वैभव जोशी यांच्या गझल, कवितांची अनोखी मैफील - शब्द झाले मायबाप

Submitted by किरू on 9 August, 2011 - 02:25
ठिकाण/पत्ता: 
२० ऑगस्ट रोजी, टिळक स्मारक मंदीर, पुणे

.
काही दिवसांपूर्वी तिन मायबोलीकर गप्पा मारत होते.
'पूर्वी कसली मजा यायची माबोवर.'
'का रे? मजा तर आताही येते.'
'तस नाही रे. काही वर्षांपूर्वी माबोला सुगीचे दिवस होते. बरेचजण उच्च लिहायचे.
कविता, गझल, लेख... मेजवानी असायची नुसती. ती गंमत हल्ली नाही येत. डोळ्यांना, कानांनाही सवय होते उत्तम वाचायची, उत्तम ऐकायची. एकदा का ती सवय झाली की मन फक्त तोच दर्जा स्विकारतं.'
'हे मात्र खरं. हल्ली वैभव जोशी तर काहीच लिहित नाही.'
'हो रे.. तिच तर खंत आहे. कुठे गेले हे लोक?'
'वैभव हल्ली बराच बिझी असतो त्यामुळे वेळ मिळत नाही त्याला तेवढा.'
'अरे मग आम्हाला त्याच्या कविता वाचायला कशा मिळणार?'
'हं.. ए आपण असं केलं तर? आपण वैभवचा कविता, गझलचा कर्यक्रम अ‍ॅरेंज केला तर?'
'मस्त आयडीया'

हा एकच विचार मनांत आला आणि पुढलं सगळं मनासारखं घडत गेलं.
हे तिन मायबोलीकर म्हणजे आनंदमैत्री (आनंद चव्हाण), कौतुक शिरोडकर, किरू (किरण सामंत).
सुरूवातीला छोटं स्वरूप डोळ्यासमोर असलेला हा कार्यक्रम आता भव्य होऊन कागदावर उतरलाय.
आनंदाची गोष्ट म्हणजे यातून एका संस्थेची निर्मिती झाली. सृजन थिएटर्स, मुंबई.

तेंव्हा आता सृजन थिएटर्स, मुंबई, २० ऑगस्ट २०११ रोजी आपला आवडता मायबोलीकर वैभव जोशी याच्या गीतांची आणि गझलांची एक अनोखी मैफील घेऊन येत आहे.

szmb.jpgszmb2_1.jpg

कार्यक्रमांत सहभाग असणार आहे यांचा..
szmb4_2.jpg१) वैशाली सामंत
२) राहूल देशपांडे
३) अमृता नातु
४) रघुनंदन पणशीकर
५) मधुरा दातार
६) दत्तप्रसाद रानडे
७) जयदीप बागवाडकर
८) जान्हवी प्रभू - अरोरा

आणि गझल, कविता सादर करतील...
सौमित्र आणि स्वतः वैभव जोशी..
सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांच असेल.

एवढा भव्य कार्यक्रम करायचा म्हणजे खर्चही तितकाच भव्य असणार. या खर्चाचा भार पेललाय आपलेच एक मायबोलीकर श्री. राम चिंचलीकर यांच्या एलिगंट केअरटेकर या कंपनीने.
त्याशिवाय आपल्या बर्‍याच मायबोलीकर मित्रांची मेहनत आहेच. ते सगळं कार्यक्रमानंतरच्या वृत्तांतात येईलच.

हा मायबोलीकरांनी मायबोलीकरांकरता योजलेला मायबोलीकरांचा कार्यक्रम आहे. त्याचा आपण नक्की लाभ घ्यावा ही विनंती.

कार्यक्रम २० ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदीर, पुणे इथे होईल.
मायबोलीकरांकरता तिकीटविक्री १३ ऑगस्ट रोजीच चालू होईल आणि १५ ऑगस्ट पासून टिळक स्मारक मंदीर येथे तिकीटविक्री सर्वांकरता खुली होईल.

