निनाव - सी के पी खासियत - फोटोसहीत

Submitted by दिनेश. on 27 June, 2011 - 02:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
आठवण !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिनेशदा. दिसतय झक्कास!

मात्र हा जरा ओव्हरहाईप्ड प्रकार आहे असं मला नेहमी वाटत आलय. मी खुप आवडीनं कधी निनावं खाल्लं नाही.

दिनेशदा Happy मनापासून धन्यवाद.
काही बदल : पीठांऐवजी मूळ धान्य घेते मी, अन तांदूळ नाही घेत. हरभरा डाळ अन गहू वेगवेगळे भाजून गिरणीतून जाडसर दळून आणते. अन वेलची न टाकता फक्त जायफळच वापरते. अन नारळाचं दूध गाळूनच घेते. बाकी रेसिपी सेम.
माझ्या कडे दोन जाड तवे आहेत. दोन्ही तापवून लंगडीच्या खाली- वर ठेवते, १० मिनिटांनी त्यांची अदलाबदल करते. अन निनावं तोंडात घातलं की विरघळलं पाहिजे, न चावता; त्यामुळे खोबर्‍याचा कीस मध्ये येईल असं वाटतं Happy
>>> हे भाजत असताना सुंदर दरवळ सूटतो. <<< आहाहा मला भूक लागली ना हो Happy
दिनेशदा आता तुमच्यावर आम्ही सीकेपी लोकं पेटंट जाहीर केल्याबद्दल तक्रार करणार बरं Wink त्याची भरपाई म्हणून बोलवा बरं जेवायला Proud

मवा, लंगडी म्हनजे उंचीला कमी आणि पसरट, जाड बुडाचे भांडे. सहसा यात भात, खिचडी, बिर्याणी वा तत्सम पदार्थ छान होतात Happy
निनावं जसं मुरत जातं तसं ते अजून भारी लागतं शिल्लक उरलच तर दुसर्‍या दिवशी जास्ती मस्त लागतं. मी आधल्यादिवशी संध्याकाळीच करून ठेवते, मग तोंडात विरघळत जातं......... आहाहा दिनेशदा या वेळेस माझा दाटा लवकर होणार बहुदा Happy

मी निनावं खाल्लेलं ते फक्त बेसन-नारळाचं दूध-गूळाचं होतं. वड्या कापल्यावर पुन्हा तुपावर परतून गरम गरम खायला दिलेल्या होत्या. मस्त खमंग लागत होतं.

खरे तर घटक बघितल्यास ते साधारण पुरणपोळीचेच आहेत, पण हि खास रेसिपी , त्याच घटकांना अप्रतिम चव मिळवून देते.>>>>> म्हणजे कुठले पदार्थ ते मला समजले नाही. पण हे निनावं खरंच चविष्ट लागते एवढे मात्र खरे.

मवा, लंगडी म्हणजे उथळ पातेलं, त्याची उंची फारतर दीड इंच असेल. ही लंगडी सर्वसाधारणपणे पितळेची असते.

अरे वा,मस्तच.
रत्नागिरीत हे तांदूळ कण्या आणि नारळाचं दूध घालून करतात.
आम्ही याला 'गावठी केक' म्हणतो.
याला आमच्या गावात " भानोरे किंवा टोपातले म्हणतात.'
गेल्याच आठवड्यात बाजूच्या जी.एस.बी. काकूंनी फणसाचा रस ! घालून हे केले होते..

हो अवल बरोबर, डाळ आणि गहू पण भाजून घ्यायचे असतात. या पदार्थाच्या प्रत्येक कृतीत नेमकेपणा लागतो. नेमकेच भाजायचे, नेमकेच शिजवायचे. प्रचंड निगुतीने करावा लागतो हा प्रकार.

आणि निनाव जिभेवर विरघळलच पाहिजे. मी खोबरे घातल्यामूळे ते जरासे रेंगाळले, नाहीतर तोंडातून कधी नाहीसे झाले ते कळतच नाही.

माझ्याकडे जेवायला काय, कधीही यायचं.

