Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
माझा च्या नव्या जाहिरातीत ती
माझा च्या नव्या जाहिरातीत ती सोनाली बेंद्रे आहे काय?? काय बदललाय चेहरा तिचा.... मला तिची सौदर्य साबुन निरमा ची जाहिरात खुप आवडायची...
अक्षयकुमारची मॅक्रोमॅक्स
अक्षयकुमारची मॅक्रोमॅक्स मोबाईलची अॅड कसली बेक्कार आहे, त्याचं हसणं तर प्रचंड इरिटेटिंग.
मोबाईलची आहे की गेमची आहे?? हल्लीच्य जाहिरातींचे प्रोडक्टस काय आहेत ते सुरवातीला आणि शेवटी अगदी ठळकपणे दाखवले पाहिजेत. काय चाललेय कायबी कळत नाय... एक छोटा मुलगा सायन्म्स प्रोजेक्टसाठी घरात झुऱळे शोधत असतो ती अॅडही मला बरेच दिवस कळतच नव्हती नक्की कसली आहे ते..
स्वप्ना, ती सॅमसंगची आहे
स्वप्ना, ती सॅमसंगची आहे बहुतेक.
स्वप्ना मस्तच आहे ग ती अॅड.
स्वप्ना मस्तच आहे ग ती अॅड. दिल तो जेब मे रखा है अगदी छान वाटले ऐकायला.
मॅक्स मोबाईलची धोनीची अॅड नाही आवडली.
लगा लगा शॉक ची अॅड अगदी मस्त. कुठल्याशा स्विच ची आहे
साधना मला वाटतं मॅक्रोमॅक्स
साधना मला वाटतं मॅक्रोमॅक्स मोबाईलच्या गेमची अॅड आहे ती. टेनिसचा गेम दाखवलाय त्यात आणि हा येडचॅप शेफ.
>>ल्लीच्य जाहिरातींचे
>>ल्लीच्य जाहिरातींचे प्रोडक्टस काय आहेत ते सुरवातीला आणि शेवटी अगदी ठळकपणे दाखवले पाहिजेत. काय चाललेय कायबी कळत नाय
साधना अनुमोदन ग अगदी.
आणि ती झुरळाची अॅड हिटची आहे.
अनिशा, धन्यवाद
पनू, ती शॉकची अॅड मला पण फार आवडते. विशेषतः तो मुलगा शेवटी येऊन बॅटने मारून निघून जातो ते सही आहे.
त्या पेप्सीच्या Youngistan ka
त्या पेप्सीच्या Youngistan ka wow च्या जाहिरातीसुध्दा फालतू वाटल्या.
कुठल्याशा स्विच ची आहे>>
कुठल्याशा स्विच ची आहे>> हॅवेल्स. यांच्या सगळ्याच अॅड छान असतात.
अनुमोदन साधना.
महेश, मला त्यांच्या केबलच्या
महेश, मला त्यांच्या केबलच्या सार्या अॅडस आवडतात - आधीची तो मुलगा आईला भाकरी उचलायला चिमटा आणतो ती आणि आत्ताची त्या बाईची गळ्यातली माळ ओवून देतो तीपण. पण ती दिव्याची अॅड आहे ना, तो फाशी देणारा माणूस दाखवलाय ती, ती आवडत नाही. आता तो बिचारा त्याचं काम करतोय तर त्यात कसलं आलंय पाप-पुण्य? तसंच ती "उपरवाला बचायेगा" अशी काहीतरी फॅनची अॅड आहे तीपण आवडत नाही मला, कैच्या कैच आहे एकदम.
करीना आणि सैफची एयरटेलची अॅड हॉरीड आहे.
तिची बकवास बंद करायला तो रिमोट वापरला पाहिजे.
नवी क्लोजअपची अॅड पाहून माझा 'आ' वासलाय. टूथपेस्टची ग्राऊंडब्रेकिंग अॅड आहे एकदम
त्यापेक्षा "क्लोजअप स्माईल" हे पूर्वीचं जिंगल छान वाटायचं.
नवी क्लोजअपची अॅड पाहून माझा
नवी क्लोजअपची अॅड पाहून माझा 'आ' वासलाय. >>> जास्तवेळ नको करूस. नाहीतर तुलापण गुलाब शोधावे लागतील लगेच.
कोणी तनिश्कची वेडींग
कोणी तनिश्कची वेडींग ज्वेलरीची अॅड पाहिलीय?????????
एकदम झक्कास... ती आई झालेली कोण.. मस्त काम केलंय तीने.. we are not interested in wedding jwellery निकाल दो निकाल दो बेटी....
अनीशा साधना, अनुमोदन ग. त्या
अनीशा
साधना, अनुमोदन ग. त्या बाईने "पा' मध्ये विद्या बालनच्या आईचं काम केलंय. मला वाटतं कोणीतरी कन्नड नटी आहे ती. पूर्वी टीव्हीवर कुठेतरी पाहिलंय तिला.
अगं ती अरूंधती नाग. मालगुडी
अगं ती अरूंधती नाग. मालगुडी डेज वाली.
अनीशा, अनंत नागची बायको का?
अनीशा, अनंत नागची बायको का?
