अण्णांचे लोकपाल बिल v/s सरकारी लोकपाल बिल

Submitted by उदयन. on 16 August, 2011 - 02:52

http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=9619669

अण्णांचे लोकपाल बिल आणि सरकारी लोकपाल बिल हे दोन्ही यात आहे...
दोघांचे अवलोकन करण्यात यावे..
यात मुख्यतः संघर्ष खालील प्रमाणे
१) प्रकरण ७ मधे....
पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल..
अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा..

२) प्रकरण ८ मधे..
अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराची झडती कोणत्याही वेळी घ्यायला लावु शकतो
सरकारी लोकपाल मधे.. लोकपाल ला आधी एक नोटीस बजावावी लागेल..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत, पण केतकरान्चा कुमार अण्णान्च्या आन्दोलनामुळे हिवरं भरल्याप्रमाणे लिहीत सुटलाय त्याचे ते टिप्पीकल अग्रलेख की फिग्रलेख! Proud

limbu ji saraav kara ki marathi lihaychaa...vaachtana barobar nahi vaatat... Happy ....

aho shuddhalekhanaachaa....sarav....for expl. anuswar detana CRT+m type kara... Happy

GAME NOW IS CLEAR...RAHUL GANDHI LA PUDHE AANALE....TYALA PANTPRADHAN KARANYA SATHICH HE SAGALE....RAHUL LA EK MORAL; POLITICAL BOOST MILANYA SATHI...SAGALE...
RAHUL NE MANMOHAN YANCHYA SHI CHARCHA KELYA NANTAR LAGECH SAGALE FIRALE CHAKRA...

उदयभौ, "हिवरं" वर टाकलाय की अनुस्वार! पण दरवेळेस घोड्यावर स्वार झाल्याप्रमाणे शिफ्ट्+एम दाबायचा कण्टाळा येतो हो! काय करु? Wink
अमि, लोकसत्ताचा सर्व स्टाफ विरुद्ध आहे असे नाही, पण सम्पादक मण्डळातील महत्वाच्या निर्णयक्षम व्यक्ती मात्र नक्कीच विरुद्ध आहेत, इतक्या की ते "एक्स्प्रेस गृपच्या" इतरवेळच्या धोरणाविरुद्ध वाटते. थोडक्यात म्हणजे एक्स्प्रेस गृपच्या लोकसत्ता या वृत्तपत्राला अगदी "टाईम्स गृपची" अवकळा आणलीये केतकरादी मण्डळीन्नी Proud पण असो. (कुठे तो माधव गडकरीन्च्या वेळचा लोकसत्ता, अन कुठे हा सध्याचा.... वाईट वाटते, निदान रात्रपाळीचा सम्पादक तरी....... पण पुन्हा असो.)

लोकसत्ताचे संपादक तीन महिन्यांपासून गिरिश कुबेर आहेत.
कुमार केतकर दिव्य मराठी या दैनिक भास्कर गटाच्या नव्या मराठी वृत्तपत्राची धुरा सांभाळाताहेत.
लिंबूटिंबू आता लोकसत्तातले गेल्या तीन महिन्यातले अग्रलेख पुन्हा वाचून पहा, वेगळा अर्थ लागतोय का ते ; नाहीतर काविळीवर उपचार करून घ्या Happy

>>> भरत, पण केतकरान्चा कुमार अण्णान्च्या आन्दोलनामुळे हिवरं भरल्याप्रमाणे लिहीत सुटलाय त्याचे ते टिप्पीकल अग्रलेख की फिग्रलेख!

लोकसत्ताचे संपादक आता गिरीश कुबेर आहेत. केतकर ३-४ महिन्यांपूर्वीच लोकसत्तातून बाहेर पडले (की बाहेर काढले ?). लोकसत्तातला बदल तुम्हाला जाणवला नाही का? अग्रलेखात आता भाजप नेत्यांना "निगरगट्ट", "निलाजरे", "कोडगे","बेशरम", अशा शिव्या अजिबात नसतात आणि लेखणी झिजेपर्यंत सोनिया स्तुती, राहुल स्तुती, मनमोहन स्तुती इ. देखील बंद झाली आहे. केतकर अजून असते, तर, लोकसत्तातुण एव्हाना हे वरचे सगळे शब्द वापरुण अण्णांचा व अण्णांच्या मागच्या ४२ पिढ्यांचा उध्दार झाला असता. बातम्या पूर्वीसारख्या एकांगी नसतात. मुख्य म्हणजे "कॉन्ग्रेसचे मुखपत्र" ही लोकसत्ताची केतकरांनी दिलेली छबी बदलत आहे.

एक्स्प्रेसचे मुख्य संपादक यांनी अलीकडे वॉक द टॉक मध्ये घेतलेल्या नंदन निलेकनीं आणि अरुणा रॉय यांच्या मुलाखती पाहिल्यात का?इंडियन एक्स्प्रेसनेही समतोल दृष्टिकोन घेतलाय. दोन्ही बाजूचे लेख आहेत.

