Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शर्मिला टागोर आणि राजेन्द्र
शर्मिला टागोर आणि राजेन्द्र कुमार ह्यांच्या एका गाण्यातले सुरुवातीचे शब्द असे आहेत 'आज तो जुमली रातमा, धरतीपर है आसमा". हे "जुमली" प्रकरण काय आहे? कोणाला माहित असेल तर सांगा प्लीज.
हिंदी चित्रपटातल्या गीतांमधील
हिंदी चित्रपटातल्या गीतांमधील शब्दांना अर्थ असतीलच असे नाही. 'आज को जुनली रात मां' च्या आधी लोकसंगीतातल्यासारखं गायलंय 'जुनली रात मा औनस औनस जुनली रात मा'
अलिबाबा और ४० चोर (धर्मेंद्र्,हेमा,झीनत) या चित्रपटात खतूबा खतूबा असे गाणे आहे. अलीकडेच एका मुलाखतीत ऐकले की खतूबा असा काही शब्द नाही, पण मेहबूबाशी यमक जुळवायला दुसरा शब्द मिळेना म्हणून आनंद बक्षींनी नवा शब्द पाडला.
हे पावसाचे गाणे : आहा रिम्झिम के ये प्यार प्यारे गीत लिए
आइ रात सुहानी देखो प्रीत लिए
घुंगर बोले चिकी मिकी चिकी मिकी
भरत घुंगरु नाही, झिंगर. आधीची
भरत घुंगरु नाही, झिंगर. आधीची ओळ, मित मेरे सुनो जरा हवा कहे क्या...
गाण्यात पाऊस नाही, पावसाआधीचे गाणे आहे हे. पदद्यावर नंदा आणि सुनील दत्त, चित्रपट उसने कहा था.
भरत धन्यवाद!
भरत धन्यवाद!
आज ट्रेन मध्ये बाजूच्या
आज ट्रेन मध्ये बाजूच्या जेन्ट्स कंपार्टमेंट मध्ये कुणीतरी रेडिओवर हे गाणे वाजवत होते. "मै से मीना से ना साफी से, ना पैमाने से, दिल मचलता है मेरा आपके आ जाने से" (गोविंदा आणि नीलम चे आहे वाट्टं हे गाणं.) पहिली ओळ काये नक्की?
ते साफि नावाचं रक्तशुद्धीकारक टॉनिक का काय ते मिळतं ते आठवलं मला
मय से मीना से ना साकी
मय से मीना से ना साकी से
मय=दारू, मीना=दारूचा प्याला, साकी =दारूचे प्याले भरण्याचे काम करणारी स्त्री.
ओके ओके. म्हणून मयखाना असा
ओके ओके. म्हणून मयखाना असा शब्द आहे होय.
आणि मीना म्हणजे "दारूचा प्याल" हे ठाऊक नव्हते मला
मीनाकाम शब्दाचा अर्थ काय होतो मग?
मीना या शब्दाचा दुसरा अर्थ
मीना या शब्दाचा दुसरा अर्थ blue gem stone असा आहे. तो वापरून केलेले नक्षकाम म्हणजे मीनाकाम, मीनाकारी.
लोकसत्तामधलं शब्दकोडं
लोकसत्तामधलं शब्दकोडं सोडवताना कळलेला आणखी एक शब्द - मीनाबाजार म्हणजे स्त्रियांनी भरवलेला कलाकुसरीच्या वगैरे वस्तूंचा बाजार.
भरतजी तुम्हाला कोपरापासून
भरतजी तुम्हाला कोपरापासून दंडवत... तुम्हाला सगळंच कसं माहिती असतं??
मला फार आवडते ते आपके आ जाने
मला फार आवडते ते आपके आ जाने से गाणं!! गोविंदा व नीलम मस्त टीपी नाचलेत त्यावर..
नमस्कार मन्डळी (हे अस न ला ड
नमस्कार मन्डळी (हे अस न ला ड जोडल्यामुळे हडळी लिहिल्यासारख वाटतय), मी 'मामी'..... नविन सभासद! धागा वाचुन ह. ह. मु. व. ची वेळ आली.
