हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<माझ्याकडे सगळी पुस्तके हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही मध्ये आहेत.. ऑफिसमध्ये फार्फार वैताग झाला की कधीकधी की ३०मि वाचत बसते.
सातव्या भागाचं एक फेक पुस्तक पण आहे.. ते पण बरंच चांगलं आहे पण जेकेची सर नाही.
ज्यांना हवंय त्यांनी सांगा इबुक्स पाठवते. >>> मला हवी आहेत. पाठवशील का?
<<<माझ्याकडे आहेत इबुके. मित्राने पाठवलि होती मागे. हवी असतिल तर मेल करते.>>
मला हवी आहेत. पाठवशील का?

धन्यावाद.

रैना, भरत आणि इतर सगळ्याच फॅन्सना अगणित मोदक...
मी आणि माझा नवरा पण (त्याला मीच वेड लावलं याचं) हॅपॉचे जबरदस्त चाहते आहोत.

मी एम.ए आर्किऑलॉजीच्या वर्गात वैदिक धर्म शिकवताना अथर्ववेदातील धर्म - त्यातली यातुविद्या (सुष्ट आणि दुष्ट), शिवाय वनौषधींच्या सहाय्याने उपचार करताना अगदी बिनचूक मंत्र म्हणण्याची आवश्यकता या सगळ्या संकल्पना चक्क हॅरी पॉटर च्या मदतीने शिकवते. म्हणजे अथर्ववेदातील defence against dark arts, herbology, potions, spells, असं. पोरं जाम खूष आणि संकल्पना पटकन समजावता आल्याने मीही खूष!!! (अजून माझ्या सीनियर ऑथोरिटीजपर्यंत ही बातमी पोचली नसावी बहुदा... बेशुद्ध पडतील असलं काहीतरी धर्माच्या इतिहासात शिकवते म्हणून Proud )

मी पण आहे तुमच्यात आणि माझी ८ वर्षाची लेक पण. तिच्य ७ व्या वाढदिवसाला गूगलून मस्त हॅरी पॉटर थीम पार्टी केली होती. प्लॅटफॉर्म ९३/४ ला बोलावलं होतं. धमालच आली.

वरदा, जेकेबाईना तिथूनच स्फूर्ती आली असेल का??? पुना ओक एखादे पुस्तक लिहितील त्यावर "हा हरी नावाचा कुंभार आहे" Proud त्यामधली नागिनी, पार्वती पाटील असली भारतीय नावे वाचताना मजा आली होती.
.

गॉब्लेट ऑफ फायर रीलीज झाला तेव्हाची गोष्ट. मला "बघायला" म्हणून एक जण आला होता. सहज बोलता बोल्ता म्हणाला की मी आज संध्याकाळी गॉब्लेट ऑफ फायरला जाणार आहे. (मी आधी पाह्य्ला होता) मग काय चर्चा रंगली आमची दोघाची Happy त्याचे (आणी माझे घरवाले) झीट येऊन पडले.

माझे आवडते पुस्तक पहिले आणि सातवे. अझ्काबान कैच्याकै होते. खासकरून त्यातले ते टाईम मागे नेण्याचे.

जेकेने प्रतिसृष्टी निर्माण करताना या जगाचा एक क्षणभरदेखील विसर पडू दिला नाही हे तिचे कौशल्य.

चित्रपट चांगलेच आहेत पण दुर्दैवाने अझ्काबान नंतर चित्रपटांना पुस्तकाची सर आली नाही...... गॉब्लेट ऑफ फायर मधे Voldemort ची एन्ट्री होते तो भाग पुस्तकात अफाट आहे. शिवाय Dumbeldore च्या मृत्युचा प्रसंग देखील......
बर्‍याचदा खटकलेली गोष्ट म्हणजे चित्रपटातले Dumbeldore पेक्षा पुस्तकात Dumbeldore फारच शांत आणि ठाम वाटतात. चित्रपट खूप पळवल्यासारखा वाटतो.

नंदे Proud
हो, पण हॅपॉ वाचताना या बाईचा जगातील प्राचीन धर्माच्या, मिथकांच्या, लोककथांच्या इतिहासाचा अभ्यास किती सखोल आहे हे वारंवार जाणवत रहाते. जेवढी आपल्याला जास्त माहिती तेवढी त्याची खुमारी जास्त.. मी तर पहिल्याच पुस्तकाच्या पहिल्याच पानाच्या वाचनात जी काही प्रेमात पडले ती अजून गटांगळ्याच खातीये..