MASTURE AHO KITI JAAGA A BADALAT AAHET...TUMHI..
KADHI LOKSATTA MADHIL LEKHA VIRUDDH BOLATAAT..KADHI TYALA KUMAR KETKAR JAWABDAR MHANTAT...MAG TO KETKAR NAVHECH HE SAMAJLYA VAR...EKDAM LEKH EKANGI NAHIT ASE VAATU LAGANE...
EKA THIKANI THAMBA JARA...NEM DHARTAA YET NAHI TUMCHYA VAR..... Happy

EK MUDDA CHANGLA AALA AATA CHYA KEJARIWAL CHYA BHASHANAT 11 WAJATA CHYA...
Jr. LEVEL VAR AMUK KAAM KADHI, KITI VELET HOIL ANI TE KON KAREL YAACHA EK CHART OFFICE MADHE LAAVAVAA LAGEL...

१) प्रकरण ७ मधे....
पंतप्रधान, संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल..
अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा..

>> माझ्या मते यात पंतप्रधान उगाच चिकटवण्यात आलेले आहे. पंतप्रधानांना पद्त्याग करावा लागल्यास संसद बरखास्त होइल अशा शंका व्यक्त होत आहेत खरे तर संसद आणि न्यायालयातिल भ्रष्ट लोकांना वाचवण्यासाठी पंतप्रधानची ढाल पुढे होत आहे. माझ्यामते हा मुद्दा असा असावा

पंतप्रधान व्यतिरिक्त इतर संसद सदस्य आणि न्यायमुर्ती यांच्या विरोधात कोणाला ही खटला आणि तपास सुरु करण्या पुर्वी खंडपीठाच्या ७ सदस्यी समिती ची परवानगी घ्यावी लागेल..
अण्णांच्या लोकपालात कोणाविरुध्द ही तपास आणि खटला भरता यावा..

२) प्रकरण ८ मधे..
अण्णांच्या लोकपाला मधे..लोकपालाला हवे असल्यास संशय असल्यास तो संबधीत व्यक्तीच्या घराची झडती कोणत्याही वेळी घ्यायला लावु शकतो
सरकारी लोकपाल मधे.. लोकपाल ला आधी एक नोटीस बजावावी लागेल..

हा योग्य मुद्दा आहे नोटिस दिल्यावर घरात काय मिळणार आहे काय राव?

आण्णानी मसुदा जनतेला दाखवावा ही मागणीच हास्यास्पद आहे. आण्णानी सरकारचा मसुदा वाचला, तो त्याना पटला नाही, त्यानी त्याला विरोध दर्शवला. आण्णांची कृती ही घटनेने जनतेला दिलेल्या अधिकारानुसारच आहे.

लोकानी सरकारचा मसुदा वाचावा, आण्णांचा नव्हे! सरकारचा मसुदा जर लोकाना पटत नसेल तर लोकानीही त्याला विरोध्/बदल/सूचना इ करावे. आण्णानी किंवा इतर लोकानी त्यांच्या बिलात काय म्हटले आहे याच्याशी इतर लोकांचा संबंध येतच नाही.

जनलोकपाल विधेयकाचेच कायद्यात रूपांतर व्हावे अशी मागणी आहे ना?की फक्त चर्चा चर्चा खेळण्यासाठी आहे तो मसुदा? मग संबंध येत नाही असं कसं म्हणता?

सध्याच्या स्थितीवरुन एक स्पष्ट झाले आहे..की..
३ मुद्द्यांवरुन आता मतभेद आहेत
१) न्यायालय यांना कक्षेत आणावे का ?
२) कनिष्ठ सरकारी कर्मचारी यांना कक्षेत आणावे का ?
३) कामाची माहीती आणि वेळे साठीचा तक्ता हा संबधीत कार्यालयात जनतेच्या माहीती साठी लावावा का..आणि काम वेळेवर नाही झाले तर वेतनकपात करावी का..?

१) मुद्यावर मतभेद असणारच आहे..कारण घटनेने न्यायसंस्था ही स्वतंत्र ठेवलेली आहे..त्यावर सरकारचे नियंत्रण नसतेच...त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळे विधेयक आणावे या मागणीला काहीच विरोध नसावा...ते विधेयक सुध्दा कडक निर्बंध असणारे असावे यात दुमत कोणाचेच नसणार...

