वांगे बेक्ड व शॅलोफ्राय

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 August, 2011 - 04:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वांगी
ब्रेडचा चुरा (ब्रेड मिक्सरमधुन काढून)
मटार दाणे
१ गाजर किसुन
बटाटे बारीक कांद्यासारखे चिरुन
फ्लॉवर बारीक चिरुन
सिमला मिरची बारीक चिरुन
टोमॅटो बारिक चिरुन
आल, लसुण बारीक चिरुन
हिंग, हळद, मसाला
किंचीत साखर
चविपुरते मिठ
अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा गोडा मसाला (पण मला ह्यापेक्षा पावभाजी मसाला जास्त चांगला लागेल अस वाटत)
तेल

क्रमवार पाककृती: 

गणपा यांची बेक्ड वांग्याची रेसिपी पाहीली आणि ही करायचीच असे मनाशी ठरवले. काही दिवसांपुर्वी सकाळीच मोठ्या वांग्याची भेट आलेली हाही एक योगायोग होता. मग घरी जाताना भाज्या घेउन जाण्याचा खटाटोप केला. आणि खालील भरले वांगे दोन प्रकारे तयार केले एक बेक करुन आणि एक फ्राय करुन.

खालील तयारी आधी करुन ठेवली

सगळया वांग्याचे दोन उभे भाग केले.एका वांग्यातील दोन भागांचा गर सुरीने काढुन घेतला

बाकीची कापलेली वांगी मायक्रोवेव्ह मध्ये २ - २ मिनीटे करत ७ ते ८ मिनीटे भाजुन घेतली. ह्या वांग्यामध्ये भरपुर बिया असल्याने मी त्या घेतल्या नाहीत. थोडा गर होता तो भाजीत टाकला. जाडी वांगी मायक्रोवेव्ह मधे न टाकता तव्यावर शॅलोफ्राय करण्यासाठी तशी च ठेवली.

कढईत तेलावर आल लसुण टाकुन हिंग, हळद मसाला घालून त्यावर फ्लॉवर, मटार, गाजर, बटाटा, वांग्यातील गर ह्या भाज्या टाकल्या. ह्या भाज्या शिजत आल्यावर त्यात मिठ, गोडा व गरम मसाला, किंचीत साखर घालुन टोमॅटो व सिमला मिरची घातली. चांगली वाफ आल्यावर थोडा वेळ झाकण काढून शिजवली भाजी त्यामुळे ती पुर्ण सुकी झाली.

आता बेक करुन गर काढलेल्या व कच्च्या वांग्याचे गर काढलेल्या वांग्याच्या वाटीत भाजीचे पुरण भरले.

वरुन ब्रेडक्रम्ब्स लावले.

आता बेक केलेली पुरण भरलेली वांगी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये १-१ मिनीट करत ४ ते ५ मिनीटे ठेवली.

कच्ची पुरण भरलेली वांगी तव्यात शॅलो फ्राय केली.

ओव्हन नव्हता त्यामुळे मायक्रोवेव्हमधील वांग्याला एवढा भाजका वास आला नाही. त्यामुळे बेक वांगे खास वाटले नाही. गणपांनी सांगितलेच होते के मावेत तो फिल येणार नाही. पण वेळ वाचवायचा होता व निखारे करायचा कंटाळा आल्याने मी मायक्रोवेव्ह ट्राय केला.

पण शॅलो फ्राय केलेले वांगे मात्र तोंपासु. खुच चविष्ट लागले.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक भाग.
अधिक टिपा: 

तळलेलेच मला जास्त चांगले वाटले.

ब्रेड क्रम्स ऐवजी रवाही वापरू शकता.

जाडी वांगी असतील तर ओव्हनमध्ये निट शिजणार नाहीत.

माहितीचा स्रोत: 
मिसळपाव वरील गणपा यांची पाककृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! आणि वांगी पण ताजी मिळाली होती की.
इजिप्तमधे असा प्रकार करतात. ते अर्थात खिमा भरतात. किंवा नुसता कच्चा लसूणही भरतात.

चातक, भुंगा, निराली धन्यवाद.

दिनेशदा हो आमच्याकडे ताज्या भाज्यांच्या चांगल्या भेटी येतात वकिलसाहेबांना.

मस्त वाटत आहे .. रेसीपी कसली सोलिड दिसतेय.. जागु तुम्ही ग्रेट आहात .. नाव वाचुन अस काहि असेल अस वाटल पण नव्ह्त. पण मस्तच..

इजिप्तमधे असा प्रकार करतात. ते अर्थात खिमा भरतात.<<<<<<<<<दिनेशदा, मी तरी असा प्रकार ईजिप्तमध्ये बघितला नाही.

जागु, त्या पुरणात कोलंबी/करंदी घालुन पण चांगली(च) लागतील.

छान

चीज घालून लसान्या करून बघा. मस्त लागते. खिमा फिलिन्ग बरोबर. आपण वांगे मार्गी नाही त्यामुळे फक्त द्रूष्टी सूख.

दक्षे अशा रेसिपज ऑफिसातुन घरी गेल्यावर लगेच लागते करायला. मधे मधे मुलीचा अभ्यास आणि खाऊ अमुक तमुकही असत. आणि हल्ली ऑफिसमध्ये नेट खुप स्लो आहे. त्यामुळे रात्री ११-११.३० ला बसुन फोटो, रेसिपीज लोड करते. सगळी तुमच्या प्रोत्साहनाची कृपा आहे म्हणायची.

चिउ Happy

मामी मलाही वांगे भाजित आवडात नाही. वांग्याच्या फ्राय चकत्या, भाजुन केलेले भरीत मात्र आवडते.