वैभव जोशी यांच्या गझल, कवितांची अनोखी मैफील - शब्द झाले मायबाप

Submitted by किरू on 9 August, 2011 - 02:25
ठिकाण/पत्ता: 
२० ऑगस्ट रोजी, टिळक स्मारक मंदीर, पुणे

.
काही दिवसांपूर्वी तिन मायबोलीकर गप्पा मारत होते.
'पूर्वी कसली मजा यायची माबोवर.'
'का रे? मजा तर आताही येते.'
'तस नाही रे. काही वर्षांपूर्वी माबोला सुगीचे दिवस होते. बरेचजण उच्च लिहायचे.
कविता, गझल, लेख... मेजवानी असायची नुसती. ती गंमत हल्ली नाही येत. डोळ्यांना, कानांनाही सवय होते उत्तम वाचायची, उत्तम ऐकायची. एकदा का ती सवय झाली की मन फक्त तोच दर्जा स्विकारतं.'
'हे मात्र खरं. हल्ली वैभव जोशी तर काहीच लिहित नाही.'
'हो रे.. तिच तर खंत आहे. कुठे गेले हे लोक?'
'वैभव हल्ली बराच बिझी असतो त्यामुळे वेळ मिळत नाही त्याला तेवढा.'
'अरे मग आम्हाला त्याच्या कविता वाचायला कशा मिळणार?'
'हं.. ए आपण असं केलं तर? आपण वैभवचा कविता, गझलचा कर्यक्रम अ‍ॅरेंज केला तर?'
'मस्त आयडीया'

हा एकच विचार मनांत आला आणि पुढलं सगळं मनासारखं घडत गेलं.
हे तिन मायबोलीकर म्हणजे आनंदमैत्री (आनंद चव्हाण), कौतुक शिरोडकर, किरू (किरण सामंत).
सुरूवातीला छोटं स्वरूप डोळ्यासमोर असलेला हा कार्यक्रम आता भव्य होऊन कागदावर उतरलाय.
आनंदाची गोष्ट म्हणजे यातून एका संस्थेची निर्मिती झाली. सृजन थिएटर्स, मुंबई.

तेंव्हा आता सृजन थिएटर्स, मुंबई, २० ऑगस्ट २०११ रोजी आपला आवडता मायबोलीकर वैभव जोशी याच्या गीतांची आणि गझलांची एक अनोखी मैफील घेऊन येत आहे.

szmb.jpgszmb2_1.jpg

कार्यक्रमांत सहभाग असणार आहे यांचा..
szmb4_2.jpg१) वैशाली सामंत
२) राहूल देशपांडे
३) अमृता नातु
४) रघुनंदन पणशीकर
५) मधुरा दातार
६) दत्तप्रसाद रानडे
७) जयदीप बागवाडकर
८) जान्हवी प्रभू - अरोरा

आणि गझल, कविता सादर करतील...
सौमित्र आणि स्वतः वैभव जोशी..
सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांच असेल.

एवढा भव्य कार्यक्रम करायचा म्हणजे खर्चही तितकाच भव्य असणार. या खर्चाचा भार पेललाय आपलेच एक मायबोलीकर श्री. राम चिंचलीकर यांच्या एलिगंट केअरटेकर या कंपनीने.
त्याशिवाय आपल्या बर्‍याच मायबोलीकर मित्रांची मेहनत आहेच. ते सगळं कार्यक्रमानंतरच्या वृत्तांतात येईलच.

हा मायबोलीकरांनी मायबोलीकरांकरता योजलेला मायबोलीकरांचा कार्यक्रम आहे. त्याचा आपण नक्की लाभ घ्यावा ही विनंती.

कार्यक्रम २० ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदीर, पुणे इथे होईल.
मायबोलीकरांकरता तिकीटविक्री १३ ऑगस्ट रोजीच चालू होईल आणि १५ ऑगस्ट पासून टिळक स्मारक मंदीर येथे तिकीटविक्री सर्वांकरता खुली होईल.

तिकीट मिळण्याचे स्थळ -
विवेक देसाई
१६ - अभिकल्प अपार्टमेंट,
अलकापूरी हाऊसिंग सोसायटी,
न्यु फ्रेंड्स सोसायटी समोर, वनाझ शेजारी,
पौड रोड, कोथरूड,
पुणे - ४११०३८
संपर्क - ९८५०५१३९१५

तिकीटं मिळण्याची वेळ -
शनिवार - सकाळी ९:३० ते दुपारी १२:००
संध्याकाळी ६:३० ते रात्री ९:००
रविवार - सकाळी ९:३० ते रात्री ९:००

अधिक माहितीसाठी संपर्क -
परेश लिमये - ९८९०४३०१२३ (पुणे)
किरू - ९८२०८१०६०६ (मुंबई)
आनंदमैत्री - ९७६९४५४४२९ (मुंबई)

* (काही तांत्रिक अडचणींमूळे तिकीट विक्री १३ तारखेला सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी)

कर्यक्रमासंदर्भात शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. त्याची ही काही क्षणचित्रे.
DSCN0077-P.jpgDSCN0079.JPGDSCN0083_p.jpg

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 20, 2011 - 07:30 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी...
२० ऑगस्टला किती वाजता कार्यक्रम आहे???...>>>...
संध्याकाळी ०५ ते रात्री ०८ पर्यन्त कार्यक्रम आहे...
वरती लावलेल्या 'निमंत्रण पत्रीके'त देखिल वेळ नमूद केलेली आहे... :स्मित:...

अरेच्चा ! हो की ! धन्यवाद विवेक Happy
मला जमणार नाहिये, पण पुण्यातल्या नातेवाईकांना तिकिटं पाठवून कार्यक्रमास धाडायचा विचार आहे.

अश्विनि...

पुण्यातल्या नातेवाईकांना तिकिटं पाठवून कार्यक्रमास धाडायचा विचार आहे....>>>...

अवश्य पाठवा!!!... आपले स्वागत करतो... :स्मित:...

अरे वा अभिनंदन आणि शुभेच्छा. एक कार्यक्रम मुंबईतपण करा म्हणजे आम्हालाही त्याचा लाभ घेता येईल.

कार्यक्रमासाठी हार्दीक शुभेच्छा.. Happy
एक कार्यक्रम मुंबईतपण करा म्हणजे आम्हालाही त्याचा लाभ घेता येईल. >> जागूला अनुमोदन.. मी हेच लिहाय्ला आले होते..

मस्त!

तुम्ही सगळे पुढाकार घेऊन हे सगळं साधताय याबद्दल तुमचे मनःपुर्वक अभिनंदन!!

कार्यक्रमांस शुभेच्छा!

अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबई-ठाण्याकडे आयोजित करावा अशी नम्र विनंती Happy

मस्त Happy कार्यक्रमासाठी अनेक शुभेच्छा.

मुंबईत असा एक कार्यक्रम हवाच !! (आणि त्या कार्यक्रमाची तिकीटविक्रीही अशीच माबोकरांसाठी आधीपासूनच सुरू व्हायला हवी Wink )

मी माझ्या पुण्यातल्या पोतंभर नातेवाईकांना, दोस्तमंडळीना, पुण्यात स्थायिक झालेल्या शाळूसोबत्यांना - सर्वांना ई-मेल करून ही लिंक पाठवलीय. Happy

Pages