चितचोर सिनेमातील 'जब दीप जले आना' गाण्यात 'मेरे प्रीत का काजल तुम अपने नैनो मे भरे आना' च्या जागी मी कित्येक दिवस 'मिर्ची का काजल' असच समजत होते. म्हटल, असेल प्रियकराला अपल्या प्रेयसीचे नेत्र खुपच 'तीखे' असलेले आवडत असतील.
@ स्वप्ना_राज, ते 'आज तो
@ स्वप्ना_राज,
ते 'आज तो जुमली' नसून 'आज कोजुमली' असावे. आणि 'कोजुमली' म्हणजे 'कोजागिरि' असावे असा एक अन्दाज. पण तो 'रातमा' शब्द फारच विनोदि आहे - गुजराती वाटतो.
<<<चितचोर सिनेमातील 'जब दीप
<<<चितचोर सिनेमातील 'जब दीप जले आना' गाण्यात 'मेरे प्रीत का काजल तुम अपने नैनो मे भरे आना' च्या जागी मी कित्येक दिवस 'मिर्ची का काजल' असच समजत होते. म्हटल, असेल प्रियकराला अपल्या प्रेयसीचे नेत्र खुपच 'तीखे' असलेले आवडत असतील.>>>
मामी, ते प्रीत का काजल तुम अपने नैनो मे "मले" आना आहे.......
हवा हवा ऐ हवा मुझको बता
हवा हवा ऐ हवा मुझको बता दे,
कहा खुली हा खुली झुल्फे बता दे,
अब उसका पता दे जरा मुझे बता दे
मै उससे मिलून्गा इक बार मिला दे
यार मिला दे, दिलदार मिला दे.....
खूप पूर्वी लोकप्रिय झालेल एका पाकिस्तानी गायकाच हे गाण. मला बरेच दिवस 'अब्दुल का पता दे' आणि 'ईकबाल मिला दे' अस आहे असच वाटायच.
एक नाट्यसंगीत आहे
एक नाट्यसंगीत आहे रणदुदुंभी(की दुंदुभी?) नाटकातले. खरे तर त्या गीताच्या ओळी बर्याचसा गाण्यात रीपीट होतात पण दरवेळी वेगेळेच ऐकु येते. त्य सगळ्या ऐकु आलेल्याची सरासरी काढुन मी काहितरी ओळी गुणगुणत असतो. खरे गाणे काय अहे ते सांगावे
वर बसता चाप धरी रे त्याच्या गळा लागला
ललललल्लल्ल्ल्ललललल म्हणुनी दोष त्याला..
काही अर्थ ना फिर्थ!
वर बसता चाप धरी रे त्याच्या
वर बसता चाप धरी रे त्याच्या गळा लागला
ललललल्लल्ल्ल्ललललल म्हणुनी दोष त्याला..>>>
अहो, ते 'परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला' असे आहे.
>>ते 'आज तो जुमली' नसून 'आज
>>ते 'आज तो जुमली' नसून 'आज कोजुमली' असावे.
मामी, नाही हो. गाण्याच्या ओळी आणि सिनेमाचं नाव आलं होतं टीव्हीवर. त्यामुळे ते "तो जुमली" असंच आहे हे नक्की.
>>मला बरेच दिवस 'अब्दुल का पता दे' आणि 'ईकबाल मिला दे' अस आहे असच वाटायच.
" परवशता पाश दैवे ज्याच्या
" परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला,
असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला..."
हे मी मागे टाकलय वाट्टं! मधु
हे मी मागे टाकलय वाट्टं!
मधु मागसी माझ्या सख्यापरी हे अतीव सुंदर गाणे
मी लहानपणी असे ऐकायचे
'मधु मागसी माझ्या सख्या परि
मधुघटची(भटजी?) उताणे पडती घरी'
मधुघटची(भटजी?) उताणे पडती
मधुघटची(भटजी?) उताणे पडती घरी' >>>
आमच्या जवळ एक मधु नावाचे भटजी
आमच्या जवळ एक मधु नावाचे भटजी आहेत.. (आता इथे आडनाव नाही लिहित, नाहितर त्यान्चा एखादा यजमान फोडेल मला :हाहा:). ते उताणे पडले तर त्याना उभे कोण करणार ...याचा विचार येउन हसु येतेय.......
