आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 19 July, 2011 - 09:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी वाटी मूग डाळ
दीड वाटी तांदूळ
१ टेबलस्पून शुध्द तूप
१०-१२ कढीपत्ता पाने
१ टीस्पून जिरे
पाव चमचा मिरी दाणे
मीठ
१०-१२ काजू तुपावर खरपूस भाजून
आवश्यकतेनुसार पाणी

khich1 copy.jpg

क्रमवार पाककृती: 

मूग डाळ कोरडीच थोडी भाजून घ्यावी. भाजून थंड झालेली डाळ व तांदूळ पाण्यात २० मिनिटे भिजवून ठेवावे.
पॅन/ कढईत तूप गरम करून त्यात जिरे तडतडवावेत. कढीपत्ता, मिरी दाणे घालून थोडे परतावे.
त्यात निथळलेले तांदूळ व डाळ घालून व्यवस्थित परतावे. आवश्यकतेनुसार पाणी व मीठ घालून शिजवावे. वाढताना ही खिचडी वरून काजू घालून वाढावी.
सोबत आंध्र स्टाईलने टोमॅटोची चटणी देतात. परंतु कैरीचा छुंदा/ लोणच्याबरोबरही ही खिचडी मस्त लागते.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

आंध्रात किंवा दक्षिण भारतात ही खिचडी खास करून नैवेद्यासाठी बनवली जाते. अतिशय सौम्य व रुचकर असा हा पदार्थ आहे. गरम/ गार दोन्ही प्रकारे छान लागते. हिरव्या केळीच्या पानांत किंवा द्रोणात ही गरमागरम खिचडी घालून देतात. वरून साजूक तूप!

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल व दाक्षिणात्य मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! ही अगदी सेम टू सेम मद्रासी पोंगलची रेसिपी!
मुंबईत माटुंग्याला एका ष्टालवर मस्त मिळतं पोंगल!
आता करून पहातो घरी! Happy

येस्स... पोंगल सारखीच वाटत्येय ही खिचडी.
मस्त लागते. शुद्ध तूप मस्त, त्याशिवाय मजा नाही. सोबत मद्रासी पापड... यम्मी Happy

येस्स बित्तु, ही पोंगल खिचडीच असावी! पण मी ज्या प्रकारे पोंगलची कृती पाहिली आहे त्यात कधी हिंग होता, कधी मिरच्या वगैरे होत्या. पण ह्या वरच्या प्रकारात ह्यापैकी काहीच नाही. फार भन्नाट लागतो हा प्रकार. यम्मी नाश्ता म्हणूनही खायला हरकत नाही! Happy सोबत सागु / काकडीची दह्यातील मोहरी फेसून केलेली कोशिंबीर देखील मस्त कॉम्बो आहे.

बित्तु अय्यप्पन चा पत्ता दिल्याबद्दल थँक्स! सहर्ष समस्त खादाडीप्रेमी मुंबईनिवासी सुहृदांस कळविण्यात येईल. Happy

लाजो, मामी, देवचार... धन्स!

धन्स रोचीन. काल आमच्याकडेही रात्री जेवायला हीच खिचडी होती. नाश्त्यालाही मस्त लागते.
वर्षा, प्राची, दीपा, दिनेशदा, अनिल... धन्यवाद! Happy

आत्ताच केली ही खिचडी. काय मस्त लागते आहे.
इतक्या सात्विक आणि चविष्ठ पाककॄतीबद्दल अरुंधती कुलकर्णी यांचे शतशः आभार!

खावीशी वाटत आहे

धन्यवाद या नावीन्यपूर्ण प्रकाराच्या माहितीबद्दल Happy

आता सगळे नीट वाचतो, नुसता फोटो पाहूनच प्रतिसाद लिहिला Happy

मला फार आवडते ही खिचडी. आमच्या इथल्या साउथ इंडीयन रेस्टॉरंटमधे पोंगल म्हणून मिळते. रेसेपीबद्दल धन्यवाद अरूंधती.