पावसाचं कौतुक मला नाही फारसं
पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
नकळत माझं मन
शोधू लागलंय साम्य त्याच्यात
आणि तुझ्या केसांच्या गंधात
या मातीच्या गंधासारखाच
तुझ्या केसांचा गंधही
जाणीव करुन देतो मला
की रोजच्या रहाटगाडग्यात
दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे
देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?
ओल्या मातीच्या सुगंधाला
बंद करुन ठेवलंय आधीच,
माझ्या हृदयाच्या कुपीत
त्याच्या जोडीला हवाय मला "तो"
देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मंदार रचना छान आहे !
मंदार रचना छान आहे !
आवडली!
आवडली!
छान
छान
अरे वा ! काय रे काय झालय?
अरे वा ! काय रे काय झालय? एकदम नवा मंदार ?
क्या बात है....मंदारभौ...लईच
क्या बात है....मंदारभौ...लईच झ्याक जमायला लागल्यात कविता...
दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे
हे फार म्हणजे फार आवडलं....अजून लिहीत जा
पण पहिला पाऊस आल्यावर
पण पहिला पाऊस आल्यावर येणारा
ओल्या मातीचा गंध नेहमीच मला सुखावतो
एका श्वासासरशी माझ्या गात्रागात्रांना कुरवाळतो
...आणि हुंदडती पाडसे गाईची पिऊनी गंधित वारा...
विस्मरणात गेलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या..
छान सुगंध मातीचा,कवितेचा,....केसाचा सुगंध तुम्हीच ध्या.
वाह वाह ! मस्तच मंदार. मला
वाह वाह ! मस्तच मंदार. मला खुप आवडली ही कविता.
चांगली आहे कविता! आवडली.
चांगली आहे कविता! आवडली.
अप्रतिम . खरच मंदार सुटलायेस
अप्रतिम . खरच मंदार सुटलायेस अगदी.
आणखी येऊ देत . खूप सुंदर
मस्तच
मस्तच
व्वा! अप्रतिम...
व्वा! अप्रतिम...
सुंदर! मंदारचा एकदम अलवार
सुंदर! मंदारचा एकदम अलवार झालाय; काय विशेष?
ही पण कविता मस्तच! काय एकावर
ही पण कविता मस्तच! काय एकावर एक हळुवार कवितांचा सिझन आलाय का मंदारच्या मनात??? सावन का महिना असल्याचा इफेक्ट का रे हा?
(No subject)
मस्त रे मंदार... देशील का मला
मस्त रे मंदार...
देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?
सहीच!
यात भाव सहजतेने आलाय ....अगदी
यात भाव सहजतेने आलाय ....अगदी अलगद....
सुंदर
सुंदर
ये बात !!! छान
ये बात !!! छान ..मस्त...सुरेख.....
देशील का तुझ्या केसांचा गंध,
देशील का तुझ्या केसांचा गंध, कायमचा?>>> इथपर्यंत उंची वाढत वाढत जाते आणि शेवटच्या कडव्यात कविता खाली येते मंदार....एक अस्वस्थता कायम ठेवून जाईल का काय असे वाटत असताना कवितेचा पुन्हा एकदा पारंपारीक शेवट होतो.
शुभेच्छा
रिक्षा चालते मला.. पण हल्ली
रिक्षा चालते मला.. पण हल्ली माबो वर येण्च होत नाहिये. क्षमस्व खुप उशिराने प्रतिक्रिया देत आहे...
>> दमलला, पिचलेला, हरवलेला, माझ्यातला "मी"
अजून पुरता जिवंत आहे
वैतागलेला, कंटाळलेला, सरावलेला रोजचाच "मी"
त्याच्याचमुळे श्रीमंत आहे>> ह्या ओळी सुंदर
क्या बात है.. मंदार खुलला
क्या बात है.. मंदार खुलला आहेस एकदम..
तु पाटणकर वाचलेस का..?
वाच मिळाल्यास..
सुं द र!!!!!!
सुं द र!!!!!!
देशील का मला तो गंध,
देशील का मला तो गंध, कायमचा?
मी जिवंत असल्याचा पुरावा म्हणून?>>>>>>>>>>>>>>> काय मस्त लिहल आहेस मंदार दा खुप भावली
खालचा फोटो पण एकदम सुटेबल आहे
नविन काही नाही
नविन काही नाही
कुणी वर आणली हे पहात होतो.
कुणी वर आणली हे पहात होतो. निराशाच झाली
जीवंतपणाचा पुरावा!
जीवंतपणाचा पुरावा! मस्तच...................
झ्याकच....!
झ्याकच....!
मस्त!
मस्त!
किरण तुला कोण अपेक्षित होतं?
किरण तुला कोण अपेक्षित होतं?
supercalifragilisticexpialido
supercalifragilisticexpialidocius....
i am happy that u have returned 2 mb
Pages