केदार गोब्लेट ऑफ फायरमध्येच व्हॉल्डेमर्टला शरीर मिळालं ना?
आणि तिथेच त्याच्या आणि हॅरीच्या वाँडच्या नात्याचं महत्त्व कळतं.

चित्रपटतला टॉम रिडल - हाफ ब्लड प्रिन्स मधला बघून ओमेनमधल्या मुलाची आठवण येते का?

रैना मस्तच लिहिलंय.

मी हॅपॉचं एकही पुस्तक वाचलेलं नाही.. एकही चित्रपट पाहिलेला नाही.. फॉर दॅट मॅटर मला हॅपॉबद्दल काही म्हणजे काहीच माहित नाही.. गेलाबाजार ती ऑरलँडोतली राईड सुध्दा नाही घेतलेली हॅपॉची.. आम्ही गेलो तेव्हा बंद होती.. शून्य डोमेन नॉलेज... !
इथले आणि आजूबाजूचे पंखे, एसी, कुलर पाहून वाचेन/पाहीन म्हणतो..
आधी वाचावं की आधी पहावं ? एनी थॉट्स ?

माझ्याकडे हार्डकॉपीज, सॉफ्टकॉपीज, सर्व मूव्हीज, पुस्तकं रिलीज व्हायच्या आधी इंटरनेटवर बोकाळलेली 'फेक' वर्जन्स असं एच.पी शी रिलेटेड सगळं काही आहे. ( बाय द वे, माझ्याकडे 'क्विडीच थ्रू एजेस' आणि 'फँटास्टीक बीस्ट अँड व्हेअर टू फाईंड देम' सुद्धा आहे)

हॅरी पॉटर मला आवडतं कारण माझ्या म्हणून ज्या लिमिटेशन्स आहेत (ज्या मला माहित आहेत) त्या लिमिटेशन्स हॅरी सहजपणे पार करुन जातो . रिसरेक्शन स्टोन, एल्डर वाँड सहजासहजी मी हातातून जाऊ दिला नसता. "ओक्के ड्युड! मला नसतं हे जमलं" असं प्रांजळपणे म्हणावंसं वाटतं अशी पात्र असलेली पुस्तकं वाचायला मला फार आवडतं. आणि म्हणूनच हॅरी पॉटर आवडतं.

त्यातले स्पेल्स, फीस्ट्स, हनीड्युक्स, क्विडीच याबद्दलची गंमत माझ्याकरता गॉब्लेट ऑफ फायरमध्येच संपली, ते सरावाचं झालं आणि मग दुवे सांधणे सुरु झालं. पहिल्या भागांमधले न कळलेले, ओझरते आलेले संदर्भ नव्याने कळायला लागले, चमकवून टाकायला लागले आणि मग पुस्तक आवडण्याची ब्रुम्स, चावीशिवाय उघडणारी कुलुपं, हलू-बोलू शकणारी चित्रं, वाँड्स याशिवायची नॉन-चाईल्डीश कारणं मिळू लागली.

मला हॅरीला सर्व थरातून मिळणारया अकृत्रिम प्रेमाचा हेवा वाटतो त्यामुळे मॅलफॉयचा द्वेष आवडतो, हॅरीचं निरलस साधेपण आवडतं, डंबलडोरचं पर्वताएव्हढं महान महान असणं आवडतं, त्यातल्या प्रत्येक गोष्टीमागे सॉलिड रिझनिंग असणं आवडतं, हॅरी प्रोटॅगनिस्ट असला तरी रॉन, हर्मायनी खेरीज त्याचं अपूर्ण असणंही आवडतं. (हर्मायनी नसती तर हॅरी आणि रॉन जिवंत तरी राहिले असते का हा मोठा प्रश्नच आहे)

मी डंबलडोरच्या जागी नेहमीच लॉर्ड ऑफ द रिंगवाल्या ' गँडाल्फ' (सर इयान मॅकेलन) ला कल्पूनच पुस्तक वाचलंय.चित्रपटांमधले क्रिस कोलंबसचे पहिले दोन्ही भाग आवडले नंतरचे धन्य आहेत..

