मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर काव्य आहे ते...
मला त्याचा अर्थ माहित नव्हता. सारेगामात हृदयनाथांच्या तोंडुन ऐकला तेव्हा कळला.

माहेरी माझ्या घराशेजारीच शिवसेनेचे ऑफिस होते. दरवर्षी शिवजयंतीला किंवा अन्य काही कार्यक्रम असला की शिवकल्याणराजा कॅसेट वाजवायचे. त्यामुळे मी कधीच ती कॅसेट विकत घेतली नाही. त्यामुळे गाणीही नीट ऐकली नाहीत.

तसेही 'इंद्रजिमी जंभपर' वगैरे हाय लेवेल हिंदी मला कळलेही नसते... Happy

सुप्रसिद्ध गीत जिथे सागरा धरनी मिळते.... ..कितितरी दिवस मला वाटायच की त्या हिरविण्ने आत्महत्या केली आहे आणि तिचं भूत हे गाण गातय....

जिथे सागरा धरनी मिळते = सागराचा तळ

शर्मिला टागोर आणि राजेन्द्र कुमार ह्यांच्या एका गाण्यातले सुरुवातीचे शब्द असे आहेत 'आज तो जुमली रातमा, धरतीपर है आसमा". हे "जुमली" प्रकरण काय आहे? कोणाला माहित असेल तर सांगा प्लीज.

आई शप्पथ... मी इतके दिवस ते अस एकत होते Uhoh
आज तो जुल्मी रातमा
धरती पर है आत्मा

कुलु,
ब्रिटीश राज मधे, स्वातंत्र्यलढ्याचा उघड प्रचार करण्यावर बंदी होती. त्यामूळे नाटकात, रुपके वगैरे वापरुन असे छुपे संदेश दिले जात. रणदुदुंभि, सन्यस्त खड्ग ही अशी काही नाटके होती.
ते वरचे गाणे पण असाच संदेश देणारे आहे.

परवशता पाश दैवे, ज्याच्या गळा लागला
सजीवपणी घडती सारे, मरणभोग त्याला
असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला
सौख्यभोग इतरां सारे, कष्ट मात्र त्याला

पारतंत्र्यातील भारतीय जनतेचे हे वर्णन आहे.

या 'जुमलीचा' जुम्माशी (शुक्रवार) संबंध असेल.. आणि मीटर मधे बसवण्यासाठी वापरला असेल.. Happy
एक फा. अंदाज Happy

बरेच दिवस इथे लिहु का नको विचार करत होतो. माझ्या मुलिला (पावणे तीन वर्षे) कुलवधुचे टायटल सॉन्ग भारी आवडते...... ते ती असे म्हणते......

एक नदिसारखी वाहते ही जणु
पाऊलखुणा ठेऊन मागे
चालले मी कुलेधु..... Rofl

(आणि काहीतरी शिकवल्याच्या शिव्या मात्र मला मिळतात.... काहिही शिकवलेले नसताना.... :अरेरे:)

सुप्रसिद्ध गीत जिथे सागरा धरनी मिळते>>>>> आधी मी ते असे ऐकायचे "जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट लावते......" Happy Happy

जब प्यार किसीसे होता है (नवा, सलमानचा चित्रपट) मधील एक गाण मी आस गुणगुणायचो

मदहोश दिलकी धडकन चुपसी तनहायीसी
छुप गया चांद क्यू क्या तेरी मॉम इधर आयी

(मॉम च्या भुमीकेत उषा नाडकर्णी, रीटा भादूरी किंवा तत्सम कुणीस असाव उगाच नाय चांद लपणार )

*

बबूल टूथपेस्ट च जींगल लहानपणी मी पुढील प्रमाणे म्हणायचो

आई आई बबूल की बहार
बबूल टूथपेस्टसे हम सबको है प्यार
दातो का ये दोस्त है
मसूडोका ये यार
दात के कीडे कितने प्यारे कितने खुशबूदार
आई आई

(नंतर कूणीस सांगितलकी ते दात के किडे नसून दात मसूडे आहे ) Proud

आधी पोस्टलं असेल कदाचित. "एक था गुल और एक थी बुलबुल" हे मी बरेच दिवस "एक था बुल और एक थी बुलबुल" ऐकत होते आणि इंग्लिश बुल हिंदी गाण्यात कुठून आला, त्या बुलचं चमनमध्ये काय काम असे प्रश्न पडले होते:-)

"बहरला पारीजात दारी फुले, का पडती शेजारी" हे ऐकताना कोणीतरी फुले आडनावाचे गृहस्थ बहरलेला पारीजातक पाहून पडले असेच वाटायचे.. Happy

"बहरला पारीजात दारी फुले, का पडती शेजारी" हे ऐकताना कोणीतरी फुले आडनावाचे गृहस्थ बहरलेला पारीजातक पाहून पडले असेच वाटायचे.. >>>>> Proud Proud Proud शी बाई, आता दरवेळी एक गृहस्थ खाली पडलेले दिसणार मला ... आणि मला फुले नावाचे केवळ निळू फुलेच माहित आहेत. आता काय करु?