मागे एकदा टीव्ही वर एका
मागे एकदा टीव्ही वर एका गायकाच्या मुलाखतीत सान्गितलेली गम्मत आठवतेय : सन्गीत शारदा नाटकात शारदा आपल्या मैत्रिणीन्ना (अनुस्वार कसा द्यायचा?) तिच्या दाखवण्याच्या प्रसन्गाच वर्णन करताना गाण अस आहे "दाखवावयासि मला ....(...तात नेति वै. वै.)" पण गाताना 'या' नन्तर एक छोटिशी तान येते अणि पुढचे शब्द एकत्र येतात. त्यामुळे हिमाचल प्रदेशाच्या टुरिस्टान्मधे एक-दोघान्ची भर पडते.
माझा ३ वर्षाचा मुलगा सांग
माझा ३ वर्षाचा मुलगा सांग सांग भोलानाथ हे गाणे सॅमसंग भोलानाथ पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे वाचून सुटु मिळेल काय असे गातो
मामी ते पं वसंतराव देशपांडे :
मामी ते पं वसंतराव देशपांडे : दाखवावयासी मला चे दाखवावया सिमला झाले ना?
अनुस्वार = M naMtar नंतर
९८.३ रेडिओ मिरची वर १४-१६
९८.३ रेडिओ मिरची वर १४-१६ जुलै, रात्री ९-१२ लक्ष्मीकांत-प्यारेलाल आहेत - पुरानी जीन्स ह्या कार्यक्रमात. अधिक माहितीसाठी रेडिओ मिरचीवर ‘सबकुछ लक्ष्मीकांत प्यारेलाल’
इथे अस्थानी आहे पण योग्य बीबी
इथे अस्थानी आहे पण योग्य बीबी सापडला नाही, आणि शिवाय कवितेशी संबंधित म्हणुन इथे लिहिते.
शाळेत असताना विंदांची देणा-याचे हात घ्यावे ही कविता पुस्तकात होती. त्यात शेवटचे कडवे
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एके दिवशी
देणा-याचे हात घ्यावे
हे वाचुन मी दचकले. म्हटले हा घेणारा ग्रेट आहे, देणा-याकडुन जे मिळतेय ते घेतोय वर त्याचे हातही तोडुन घेतोय?? बरे असल्या शंका शिक्षकांना तरी कशा विचारणार? कवीने असली कविता का बरे लिहिली असेल हा विचार मी बरेच दिवस केला. शेवटी कवीला माणसाच्या कृतघ्नतेबद्दल काहीतरी भाष्य करायचे असेल म्हणुन त्याने असे लिहिलेय असा माझ्या मनाशीच मी अर्थ लावुन घेतला.
नंतर ब-याच वर्षांनी आपोआप उकल झाली की देणा-याचे हात म्हणजे आपण देणारे बना....
हिमाचल प्रदेशाच्या
हिमाचल प्रदेशाच्या टुरिस्टान्मधे एक-दोघान्ची भर पडते >>>
बाप्रे, इथे २-२ मामी झाल्या म्हणायच्या माबोवर!
सॅमसंग भोलानाथ आणि सुटु >>>
सॅमसंग भोलानाथ आणि सुटु >>>
पूर्वी "तांडा चालला" अशी
पूर्वी "तांडा चालला" अशी सीरीयल लागायची. उदय म्हैसकर असायचे बहुतेक त्यात. त्याला माझी आजी (वडीलांची आई) "टांगा चालला" असे म्हणायची आणि त्याचे टायटल साँगही तसेच ऐकू येऊ लागले मग
तशे ही कल्याणमध्ये टांगे प्रचलित असल्याने (अजूनही आहेत
) तिची बिचारीची अशी भोळी समजूत होती की खरंच अशाच नावाची सीरियल आहे. 
मध्यंतरी स्टार प्रवाह वर "राजा शिवछत्रपती" ही सीरीयल लागायची. त्याचे टायटल साँग जाम म्हणजे जाम कळायचे नाही. इथे विचारणार होते तर बाबासाहेबांच्या शिवचरित्रात वाचायला मिळाले. शिवराजभूषण नावाच्या कवीने शिवरायांच्या स्तुतीपर रचलेले काव्य आहे ते.
Pages