Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
.
.
गूड नाइटची, आजी-आजोबांच्या
गूड नाइटची, आजी-आजोबांच्या पैजेची अॅड छान आहे
रीया..... मला गाण आवडल...
रीया..... मला गाण आवडल... जाहीरात नाही
अश्विनी काळसेकर>> सुंबरान
अश्विनी काळसेकर>>
सुंबरान ह्या मराठी सिनेमात रविंद्र मंकणीची बिना लग्नाची ठेवलेली बाई म्हणून काम केले आहे हिने.
सी आय डी मध्ये पण होती वाटते.
निंबे धन्यवाद. कोणत्याही
निंबे धन्यवाद.
कोणत्याही बॉडी स्प्रेची जाहिरात घ्या. एकच पॅटर्न.. इकडे पोराने अंगभर फसाफसा मारला की दरवाजे तोडून बिडून पोरी धावत..

आयसीआयसीआय रिवॉर्ड्स
आयसीआयसीआय रिवॉर्ड्स पॉईंट्सची जाहिरात पाहिलीत का? मस्त वाटली, मला.
न आवडलेल्या अॅडस्
न आवडलेल्या अॅडस् लिहिणार्यांना एक विनंती, तूम्ही ती अॅड कशी बनवली असती किंवा तूम्हाला त्या अॅडमध्ये काय पहायला आवडले असते ते जरुर लिहा.
हो गिरी.....कालच
हो गिरी.....कालच बघितली.....आज त्याबद्दलच लिहायला आलेलो..........मस्त अॅड आहे...... गाणे पण छान आहे.....कोणात्या भाषेत आहे कळले नाही पण
, तूम्ही ती अॅड कशी बनवली
, तूम्ही ती अॅड कशी बनवली असती किंवा तूम्हाला त्या अॅडमध्ये काय पहायला आवडले असते ते जरुर लिहा>>

बाबु मग आम्हीबी जाहिराती नसत्या काय बनवल्या.
काय खटकतं ते सांगता येतं. काय हवय हे सांगायला कल्पनाशक्तीची भरारी हवी..
एक्झॅक्टली हेच सांगायचं होतं
एक्झॅक्टली हेच सांगायचं होतं झकासा
न आवडणार्यांविषयी बहुत्येक केसेसमध्ये सहमतीच आहे. पण त्या अॅडमध्ये बनवणार्याची क्रिएटीव्हीटीच असते. (काही अपमाननीय अपवाद सोडून
)
पण काय हवय हे सांगायला कल्पनाशक्तीची भरारी असायची गरज नाही. नवीन अॅड नाही बनवायचीये. फक्त खटकलेल्या गोष्टी ऐवजी अमूक तमूक चालेल हे सांगायचय. अर्थात त्यालाही विचार करावा लागतोच.
वरती दक्षीने दिलेलं उदाहरण घेउया. डिओच्या बहुतांश सगळ्या बहुतांशश्याच असतात. पण फीचर्सना बेनिफीटस् मध्ये कव्हर्ट करण्यासाठी अजून काय बरं दाखवता येईल त्या अॅडमध्ये ? बघ तर विचार करुन......
पण फीचर्सना बेनिफीटस् मध्ये
पण फीचर्सना बेनिफीटस् मध्ये कव्हर्ट करण्यासाठी अजून काय बरं दाखवता येईल त्या अॅडमध्ये ?>>
हम्म. त्याच्या वास कसा चांगला आहे, कसा घामाच्या वासापासुन बचाव होतो हे सांगता येइल की.
बायकांचा तांडा कशाला हवा? युनिकनेस म्हणावं तर बहुतांश डिओच्या जाहिरातीत बायकांचा तांडा असतोच. म्हणजे तो मुद्दा युनिकनेसच्या निष्कर्षावर बाद होतोय.
डिओ/साबण्/पावडर्/फेसवॉश
डिओ/साबण्/पावडर्/फेसवॉश वापरल्याने मिटींग/प्रेसेंटेशनमधे प्रभाव पडतो/खेळात यश मिळते असले कायतरी दाखवण्यापेक्षा बायका मागे लागतात हे जास्त सयुक्तिक नाही का?
तेच सांगताहेत झकोबा. वास इतका
तेच सांगताहेत झकोबा. वास इतका चांगला आहे की मुली ( टार्गेट कन्झ्यूमर पुरुष धरुन) आकर्षिल्या जातात. घमापासून बचाव नाही घामाच्या वासापासून बचाव.
मी त्या प्रॉडक्टसाठी अॅड बनवताना काही अश्या गोष्टींचा विचार केला असता...
न टाळता येणारी जवळीक सहन करण्याजोगी बनवता येते. - उदा. ट्रेन / पार्टी / लिफ्ट. लॅटर ईज बेटर कारण जेन्डरलेस.
बकबक करणारा / री मॉडेल. दुसरी व्यक्ती सांगत्येय. नशीब घामाच्या वासाचा त्रास तरी नाहीये. ईट मेक्स युवर लाईफ 'लिटील' बेटर.
