मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत Happy

.

रिलायन्स बिग टीव्हीची एक अ‍ॅड मस्त आहे. ती छोटी मुलगी फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तयार होऊन येते आणि तिचे वडिल टीव्ही बघत असतात ती. त्यांची दुसरी अ‍ॅड मात्र डोक्यात जाते. तो माणूस टीव्ही पहात असतो आणि त्याची बायको २ ड्रेसेस घेऊन कोणता घालायचा ते त्याला विचारायला येते ती.

डाग चांगले आहेत मधली कावळा उडवणारी आजी किती प्रेमळ. माझ्या आजीने आणी आईने कपडे खराब
केले म्हणून पाठीत धपाटा घातला असता

"माझ्या आजीने आणी आईने कपडे खराब केले म्हणून पाठीत धपाटा घातला असता"
तेव्हा बालमानसशास्त्र नव्हते ना.

नेरोलॅकची जस्सी असलेली ती नवी अ‍ॅड बेकार आहे. मला तर २-३ वेळा बघूनही त्या वांग्याचा आणि पेन्टचा संबंध लक्षात आला नव्हता. तसंच ती अ‍ॅक्सिस बॅन्कची सिनियर सिटीझनची अ‍ॅड (सुलभा देशपांडे आहेत त्यात). त्यापेक्षा त्यांची सर्वात उंचावरच्या एटीएमची अ‍ॅड मस्त आहे. आणखी एक वैतागवाणी अ‍ॅड म्हणजे ट्रॅव्हलगुरुची (इंडिया को बेच डाला). खरंच आहे म्हणा....ह्या राजकारणी लोकांनी देश विकायलाच काढलाय. Sad

आजकाल सलमान कुठल्यातरी innerware च्या अ‍ॅडमध्ये दिसतोय. कसल्या कर्जाचे हप्ते फेडतोय देवाला ठाऊक.

स्वप्ना Happy
अरे ती सलमान आणि सोहेलची अ‍ॅड पाहीली का? कुठल्याशा मिनीट्रक ची आहे.. काहीही आहे ती अ‍ॅड!

तो डाग चांगले आहेत मध्ये कपडे खराब करून बुजगावणं होणारा मुलगा कस्सला गोजिरवाणा आहे !! प्रचंड आवडला तो मला! >> अगदी अगदी बस्के.. आजी नि नातू दोघेही प्रचंड ग्गोड आहेत.. Happy

>>अरे ती सलमान आणि सोहेलची अ‍ॅड पाहीली का

सलमान आणि सोहेल लाईफटाईम "Buy One, Get One Free" स्कीमवर आहेत Wink

ती रेक्सोना का कुठल्या साबणाची जाहिरात आहे, नवरा बाहेर बाईक काढून वाट पाहतो आणि बायकोलाच गाडी चालवायला देतो मग तिची रेशम सी त्वचा वगैरे.. पण तो प्रत्यक्ष तिला स्पर्श करेपर्यंत जाहिरात बाईकची आहे, इंजिन ऑईल ची आहे की आणखी कशाची आहे त्याचा पत्ता लागत नाही. Uhoh
सलमान आणि सोहेलची >> हो कसली टुकारे! Lol

>>>पण तो प्रत्यक्ष तिला स्पर्श करेपर्यंत जाहिरात बाईकची आहे, इंजिन ऑईल ची आहे की आणखी कशाची आहे त्याचा पत्ता लागत नाही
अग बरं आहे एका दगडात दोन्-तीन पक्षी, नशीब कान वगैरे चावला नाहिये Wink

पण तो प्रत्यक्ष तिला स्पर्श करेपर्यंत जाहिरात बाईकची आहे, इंजिन ऑईल ची आहे की आणखी कशाची आहे त्याचा पत्ता लागत नाही.>>>>> अगदी अगदी.. Happy

टाटा इंडिकॉम्ची नवीन अ‍ॅड छान वाटली.. ती पानिपतच्या लढाईची.. सारखा फोन कट झाल्यावर बोलणं किती irritating होउ शकतोय ते चांगलं टिपलयं..

छान धागा आहे...

माझी नावडती जाहिरात
कसली जाहिरात आहे, आठवत नाहीये, पण एक नाकातला पुरुषी आवाज जो ऐकून फार वैताग येतो...." आहेस कोण गं तू, सुंदरी...मला वेड लावलं आहेस..." असं गाणं आहे.