फाशी देणारा माणूस दाखवलाय ती,
फाशी देणारा माणूस दाखवलाय ती, ती आवडत नाही.>> अनुमोदन
बादरायण संबंध कसा जोडायचा त्याचं हे आदर्श उदाहरण 

ती गोजियो का काय त्याची अॅड मला झेपलीच नाहीये अजूनही. त्यात बांगलादेशचा उल्लेख आहे. अन् ते सगळे शिवाशिवी सारखा खेळ खेळतात मधूनच... कायच्या कायच...
हॅवेल्सच्या आई मुलाच्या अन्
हॅवेल्सच्या आई मुलाच्या अन् शाळेतल्या (आधीच्या) अॅड्स ही सह्ही आहेत. एचडीएफसीची ही http://aschkaahitri.blogspot.com/2009/07/hdfc-sl.html अॅड पण मस्त आहे
आणि मॅक्स न्यूयॉर्कचीही - http://aschkaahitri.blogspot.com/search?updated-max=2009-06-05T01:08:00%...
आणि हिरो होंडाची ही - http://aschkaahitri.blogspot.com/2009/05/kuch-bole-bin.html
मला कत्रिनाची मँगो स्लाईसची अॅड आवडली
(प्रोडक्ट बेक्कार आहे
)
अनंत नागची बायको का? << हो हो
अनंत नागची बायको का?
<< हो हो तीच ती अरुंधती नाग
पब्लिक लिंका द्या ना राव !
पब्लिक लिंका द्या ना राव ! नुसतं वाचुन आमचं पोट कसं भरणार .
आयपीएल दर्म्यान धोनी फोनची
आयपीएल दर्म्यान धोनी फोनची जाहिरात करत होता की सारखे तुम्ही (म्हणजे आपण!) माझा फोने चोरताय, स्वता:चा घ्या. अगदी शेवटी त्याने दाखवले हा माझा सातवा फोन्...तो इतका भयंकर दिसत होता काय रंग काय आकार्(फोनचा) की हा कोण कशाला चोरेल? आणि वर धोनी सांगतोय पैसे खर्चून विकत घ्या. असला फोने घ्यायला कोणी पैसे दिले तरी घेणार नाही.
जेनेलिया (जाने तू या जाने ना- इम्रान खान बरोबर) आणि रणवीर कपूर् नव्या पिढीचे दोघे आघाडीचे मॉडेल्स होणार.
मला तिची जॉन अब्राहम, अभय देवोल बरोबर ची आणि फँटाच्या जाहिराती आवडतात्.फँटाच्या टेस्ट्ची झिंग त्या अॅड्स मधे उतरलीय.
>>तो इतका भयंकर दिसत होता
>>तो इतका भयंकर दिसत होता काय
मला प्रथम वाटलं हे वाक्य धोनीला उद्देशूनच आहे
पण तुम्हाला अनुमोदन. फोन काही खास नाही.
लिमकाची अॅड पण मस्त आहे.
मलाही धोनीच वाटला होता. धोनी
मलाही धोनीच वाटला होता. धोनी हा चांगला मॉडेल आहे. लूक्स , दायलॉग डिलिवरी, इ.
त्या Lay's च्या जाहिरातीत तो
त्या Lay's च्या जाहिरातीत तो मुलगा त्याला "तंग मत कर माही" म्हणतो तेव्हा धोनीचं एक्स्प्रेशन छान आहे. एकदम चमकल्याचं आणि embarass झाल्याचं.
साधू लोक गुहेत खूप प्रयत्न
साधू लोक गुहेत खूप प्रयत्न करूनही चकमकीने शेकोटी की धुनी पेटत नाही म्हणून एक साधू 'तिखट "बिंगो" खाऊन लाकडावर फुन्कर घालतो. त्याच्या तोंडात तिखटाने जाळ झालेला असतो त्यामुळे लाकडे पेटतात ही अॅनिमेटेड जाहिरात मस्त आहे....
टोणगा अनुमोदन. तो "आंधळा"
टोणगा अनुमोदन.
तो "आंधळा" अक्षयकुमार सगळ्यांना धू धू धुतल्यावर एका बाईला "बटन खुला है" असं सांगतो ती अॅड मला आवडली नाही. काय गरज होती हे घुसडण्याची?
तो आंधळा नाही आहे हे त्यातून
तो आंधळा नाही आहे हे त्यातून दाखवायचे होते..
आधी सगळ्यांना धुतो ते? हे
आधी सगळ्यांना धुतो ते? हे पुरेसं नाहिये का? बरं तो आंधळा नाही आहे हे दाखवण्या साठी बाईच हवी का? कायच्या काय....
मलातर ती पंच लाईनच आवडली
मलातर ती पंच लाईनच आवडली बुवा... (बादवे प्रॉडक्ट काय होतं? :फिदी:)
लिमकाची अॅड पण मस्त
लिमकाची अॅड पण मस्त आहे.>>>>>
खरच. एकदम फ्रेश असतात त्या अॅड. सुशमा रेड्डी ची पण छान होती. आता र्हिशीता भट चि येते.
पण आधिच गाण तर क्लासच होत.
श्रीदेवीची अॅड बघितली. ह्या
श्रीदेवीची अॅड बघितली. ह्या वयातही कसली फीट आहे अजून !
ह्या वयातही कसली फीट आहे अजून
ह्या वयातही कसली फीट आहे अजून !
>>
अहो वय तुमचं झालं तिचं नाही...
Pages