स्वतःच्या अंगाला येणारा वास आणि डिओने मिळणारा फ्रेशनेस. मला वाटतं लेडीज डिओंसाठी ते हाच कन्सेप्ट वापरताहेत.
मेकर शर्ट्स नि ट्राऊझर्सची
मेकर शर्ट्स नि ट्राऊझर्सची अॅड खुप छानेय...
अमेझॉन का कुठली तरी बॅटरी चार्जरची जाहीरातही खुप छानेय... केरळ बॅग्राऊंडवाली... तो सायकलीवरनं बॅटरी डिलिव्हर करायला जात असतो ती...
या डिओच्या सुगंधाने तुम्हीच तुम्हाला आवडाल... *स्वतःच्या फिल गुड फॅक्टरसाठी हा डिओ वापरा अशी जाहीरात नाही का होऊ शकत... का भिन्न लिंगींना (मुलगा <-->मुलगी) अट्रॅक्ट करणं हे एकच ध्येय असतं कायम
*स्वतः - ऊंमाझो मधले स्वतः अभिप्रेत नाहीयेत ईथे...
लाडके, तोच सेलेबल पॉईन्ट आहे.
लाडके, तोच सेलेबल पॉईन्ट आहे. जपळपास प्रत्येक युजरकडून "ह्या, खोट्टारडे आहेत. अस काही होत नाही." ही कॉमेन्ट ऐकू येईल. हे शक्य नाही हे माहिती असतानाही ट्राय करणारे आपण मूर्ख की हे दाखवून आपल्याला प्रॉडक्ट विकत घ्यायला भाग पाडणारे मूर्ख ?
ईव्हन एन्जल्स विल फॉल अशीही अॅड आली होती डिओंची
कुठलीही जाहिरात बनवताना
कुठलीही जाहिरात बनवताना सर्वात आधी विचारात घेतला जातो तो त्याचा टारगेट कस्टमर. त्या कस्टमरची परत सबसेटमधे विभागणी वगैरे केली जाते. मेल्स डिओच्या जाहिरातींसाठी टारगेट कस्टमर हा २० ते ४० मधला पुरूषवर्ग असतो. आता या वर्गाला पोरी मागे लागल्या आहेत ही फँटसी जास्त चालेल की घामाचा वास वगैरे यक्क गोष्टींबद्दल बोललेलं आवडेल?? अर्थात जेव्हा सतत एकाच बाबतीत जाहिरात दाखवायची तर लोकांच्या मनात् ठसण्यासाठी व्हिज्युल्स इंटरेस्टिंग करावे लागतातच. (एका डीओअची अॅड आळशीपणा घालवा आणि फ्रेश व्हा अशी होती. जी या जॉनरमधे वेगळी होती. आणि तिची ट्रीटमेंट एकदम सही होती.)
दुसरी गोष्ट जी बर्याचदा एफ एम सी जी प्रॉडक्ट्सबद्दल असते. (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गूड्स) ती म्हणजे यातले बहुतेक ब्रँड्स दर्जाच्या बाबतीत्/किमतीच्या बाबतीत साधारण सारख्या लेव्हलवरती असतात. त्यामुळे "माझे प्रॉडक्ट किती चांगले?" याबद्दल बोलण्यापेक्षा "माझाच ब्रँड वापरा" हे कंडिशनिंग करणे सोपे पडते.
डिओ वापरणार्याला यामुळे मुली आपल्या मागे लागणार नाहीत हे सत्य माहित असतं. पण रॅकवर ठेवलेल्या अनंत डीओमधून बरोबर तोच डीओ त्याने उचलावा अशी अपेक्षा असते. त्या डीओचे नाव आणि त्यासोबत "त्या" इमेजेस डोक्यात लिंक झालेल्या असतात. हे लिंकिंग करणे हे जाहिरातीचे काम.
डोक्यावर खिळा मारलीस....
डोक्यावर खिळा मारलीस....
बाबु, कुणाच्या डोक्यावर???
बाबु, कुणाच्या डोक्यावर???
आश्विनी कालसेकर म्हणजे ती
आश्विनी कालसेकर म्हणजे ती राम्याच्या फुंक १ मधली कावळावाली बाई.
खिळ्याच्या..... तू विशलिस्ट
खिळ्याच्या.....
तू विशलिस्ट बनवायला घेतलीवतीस कॉय ?
आश्विनी कालसेकर आठवली. एकता
आश्विनी कालसेकर आठवली.
एकता कपूर च्या '' कसमसे '' मधे पण होती.
कोणत्याही बॉडी स्प्रेची
कोणत्याही बॉडी स्प्रेची जाहिरात घ्या. एकच पॅटर्न.. इकडे पोराने अंगभर फसाफसा मारला की दरवाजे तोडून बिडून पोरी धावत..
