वैभव जोशी यांच्या गझल, कवितांची अनोखी मैफील - शब्द झाले मायबाप

Submitted by किरू on 9 August, 2011 - 02:25
ठिकाण/पत्ता: 
२० ऑगस्ट रोजी, टिळक स्मारक मंदीर, पुणे

.
काही दिवसांपूर्वी तिन मायबोलीकर गप्पा मारत होते.
'पूर्वी कसली मजा यायची माबोवर.'
'का रे? मजा तर आताही येते.'
'तस नाही रे. काही वर्षांपूर्वी माबोला सुगीचे दिवस होते. बरेचजण उच्च लिहायचे.
कविता, गझल, लेख... मेजवानी असायची नुसती. ती गंमत हल्ली नाही येत. डोळ्यांना, कानांनाही सवय होते उत्तम वाचायची, उत्तम ऐकायची. एकदा का ती सवय झाली की मन फक्त तोच दर्जा स्विकारतं.'
'हे मात्र खरं. हल्ली वैभव जोशी तर काहीच लिहित नाही.'
'हो रे.. तिच तर खंत आहे. कुठे गेले हे लोक?'
'वैभव हल्ली बराच बिझी असतो त्यामुळे वेळ मिळत नाही त्याला तेवढा.'
'अरे मग आम्हाला त्याच्या कविता वाचायला कशा मिळणार?'
'हं.. ए आपण असं केलं तर? आपण वैभवचा कविता, गझलचा कर्यक्रम अ‍ॅरेंज केला तर?'
'मस्त आयडीया'

हा एकच विचार मनांत आला आणि पुढलं सगळं मनासारखं घडत गेलं.
हे तिन मायबोलीकर म्हणजे आनंदमैत्री (आनंद चव्हाण), कौतुक शिरोडकर, किरू (किरण सामंत).
सुरूवातीला छोटं स्वरूप डोळ्यासमोर असलेला हा कार्यक्रम आता भव्य होऊन कागदावर उतरलाय.
आनंदाची गोष्ट म्हणजे यातून एका संस्थेची निर्मिती झाली. सृजन थिएटर्स, मुंबई.

तेंव्हा आता सृजन थिएटर्स, मुंबई, २० ऑगस्ट २०११ रोजी आपला आवडता मायबोलीकर वैभव जोशी याच्या गीतांची आणि गझलांची एक अनोखी मैफील घेऊन येत आहे.

szmb.jpgszmb2_1.jpg

कार्यक्रमांत सहभाग असणार आहे यांचा..
szmb4_2.jpg१) वैशाली सामंत
२) राहूल देशपांडे
३) अमृता नातु
४) रघुनंदन पणशीकर
५) मधुरा दातार
६) दत्तप्रसाद रानडे
७) जयदीप बागवाडकर
८) जान्हवी प्रभू - अरोरा

आणि गझल, कविता सादर करतील...
सौमित्र आणि स्वतः वैभव जोशी..
सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांच असेल.

एवढा भव्य कार्यक्रम करायचा म्हणजे खर्चही तितकाच भव्य असणार. या खर्चाचा भार पेललाय आपलेच एक मायबोलीकर श्री. राम चिंचलीकर यांच्या एलिगंट केअरटेकर या कंपनीने.
त्याशिवाय आपल्या बर्‍याच मायबोलीकर मित्रांची मेहनत आहेच. ते सगळं कार्यक्रमानंतरच्या वृत्तांतात येईलच.

हा मायबोलीकरांनी मायबोलीकरांकरता योजलेला मायबोलीकरांचा कार्यक्रम आहे. त्याचा आपण नक्की लाभ घ्यावा ही विनंती.

कार्यक्रम २० ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदीर, पुणे इथे होईल.
मायबोलीकरांकरता तिकीटविक्री १३ ऑगस्ट रोजीच चालू होईल आणि १५ ऑगस्ट पासून टिळक स्मारक मंदीर येथे तिकीटविक्री सर्वांकरता खुली होईल.

तिकीट मिळण्याचे स्थळ -
विवेक देसाई
१६ - अभिकल्प अपार्टमेंट,
अलकापूरी हाऊसिंग सोसायटी,
न्यु फ्रेंड्स सोसायटी समोर, वनाझ शेजारी,
पौड रोड, कोथरूड,
पुणे - ४११०३८
संपर्क - ९८५०५१३९१५

तिकीटं मिळण्याची वेळ -
शनिवार - सकाळी ९:३० ते दुपारी १२:००
संध्याकाळी ६:३० ते रात्री ९:००
रविवार - सकाळी ९:३० ते रात्री ९:००

अधिक माहितीसाठी संपर्क -
परेश लिमये - ९८९०४३०१२३ (पुणे)
किरू - ९८२०८१०६०६ (मुंबई)
आनंदमैत्री - ९७६९४५४४२९ (मुंबई)

* (काही तांत्रिक अडचणींमूळे तिकीट विक्री १३ तारखेला सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी)

कर्यक्रमासंदर्भात शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. त्याची ही काही क्षणचित्रे.
DSCN0077-P.jpgDSCN0079.JPGDSCN0083_p.jpg

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 20, 2011 - 07:30 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लले, त्या सगळ्यांना माझा फो.नं पण कळवून ठेव कारण मंजिरी सोमण म्हणजे कोण हे त्यांना पटकन लक्षात नाही यायचं Proud

अरे व्वा आली का बातमी... मस्तच...

