Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 23, 2008

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » मुलांचे खाणे » लहान मुलांसाठी खाद्य » Archive through May 23, 2008 « Previous Next »

Dhanu66
Monday, January 29, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभरी आहे. वरील सग्ल्या लिन्क्स वाचल्या. खूपच उपयोग होईल ह्या माहीतीचा.

Deepant
Wednesday, February 07, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks sami, sorry for sooooooooo late reply.

Jagu
Thursday, May 17, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी दिड वर्षाची आहे. सात आठ दिवस टिकतील असे गोड सोडून कुठले पदार्थ करता येतिल? ती गोड खाण्याचा कंटाळा करते.

S1sd
Friday, June 15, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज़गु

खुप सारे करण्या सारखे आहे.
जीरे पुरी, ओव्याच्या शन्करपाळ्या,
घवाचे बिस्किट......
वगेरे वगेरे.............


Jagu
Tuesday, July 24, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दर्शना. मला गव्हाच्या भिस्कीटांची आणि ओव्याच्या शंकरपाळ्यांची रेसिपी दे ना.

Jagu
Tuesday, July 24, 2007 - 6:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारु तू मागिल पोस्ट मध्ये घरी चाॅकलेट बनवायचे लिहिले आहेस. ते जरा सविस्तर सांग प्लिज.

Skdeep
Thursday, October 18, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या ५ वर्षाच्या मुलाला मला लन्च साठी काय द्यायचे हा मोठा प्रश्न आहे कारण इथे आम्ही राहतो तिथे आणी त्याच्या शाळेत फार इन्डियन्स नाहीत एक दोन वेळा पराठे धिरडे दिले मसाले न घालता तरी इतर मुलाना त्याचा वास आवडला नाही, नाके बन्द केली रोज पिझ्झा किन्वा चिकन नगेट्स देणे मनाल पटत नाही कारण चीज़ ने इथल्या मुलान्मध्ये दिसणारा लठ्ठपणा नगेट्स ही फ़्रोज़न असतात कोणी आपले अनुभव सान्गू शकेल का?

Chetu08
Friday, October 19, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazi ek maitrin tichya mulala idli, noodles, upma, pulav, sandwich ase padarth dete. khatana hat kharab hot nahit

Shonoo
Friday, October 19, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलांच्या डे केअर मधे सगळे डबे फ़्रीज मधे ठेवावे लागतात. अन ते काहीही अन्न गरम करून देत नाहीत. माझ्या मुलांना पास्ता, मॅगी नूडल्स अजिबात आवडत नाहीत. मी त्यांना डोसा, इडली, उत्तपा, मेथीचे पराठे, साधे गुंडाळीचे पराठे, पीनट बटर किंवा जेली सँडविच असे प्रकार देते. याशिवाय एक फळ, एक दही, पुडिंग किंवा चीज़ अन एक 'खाउ' टाइप काहीतरी देते (एखादी ओरिओ कूकी, चकली, गाठिया, केळ्याचे वेफ़र्स.) कधी छोटी गाजरं, काकडी असं देते. अधून मधून पिस्ते, अक्रोड, पीकॅनस, मनुके, खजूर असा काही सुका मेवा देते. क्वचित चिकन नगेटस दिलेत पण ते माझी मुलं गार खात नाहीत :-)

मुलं जर खात असतील तर Mac and Cheese, Raviol असले प्रकार द्यायला हरकत नाही. रोज एकच प्रकार नेऊन ती पण कंटाळतात. आलटून पालटून काही तरी द्यावं. पाचेक वर्षाच्या मुलांना त्यांना विचारून त्यांच्या आवडीचा एखादा प्रकार द्यावा. If they are involved in choosing, they are more likely to eat it.

नवीन पदार्थ देताना आधी घरी दोन्-तीनदा देऊन सवय करावी. मग शाळेत द्यावा. बरेच वेळा शिक्षकांचं नीट लक्ष असतं कोण काय खातं याच्याकडे. त्यांच्याशी बोलून त्यांना पण आपल्या पदार्थांची ओळख करून द्यावी.


