गाठ्याची भाजी

Submitted by अबोल on 26 July, 2011 - 11:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी बेसन, १ वाटी दही , जीरा, तिखट्,हळद्,मीठ, कोथीबीर , तेल

क्रमवार पाककृती: 

१ वाटी बेसन मध्ये हळद, मीठ, अर्धा चमचा तिखट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, जिर ,थोड्स हीन्ग , घालुन चान्गल मीक्स् करावे मग वरुन २ ते २.५ चमचे तेल व २ ते ३ चमचे पाणी घालुन चागल मळुन कणके सारखा गोळा बनवावा. गोळा कडक होइल थोडा पण तसाच हवा (तिखट मसाला , गरम मसाला तुम्हाला गाठ्या किती तिखट पाहिजे त्या वर आहे )

मग थोद कणिक घेवुन पोळपाटा वर घेवुन त्याचि लाब सुरळि करावी ( मला नीट शब्द आठ्वत नाहि पण कापुस कसा घेवुन वाति वळतो तस ) पण जाड्सर आनि सुरी ने कापुन त्याचे लहान ( फरसाण मध्यल्या गाठया असतात ना ) तसे तुकडे करावे .

नतर एका कढई मध्ये हे तुकडे घेवुन ते तुकडे बुडतील त्या पेक्षा जास्त पाणी घेवुन ते गॅसवर उकडायला ठेवायचं १५ मिनिट तरि लागतात ..

तो पर्यत दहि घुसळुन घ्यावे... आनि ते उकडल्या वर गॅस मद करावि व हे दहि त्यात टाकावे , मीठ टाकावे(जारि त्यात थोड पाणी असल तरी चालेल ) हे मिश्रण फुटता कामा नये ते हलवत रहावे .

बाजुला छोट्या कढई मध्ये तेलामध्ये जिरा हिग , हळद , तिखट मसाला घालुन हि फोडणी वरिल मिश्रणा वर टाकावे वरुन भरपुर कोथीबीर पसरावि ..

गाठ्याची भाजी तयार

अधिक टिपा: 

दहि आबट नसावे

माहितीचा स्रोत: 
मैत्रीणी कडुन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागोमोहनप्यारे : हि मला मैत्रीणी ने शिकवली आहे.. ति मारवाडी च आहे.. म्हणून मी अशी करते... आता तूम्ही दीलेल्या प्रमाणे पण करुन पाहिन... धन्यवाद