बर्‍याच जणांनी फक्त शुभेच्छा दिल्या आहेत.. मंडळी नुसत्या शुभेच्छा देऊ नका कार्यक्रमाला पण या Happy

घरचं कार्य आहे Happy

हा कार्यक्रम आपण हाऊसफुल्ल करून दाखवू म्हणजे संयोजकांना मुंबईतपण करायचा उत्साह येईल Happy

मिल्या, यु सेड इट...

मंडळी, मिल्या म्हणतो त्याप्रमाणे...
घरचं कार्य आहे. तेंव्हा नुसत्या शुभेच्छांनी चालायचं नाही. Happy
कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आवश्यक आहे. Happy

अरे वा!! मस्तच. कार्यक्रमाला भरघोस शुभेच्छा. याचे हजाराच्या वर प्रयोग होवूदेत.
मायबोलीकरांचा कार्यक्रम आहे म्हणून मायबोलीचा लोगो, जाहिरात तिकडे टाका ना बॅनरवर.

बर्‍याच जणांनी फक्त शुभेच्छा दिल्या आहेत.. मंडळी नुसत्या शुभेच्छा देऊ नका कार्यक्रमाला पण या >>> अनुमोदन.

आणि माबो लोगोबद्दल रुनीला पण अनुमोदन. माहितीपत्रकं ऑलरेडी तयार झाली असतील तर आता प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी / स्टेजवर मागच्या बाजूला जे बॅनर्स असतील तिथे माबोचा लोगो टाकता येईल का?

पुण्यात कार्यक्रम होतो आहे हे छानच पण इकडे US मधे नुसति बातमीच् :-(.वैभव च्या मायबोलि वर प्रकाशित झलेल्या सगळ्या कविता एकत्र करयच्या असतिल तर कशा करायच्या? किंवा कोणि केल्या आहेत काय अधिच?

वाह .. अभिनंदन आणि कार्यक्रमास मनापासुन शुभेच्छा!!!
लवकर मुंबई ला पण करा कार्यक्रम

बा-बु...
मी आलो तर चालेल कॉय ???...>>>...

चाललंच पाहिजे... आपल्या कार्यक्रमाला उपस्थीती लागणं गरजेचं आहे... वाट बघतोय...
यायला लाग...

अभिनंदन !!!! आणी शुभेच्छा....

लवकर मुंबई ला पण करा कार्यक्रम
सहमत.....

किर्‍या, २-३ ठिकाणी टिळक स्मारक मंदिर च्या ऐवजी टिळक मंदिर स्मारक असं लिहिलं गेलंय बाफ मधे, तेवढी दुरूस्ती कर ना, वाचायला विचित्र वाटतंय ते Proud

मंजिरी, दुरूस्ती केली आहे.
पार्ल्याचा परीणाम असणार तो. टिळक मंदीर ही पार्ल्यातली प्रसिद्ध संस्था.
पार्ल्यात टिळक स्मारक मंदीर म्हटलं की विचित्र वाटतं. Happy

तिकीटं कुठे मिळतील? ?केंव्हापासून विक्री सुरू? दूरभाष आरक्षणाची सोय आहे का?मायबोलीवरच्या 'वैभव-पंख्यां' साठी काही राखीव जागा वगैरे?
बापू करंदीकर [९३७१०४००१३]

२-३ ठिकाणी टिळक स्मारक मंदिर च्या ऐवजी टिळक मंदिर स्मारक असं लिहिलं गेलंय >>>
टिळक मंदीर ही पार्ल्यातली प्रसिद्ध संस्था. >>>

तरीच काल किरु फोनवर पण सारखं टिळक मंदीर स्मारक म्हणत होता. मी आपलं 'कार्यबाहुल्यामुळे घसरत असेल जीभ (स्लिप ऑफ टंग)' असं म्हटलं अन् सोडून दिलं झालं Wink

पार्ल्याचा परीणाम असणार तो. >>> किरु क्षणाचा बोरीवलीकर अन अनंतकाळचा पार्लेकर आहे Proud

बापू,
तिकिटं मिळवण्याकरता संपर्क करायचे नंबर्स वर दिलेले आहेत. उद्यापासून तिकिटं विक्री चालू होईल.
'वैभव पंख्यांकरताच' आपण तिकिटविक्री ११ ऑगस्ट पासून ठेवली आहे.

दूरभाष आरक्षणाची सोय नाहीये याची कृपया सर्वांनीच नोंद घ्याची.

लले Lol

अभिनंदन आणि शुभेच्छा! Happy

>> हा मायबोलीकरांनी मायबोलीकरांकरता योजलेला मायबोलीकरांचा कार्यक्रम आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असतांना अशी जाहिरात दिशाभूल करणारी वाटते. (वर मायबोलीचा बॅनर लावण्याबाबत काही पोस्ट्स पाहिल्याने हे प्रकर्षाने जाणवलं.)

रामभौ : तुम्हाला फोनल्यास, तिकिटांचं काम होइल काय??????????>>> बुधवारी फोनल्यास नक्की होईल रे.. Proud जोक्स अपार्ट मी व्यवस्था करतो रे.. Happy
@ स्वाती.. वैभव जोशी आणी सर्व आयोजक हे मायबोलीकरच आहेत.. Happy

Pages