Mrinmayee
Friday, October 19, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

skdeep , चीझमुळे मुलांना लठ्ठ्पणा येतो ही समजुत बरोबर नाही. त्यासाठी बरीच कारणं आहेत. मैदा, साखर, अतीशय ग्रीजी, तळकट पदार्थ आणि त्या मानाने शरीराला व्यायाम अगदीच कमी! मुलं जाड होणार ती अश्यानी!
रोज चीझ खायला घालायला हरकत नाही. प्रमाण अल्प असावं!
माझा मुलगा न्यु यॉर्कला ज्या डे केअरमधे जायचा, तीथे अतीशय स्ट्रिक्ट अशी 'नो शुगर' पॉलिसी होती. अगदी वाढदिवसालाही कुकीज, केक, पेस्ट्री, पाय चालायचं नाही. तसच पुडिन्गज, साखर घातलेलं विकतचं दही हे पण चालायचं नाही. (सुरवातीला एकदा इडली साखर दिली तर त्याला विचारलं 'चव कशी आहे? चिरंजीव बिचारे प्रामाणिकपणे म्हणाले "गोड"! त्यानंतर तेही बाद झालं!)पण सुदैवानं अन्न गरम करून द्यायचे. तेव्हा मी हे पदार्थ लंच मधे द्यायचे...
फोडणीची इडली
पालक पुर्‍या किंवा पराठे (बटाट्याचे, पालकाचे किंवा मिक्स्ड भाज्यांचे तसंच क्वचित चीज घालून)
पुलाव किंवा वेज / चिकन बिर्यानी
कोल्ड कट सँडविचेस
पास्ता
पोळीच्या रोल मधे आवडती भाजी भरून फ़्रँकी
पिझ्झा (घरी डो आणून केलास तर चीज किती टाकायचं, टॉपींग्ज कुठली ते ठरवता येतं. आणि उघड्या स्लाईस ऐवजी सगळीकडून बंद करून बेक करता येतो. छोटे छोटे पिझ्झा पॉकेट्स)
गुड लक! :-)


Saj
Monday, October 22, 2007 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Skdeep,
mazi mulagi suddha 1st grade madhe aani shalet kiva areat konich indian nahit, tyamule ti suddha aaple padartha dabyat nyayala nako mhante, pan ti ghari donhi veles vyavasthit bhaji poli varan-bhat vagaire khate. tyamule mag mi tila ek diavasa aad wheat bread che peanut butter sandwich dete, kadhi chicken nuggets aani jelly sanwich dete, cheese sanwich aani mag kadhi tari sheera ,chatni lavun dosa roll dete.
aani snacks sathi apple slices,grapes,peanut butter cookies,peanuts,cheese puffs,cheerios,granola bar,cookie vagaire ase kahi dete.
roj kahi navin deta yet nahi pan joparyant te ghari nit jevatat toparyant no problem.

Madhura
Monday, October 22, 2007 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी ,
lunch box ideas ही लिंक बघा.

Prr
Thursday, February 21, 2008 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Madhura....
very nice link..thanks!

Pinku
Thursday, February 21, 2008 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bookmark the following link , it has a good compilation of all the lunch ideas for the kids.
http://www.aayisrecipes.com/lunchbox-recipes/

Based upon these lunch ideas, you can make sample menu. Its very helpful and handy for packing the daily lunch.

(sorry for posting in english, maayboli crashes on my IE browser).


Dhanu66
Monday, May 12, 2008 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलाला ( वय ४.५ वर्षे) आठवड्यातून एक दिवस पालेभाजी डब्यात मस्ट असते आणी एक दिवस फ़र्मेटेड पदार्थ.
पराठे त्याला आवडत नाही आणी भाजी पोळी दिली तर ती थंड होते.
तर पालेभाजी वापरुन काय करता येईल मला?
आणी इडली, डोसा, उत्त्पा, आप्पे खाऊन तो कंटाळला आहे.

काही सुचवाल का?


Mrinmayee
Monday, May 12, 2008 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चीज्-पालक रव्हीओली किंवा लजानिया, (थंड देखील वईट लागत नाही.)
मुलं कडू चव म्हणून खात माहीत, पण आवडत असेल तर कोवळी मेथी पानं चणा डाळ मूग डाळ घालून मुटके. मुटक्यांऐवजी त्याच्याच वड्या केल्या तर त्या ब्रेड्मधे भरून सँडविचेस,
पालक पुलाव . (इथेच कुठेतरी पालक पुलावाची कृती बघीतली होती.)
पालक क्रीमचीज स्प्रेड घरी तयार करून ब्रेड तव्यावर खरपुस भाजून त्यावर पसरून देता येईल.
थालीपीठं आवडत असतील तर भाजणीच्या थालीपीठात भरपूर कोथींबीर, पालक, मेथीपानं घालून ती देता येतील.