२) जर वरीष्ठ कर्मचारी यांना आणावे का....? याचे उत्तर नक्कीच हो आहे..कारण सुरुवात होतेच क्लार्क पासुन भ्रष्टाचाराची.. यावर सरकार का त्यांना पाठीशी घालत आहे हे कळत नाही..५८ वर्षे आता आपली नोकरी जाणार नाही या विचाराने सरकारी नोकरांना माज येतो..आणि भ्रष्टाचारला सुरुवात करतात.. कनिष्ठ वर्ग नक्कीच आणावा..त्याच बरोबर इतर खाजगी कंपन्यांना सुध्दा आणावे यात...मिडीया, स्वयंसेवी संस्था इत्यादी सगळ्यांनाच आणावे... त्यांना जनलोकपाल बिलात का बरे बाहेर ठेवण्यात आले आहे... हे जरा संशयाचे आहे..

३) कामाची माहीती आणि वेळे साठीचा तक्ता हा संबधीत कार्यालयात जनतेच्या माहीती साठी लावावा का..आणि काम वेळेवर नाही झाले तर वेतनकपात करावी का..?........ हा तक्ता काही कार्यालयात मी बघितला आहे..उदा राशन ऑफिस मधे...बाकी ठीकाणचे माहीत नाही...म्हणजे तक्ता लावावा हा कायदा आहे फक्त त्यांची अंमलबजावणी व्यवस्थीत होत नाही....ते व्यवस्थीत करावे.. वेतनकपात करावी की नाही यावर दुमत होउ शकते..काही कारणास्तव काम नाही वेळेत झाले तर.. उशीर का झाला याची परिस्स्थिती पाहुन वेतन कपात करण्यात यावी...सरसकट न्याय लावुन करु नये..

या बाबींवर सरकार आणि अण्णा यांच्यात मतभेद असल्याने त्यात सुवर्णमध्य काढुन ३ मुद्दे समाविष्ट करावेत

न्यायालयांच्या मुद्द्यावर सहमत झालंय बहुतेक. न्याययंत्रणेसंबंधीचं वेगळं विधेयक जे सरकारने तयार केलेलं आहे, ते लोकपाल विधेयकाच्या जोडीन मांडावे अशी मागणी आहे.

आता संपूर्ण शासकीय यंत्रणेला लोकपालाच्या कक्षेत आणावं का आणि लोकपाल कायदा फक्त केंद्राला लागू असावा की राज्यांनाही हे दोन मुद्दे उरलेत.
सरकारचं म्हणणं फक्त वरिश्ठ अधिकार्‍यांना लोकपालाच्या विधेयकात आणावं. राज्यांनी त्यांचे वेगळे कायदे करावेत्...संघीय व्यवस्थेत एकच कायदा बसत नसावा. किंवा त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल.

आत्ताच बातमी आली की पंतप्रधानानी जनलोकपालावर संसदेत चर्चेसाठी मांडावे.......असा प्रस्ताव मांडला आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना दिलेलं घटनादत्त संरक्षण हे मुलभूत स्वरूपात आहे. त्या स्वरूपाला धक्का लावायचा असल्यास किंवा घटना बदलायची असल्यास ३/४ बहु मत लागतं अशी माझी समजूत आहे.

आत्ता...पंतप्रधान आणि संसदेने केलेल्या आहवानाला जर टिम अन्ना नी प्रतीसाद दिला नाही तर ही फार मोठी चुक म्हणुन पुढे येयील... आता जर हट्ट केला टीम अण्णांनी तर मग अण्णां संसद विरोधी आहे ही भावना सर्वच पक्षात येयील

सरकारचं म्हणणं फक्त वरिश्ठ अधिकार्‍यांना लोकपालाच्या विधेयकात आणावं. राज्यांनी त्यांचे वेगळे कायदे करावेत्...संघीय व्यवस्थेत एकच कायदा बसत नसावा. किंवा त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल.

याबाबत केंद्राचाच कायदा हवा. प्रत्येक राज्याला स्वायत्तता दिली तर प्रत्येक राज्य हवा तसा कायदा करणार.

याबाबत केंद्राचाच कायदा हवा. प्रत्येक राज्याला स्वायत्तता दिली तर प्रत्येक राज्य हवा तसा कायदा करणार>>>>
जामोप्या......... असे कसे होईल कायदा हा कायदाच असतो.....भरत यांचा रोख पोलीस महासंचालक, सचिव इत्यादी जे राज्यसरकार च्या अधिकार क्षेत्रात येतात त्यांच्याविषयी आहे......यात केंद्र हस्तक्षेप करत नाही.. आय एस ऑफिसर हा केंद्र सरकार च्या अधिकारात असतो.. बाकीच्यांसाठी राज्यसरकारच जवाबदार असते...

अतिशय योग्य सूचना आहे, बाळासाहेबांनी अण्णांना केलेली. बाकिचे साथिदार बेदि, भुषण, सिसोदिया, केजरिवाल यापैकि कोणिच कसे उपोषणाला बसत नाहि. "अण्णा तुम लढो, हम कपडा संभालता है" हेच त्यांचं धोरण आहे का? आजवर मिडिया, आंदोलनाचे समर्थक यापैकि कोणिहि अजुन हा प्रश्न त्यांना कसा विचारला नाहि?

Pages