पण या वरून आठवलं : ते 'आजा सनम मधूर चांदनी मे हम' गाणं आहे ना त्यातल्या 'केहेता है दिल और मचलता है दिल मोरे साजन ले चल मुझे तारों के पास ...' या ओळिंचं मी (असचं गंमत म्हणून) interpretation केलं होतं की, ती हिरवीण तिच्या 'मोरे' आडनावाच्या साजणाला सांगतीये की, तिच्या heart मध्ये काहितरी problem झालाय तर त्याने तिला डॉ. तारे यांच्याकडे घेउन जावे.

माझ्या मैत्रिणीचा भाऊ एकदा ट्रेन मध्ये स्वतःच्या तंद्रीत गाणे गुणगुणत होता - 'मेरे हाथोंमे नौ नौ चुडीयाँ है ....'. शेजारी बसलेल्या गृहस्थाने बराच वेळ सहन केले आणि शेवटी न राहवून त्याला सांगितले की भाऊ तुम्ही शब्द चुकीचे वापरताय... कारण तो 'हाथोंमे' च्या ऐवजी 'घुटनों मे' म्हणत होता.

>>"बहरला पारीजात दारी फुले, का पडती शेजारी" हे ऐकताना कोणीतरी फुले आडनावाचे गृहस्थ बहरलेला पारीजातक पाहून पडले असेच वाटायचे..

Proud

'ओ हसीना जुल्फोंवाली' हे गाणं ऐकताना मला नेहमी प्रश्न पडतो की तिला जुल्फे नसती......थोडक्यात तिचा अनुपम खेर झालेला असता तर ह्याने तिला हसीना म्हटलं असतं का? का "जुल्फे" ह्या शब्दाचा "कुरळे केस" वगैरे काही खास अर्थ आहे?

आई ग! त्या पर्सिस खंबाटाला बघवलं नाही स्टार ट्रेकच्या त्या पिक्चरमध्ये. Sad तरी बरंय बराचसा रोल रोबोटाईप होता. अ‍ॅक्टींग डिपार्टमेन्टमध्ये बोंबच होती नाहीतरी तिची.

<<<आणि मला फुले नावाचे केवळ निळू फुलेच माहित आहेत. आता काय करु?>>>

मामी, ते फुले फक्त "जंगलातल्या वाड्यावर" पडलेले असतात......... Rofl

हे अ‍ॅक्चुअल चुकीचे ऐकलेले गाणे नाहीये. पण सेम वरच्या पारिजातकासारखे चुकीचे इंटरप्रिटेशन आहे.

नटरंग मधील अप्सरा आली या गाण्याचे शब्द असे आहेत : " अप्सरा..... आली, इंद्रपुरीतून खाली... पसरली........ लाली"

मला कायम अप्सरा, इंद्रपुरीतून खाली आल्यावर पसरली आहे असे डोळ्यासमोर येते. 'लाली'ची गाडी कायम शेवटून आरामात येते. व चांगल्या गाण्याचं पार भजं होतं! Proud

बस्के, ठकु >>>>> Lol Lol Lol

ठकु, actually तुला जे ऐकु येतं ते एकदम logical आणि practical आहे. पारिजात फुलला तर खाली खुले कापड अंथरून ठेवा. फुलं गोळा करायला सोप्पं!

आता खर तर हे फार प्रसिध्द गोअन भाषेतिल गाणे अहे पण मला कधिही त्याचे बोल कळले नाहीत.

माझे राणी माझे मोंगा, तुझे दोळ्यात सोधता ठाव
माझे राणी माझे मोंगा,तुझे नावक जोडता नाव
पुलापुलात खुशीत र्‍हायलो तुझे माझे प्रीतीचे नाव

काळ्या काळ्या दोळ्यान तुझ्या
माझ्या वाटा वाटा मिळतात माका
तुझे छातीर ठेवता माथा
माझ्या कळजाक लागता घाव
तुझे पायात रुतता काटा, फुलाभाशेन हलके दुखा

गोर्‍या ग्गोर्‍या रंगान तुझ्या
माझ्या दोळ्याक दोळ्याक चादण्यालाती
तुझ्या ओठार कफने माझी
माझे गाणे गाणे होऊन येती
तुझे बेसुर माझ्या मना दर्यावरल्या हरणांचे भाव

अतिशय भलभल्ते अर्थ निघतात. एकतर प्रियकराच्या चातीवर माथा थेवल्याने कळजाला घाव लङण्याचे कारण काय? "चादण्यालाती" या विचित्र शब्दाचा अर्थ काय? ओठावर कफने, दर्यावरले हरीण ह्या गोअन फ्रेझेस अहेत का?

Pages