मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली हिरो होंडाची अ‍ॅड दाखवायला लागलेत If you happy and u know clap your hands....... त्या लहान मुलीचा आवाज व ते म्युझिक छान वाटतं. एकंदरीत आवडली.

ऑडो, अगदी अगदी... मलाही खूप आवडते ती जाहिरात.

IPLच्या बर्‍याच जाहिराती आहेत, त्यातली ती नेत्याची आणि त्याच्या चमच्यांची जाहिरात लेकीला खूप आवडते. अगदी अ‍ॅक्शनसकट करून दाखवते. बाकीच्या फसल्यात हे खरं.

हल्ली हिरो होंडाची अ‍ॅड दाखवायला लागलेत If you happy and u know clap your hands......
>>
सुमारे ३ वर्षांपूर्वीच्या बजाज वेव्ह च्या अ‍ॅड मधे हेच गाणं होतं...

सोन्याहून सोनसळी .. अफलातून जमलंय गाणं आणि व्हिडिओ पण! हीच जाहिरात हिंदीत तितकी श्रवणीय नाही वाटत!
अजून एक नवीन मारुती इको का इगो व्हॅन ची.. तो कुत्रा सहीये. शेरोशायरी काय आणि शेवटी ती आजी त्याला म्हणते, "behave like a dog!" त्यावर लगेच कुत्र्याचं "OK! bhau bhou!" जबरदस्त मजा येते. Lol

आईशप्पथ, आशू आवडी निवडी काय जुळतात ग आपल्या.
त्या कुत्र्याला रझा मुरादचा आवाज दिलाय Happy तो अजून्च मजा देऊन जातो.

गेल्या १-२ दिवसांपासून 'बँक ऑफ इंडिया' ची अ‍ॅड दाखवतायत. तशा त्यांच्या वेगवेगळ्या अ‍ॅड्स आहेत पण ही शाळेतल्या मुलांची आहे स्कूलबस मधली. एक मुलगा दुसर्‍या मुलाला ओरडतोय, बॅटिंगवरून. सही आहे, मला ती सगळीच मुलं आवडली.

काल चॅनेल सर्फिन्ग करतान्ना कुठ्ल्याश्या साऊथ इन्डियन वर पीअर्स ची नवीन जाहीरात बघीतली..त्यात जिन्गल मधे काहीतरी सूर्यम असा उल्लेख होता..बाबर का बेटा नव्हता...तो फक्त हिन्दी आणि मराठीत आहे...

माझी सध्याची एकदम आवडती अ‍ॅड कोकची. 'तुम जो मिल गए हो' गाणं काय सही वापरलयं! ३५ वर्षांपेक्षा जास्त होउन गेली या गाण्याला.जुन्या गाण्यांना काहीही पर्याय नाही यात शंकाच नाही
कल्की आणि इम्रानपण झकास.

सध्या टीव्हीएस स्पोर्टची लागते ती... वाह वाह मेरे भाई के लिये... मस्त आहे

आणि एक मेटलाइफची -आजा आजा मैं हुं प्यार तेरा वर आजी नाचते ती पण छान वाटली.

हो, परवाच नवरा ह्या मेटलाईफच्या अ‍ॅडबद्दल सांगत होता. मी बघितली नाहीये अजून, बघायला हवीये.

अनुमोदन चिंगी. द. आफ्रिकेच्या कसोटी सामन्यांच्या वेळी ही जाहिरात, मेन स्क्रीन छोटा करून (स्क्रीन च्या डावीकडे) दाखवली जायची. मला माझ्या छोट्या मुलाबरोबर ही कसोटी बघताना माझीच कसोटी होती. खूप अवघडल्या सारखं वाटायचं. चॅनेल बदलायचो तर हा "काय उगीच चॅनेल बदलताय?" असं म्हणायचा. तेच जेके का फेके सिमेंट मिस्त्रीच्या छप्पीत घ्यावं अन् थापावं त्या बाईवर असं वाटायचं.

हो चांगली आहे. यांचीच वायरची जाहिरात छानच आहे. आईचे भाकरी करत असताना हात भाजत असतात. तो मुलगा या वायर पासून एक चिमटा तयार करून आपल्या आईला देतो. मस्त!

इंडियन ओव्हरसीज बँकेची एक जाहिरात यायची. एक पोरगं चुटकी वाजवायला शिकत असतं. सतत चुटकी वाजवायचा सराव करत असायचं. हे पोरगं बागेत चुटकी वाजवायचा सराव करत बसलेलं असताना समोरच्या पेंगत असलेल्या आजोबांचं पाकिट मारायला एकजण येतो. पाकिटाला हात घालणार तेवढ्यात या पोराला चुटकी वाजवायचं जमतं अन् त्याचा आवाज होतो. आजोबा जागे होतात चोर पळून जातो. मस्त जाहिरात. Happy

मॅक्स शिक्षाप्लॅनची जाहिरात मूर्ख पनाची आहे. मुलाला विचारतात तू कोणाचा. तो सांगतो 'मल्होत्रा अंकलका..... कांच तोड दिया छका मारके...' अभिरुचीहीन जाहिरात.

मला ती मेटलाईफची अ‍ॅड आवडते, तो नातू आजीला ब्लॅकमेल करत असतो. कसली धमाल आहे. तसंच हॅवल्सची नवी वायरची अ‍ॅड आली आहे ती पण सही आहे. बॅन्क ऑफ इंडियाची तो मुलगा भावाला ओरडत असतो ती आणि ती बायको नवर्‍याला बोलावून औषध देते ती दोन्ही छान आहेत. व्होडाफोन झूझू अ‍ॅड्स नेहमीप्रमाणेच मस्त.

आयसीआयसीआयची मात्र काहीच्या काहीच आहे. बॅन्केतला माणूस असा तासनतास बोलत बसेल काय कोणाशी? तसंच अक्षयकुमारची तो शेफ असतो आणि वेडगळासारखा हसत असतो ती अ‍ॅड बघवत नाही. मला वाटतं मायक्रोमॅक्सची आहे. दुसरी एक डोक्यात जाणारी अ‍ॅड - डोकोमोची तो मुलगा गर्लफ्रेन्डशी ब्रेक करून त्या दुसर्‍या मुलीबरोबर जातो ती.

मायक्रोम्याक्सची जाहि. फारच डोकेफिरवू आहे. दुकानात हा मोबाईल दिसला तरी लोक लाम्ब पळतील. निगेटीव्ह पब्लिसिटी.

प्राची Happy ती अमूल सिल्कची एक जाहिरात पाहून मला मळमळतं. काय बोटं चाटतात. छ्या! महिन्द्रा क्लब रिसॉर्टची अ‍ॅड आवडते.

स्वप्ना_राज सिल्क ची डान्सवाल्या मुलींची अ‍ॅड डोक्यात जाते .. पण ती ऑफिस मधली सहनेबल आहे.. Happy

सिल्कची डान्सच्या मुलींची चांगली वाटली . विशेषतः चॉकलेटची असोशी चांगली टिपली आहे. दिसतातही छान त्या Happy

ती एक फॅनची अ‍ॅड पण अशीच बावळटासारखी आहे. तो मुलगा परिक्षेला जातो आणि कुठला पेपर आहे ते शेजारच्या मुलीला विचारतो आणि मग आकाशात बघून देवाची प्रार्थना करतो. काय तर म्हणे "वो उपरवाला बचाये ना बचाये लेकिन ये उपरवाला जरुर बचायेगा" असलं काहीतरी. ओढूनताणून आणलंय अक्षरशः Sad

Pages