देशील का?

Submitted by मंदार-जोशी on 15 August, 2011 - 08:36

पावसाचं कौतुक मला नाही फारसं
पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
नकळत माझं मन
शोधू लागलंय साम्य त्याच्यात
आणि तुझ्या केसांच्या गंधात

या मातीच्या गंधासारखाच
तुझ्या केसांचा गंधही
जाणीव करुन देतो मला
की रोजच्या रहाटगाडग्यात
दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला
बंद करुन ठेवलंय आधीच,
माझ्या हृदयाच्या कुपीत
त्याच्या जोडीला हवाय मला "तो"

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?

deshilka.GIF

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 

छान Happy

क्या बात है....मंदारभौ...लईच झ्याक जमायला लागल्यात कविता...

दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे

हे फार म्हणजे फार आवडलं....अजून लिहीत जा

पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
...आणि हुंदडती पाडसे गाईची पिऊनी गंधित वारा...
विस्मरणात गेलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या..
छान सुगंध मातीचा,कवितेचा,....केसाचा सुगंध तुम्हीच ध्या.

ही पण कविता मस्तच! Happy काय एकावर एक हळुवार कवितांचा सिझन आलाय का मंदारच्या मनात??? सावन का महिना असल्याचा इफेक्ट का रे हा? Happy

सुंदर Happy

ये बात !!! छान ..मस्त...सुरेख.....

देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?>>> इथपर्यंत उंची वाढत वाढत जाते आणि शेवटच्या कडव्यात कविता खाली येते मंदार....एक अस्वस्थता कायम ठेवून जाईल का काय असे वाटत असताना कवितेचा पुन्हा एकदा पारंपारीक शेवट होतो.

शुभेच्छा

रिक्षा चालते मला.. पण हल्ली माबो वर येण्च होत नाहिये. क्षमस्व खुप उशिराने प्रतिक्रिया देत आहे...
>> दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे>> ह्या ओळी सुंदर Happy

देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?>>>>>>>>>>>>>>> काय मस्त लिहल आहेस मंदार दा Happy खुप भावली
खालचा फोटो पण एकदम सुटेबल आहे Wink

Pages