चांदणे आहे खरे की... (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 11 August, 2011 - 02:07

चांदणे आहे खरे की भास नुसता?
भूतकाळाचा जिवाला त्रास नुसता!

अजुनही तितकीच आवडते मला ती
अजुनही फुलतो मनी मधुमास नुसता

अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!

मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता

ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता

अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता

मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!

मी कशी फेडू उधारी जीवना ही?
घेत असतो रोज मी गळफास नुसता

मी किती जगलो मलाही आठवेना
घेतला मी शेवटीही श्वास नुसता

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2011/08/blog-post_11.html)

गुलमोहर: 

शाम, "धरेचा नुसता व्यास मोजला आहे, अंबराचा थांगही लावेन म्हणतो" असंच म्हणायचं होतं...>>>>

पण मला काहीच म्हणायचं नव्हतं...

मी फक्त स्वतः पुरता तसा वाचून मजा अनुभवली नि शेअर केली...

बाकी "expression"च मला जास्त कळत नाही....शिकेन हळूहळू ..तोवर सांभाळून घ्या Happy
..................धन्यवाद!!!!!

Pages