चित्रपटातला हॅरी मला नेहमीच मेंगळट वाटत आलाय. पण वाचताना मी माझ्या डोक्यात जशी पात्रं रंगवली होती तशीच्या तशी मला मॅलफॉय, रॉन, हर्मायनी, बेलाट्रीक्स,लुपिन, मॉली, डॉबी,लुना, वीझले ट्विन्स यांच्यामध्ये दिसली. मॅलफॉय कार्टं महान घेतलंय. 'माज' दाखवावा तो ह्या पोरासारखा असं मला कौतुकाने वाटतं. 'अभिनय' असा त्या चित्रपटातले फार थोडे लोक करतात त्यातला हा एक.

पुस्तकांमध्ये वाचायला 'गॉब्लेट ऑफ फायर' आवडतं आणि मूव्हीज मध्ये 'चेंबर ऑफ सेक्रेट्स' हा भाग सर्वात जास्त आवडतो. आणि मला सातही सात पुस्तकं पाठ आहेत. Happy

सर्वात फेवरीट कॅरॅक्टर म्हणजे लूना लव्हगूड... आणी चित्रपटात तर काय गोड दीसते ती इव्हाना लिंच लूनाच्या भूमीकेमधे.. तिने फक्त बोलत रहावं आणी मी ऐकत राहीनं.............

मणिकर्णिका,
<<<हॅरी पॉटर मला आवडतं कारण माझ्या म्हणून ज्या लिमिटेशन्स आहेत (ज्या मला माहित आहेत) त्या लिमिटेशन्स हॅरी सहजपणे पार करुन जातो . .............
........ त्यातल्या प्रत्येक गोष्टीमागे सॉलिड रिझनिंग असणं आवडतं, हॅरी प्रोटॅगनिस्ट असला तरी रॉन, हर्मायनी खेरीज त्याचं अपूर्ण असणंही आवडतं. (हर्मायनी नसती तर हॅरी आणि रॉन जिवंत तरी राहिले असते का हा मोठा प्रश्नच आहे)>>>

एकदम माझ्या मनातलं.. पण मला इतके नेमके शब्द सापडले नसते..

रैना ___________/\__________ खूप छान लिहिलं आहेस... हे त्या मोठ्या पोस्टीबद्दल.. अजुन बाकीच्या वाचत आहे Happy
काय आवडत नाही.>>> याची मुद्दे पटले.. फक्त पहिला सोडुन.. मला खूप आवडायचं साध्या साध्या स्पेल ने बाकिच्यांना हरवलेलं.. अगदी शेवटच्या लढाईतही पहिल्यांदा वाचताना जाणवलं होतं की हॅरी expelliramusच वापरेल म्हणुन.. Happy

येताय का हॅरीपॉटरपार्कात?? >>>>>>>>>> मृण्मयी अजुन ४-५ वर्षे तिथे असशील तर या आमंत्रणाचा नक्की उपयोग करेन मी Wink

रच्याकने ज्यांना हॅपॉ मधली प्रतिसृष्टी आवडते त्यांच्या साठी अजुन हि एक रेकमेंडेशन सिरिज आहे.>>>> सावली पुण्यात मिळतील का गं ही पुस्तके... मला आवडतं असलं वाचायला...

ए हो मलाही धागा हायजॅक वगैरे करायचा नाहीये. >>>> काही हाय्जॅक वगैरे होत नाही धागा.... उलट नवीन काहितरी ऐकायला मिळेल... Happy

बटरबियरची चव मस्त नाही?>>>> firewhiskeyची तरी चांगली असावी मग Wink मला चॉकलेट फ्रॉग खायचाय...

डेथली हॉलॉज विकत घेतले त्याच रात्री वाचायला सुरुवात केली. हॅरी बथिल्डाच्या घरी जातो तेव्हा करकरीत मध्यरात्र होती. आणि अचानक जोरदार वारा सुटला. भयंकर घूंघूं आवाज! मी घरी एकटीच. जरावेळ न वाचता घाबरून गप्प बसले, तर अचानक खालून लॅच उघडून कोणीतरी घरात घुसल्याचा आवाज!! बापरे. पाचावर धारण वगैरे परिस्थिती. आणि मग खालून माझ्या हाउसमेटने विचारले, 'मृ, अजून जागी आहेस का?' ती नर्स असल्याने अशी रात्री बेरात्री घरी यायची. हुश्श झाले. तरी नक्की सिल्विया आहे की तिच्या आवाजात दुसरे कोणी असा बारीक विचार आलाच!>>>>>>>>>>>>>>> Lol