मंजूडी, नूसत्या बेसनाचे केले तर नीट वड्या पडत नाही.
आणि डाळ, गूळ, कणीक, तूप हे पुरणाच्या पोळीचेच प्रकार. शिवाय नारळाचे दूध.

य्म्म्म्म्म्म्मी! भयानक आवडता प्रकार! आई, दोन्हि आजी आणि सा.बा, सग्ळ्यान्च्या हातचा खाल्ला आहे... आई ग, आता कधी खायला मिळनार??

दिनेशदा आता तुमच्यावर आम्ही सीकेपी लोकं पेटंट जाहीर केल्याबद्दल तक्रार करणार बरं डोळा मारा त्याची भरपाई म्हणून बोलवा बरं जेवायला फिदीफिदी>>>>

दिनेशदा, आपण ओळखत नाही एकमेकांना; पण असं सीकेपी लोकांना त्यांचं पेटंट फोडल्याबद्दल जेवायला बोलवणार असाल तर मी "मान ना मान, मै तेरा मेहमान" या तत्त्वावर हजर होइन!

निनावाचि छान आठवण करुन दिलित. ४,५ वर्षापूर्वी सा.बा पीठ घेवुन आल्या होत्या तेव्हा केले होते. आम्ही (आई आणि साबा) ओव्ह्न मधे निनाव करतो. डाळ, तांदूळ, गहु भाजून दळुन आणायचे मग नारळाचे दूध आणि गुळ घालून ओव्ह्न मधे बेक करायचे. पूर्वी भोंड्ल्याला ही खिरापत करायचो, कोणाला ओळ्खता येवु नये म्हणुन.

मस्त मस्त मस्तच!!!! सहीच लागतो हा प्रकार Happy

दिनेशदा, डिसेंबर-जानेवारीत भारतात आहात का? मी येत्येय जेवायला Happy

लाजो, त्या दिवसात माझाच तिकडे यायचा प्लान होता ! असो काहितरी अ‍ॅडजस्ट करु.
आत्ताच एक कल्पना सूचली. मुंबईत सत्तूचे पिठ तयार मिळते. ते वापरुन पण हा प्रकार करता येईल.
थोडा(साच) त्रास वाचेल.

धनश्री, हे जाळीदार नसते. पण तरीही हरवाळ लागते. सोडा घातला, तर शिजवतानाच तो निष्प्रभ होईल. शिवाय सोडा फसफसायला यात काही आंबट पदार्थही नाही.

दिनेशदा, ..........................

अहाहा......... दिनेशदा............ खरतर निनाव करायला जास्त खटाटोप नाही लागत पण का कोण जाणे बरेचदा जिवतीच्या नारळाच केल जात, एरव्ही करायला हरकत नाही ,आणि मी तांदळाच पीठ नाही घेत पण try करायला हरकत नाही. oven मधएही छान होतं.

साती <<<<< रत्नागिरीत हे तांदूळ कण्या आणि नारळाचं दूध घालून करतात>>>>>>> त्याला आम्ही सांदण म्हणतो:)

कुठलाही अवघड पदार्थ तुम्हाला सोप्पा कसा काय वाटतो हो दिनेशदा? हे सी के पी लोकं म्हणजे एकतर अचाट असतात; म्हणजे त्यांच्या पदार्थांच्या बाबत मी बोलतेय! अतिशय अवघड, किचकट, सुगरणपणाचा कस लागेल असे पदार्थ असतात त्यांचे, आणि तुम्ही- अगदी डाव्या हातानी करावे असे करता नि वर सोप्प्या भाषेत ते सांगता. तुम्हाला माझा __________/\___________

असो, पदार्थ छान दिसतोय. अहो तुम्हाला इथे शंका तरी लोकं विचारतात म्हणजे ते करून बघतात हे पदार्थ किंवा त्यांना त्यातली माहिती तरी आहे. पण माझी बुद्धी तेवढीही नाही हो की ह्यात हे घालू का? असा केला तर चालेल का?

जाउंदे कशाला तो विषय? झाकली मूठ सव्वालाखाची हेच खरं!

खरंच शांकली, त्यांच्या पदार्थातली प्रत्येक कृति नजाकतीची असते. साधे कांदा चिरणे असो, की वाटण करणे असो.

Pages