Dineshvs
Monday, May 12, 2008 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेथीचे मुटके, कोथिंबीर वडी, अळुवडी सारखी पालकाची वडी, पालकपुर्‍या, असे बरेच प्रकार आहेत. मेथीचे ठेपले पण करता येतील. हे सगळे प्रकार थंड खाल्ले तरी चालतात.

पराठे वगैरे करताना जर पिठ दूधाने भिजवले, तर ते पराठे थंड झाले तरी चिवट होत नाहीत. पराठ्याची नावड घालवण्यासाठी फ़ळांच्या चवीचे पराठे हा चांगला पर्याय आहे. कुठल्याही आवडत्या फ़ळाच्या रसात वा गरात, थोडेसे तूप आणि मीठ घालून पिठ भिजवायचे. अजिबात पाणी वापरायचे नाही. या पराठ्याना, फ़ळांचा छान स्वाद येतो.
पालेभाजी आणि फ़ळभाजी यांचे सारण वापरून छोटे मोदक किंवा दिम सम सारखा प्रकार करता येईल. कुठलिही पालेभाजी, भाजणी वा पिठ पेरून करायची. ती नुसती खाल्ली तरी चालते.

इडलीच्या जागी ढोकळा करता येईल. ढोकळ्याचे अनेक प्रकार आहेत इथे.


Lajo
Tuesday, May 13, 2008 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भात आणि पालेभाज्या घालून वड्या पण करता येतील.
भात शिजवून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचा, पालेभाजीची कांदा-लसूण जीरे घालुन भाजी करायची. यात हवे तर गाजराचे तुकडे, मटार, मक्याचे दाणे ई सुद्धा घालता येईल.
आता भात आणि भाजी एकत्र कालवायची, थापण्या इतपत घट्ट भिजवायचे एखादा ब्रेडचा स्लाईस पाण्यात थोडासा ओला करून घ्यायचा आणि तो भात भाजीच्या मिश्रणात कालवायचा. मीठ, हवातर थोडा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला घालायचा. आता एखादा खोलगट पॅन घेऊन त्यात तेल घालायचे, सगळीकडे नीट पसरायचे. त्यावर हे मिश्रण थापायचे आणि वर झाकण ठेवायचे. मंद आचेवर खरपूस भाजायचे. (थिकनेस १ इंचाच्या आसपास ठेवायचा. ज़ास्त थिक थापले तर आत मऊ रहाते.) एक बाजू झाली की झाकण काढुन तव्यावर प्लेट ठेवायची आणि वडी उलटायची. आणि दुसरी बाजु परत तव्यावत सरकवायची दुसरी बाजु खरपूस भाजायची. किंवा एक बाजू झाली की वरच्या बाजूवर किसलेले चीज पसरायचे आणि ग्रीलर खाली वरची बाजू ग्रील करायची. साॅस बरोबर गरम किंवा थंड छान लागते.
वेळ आसेल तर याच मिश्रणाची छोटी छोटी थालीपीठ करायची.

उकडलेल्या पालेभाज्या आणि उकडलेला बटाटा थोडे मीठ, मसाला घालून मळून घ्यायचे. हे मिश्रण घालून ब्रेड रोल, पोळी रोल, पफ़ पेस्ट्री वगैरे करता येतील.


Dhanu66
Friday, May 23, 2008 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हा सगळ्यांना धन्यवाद.

पफ़ पेस्ट्री कशी करतात?


Dineshvs
Saturday, May 24, 2008 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनु, पफ़ पेस्ट्री घरी करणे अशक्य नसले तरी अत्यंत जिकीरीचे आहे. बाजारात ती फ़्रोझन मिळते. ती आणून, थॉ करून, लाटून आपल्याला हवे ते प्रकार करता येतात. बेक करायच्या सूचना, पाकिटावर असतातच.
पण लहान मुलांसाठीच काय मोठ्या माणासाना पण देताना, त्यातील जास्त प्रमाणातील चरबीचा, विचार करायला हवा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators