तर अण्णा देतच नाहीत. खाणारं एक तोंड आणखी वाढणार आहे का ? कदाचित हा प्रश्न निराशाजनक विचारसरणीचा परिपाक असेल, तरीही संसद लोकपाल बिलावर निर्णय घेऊ शकत नाही हा अविश्वास योग्य नाही. सरकारला एकत्याला बिल पास करता येत नाही. ३/४ बहुमताशिवाय बिल पास होऊ शकत नाही. चुकीचे कायदे बनवण्यात विरोधी पक्ष पण सामील असणार आहेत का ?

तस असेल तर ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो त्याबद्दल विचार केला पाहीजे. ही एकी निवडणुकीच्या काळात दिसायला हवी. चुकीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी मोर्चे निघायला हवेत. चांगल्या लोकांनी असं बाहेरून सक्रिय होण्यापेक्षा संसदेत जायला हवं. निवडणुका लढवायचं स्वातंत्र्य आहेच. जो पाठिंबा आज दाखवला गेलाय त्यावरून टीम अण्णांना एखादं विधेयक मांडन्याइतक्या सीटस मिळायला हरकत नसावी.

आम्ही म्हणतो तेच करा असे आदेश संसदेला देणं हे संसदेला आव्हानच आहे. अण्णांचं म्हणणं जरी बरोबर असेल तरीही !

HOOOO...MI ATI SHAHANA...TUMHI MAHA MURKH....

अरवींद केजरीवाल यांनी IIT चेन्नाई इथे केलेले भाषण youtube वर आहे. ४ भागात आहे.

हा पहिल्या भागाचा दुवा. http://www.youtube.com/watch?v=2CHcKlIsvAQ

पुढचे भाग त्याच्याच पुढे दिसतील. बर्‍याच प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली आहेत.

सरकार निलाजरे झाले आहे.
जन लोकपाल संसदेत न्यायला सुद्धा त्यांना भीती वाटतीये.
सरकारी लोकपाल अतिशय तकलादू आहे.
अण्णा आणि किरण बेदी सारख्या लोकांना अटक करण्याआधी ह्यांनी आपली लायकी पाहायला हवी होती.

I pray to god that this fire does not fizz off !

कोन्ग्रेसने चूक केली. त्यांनी अण्णांचे विधायक सन्सदेत आणायला पाहिजे होते. कोणत्यहि पक्षाने ते पास केले नसते कारण पुढे मागे जर त्यांचा पन्तप्रधान झाला तर त्यालाही लोकपालच्या अखत्यारित रहावे लागले असते.

It is very simple, In English Con is opposite of Pro. It simply means Congress is Opposite of Progress. They are following simple English.This has been contributed by my Friend - Dr Chitnis.

काश्मीर स्वतंत्र करा म्हणून गिलानी राजघाटावर आमरण उपोषणाला बसले तर ? >>>

अहो ... एवढे म्हणताहात तर सरळ गांधींना का नाही शिव्या शाप देत ? सुरुवात तर त्यांनीच केली ना ?
उगाच त्यांनी स्वातंत्र्याचा अट्टहास केला. नाहीतर आजही आपण छान पैकी "लॉंग लिव क्वीन" गात बसलो असतो नाही का ?
छान गोर्या लोकांनी आपल्यावर राज्य केले असते ... मज्जा आली असती ! Angry

काय राव ! Sad

मला कळतंय की हे सर्व परफेक्ट चालले नाहीये ? पण आंदोलन परफेक्ट कसे असू शकते ? आंदोलनाने सामाजिक / आर्थिक / राजनैतिक जीवन दोलायमान होणारच ना (त्यासाठी तर आंदोलन करतात !)

आपल्याकडे दुसरा चांगला पर्यायी मार्ग नाहीये. अण्णांना विरोध करून खरंच उपयोग नाही. विरोध करण्यासाठी कारण एकाच असू शकते ... भ्रष्टाचार !

उदय, (बर झाल इन्ग्लिश पोस्ट देवनागरीत टाकलिस)
या सगळ्या घडामोडीन्मधुन सरकार बील पास करेल न करेल, पण जी जनजागृती होत आहे तिनेच जे जे पक्ष अन त्यान्चे कार्यकर्ते अधिकृत पणे "भ्रष्टाचारी" म्हणून आधीपासुनच जनसामान्यात ओळख पावलेत त्यान्च्या पोटात गोळा उठतोय. अन हे जर अण्णान्नी आज नै केले तर मग कोण काय करणार आहे? अन त्यान्नी तरी हे नाही तर नेमके काय करायला हवे होते? स्त्रीयान्करता राखिव जागा ठेवण्याच्या बीलाची जशी वर्षानुवर्षे वासलात लागते तसे लोकपालबीलाचे धिन्दवडे बघत रहायचे? कॉन्ग्रेस की बीजेपी की डावे हा तुम्हाला पडलेला प्रश्न आहे, पण कॉन्ग्रेस जाऊन बीजेपी यावी अन तशी ती आली तरी अण्णान्च्या तोन्डाला पानेच पुसेल हा तर्कही तुमचा आहे, प्रत्यक्षात अण्णाना काय की देशातल्या सर्वसामान्यान्ना या आन्दोलनामुळे कोण आहे यापेक्षा ते कसे आहे/असावे हे निवडण्याची समज येणार आहे हा या आन्दोलनाचा सर्वात मोठा फायदा आहे.
वर आर्निअस ने म्हणले तसे असू शकते, व कॉन्ग्रेसची ती चूकच झालीये [तीच नव्हे तर इतर अनेक जसे की अण्णान्ना त्यान्च्या वर मूर्खासारख्या टीका करुन कॉन्ग्रेसनेच प्रसिद्ध-मोठे केले - त्याचे अर्ध्वयु दिग्गीराजा ( Proud ) इत्यादिक मुखण्डान्वर आवर घातला नाही इतके की जी सर्वसामान्य लोक साधारणतः तटस्थ कुम्पणावर बसुन मला काय त्याचे अशा विचारात असतात त्यान्च्या मस्तकाची शीर देखिल तडतड उडावी इतका यान्चा इफेक्ट होता], पण त्यान्च्या भ्रष्टाचाराच्या तुलनेत बीजेपी किस झाडकी पत्ती आहे हे सामान्य लोकही जाणतात, त्यामुळे सन्सदेत बील मान्डण्याचे धाड्स ते करु शकले नसावेत. इथुन पुढे करतील कदाचित.
यानिमित्ते काल बातम्या झळकत होत्या की "मनमोहन - राहुल गान्धी" यान्चे चर्चेनन्तर त्यान्नी घेतलेल्या निर्णयानुसार अण्णान्ना सोडाण्याचे ठरले! एका अर्थी अण्णान्च्या आन्दोलनाने, "राहुल गान्धीला" महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे निमित्ते पब्लिक समोर आणण्यास मदतच झालीये असे नै वाटत? Wink
अर्थात आमच्यासारखे खवचट कडू लोक लगेच असे विचारतात की अटक झाली तो निर्णय देखिल या जोडगोळीचाच होता ना?

काँग्रेस आणि मित्र पार्टी = २३१
भाजप आणि मित्र पार्टी = १६६
डावी आघाडी = १२६
अन्य = ०१२

म्हणजे जर काँग्रेस पार्टी ने जर बिल पास नाही केले तरी काही फरक नाही पडणार
भाजप आणि डावी आघाडी चे मिळुन २९२ + १२ अन्य = ३०४ होतात...

जन लोकपाल बिल आरामात पास होउ शकते........जर........भाजपा ने आणि डावी आघाडी ने केले तर.... Happy

अवांतर :--------------------------------

उद्या जर प्रत्येक कायद्यात सिविल सोसायटी ला विचारायला लागले तर संसद भंग करावी का????? अशी पण ती चालत नाहीच..आणि विरोधक सुध्दा चालु देत नाहीत..उगाच खरच सुध्दा वाढत आहे..मग.. एक काम करावे
सरकारने एकच संस्था नेमावी त्यात संसद सदस्य (जनतेने निवडुन आलेले सदस्य) आणि सिविल सोसायटीचे सदस्य (अन्ना टीम ने निवडलेले सदस्य) यांचा समावेश करावा.......... प्रत्येक कायद्याच्या विधेयकाला इंटरनेट वर टाकावे एक सरकार चे आणि एक टीम अन्नांचे आणि त्यावर जनतेचा कौल घ्यावा...........ज्याला जास्त प्रतीसाद तो विधेयक पास करावे.............

चुकुन जर सरकार चे विधेयक पास झाले तर माझेच बरोबर आहे म्हणुन अन्ना परत उपोषणाला बसले तर ?????
Happy

यानिमित्ते काल बातम्या झळकत होत्या की "मनमोहन - राहुल गान्धी" यान्चे चर्चेनन्तर त्यान्नी घेतलेल्या निर्णयानुसार अण्णान्ना सोडाण्याचे ठरले! एका अर्थी अण्णान्च्या आन्दोलनाने, "राहुल गान्धीला" महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे निमित्ते पब्लिक समोर आणण्यास मदतच झालीये असे नै वाटत?
----- काँग्रेस सर्वात वयस्कर म्हणुन अत्यंत मुरलेला पक्ष आहे... अण्णांवर (काँगेस नेत्यांनी) केलेल्या टिकेमुळे राहुल गांधी अस्वस्थ झाल्याचे तसेच झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी आपली नापसंती व्यक्त केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे सर्व ठरवलेले नाटक आहे असे वाटते. खरोखरच त्यांना अण्णांबद्दल आदर (किंवा त्यांच्या आंदोलना बद्दल) असेल तर पातळी सोडुन टिका करणार्‍या मंडळींवर त्वरित कारवाई करता आली असती.

.

Pages