अझ्कबान माझे सगळ्यात आवडते आहे.>>> माझंपण

आत्ता या वाढदिवसाला कलिग्जनी माझे हॅपॉ प्रेम पाहून आख्खाच्या आख्खा सेट दिलाय आणि त्याबरोबर ऑडीयो बुक्स सुद्धा...>>>>>>>> सो लकी Happy

असे कलिग्ज मिळावेत म्हणून कोणता स्पेल वापरायचा म्हणे?>>>> त्यापेक्षा सरळ सेटलाच जेमिनो स्पेल वापर Happy

मी एम.ए आर्किऑलॉजीच्या वर्गात वैदिक धर्म शिकवताना अथर्ववेदातील धर्म - त्यातली यातुविद्या (सुष्ट आणि दुष्ट), शिवाय वनौषधींच्या सहाय्याने उपचार करताना अगदी बिनचूक मंत्र म्हणण्याची आवश्यकता या सगळ्या संकल्पना चक्क हॅरी पॉटर च्या मदतीने शिकवते.>>>>>>>>>>>> सहीच... आमचे immunologyचे शिक्षक हॅपॉ फॅन होते.. त्यामुळे त्यांनी शिकवलेले लगेच समजायचे (मानसिकता असते ना एक-एक ;)).. पण त्यानंतर बर्‍याच जणांनी मला immunology शिकवायचा प्रयत्न केला.. पण तेव्हा जेव्हडे शिकले तेव्हडंच लक्शात आहे अजुनही... Happy

सहज बोलता बोल्ता म्हणाला की मी आज संध्याकाळी गॉब्लेट ऑफ फायरला जाणार आहे. (मी आधी पाह्य्ला होता) मग काय चर्चा रंगली आमची दोघाची स्मित त्याचे (आणी माझे घरवाले) झीट येऊन पडले. >>>>>>>>> Rofl

बर्‍याचदा खटकलेली गोष्ट म्हणजे चित्रपटातले Dumbeldore पेक्षा पुस्तकात Dumbeldore फारच शांत आणि ठाम वाटतात. >>>>>>> अनुमोदन

आधी वाचावं की आधी पहावं ? एनी थॉट्स ?>>> पराग आधी वाचाच..... Happy

मी नविन आलेय मायबोली वर ...मी इथे लिहिलेले चालेल ना..?>>>> असं विचारायचं नसतं... बिनधास्त लिहायचं Happy
बाणाचा ण - N
फॅन - fEn

माझ्याकडे 'क्विडीच थ्रू एजेस' आणि 'फँटास्टीक बीस्ट अँड व्हेअर टू फाईंड देम' सुद्धा आहे>>>> माझ्याक्डेपण आहे.. पण अजुन वाचलं नाहिये... हॅरी रॉनला जसं अभ्यासाची पुस्तकं वाचायचा कंटाळा यायचा ना तसाच मलाही येतो.. Happy

मणिकर्णिका __________/\_________ मस्त लिहिलय....

हर्मायनी नसती तर हॅरी आणि रॉन जिवंत तरी राहिले असते का हा मोठा प्रश्नच आहे>>>> अगदी अगदी Happy

मॅलफॉय कार्टं महान घेतलंय. 'माज' दाखवावा तो ह्या पोरासारखा असं मला कौतुकाने वाटतं.>>> Lol

तिने फक्त बोलत रहावं आणी मी ऐकत राहीनं>>>> Lol

मला गॉब्लेट ऑफ फायरमधली Fleur Delacour मारिया शारापोव्हासारखी दिसते Happy

सगळ्यात खतरनाक डार्क कॅरॅक्टर बार्टी क्राउच.

हृदयस्पर्शी प्रसंग : सिरियस ब्लॅकचा मृत्यू. हॅरीसाठी पुन्हा पोरकेपण त्यानंतर लगेच हॅरीला प्रॉफेसी कळणं. स्वतः जिवंत राहण्यासाठी त्याला डार्क लॉर्डला मारणं हे भयानक विधिलिखित.ब्लॅकने दिलेला टु वे मिरर जो वापरला असता तर हे सगळं टाळता आलं असतं याची हळहळ.