तिकीट मिळण्याचे स्थळ -
विवेक देसाई
१६ - अभिकल्प अपार्टमेंट,
अलकापूरी हाऊसिंग सोसायटी,
न्यु फ्रेंड्स सोसायटी समोर, वनाझ शेजारी,
पौड रोड, कोथरूड,
पुणे - ४११०३८
संपर्क - ९८५०५१३९१५

तिकीटं मिळण्याची वेळ -
शनिवार - सकाळी ९:३० ते दुपारी १२:००
संध्याकाळी ६:३० ते रात्री ९:००
रविवार - सकाळी ९:३० ते रात्री ९:००

अधिक माहितीसाठी संपर्क -
परेश लिमये - ९८९०४३०१२३ (पुणे)
किरू - ९८२०८१०६०६ (मुंबई)
आनंदमैत्री - ९७६९४५४४२९ (मुंबई)

* (काही तांत्रिक अडचणींमूळे तिकीट विक्री १३ तारखेला सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी)

कर्यक्रमासंदर्भात शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. त्याची ही काही क्षणचित्रे.
DSCN0077-P.jpgDSCN0079.JPGDSCN0083_p.jpg

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 20, 2011 - 07:30 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यक्रम अफ्फाट झाला.. Happy
कविता, गझला, नेपथ्य... अत्यंत सुरेख होते.
पुन्हा घेतली मी भरारी वगैरे... चे काव्यवाचन कवि सौमित्र आणि वैभव दोघांच्याही आवाजात ऐकताना स्वर्गसुख अनुभवलं, अमृता नातू ने सादर केलेले २रे गीत अप्रतिम होते. दत्तप्रसाद रानडेंची पहिली गझल सुरेख आणि अर्थपुर्ण..

मला फक्त एक सजेशन द्यावेसे वाटते.. निवेदनात सुधारणा करायला भरपूर वाव आहे.

अमृता नातू, दत्तप्रसाद रानडे बेफाम. अर्थात मी तेव्हढीच दोन ऐकू शक्लो. Sad

पण मला सर्वात जास्त आवडलेला आवाज द.खु. वैभव जोशी यांचाच Happy त्यांच्या गझल त्यांच्याच तोंडून ऐकायला धमाल येते.

पुढच्या वेळेला कार्यकर्त्यांच्या लिस्ट्मधून मी कटाप. तिकिटं काढून अखंड कार्यक्रम बघणार.

खरोखर अप्रतीम कार्यक्रम झाला...

आनंद, कीरू, कौतूक...
घेतलेल्या परिश्रमांचं चीज झालं. मला आपुलकिने 'खारीची भूमिका' देऊन या कार्यक्रमात सहभागी करुन घेतल्या बद्दल तुम्हा तिघांना विशेष 'धन्यवाद'...
'सृजन' तर्फे सादर होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमात माझी 'खारीची भूमीका' राखून ठेवावी ही प्रेमाची आणि आपुलकीची विनंती...

कार्यक्रम उत्कृष्ट झाला.
वैभवचं, सर्व आयोजकांचं, प्रायोजकांचं हार्दिक अभिनंदन Happy
रघुनंदन पणशीकर, राहुल देशपांडे, मधुरा दातार, वैशाली सामंत यांनी गायलेली गाणी विशेष आवडली.
जान्हवी प्रभू-अरोरा आणि जसराज जोशी यांचे उच्चार मात्र खटकत होते.

मस्त कार्यक्रम बघितल्याचं समाधान! Happy
शेवटचा अर्धा तास राहुलच्या रागदारीने आणि दत्तप्रसादने म्हटलेल्या गझलांनी कार्यक्रम उंचीवर नेला. तृप्त व्हायला झाले अगदी. वैभव आणि सौमित्रची जुगलबंदी खासच. दोघांच्या वैशिष्ठ्यपूर्ण आवाजांनी मिळालेली अनुभूती कल्पनातीतच.

संयोजक आणि प्रायोजकांचे आभार, अभिनंदन आणि पुढल्या हजारो कार्यक्रमांसाठी शुभेच्छा. Happy

साजिरा + १

सेट अतिशय प्रासादिक. प्रसन्न वाटत होतं अगदी. रंगमंचावरची गाणानुरूप बदलणारी प्रकाशरचनाही सुरेख!

सेटबद्दल पूनमला अनुमोदन. खुपच सुरेख होता. Happy

सौमित्र यांचा खडा आवाज व वैभवचा नेहेमीसारखाच कॅज्युअल पण भारदस्त आवाज याने मजा आली. 'वगैरे' तर तुफान. सुरुवात जबरदस्त तसेच शेवटही. वैशालीचे ऋतु येत होते जबरी आहेच हे परत एकदा जाणवले. 'सोबतीचा करार' ची मात्र उणीव वाटली. जसराज जोशीच्या गाण्याने मधेच शंकर महादेवनची आठवण करुन दिली. जान्हवी प्रभू-अरोरा यांना मात्र जान्हवी प्रभू आवरा म्हणायची वेळ आली होती. कदाचीत ट्रॅक फार लाऊड झाला होता.