माझी अत्यंत आवडती जाहिरात...Center Fresh Chewing Gum ची.
कापडगिरणी मालकाचा मुलगा गिरणीमधे येऊन वडीलांना त्याचा परिक्षेचा निकाल दाखवत असतो, ज्यात तो नापास झालेला असतो. तो दाखवण्याआधी वडिलांना Center Fresh Chewing Gum खायला देतो. वडिल निकाल बघतात आणि मुलाला थोबाडीत मारतात. बॅक्ग्राऊंड मधे स्लोगन "Center Fresh Chewing Gum फक्त जिभेवर लगाम घालते, हातांवर नाही."
ह्या जाहिरातीतला सगळ्यात अल्टिमेट भाग हा आहे, की जेव्हा मुलगा वडिलांना निकाल दाखवत असतो, तेव्हा कारखान्यातील सगळे लोक काम थांबवून उत्सुकतेने पहात असतात, आता काय होतेय ते आणि वडिल मुलाच्या थोबाडीत मारतात, त्या क्षणी सगळे पुन्हा कामाला सुरुवात करतात... हे पहायला जी मजा येते, ती अशी सांगून येत नाही. कितीही वेळा पाहिली तरी मी तितकीच एन्जॉय करते ही अ‍ॅड... Happy

तो डाग चांगले आहेत मध्ये कपडे खराब करून बुजगावणं होणारा मुलगा कस्सला गोजिरवाणा आहे >>>>>>>>>ते सगळ ठिक आहे पण प्रोडक्ट बकवास वाटतोय एका मिनिटात त्या ऑईलपेंटचे डाग जाणार म्हणतात काहिही फेकतात.......आजी नातवाची मेहनत फुकट गेल्यातच जमा आहे...

काही जाहिराती खरंच धादांत खोटे दावे करतात. असल्या जाहिरातीं विरुद्ध काही कायदा, काही नियम नाहित का?

सानी, अनुमोदन. मलाही ते लोक काम थांबवतात आणि मग एकदम सुरू करतात ते बघायला आवडतं. Happy

>>काही जाहिराती खरंच धादांत खोटे दावे करतात.
ह्यात अग्रगण्य जाहिराती म्हणजे फेअरनेस क्रीमच्या. असं क्रीम लावून लोक गोरे होत असते तर भारतात सगळे गोरेच नसते का दिसले? काहीही दाखवतात. Sad

Center Fresh Chewing Gum >> माझ्या कन्यारत्नाला देखिल ही जाहिरात खुप आवडते. अगदी आवडता कार्यक्रम अस्ल्या सारखी बघते. त्यावेळि चॅनेल चेंज केलेला तीला बिल्कुल चालत नाही.

क्या आपके टुथपेस्टमे नमक है???... कसली भयानक एन्ट्री आहे त्यात... संध्या मृदुलला असे काम करताना पाहुन कसेसेच वाटले...

प्रिलच्या अ‍ॅडमध्ये सोनाली बेंन्द्रेला पाहून मजाच वाटली. आपल्या घरात भांडी घासायला पावडर वापरतात का लिक्किड डिशवॉशर का राख हेही तिला माहित नसेल Wink

जाहिरात करणार्‍या मॉडेलने त्याच वस्तू वापरल्या पाहिजेत असा का आग्रह किमान अपेक्षा लोक का ठेवतात कळत नाही. हां आता त्यानी तसे मी या वस्तू वापरतो असे म्हटले तर भाग वेगळा....

सोनाली बेन्द्रे कायमचूर्णच्या अ‍ॅडमध्ये पहायला कशी वाटेल तुम्हाला?:-) ती स्कीनकेयरच्या एखाद्या अ‍ॅडमध्ये आली असती, किंवा ज्यूस वगैरेच्या अ‍ॅडमध्ये असती तर हरकत नव्हती. सेलिब्रीटीज आणि ब्रॅन्ड ह्यांचं पण एक परसेप्शन असतं. त्यामुळे सोनाली बेन्द्रे आणि डिशवॉशींग लिक्कीड हे इक्वेशन काही जमत नाही. असंच काहीसं मला अमिताभला त्या नवरतन तेलच्या जाहिरातीत पाहून वाटतं. किंवा सलमानला त्या डिटर्जंटच्या अ‍ॅडमध्ये पाहून.

स्वप्नाला अनुमोदन. सेलेब्रिटींची जी प्रतिमा असते त्यावर तर जाहिराती चालतात ना. मग ते वापरोत किंवा नाही. आणि त्या जाहिरातीत सोनाली पाहुण्यासारखी स्टाईलमध्ये हे लिक्विड वापरा असं सांगताना पटत नाहीच.

हो ना, मधे दस का दम मधे करिश्मा कपूर ने चक्क कांद्या बटाट्याचे भाव अगदी अचुक सांगीतलेच होते ना? अता कांद्याचे भाव आणि करिश्मा हे समिकरण तरी पटेबल आहे का? पण ते चालतं तर आपल्या बाळबोध सोनाली ने काय घोडं मारलय? SmileyCentral.com

Pages