मायबोली गणेशोत्सव २०११: नांदी

Submitted by संयोजक on 8 August, 2011 - 15:58

Bappa Teaser Final 1.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'आक्षेप- शेवट सुचवा' वरुन पूनमने ही कल्पना गणेशोत्सवात घेता येईल असं तेव्हा सुचवलं होतं. तीपण कल्पना मला आवडली होती.<<<
याला जोरदार अनुमोदन....
STY ऐवजी पण हा प्रयोग करायला हरकत नाही.

झब्बू पायजे म्हणजे पायजेच.. Happy

गण्या धाव रे.. मला पाव रे...! 'बाल्या डयान्स' ची स्पर्धा ठेवता येते का ते बघा.. Proud ऑडीयो झाले.. आता अजुन एक पाउल पुढे Happy Wink

बाकी शुभेच्छा.. Happy

नांदी छान !!!
प्रचि स्पर्धेसाठी जिप्सीला अनुमोदन.
लले, प्रचि स्पर्धेसाठी 'सुर्यास्त' हा विषय देण्यात येणार नाहीय. Proud

झब्बू गेल्या दोन वर्षांपेक्षा काहितरी वेगळ्या प्रकारे ठेवला तर आवडेल. ज्या स्पर्धांना परिक्षक ठेवण्यात येणार आहेत त्या परिक्षकांची नावे स्पर्धेपूर्वी जाहिर करता येतील का ह्यावर मंडळाने विचार करावा अशी इच्छा आहे.
गद्य STY आवडेल. मागे जुन्या मायबोलीतल्या गणेशोत्सवात डिबेटची स्पर्धा होत असे ऐकलं आहे. ती पहायला मिळाली तर आवडेल कारण मी स्वत: कधी live पाहिलेली नाहिये.
एक कथा / एक कविता / एक लेख ह्या पेक्षा मालिका स्वरूपातलं लिखाण सांस्कृतिक कार्यक्रमात वाचायला आवडेल (मागे शोनूची कथा मालिका होती.. कॉलनीतल्या गंमतींबद्दल...योगची गाणी होती किंवा अजून एक गाण्यांची मालिका होती तसं काहितरी) कारण एक-एक कथा, कविता वगैरे लवकरच येणार्‍या दिवाळी अंकात देता येईल.

दणक्यात होऊन जाऊ दे उत्सव.. शुभेच्छा. Happy

झब्बू गेल्या दोन वर्षांपेक्षा काहितरी वेगळ्या प्रकारे ठेवला तर आवडेल >>>>
मालिका स्वरूपातलं लिखाण सांस्कृतिक कार्यक्रमात वाचायला आवडेल >>>> दोन्हीला अनुमोदन.

परीक्षक ठेवण्यापेक्षा स्पर्धांसाठी मतदानाने विजेते निवडले तर मायबोलीकरांना त्यांच्या आवडीच्या प्रवेशिकांना मत देता येइल.

झब्बू गेल्या दोन वर्षांपेक्षा काहितरी वेगळ्या प्रकारे ठेवला तर आवडेल. ज्या स्पर्धांना परिक्षक ठेवण्यात येणार आहेत त्या परिक्षकांची नावे स्पर्धेपूर्वी जाहिर करता येतील का ह्यावर मंडळाने विचार करावा अशी इच्छा आहे.
<<
नावं आधी जाहिर केली तरी प्रॉब्लेम, मग आधी आसून परिक्षकांची ओळख काढली वगैरे आरोप सुध्दा होउ शकतात.
मागच्या वर्षी परिक्षकांच्या निर्णया वरून वाद झाल्र होते, यावेळी उलट परिक्षकांची नावे जाहिरच करु नयेत किंवा स्पर्धकांची नावं जाहिर करु नका, फक्त एंट्री नंबर जाहिर करा म्हणजे कोणी कोणाला फेवर केलं असे वाद होणार नाहीत.केली
अजुन एक पर्याय, मायबोली बाहेरचे तज्ञ परिक्षक असले तरी कमी वाद होतील

स्पर्धकांची नावं जाहिर करु नका, फक्त एंट्री नंबर जाहिर करा म्हणजे कोणी कोणाला फेवर केलं असे वाद होणार नाहीत. >>>>> हे मागे केलं होतं २००९ साली. फक्त ह्यात प्रॉब्लेम एव्हडाच असतो की काम खूप वाढतं. संयोजक मंडळातल्या एका जरी मेंबरला काही कारणांनी ऑनलाईन येता आलं नाही तर प्रवेशिका प्रकाशित करायला उशिर व्हायला लागतो.