आयोजक त्रिमूर्ती व प्रायोजक राम यांचे मनःपूर्वक आभार.

विशेषतः, सौमित्र आणि वैभवने काव्यवाचना-सादरीकरणामध्ये जे काही नवे प्रयोग केले, करण्याचा प्रयत्न केला, ते त्यांच्या आधीच्या 'तू आणि मी' या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अगदी ठळकपणे दिसले, जाणवले. दोघांच्या आवाजाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे, जातकुळीमुळे एकच कविता किंवा गझल जेव्हा ते दोघांमिळून सादर करत होते- ते जास्त परिणामकारक होत होतं. वैभवची काही कवितांमधली शेवटच्या ओळित अफाट उंचीवर नेऊन ठेवण्याची जी सिग्नेचर शैली आहे, तीमुळे तर हा प्रकार अधिकच रंगतो.

कविता-गझल सादरीकरणातले हे केलेले थोडेफार नवीन प्रयोग मला खूप आधीच केलेल्या 'आयुष्यावर बोलू काही'त केलेया प्रयोगांपेक्षाही वैशिष्ठ्यपूर्ण आणि ताजे, चैतन्यपूर्ण वाटले. या नवीन प्रयोगांमध्ये खूप पोटेन्शियल जाणवते आहे. पुढल्या प्रयोगांत त्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले तर आणखीच बहार येईल.

कांद्या Lol जान्हवी प्रभू आरोराचा अ‍ॅक्च्यूली आवाजच ऐकू येत नव्हता.. ती तोंडातल्या तोंडातच गात होती बहुतेक Sad
वैशाली पण बरी गायली पण तिच्या गाण्याने छाप अशी सोडली नाही..
जयदिपने गायलेलं दुसरं, उडत्या चालिचं गाणं पण मस्त होतं, एकदम हलकं फुलकं.

शब्द वैभवाच्या दारी सुरांत नाहलो..
अब्द अब्द होऊनही नि:शब्द जाहलो!
Shabda 006.jpg

सुरेख रंगमंचाची आणि प्रसन्न प्रकाशयोजनेची एक झलक.

मला आपुलकीने 'खारीची भूमिका' देऊन या कार्यक्रमात सहभागी करुन घेतल्या बद्दल तुम्हा तिघांना विशेष 'धन्यवाद'... >>> माझे पण. Happy यावेळी बॅकस्टेजला ड्यूटी होती. त्यामुळे मान्यवर जेव्हा रंगमंचावर नसतात तेव्हा काय्काय(!) करतात ते थोडंफार पहायला मिळालं Wink
व्ही.आय.पी.रूममध्ये काहीच नीट ऐकू येत नव्हतं. म्हणून मध्यंतरानंतर एका गाण्याला विंगेत येऊन उभी राहिले. तर समोर प्रेक्षागृहात जाऊन बसण्याचा मोह व्हायला लागला. शेवटी 'समोरून सेट बघितलाच नाही' ही सबब किरुला सांगून दतप्रसादच्या पहिल्या गझलेला प्रेक्षागृहात येऊन बसले. जास्त वेळ बसलो तर तिथून उठावंसं वाटणार नाही हा सूज्ञ वगैरे विचार करून वेळीच तिथून उठले. Proud

संपुर्ण कार्यक्रम खुपच छान झाला. शनिवार संध्याकाळ खुपच मस्त गेली.
माझ्यादृष्टीने या कार्यक्रमातील टॉप ५

१. वैभव आणि सौमित्रची जुगलबंदी
२. राहुल देशपांडे ची दोन्ही गाणी
३. अत्तर आणि गुलाबपाणी शिंपडून केलेले स्वागत
४. वैशाली सामंत ने म्हटलेली गाणी
५. रंगमंच नेपथ्य आणि प्रकाशयोजना - यात आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो दोन्ही बाजूला सतत तेवत असलेल्या भारी-भक्कम समया.