आणि शेवटी स्नेपच्या मेमरीत कळणं की त्याला स्वतःहुन मृत्युला सामोरं जायच आहे ते.. टॉमनेच त्याला मारलं पाहिजे हे डम्बलडोरच म्हणणं... हे वाचताना मी खूप रडले होते...
शेवटपर्यंत स्नेप हॅरीच्या बाजुने आहे हेच कळलं नव्हतं..

टु वे मिरर जो वापरला असता तर हे सगळं टाळता आलं असतं याची हळहळ.>>>>>> अगदी...

शेवटच्या लढाईतले हॅरी आणि वोल्डमॉर्टचे duelच्या वेळचे बोलणे सहीच.. मूव्ही मधे हे काहिच दाखवलं नाहिये Sad

मला सगळ्यात जास्त डंबलडोर आवडतात..
आवडतं वाक्यः its our choices rather than our abilities that shows what we are made up of
ह्रुद्यस्पर्शी प्रसंग - डंबलडोअर ह्यांचा मृत्यू... Sad

नानबा- सेमपिंच.
मणिकर्णिका- भारी.
वरदा- क्या बात है. मी पण एकदा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम हॅरीला धरून करावा काय या विचारात आहे. व्यवस्थापनाला झीट येईल. पब्लिकला आवडेल पण.
टु वे मिरर - भरत. अनुमोदन. श्या. केवढी ती हळहळ वाटते ना..

पराग- पुस्तकं वाच रे. मग पाहिजे तर चित्रपट पहा. Happy
मी सगळ्यात जास्त तिरस्कार अम्ब्रिजचा केला आहे आणि त्यानंतर बेलाट्रिक्स...>> Happy चिमुरी.

हॅरी प्रोटॅगनिस्ट असला तरी रॉन, हर्मायनी खेरीज त्याचं अपूर्ण असणंही आवडतं. (हर्मायनी नसती तर हॅरी आणि रॉन जिवंत तरी राहिले असते का हा मोठा प्रश्नच आहे) >> +१

हॉस्टेलला असताना आम्ही अंब्रिजवाला भाग वाचला.. मग काय, रेक्टरला अंब्रिजच म्हणायचो.. नंतर m.sc. माझी मैत्रिण हॉस्टेलला गेली आणि मी घरी.. तेव्हा तिच्या हॉस्टेलमधे पत्रं फोडुन वाचायचे, मग पुन्हा एकदा तिची रेक्टर अंब्रिज झाली Happy

भरतजी ,
मला "गॉब्लेट ऑफ फायर " आवडत नाही कारण ते माझ्या मते उगीच फारच ताणलय . मूळ कथेशी त्याचा फारसा सम्बंध नाही .
एकदा क्राऊच मूडी म्हणून हॉगवर्ट्स मधे शिरल्यावर त्याला बाहेर आणण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींची गरज होती ? अगदी डंबलडोर ला ही शंका आली नव्हती . सहजच त्याला बाहेर नेता आल असत आणी तेथून पोर्ट की वापरून कोठेही !!!
तुमची याबबत मते वाचायला आवडतील .
वॉल्डेमॉर्ट जिवंत व्हायचा आणी नंतरचे प्रसंग महत्त्वाचे आहेत पण ते शेवटच्या १०% भागात घडतात .

मला "गॉब्लेट ऑफ फायर " आवडत नाही कारण ते माझ्या मते उगीच फारच ताणलय . मूळ कथेशी त्याचा फारसा सम्बंध नाही .>>>>> triwizard tournament होणार होती म्हणुनच डम्बलडोरने मूडीला शिकवायला बोलावलं... आणि म्हणुनच वोल्डेमॉर्टने तो प्लन बनवला...

अगदी डंबलडोर ला ही शंका आली नव्हती . सहजच त्याला बाहेर नेता आल असत आणी तेथून पोर्ट की वापरून कोठेही !!!>>>> असं झालं असतं तर ड्म्बलडोरला शंका आलीच असती की.. त्यांना वोल्डमॉर्टच परत येनं गुपचुप करायचं होतं.. पण हॅरी तिथुन परत आल्याने ते प्लॅन फसला...

triwizard tournament होणार होती म्हणुनच डम्बलडोरने मूडीला शिकवायला बोलावलं... >> मला नाही वाटत की मूडीच्या येण्याचा आणी triwizard tournament चा काही संबंध होता. आणी जरी असता तरी एकदा आत शिरल्यावर पुढच्या गोष्टींची काय गरज होती ?
त्यांना वोल्डमॉर्टच परत येनं गुपचुप करायचं होतं >> तेही करता आलच असत ना .

