मायबोली गणेशोत्सव २०११: नांदी

Submitted by संयोजक on 8 August, 2011 - 15:58

Bappa Teaser Final 1.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालुने त्या 'अमृतसरी छोले' बीबी वर सुचवलेली कल्पना चांगली होती:
संयोजकां कडून पाककृति दिली जाईल , इथे लोकांनी ट्राय करून त्याचा फोटो टाकायचा, ज्याच्या फोटो (दिसायला ) चविष्ट तो विनर, वोटिंग ने ठरवा विनर घ्या हवं तर :).

मस्त नांदी. Happy
मंडळाला शुभेच्छा! काहीही मदत लागली तर हक्काने सांगा. Happy

मोरया!!
STY STY STY STY पाहिजे.
STY ठेवा ही विनंती.
शुभेच्छा! Happy

१. गणेशोत्सव व मराठी माणूस - एक परिसंवाद
२. मनी नाही भाव, अन देवा मला पाव - देव, मी व माझे जीवन - एक परिसंवाद. चर्चा (कंट्रोल्ड)
३. ऐसा गणेशोत्सव न होएगा दुबारा - तुमचा गणेशोत्सवाच्या (मजेशीर) आठवणी (नेहमीचा तुमच्या घरचा गणेशोत्सव अभिप्रेत नाही तर मंडळात काम करतानाच्या गमतीजमती अभिप्रेत)
४. आरती की आरती? माझे गणेशोत्सवामध्ये झालेले क्रश! इम्प्रेशन मारण्याचे अनुभव Wink

४. आरती की आरती? माझे गणेशोत्सवामध्ये झालेले क्रश! इम्प्रेशन मारण्याचे अनुभव Wink
<< Biggrin

गतवर्षातले सूचनांचे धागे पहा. त्यातल्या काही त्यावेळी अंमलात आणल्या नसतील तर वापरता येतील-
इथे काही चांगल्या सूचना आहेत - http://www.maayboli.com/node/9517
'आक्षेप- शेवट सुचवा' Proud वरुन पूनमने ही कल्पना गणेशोत्सवात घेता येईल असं तेव्हा सुचवलं होतं. तीपण कल्पना मला आवडली होती.

[STY म्हटलं की सुरुवात योग्य पाहिजे, म्हणजे कोर्टाच्या मध्ये लॉब (क्रिकेटच्या भाषेत फुलटॉस) पाहिजे. नमनालाच घडाभर तेल नको. लिमिट येता काम नये. उत्तम सुरुवातीसाठी पहा प्रकाश काळेल यांनी सुरुवात लिहिलेली -अपराजीत
STY ठेवा ही नम्र विनंती. Happy ]

नांदी छान. कार्यक्रमासाठी शुभेच्छा.
१) मुलांसाठी ( /मोठ्यांसाठीही) कथावाचन किंवा कथाकथन ठेवता येईल.
२) भेटकार्डे स्पर्धा ( भेटकार्डे करुन त्यांचे फोटो इथे टाकणे)
३) मुलांसाठी हस्तकला ( किंवा ओरिगामी ) स्पर्धा.

गणपती बाप्पा मोरया ....................मंगलमुर्ती मोरया.............

१) प्रत्येक मायबोली कराने आपापल्या घरातील मंगलमुर्तीचे फोटो सहकुटुंबासकटच टाकावे.. ते ही एकाच बिबीवर..(जागा सुध्दावाचेल त्या योगे..).त्याच बरोबर माहीती सुध्दा द्यावी..घरी कधीपासुन चालु झाला..मुर्ती घेताना काही स्वता:चे अनुमान असतात ते.. दर दिवशी कोणकोणते उत्सव वगैरे करतात..प्रत्येका कडे काही ना काही परंपरा असते ती सुध्दा .......या पासुन ते विसर्जना पर्यंत माहीती द्यावी....त्यातुन सुध्दा मायबोली घरगुती फोटो स्पर्धा घेता येयील..

प्रत्येक मायबोली कराने आपापल्या घरातील मंगलमुर्तीचे फोटो सहकुटुंबासकट टाकावे.. <<<
एवढा आग्रेव का बरे? Light 1

त्या मंगलमूर्तीच्या सहकुटुंबांना फोटोसाठी वेळ आहे का आधी विचारावे लागेल. बघतो काय म्हणतात ते. Lol

गजा रे गजा... Happy

नांदी एक नंबर... पुढच्या सगळ्या उपक्रमासाठी मंडळास खूप खूप शुभेच्छा...

नांदी मस्तच Happy

मंगलमूर्तीच्या सहकुटुंबांना >>>>> गजा Lol रिद्धी सिद्धी येणार तर. झालंच तर संतोषीमातापण येणार (बाप्पाची लेक) Light 1

आपआपल्या परिसरातील गणपतीच्या देवळाची, तिथल्या कथांची माहीती सुबकपणे लिहण्याची स्पर्धा घेता येईल.

पाककृती स्पर्धा घेतली तर आमच्यासारख्यांना भाग घेता येईल.

कला कुसरी मध्ये गणपतीवर चढविण्यात येणारे अलंकार, हार, कंठी अशा सारख्या स्वहस्ते बनवलेल्या वस्तुंची स्पर्धा घेता येईल.

कविता विभागांसाठी गणपतीच्या महिमारुपी कवितांची स्पर्धा घेता येतील.

गणपतीच्या पुजेसाठि वापरण्यात येणार्‍या वस्तु म्हणजे निरांजन, ताम्हण असे सामान जास्तीत जास्त असणार्‍या छायाचित्रांची स्पर्धा घेता येईल.

प्रकाशचित्रासाठी गणपतीचे सुबक देऊळ, गणपतीचे नैवेद्य, गणपतीच्या सजावटी अश्या गोष्टी घेउ शकता.

गणपतीच्या स्वकल्पनेने केलेल्या कथांची स्पर्धा घेता येईल.

बालकलाकारांसाठी गणपती उत्सवाची चित्रकला स्पर्धा आयोजित करता येईल.

तसेच बालकलाकारांच्या मनातील आरास, डेकोरेशनची चित्रकला आयोजित करता येईल.

पाककृती स्पर्धा घेतली तर आमच्यासारख्यांना भाग घेता येईल. >>> तुमच्यासारख्यांनी भाग घेतला तर स्पर्धेची काय गरज ? Wink

दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रकाशचित्र स्पर्धा हवीच Happy

फक्त प्रकाशचित्र स्पर्धेचे विषय आधी जाहिर करावे म्हणजे प्रचि संग्रही नसतील तर नविन काढता येतील आणि संग्रही असतील तर ते स्पर्धेसाठी जपून ठेवता येतील. Wink

मवा, एकचदम अनुमोदन. जागूसारखे लोक असतील तर पाकृ स्पर्धांचे दोन विभाग ठेवावे मान्यवर अन अमॅचुअर

रिक्षा पण मस्त आहे

मोर्या मोर्या मि बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तु घाल पोटी....

Pages