नावं आधी जाहिर केली तरी प्रॉब्लेम, मग आधी आसून परिक्षकांची ओळख काढली वगैरे आरोप सुध्दा होउ शकतात. >>>>> ह्म्म्म्म... कदाचित परिक्षकांनी थोडीशी काळजी घ्यावी लागेल जसे धावत्या बाफंवर स्पर्धांबद्दल न बोलणे, विपूत वगैरे न बोलणे.. पण आरोप व्हायचे तर होऊच शकतील तरीही.

तज्ञ >>>> हे महत्त्वाचं. त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतील, हे मायबोलीवरचे असतील तरी चालेल. Happy

थोडक्यात काय परिक्षकांची नावे जाहीर करणे न करणे, स्पर्धक एंट्र्यांची नावे जाहीर करणे न करणे हे सगळे निर्णय संयोजन समितीला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे घ्या. Happy

आरोप करायचे तर कुठल्याही परिस्थितीत होऊ शकतात कारण जनरली अपवाद वगळता आरोप हे 'मला दिलं नाही बक्षिस' यातून आलेले असतात. आता स्पर्धा म्हणल्यावर कुणाला तरी नाहीच मिळायचं बक्षिस ना.. Happy

संयोजन समितीला जे योग्य वाटेल >>> हो अर्थातच. आतमधल्या चर्चांमध्ये खूप ब्रेनस्टॉर्मिंग होतं ना. त्यात अजून मुद्दे येऊ शकतील.

>>परिक्षकांची नावे स्पर्धेपूर्वी जाहिर करता येतील का ह्यावर मंडळाने विचार करावा
कशाला? त्यावर काय ठरते? तोटा काय ते डीजेने लिहिलंय, फायदा काय?

गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात परीक्षक असण्याचीच गरज नाही. रोख बक्षिसं नसतील तर मतदान ठेवावे सरळ. मतदानातून झालेला निर्णय काहींना पटणार नाही, तसा तो परीक्षकांचाही सर्वांना पटत नाहीच.

झब्बू गेल्या दोन वर्षी होता तसाच ठेवला तरी पळेल. विषय मात्र चांगले कल्पक ठेवा. काहीतरी नवीन इन्टरेस्टिन्ग पहायल मिळेल असे. झब्बू किंवा फोटो स्पर्धेत लोकांचे फोटो टाकावे लागतील असे विषय सहसा नको असं वाटतं.

[STY आणि/किंवा शेवट सुचवा ठेवा ही नम्र विनंती. Wink ]

कशाला? त्यावर काय ठरते? तोटा काय ते डीजेने लिहिलंय, फायदा काय? >>>> हा मंडळाने सजेशन्स साठी काढलेला बाफ आहे. त्यामुळे मला जे वाटलं ते त्यांच्यापर्यंत पोचावं म्हणून लिहिलं, इतरांच्या उलट प्रश्नांची उत्तरे दिली जाणार नाहीत. धन्यवाद.

आरोप करायचे तर कुठल्याही परिस्थितीत होऊ शकतात कारण जनरली अपवाद वगळता आरोप हे 'मला दिलं नाही बक्षिस' यातून आलेले असतात. आता स्पर्धा म्हणल्यावर कुणाला तरी नाहीच मिळायचं बक्षिस ना.. >>>> नीरजा. बरोबर.

मंडळाला विचार करायला मदत व्हावी म्हणून तो विचार मांडलाय. तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नाही. Proud
पुढची दोन वाक्यंही त्यासाठीच आहेत.
आणि तुम्ही आता 'मला जे वाटलं' असं लिहिलंय त्यामुळे ते मांडण्यामागे बाकी विचार काहीच नाही हे कळलं. Wink

तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नाही. >>> धन्यवाद !

तुम्ही आता 'मला जे वाटलं' असं लिहिलंय त्यामुळे ते मांडण्यामागे बाकी विचार काहीच नाही हे कळलं. >>> तुम्ही 'महान' आहात. Proud

असो.

Pages