मला नाही वाटत की मूडीच्या येण्याचा आणी triwizard tournament चा काही संबंध होता. >>>> होता हो... triwizard tournamentच्या निमित्ताने karkaroff येणार होता हॉगवर्ट्स मधे.. तो डेथ ईटर होता आणि त्याआधी Peter Pettigrew पळुन गेलेला असतो.. आणि Trelawney ने प्रेडिक्शन केलेलं असतं की फेथफुल सर्वन्ट वोल्डेमॉर्टला जॉइन होइल म्हणुन.. शिवाय वर्ल्ड कपच्या वेळेस डार्क मार्क दिसलेला असतो... आनि ड्म्बलडोरला हेदेखील माहित असतं की टॉम रिडल सिनिअरच्या घरातील खूप जुना नोकर गायब झालेला आहे.. त्यातच हॅरीच्या स्कार चं दुखणं.... कदाचीत या सगळ्या पार्श्वभूमीवर डम्बलडोरला एक ऑरर हॉगवर्ट्स मधे हवा असतो.. म्हणुन ते मूडीला बोलावतात... पुस्तकात कुठेतरी याचा उल्लेख आहे मात्र...

आणि tournament च्या निमित्ताने येणार्‍या लोकांचा पुढे सहभाग असतो त्यामुळे त्यांना intoduce करायला हा प्लॉट महत्वाचा ठरतो

त्यांना वोल्डमॉर्टच परत येनं गुपचुप करायचं होतं >> तेही करता आलच असत ना .>>>>>>>>>>>>>> एकदा हॅरी गायब झाला असता तर ड्म्बलडोरने लगेच ओळखलं असतं की हे वोल्डेमॉर्टशीच संबंधीत आहे म्हणुन...

.

मला टीका करायची किंवा वाद घालायचा नाहिये.>>>> मी त्या अर्थाने घेतलंही नाहीये.. डोन्ट वरी Happy

माझ्या मते Goblet मधे तस नाहीये. >>>> त्यातही आहेतच की... लेडी जायन्ट.. विक्टर क्रम.. फ्लर.. विक्टरच्या वॉन्डबद्दलची माहिती..

थोडं वेगळं मत मांडतेय. मीपण हॅरीची फॅनच आहे, तरी -

सगळं काही शेवटी आलबेल होतं. सगळ्या अडचणी सुटतात. सगळ्या अनाकलनीय कोड्यांची नीट संगतवार उत्तरं मिळतात. सगळ्या दुष्ट लोकांचं वाट्टोळं होतं. सगळ्या सज्जन लोकांचं अखेर यथासांग भलं होतं. नायकाला नायिका मिळते. ते एकमेकांवर संपूर्ण आणि सखोल प्रेम करू लागतात. आणि दोघे सुखाने नांदू लागतात.

असले शेवट असणारी पुस्तकं लिमिट डोक्यात जातात. काहीतरी उंचावरून खाली फेकून द्यावं, काहीतरी तोडून-मोडून-जाळून टाकावं, कुणाच्यातरी उगाचच कानफटात हाणावी, अश्या अनेक अनावर हिंसक इच्छा असल्या पुस्तकांचं शेवटचं पान संपवल्यावर जाग्या होतात. सगळं जग बेतशीर सुबकपणे आपल्या दीडवितीच्या शब्दकोड्यात चपखल बसवणार्‍या लेखकाची आणि वाचणार्‍या आपली दया-दया येते.

बाकी सगळ्याचं ठीक आहे. पण हॅरी पॉटरचं हे असं नेमकं कधी झालं?

नेमका पान क्रमांक वगैरे आता आठवत नाही.

उलट त्यातलं समांतर अद्भुत विश्व पाहिलं, तेव्हा भारावून जायला झालं होतं.

'मिरर ऑफ डिझायर'मधे साध्यासुध्या आरशासारखं आपलं प्रतिबिंब दिसत नाही, तर आपल्या अंतर्मनातल्या तीव्र इच्छा मूर्त झालेल्या दिसतात, हे कळलं तेव्हा त्यातल्या अर्थपूर्ण कल्पनेची भन्नाट मजा वाटली होती.

