दिवाळी अंक २०११ स्वयंसेवक घोषणा

Submitted by रूनी पॉटर on 8 August, 2011 - 19:38

मायबोली दिवाळी अंक २०११ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दोन-अडीच महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्‍या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
दिवाळी अंकासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत लागते, खालील पैकी कुठल्या विभागात आपल्याला काम करायला आवडेल ते कळवा.
१. दिवाळी अंक संपादन
२. दिवाळी अंक रेखाटन
३. दिवाळी अंक सजावट
४. दिवाळी अंक साचा (template - यासाठी दृपल मध्ये कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य)
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
६. दृक श्राव्य विभाग (Audio/Video editing)
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. ज्या सदस्यांना मंडळात सहभागी करणे शक्य होणार नाही त्यांची नावे संपादकांकडे असतील आणि जसे सहाय्य लागेल तसे त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.
या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे, त्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

*****
मायबोली दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ खालील प्रमाणे निवडण्यात आले आहे.
मुख्य संपादक - श्यामली
संपादक मंडळ - अंजली, अल्पना, बित्तुबंगा, ह.बा., मास्तुरे, सशल, सीमा, आनंदयात्री, अज्ञात
संपादक मंदळाचे अभिनंदन!!
ज्या मायबोलीकरांनी दिवाळी अंक टेम्प्लेट, दृक श्राव्य, रेखाटन, मुद्रित शोधन, सजावट इ. साठी नावे दिलेली आहेत त्यांचे गरजेप्रमाणे वेगवेगळे ग्रूप बनवले जातील व लवकरच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ ते ४ मध्ये मलाही काम करायला आवडेल.. पण मायबोली दिवाळी अंक म्हणजे खायचे काम नाही याची जाणीव आहे सो पात्रता आहे की नाहे तेच कळत नाहीये.. Happy

संपादनाच काम करायला आवडेल, एका वर्षातला अनुभव चालणार नसेल तर बादच, वरच्या लिस्टातल बाकी काही येत नाही

तुम्हाला अनुभवी करूनच सोडणार >>> रुपॉ, हे बरीक खरं बोल्लीस हो! Lol

जोक्स अपार्ट, मंडळी, दिवाळी अंकाचं काम खरंच आव्हानात्मक आणि तितकंच धमाल असतं. तेव्हा जी कुठली टीम बनेल त्यांना अनेक शुभेच्छा Happy २०११चा अंक like never before करून सोडा. Happy

मला यातलं फक्त मुद्रितशोधनच जमेल. पण त्यासाठी बरीच मोठी रांग दिसते आहे, तरी प्रथम सर्व इच्छुकांची शुद्धलेखनाची परीक्षा घेणार का? Happy

मलाही आवडलं असतं..संपादनाचं काम करायला...पण आमच्या मित्रमंडळाच्या जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक निघतो..त्यात मीही गुंतलो असेन...तरीही बाहेरून काही मदत हवी असल्यास आणि मी त्यासाठी योग्य आहे असे वाटल्यास जरूर सांगा..जमेल ती मदत करेन.
थोडक्यात: आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा! :))

लोकहो दिवाळी अंक साचा (template) साठी दृपलमध्ये कामाचा अनुभव असलेले लोक हवे आहेत. ज्यांना कोणाला अनुभव आहे अश्यांनी कृपया आपली नावे द्यावीत
धन्यवाद

१. दिवाळी अंक संपादन
३. दिवाळी अंक सजावट
५. मुद्रितशोधन (शुद्धलेखन तपासणे)
६. audio editing
यात आवडेल. Happy
बाकी कसलीही मदत सांगा.. उदा. मुलाखत घेणे, मराठी शुद्ध टाईपींग इ.
तसेच २. रेखाटन म्हणजे चित्र वगैरे काढायचे असल्यास नको! Sad

(सिलेक्ट केल्यास प्लीज विपूमध्ये/संपर्कातून कळवणे :))

मायबोली दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ खालील प्रमाणे निवडण्यात आले आहे.
मुख्य संपादक - श्यामली
संपादक मंडळ - अंजली, अल्पना, बित्तुबंगा, ह.बा., मास्तुरे, सशल, सीमा, आनंदयात्री, अज्ञात.
संपादक मंदळाचे अभिनंदन!!
ज्या मायबोलीकरांनी दिवाळी अंक टेम्प्लेट, दृक श्राव्य, रेखाटन, मुद्रित शोधन, सजावट इ. साठी नावे दिलेली आहेत त्यांचे आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळे ग्रूप बनवले जातील व लवकरच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.

संपादक मंडळाचे अभिनंदन..
मुसंबा.. अजून एक ऑडियो कविता होऊन जाउ द्या.. Happy

संपादक मंडळाचे अभिनंदन Happy
यावर्षीचा अंकही अप्रतिम कराल याबद्दल खात्री आहे.
कामासाठी शुभेच्छा.

संपादक मंडळाचे अभिनंदन!
मुसंबा, दुबईचा झेंडा ऊंच केलात. लई झ्याक.

Pages