<<
इथून सुरू झालं, अन नंदिनी ताईंचा प्रतिसादही वाचला. त्या जाहिरात क्षेत्राशी संबंधीत असाव्यात कदाचित..
हे जे पोरी धावत प्रकरण आहे ना, ते फेरोमोन्सशी संबंधीत आहे. हे आपल्या शरीराने स्त्रवलेले स्त्राव असतात, अन विविध वासांमुळे विविध कामांसाठी उपयोगी येतात. मादीला आकर्षित करणे हा एक महत्वाचा उपयोग. या प्रकारचे वास निर्माण करण्याचाच प्रयत्न बहुतेक परफ्यूम बनवणारे करतात असे माझे निरिक्षण आहे.
एक सिंपल अवांतर गम्मत सांगतो, डीओ चा उपयोग घामाचा वास घालवण्यासाठी असं सांगतात. यांनी बनवलेले कृत्रिम वास स्त्रीला आकर्षितही करतात 'म्हणे'
. पण स्त्रियांनी यात तथ्य किती ते सांगावे, अन स्त्रियांना वास जास्त समजतात, असे माझे वैम आहे.)
गम्मत अशी, की घामात- मस्तपैकी फिजिकल श्रम करून घामट्ट झालेल्या पुरुषाच्या वासात मानवी मादीला आकर्षित करण्याची जास्त शक्ती आहे, असे म्हणतात..
(स्वतः पुरुष असल्याने इतरांचे ठाऊक नाही, वैयक्तिक अनुभव आहे
एक्दम बरोबर! ही लिंक पहा-
एक्दम बरोबर! ही लिंक पहा- http://www.economist.com/node/10493120
तुम्हाला ज्या व्यक्तीच्या शरीराचा नैसर्गिक वास आवडतो त्या व्यक्तीची आणि तुमची 'इम्युनॉलॉजिकल कंपॅटीबिलिटी' जास्त अस्ते. यामुळे तुमच्यापासून निर्माण झालेली नवी पिढी जास्त सक्षम असण्याची शक्यता वाढते. मॉरल ऑफ द स्टोरी- डिओ वापरु नका, 'खरा' वास अनुभवा!
>>घामात- मस्तपैकी फिजिकल श्रम
>>घामात- मस्तपैकी फिजिकल श्रम करून घामट्ट झालेल्या पुरुषाच्या वासात मानवी मादीला आकर्षित करण्याची जास्त शक्ती आहे, असे म्हणतात..
फिजिकल श्रम करून आलेला घाम आणि उन्हात चालल्याने आलेला घाम किंवा आंघोळ केली नसताना आलेला घाम ह्यांच्या वासात फरक अस्तो का?
बाकीच्या स्त्रियांचं माहित नाही पण मला तरी कोणाच्या अंगाला घामाचा वास आला की त्या व्यक्तीबद्दल वैताग येतो. अर्थात बर्याचदा ते प्रॉक्डट न परवडणे हा भाग असू शकतो उदा. गवंडी, लिफ्टमन वगैरे लोक. पण ऑफिसात जाणारे लोकही असं 'गंधमादन' पर्वताहून आल्यासारखे असतात तेव्हा जाम वैतागायला होतं. :रागः
'गंधमादन' पर्वताहून
'गंधमादन' पर्वताहून आल्यासारखे >>>
स्वप्ना, हसून हसून मी धरणीवर लोळण घ्यायच्या बेतात आहे
इब्लिस, तुम्ही म्हणता आहात
इब्लिस, तुम्ही म्हणता आहात त्या संदर्भात वाचलं होतं एकदा. पण हे लॉजिक डीओवाल्यांनी वापरायचं ठरवलं तर दुकानं बंद करावी लागेल. जाहिरातक्षेत्राशी नाही पण मीडीयाशी संबंधित क्षेत्रामधे काम करते.
डिओ वापरु नका, 'खरा' वास
डिओ वापरु नका, 'खरा' वास अनुभवा!>>
'गंधमादन' पर्वताहून आल्यासारखे>>
गम्मत अशी, की घामात- मस्तपैकी
गम्मत अशी, की घामात- मस्तपैकी फिजिकल श्रम करून घामट्ट झालेल्या पुरुषाच्या वासात मानवी मादीला आकर्षित करण्याची जास्त शक्ती आहे, असे म्हणतात..>>>>>रस्त्यावर दगड फोडणारे, बटाटेवडे तळणारे आचारि यांची घामट चंगळच होत असावी.... मी पण बटाटेवडे तळावे म्हणतो
ईब्लीस, व्हाईसव्हर्साचा अनुभव
ईब्लीस, व्हाईसव्हर्साचा अनुभव सांगा तुमचा.
छोटा मुलगा रावणाच्या वेषात
छोटा मुलगा रावणाच्या वेषात दाखवलाय... समोर १० स्कुप आइसक्रीम चे आनि गडगडाटी हसत असतो..आनि बिचारे बाबा त्याच्याकडे पाहत असतात... मस्त जाहीरात आहे...आवडली
Pages