'विझार्ड नेव्हर चूजेस वॉण्ड, इट्स दी वॉण्ड हू चूजेस दी विझार्ड' हे अजब वाक्य वाचलं, तेव्हा चक्रावून जायला झालं होतं. पण मग त्यातून छडीसारख्या निर्जीव गोष्टीला बहाल केलेला जिवंतपणा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व दिसलं आणि बाईंबद्दल आदर वाटला.

'सॉर्टिंग हॅट'ची कल्पनाही अशीच अफलातून. आपल्याला जे व्हायचं असतं, ते आपल्याला होता येतंच. फक्त तितकी तीव्र इच्छा आणि निर्णयाचा ठामपणा असायला हवा, असं श्रीमंत तर्कशास्त्र सांगत होती बाई.

प्रत्येकाचा पॅट्रोनस फॉर्म (च् च्! पॅट्रोनस म्हणजे तुमच्या मनातल्या होकारात्मक भावनांनी तुमच्या वॉण्डमधून समूर्त होणं.) निरनिराळी रूपं घेतो इथवर ठीक आहे. पण लिलीवर नितांत प्रेम करणार्‍या स्नेपच्या पॅट्रोनसनं लिलीच्या पॅट्रोनसचा आकार घ्यावा? हे अद्भुत होतं.

राक्षसाचा प्राण कुठल्यातरी पोपटात असण्याची कल्पना आपल्याला कुठे नवीन होती? त्याच धर्तीवर व्होल्डरमॉटनं आपल्या जिवाचे सात तुकडे केले आणि अमर होण्याकरता ते कुठेकुठे दडवून ठेवले. पण त्याच्या जिवाचा एक अंश असावा चक्क हॅरीमधे. आणि त्यातून त्या दोघांमधे एक जिवंत दुवा निर्माण व्हावा? बालवाङ्मयाची काळी-पांढरी सरहद्द संपते आणि त्यांची अनाकलनीय सरमिसळ असलेला राखाडी प्रदेश सुरू होतो, तिकडे चाललं होतं सारं.

प्राणिसृष्टी म्हणू नका, भाषा म्हणू नका, मंत्र म्हणू नका, खेळ आणि विज्ञान म्हणू नका... एक संपूर्ण नवीन विश्व.

सर्वसाधारण कल्पना जर एकरेषीय असतील, तर हे कल्पनेचं विश्व म्हणजे एखाद्या प्रसरणशील ताकदवान विस्फोटासारखं होतं. दाही दिशांना विस्फारणारं. विस्फारत राहणारं.

दुर्दैवानं ते तसं राहिलं नाही. दर गोष्टीचा एक साचा ठरत गेला. नियम बनत गेले. दर वर्षी काहीतरी संकट यावं. हॅरीनं त्यावर मात करावी. सरतेशेवटी प्रोफेसर डंबलडोरनी सगळ्या अनुत्तरित प्रश्नांची संगतवार उत्तरं द्यावीत... सगळं कसं संतापजनक प्रेडिक्टेबल होत गेलं. शेवटच्या वर्षी हॅरीनं व्होल्डरमॉटवर मात केल्यावर त्याचं गिनीशी लग्न व्हावं, त्याला तीन मुलं व्हावीत (दोन मुलगे आणि एक मुलगी!) आणि त्यातल्या एकाचं नाव 'अल्बस सिव्हेरस' असावं हा तर गलिच्छपणाचा कळस होता.

अखेरशेवट हॅरीला पूर्ण भाग गेलाच.

फक्त हॅरीच नाही. अशी अपेक्षाभंग करणारी अनेक पुस्तकं असतात. माणसंही असतात - ज्यांचा थांग लागतो आपल्याला सहज. आणि सगळं इतकं सहज-प्राप्य-खुजं-नीटनेटकं असल्याबद्दल एक रानवट संताप येतो.

एरवी खरंतर एखाद्या संख्येला पूर्ण भाग गेलेला मला आवडतो. सगळं आलबेल चालू असल्याचा, सगळ्यावर आपला ताबा असल्याचा, सगळं नीट आवरून ठेवल्याचा एक फील येतो...

पण पुस्तकं, सिनेमे आणि माणसं? त्यांना पूर्ण भाग न जाण्यातच गंमत आहे

Pages