बाकीच्या गायकांची गाणी चांगलीच झाली, पण मुख्यत्वे माझं संपुर्ण लक्ष कवितेतील शब्दांकडे होतं, त्यामुळे गायकांमधील उणे-अधिक फारसे जाणवले नाहीत.

अत्तर आणि गुलाबपाणी शिंपडून केलेले स्वागत>>
यावेळी अरुणरावांचा फोटोग्राफरने सपत्निक फोटो काढल्याने त्यांना फारच भारी वाटले असणार. Happy

यावेळी अरुणरावांचा फोटोग्राफरने सपत्निक फोटो काढल्याने त्यांना फारच भारी वाटले असणार. >>>>>>>>> हे नाही हो कळंल आम्हाला .............. Happy

>>>यावेळी अरुणरावांचा फोटोग्राफरने सपत्निक फोटो काढल्याने त्यांना फारच भारी वाटले असणार.
म्हणजे अरूणराव सपत्नीक असतांना...की फोटोग्राफर सपत्नीक होते. Wink

कार्यक्रम सर्व मायबोलीकराना आवडला हे वाचुन आनंद वाटला... हा कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी आम्हाला ज्या मायबोलीकर मित्र मैत्रीणीनी मदत केली त्यांचे मनपुर्वक आभार.. विशेशतः परेश लिमये, विवेक देसाई, मंजिरी सोमण,ललीता, दक्षीणा, आनंद केळकर, निलवेद, घारुअण्णा, बागुलबुवा, इंद्रा.. यांचे सहकार्य खुपच मोलाचे होते.. या पुढील आमच्या अश्या उपक्रमाना तुमचे असेच सहकार्य लाभो ही विनंती...
श्री. अ‍ॅडमीन आणी साजिरा यानी या मायबोलीच्या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक म्हणुन केलेल्या जाहिरातीसाठी आणी मदतीसाठी त्यांचे मनपुर्वक आभार.. Happy
खुप मायबोलीकरानी या कार्यक्रमास उपस्थीत राहुन आमचा हुरुप वाढवला त्याबद्दल त्यांचेही आभार.. Happy

आणी शेवटी कार्यक्रमानंतर श्री. साजिरा यानी केलेल्या मदतीसाठी त्याचे विषेश आभार.. Wink

विवेक + १

राम आणि सृजन थिएटर्स ( किरु, आनंद, कौतुक ) सर्वात प्रथम अभिनंदन... अतिशय धमाल अनुभव होता हा....
मला या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आभार.. पुढील हजारो कार्यक्रमांत माझी आठवण ठेवा....

वैभव आणि तुम्हा सर्वांना भरपूर शुभेच्छा....

जसराज जोशी, राहूल देशपांडे आणि रानडेंनई गायलेलेल्या शेवटच्या दोन गझला हे सुरेख होते. वैभव जोशींचे सादरीकरण छान होते पण किशोर कदम की बात कुछ औरही है. संयोजकांमुळे पुन्हा एकदा त्यांचे जादुई सादरीकरण अनुभवता आले. एक अप्रतिम कार्यक्रम पाहता आला. धन्यवाद!

ही गझल राहीली.. ती कविता राहूनच गेली...
श्रावण... गायलाच हवी होती... पण चान्दणेही यायला हवी होती....

तीन तास कार्यक्रम होऊनही जर असे वाटते आहे म्हणजे वैभव अशक्य आहे असेच म्हणावे लागेल.
एक प्रभू-आवरा सोडता बाकी सगळेच आवडले.... जसराजचे गाणे खूप आवडले... कविता म्हणऊनही आणि गाणे म्हणूनही!

राहुल देशपान्डे आणि दत्त्प्रसाद रानडे गायल्यावर वैभवचे बोलणे आठवले की शास्त्रीय बैठकीचे गायक गझलेला अधिक चांगला न्याय देउ शकतात!

श्रावण गायला हवी होती पण.... Happy

ह.बा ने मैत्रीखातर दिलेलं तिकीट आणि घारूअण्णा यांचं चहापान इतकं सगळं फुकट म्हटल्यावर कार्यक्रम आवडणारच ना?.:)

दत्तप्रसाद रानडे विशेष आवडले,
सौमित्रने नेहमी प्रमाणेच धुंद केलं,
बॅकस्टेज आणि नैपथ्य अप्रतिम

वैभव यांच्या पुढील वाटचालीस मनोमन शुभेच्छा!!!!!:)

Pages