मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा शिक्षा म्हणजे हिंदीमध्ये शिक्षण असा अर्थ होतो.
फारच क्षिण विनोद .. हसू ही आलं नाही मला.
असो..

रिया +१ Happy

रिलायन्सची 'तुम माँ को मंदिर की सीढीयोंपे मिले थे'ची पण मस्त आहे. सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव मस्त!

रिलायन्सची 'तुम माँ को मंदिर की सीढीयोंपे मिले थे'ची >खरंच मिळाला पण असेन...अनुष्का चा भाउ कुठल्या अँगल्ने वाटतो तो मुलगा ???? Proud

रिलायन्सची 'तुम माँ को मंदिर की सीढीयोंपे मिले थे'ची >खरंच मिळाला पण असेन...अनुष्का चा भाउ कुठल्या अँगल्ने वाटतो तो मुलगा ???? >>>> + १००००० ... अगदि अगदि

मी आणि माझी बहिण हेच म्हणत होतो .. खरतर तो त्या कुटुंबातला वाटतच नाहीए

सीएट टायर्सची जाहिरात मस्त आहे.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आशय पोचवलाय.
फोन वर बोलत जाणारा काहिसा मग्रुर माणुस, त्याच्या एका हाताने बाळाची बाबागाडी ढकलतोय.
जाणार्‍याना धक्के लागले तरी आपल्याच धुंदीत फोनवर पलिकडच्याला झापतोय पैशांवरुन.
झेब्रा क्रोसिन्गच्या अलिकडेच रोड क्रॉस करतोय.
येणार्‍या गाड्या न बघताच... वरुन अर्जन्ट ब्रेक लावलेल्या दुचाकीस्वारासच अबे अंधा है क्या अस दरडावणे.. केअरलेस अ‍ॅटिट्युड फुली कॅप्चर्ड Happy

ती नविन कसलीशी अ‍ॅड
मै अभी शाहरूख बना नही
मै अभी सैफ बना नही
अभी सैफ बनना बाकी है
अभी शाहरुख बनना बाकी है
ते काय आहे नेमकं? Uhoh
मला अ‍ॅडच कळाली नाही

अनू अगदी अगदी ... भारी आहेत त्या अ‍ॅड्स Lol

मला ती मोती सोप ची पण जाहिरात आवडते, ' उजळे प्रकाश ' वाली...दर वर्षी दिवाळीच्या आधी येतेच.. दिवाळीची प्रसन्न पहाट..एकदम रिफ्रेशींग !!

मी पण रणबीरच्या पेप्सी-टी-२० जाहिरातींबद्दल लिहायलाच आले होते.
टी-ट्वेण्टी वर्ल्ड कप, ना तमीज से खेला जाता है, ना तमीज से देखा जाता है - वगैरे सगळं ठीक आहे, पण बदतमीजीलाही काहीतरी तमीज असली पाहिजे.

सतत पेप्सी पीत पीत मॅच पाहिली की निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला टी.व्ही.समोरून उठावं लागू नये, म्हणून प्रत्येकजण पुढ्यात एक-एक कुंडी घेऊन बसलेला असतो Uhoh

मॅचची वेळ झाल्यावर रणबीर प्लॅस्टरमधल्या पेशण्टला बेडवरून उठवून खुर्चीत बसवतो आणि स्वतः त्याच्या बेडवर लोळून मॅच बघायला सुरूवात करतो Uhoh

जाहिरात बनवणारा अंमळ वाहवतच गेलाय !!

जाहिरात बनवणारा अंमळ वाहवतच गेलाय !!>> +१ ..

ते काय आहे नेमकं? अ ओ, आता काय करायचं
मला अ‍ॅडच कळाली नाही>> रिया त्या दारुच्या ब्रॅन्डच्या सोड्याच्या किंवा म्युजिक सीडीजच्या आडुन केलेल्या अ‍ॅड्स आहेत. अशा बर्‍याच अ‍ॅड आहे.

रणबिरच्या हिरो मोटो कॉर्प ची जाहिरात सुद्धा मला झेपली नाही>> +१

दारुच्या ब्रॅन्डच्या सोड्याच्या किंवा म्युजिक सीडीजच्या आडुन केलेल्या अ‍ॅड्स आहेत. अशा बर्‍याच अ‍ॅड आहे.
>>>
त्यांना सरोगेट अ‍ॅड्स म्हणतात ना?

उत्पादन कुठले ते आठवत नाही. पण एका शाळकरी मुलाला कुठल्यातरी मुघल बादशहाचे पूर्ण नाव आठवत नाही आणि मग तो काहीतरी पितो की खातो आणि मग त्याला ते आठवू लागते.

स्मरणशक्तीसाठी फक्त मुघल राजांची नावे का घेतात? राजपूत, मराठे, शीख सगळे मेले का?

सामोपचार... बापरे कुठल्या गोष्टीचा राग... Happy

'बडी बडी बाते... ' मलाही खुप आवडते...
मरीन फेविकॉलची अ‍ॅडही छानेय... बंगाली जोडीची....
टु टुज आर फोर और फोर वन्ज आर भी फोर वाली अ‍ॅडही आवडली...

रणबिरच्या नविन अ‍ॅड्स नाही आवडल्या...
पीसी बाईं असलेल्या कुठल्याच जाहीराती नाही आवडत...
मध्यंतरी लिरीलची जाहीरात पाहीलेली... अगदीच बकवास...

सगळ्यात बकवास अ‍ॅड लॉरिअल च्या असतात.
एवढी मोठी कंपनी, मोठे मोठी बॉलीवुडी स्टार्स पण जाहिराती बकवास ... Happy

बडी बडी बाते जाहिरातीतला तो ट्रेडमिलचा टॅब मध्ये फोटो काढतो तो नट कोण आहे? मस्त आहे तो, एका डायमंडच्या जाहिरातीत सुमित राघवनला जास्त कॅरेट ची डायमंड रिंग घ्यायला लावतो. Happy

एका डायमंडच्या जाहिरातीत सुमित राघवनला जास्त कॅरेट ची डायमंड रिंग घ्यायला लावतो. >>>
नितेश पांडे आहे तो. अश्विनी काळसेकरचा एक्स - नवरा.

आय फिल ऑसम.......
गाण मस्त आहे हे...आवडल मला Happy
सिंथॉल ने एक्दम वेगळीच कन्सेप्ट घेतली आहे

'यंदा डाळ चांगली शिजल ............आणि आपला बाळू मोठा कृषीशास्रज्ञ होईल' या जाहीरातीनंतर माझ्या घरात वरणाचे नवीन नामकरण केलेय- 'बाळूची डाळ'

(( नितेश पांडे आहे तो. अश्विनी काळसेकरचा एक्स - नवरा.)
निम्बुडा..
कोण ही अश्विनी काळसेकर?

अश्विनी काळसेकर बहुधा पूर्वी शांती आणि सीआयडी मधे होती काही दिवस. लेटेस्ट गोलमाल रिटर्न्स मधे मुन्नीचं काम केलं होतं तिने!

Pages