Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सत्यवती ही निषादाची कन्या. तो
सत्यवती ही निषादाची कन्या. तो त्याच्या (कोळी बहुधा) जमातीचा राजा होता. म्हणजे त्यांच्यातला वैभवसंपन्न. जंगलातून वाहणार्या यमुनेच्या काठी त्यांचे वास्तव्य. त्यामुळे राजकन्या सत्यवतीला खेळण्यासाठी हंस, हरिणी, वनांमधील मुक्त विहार हे सगळे सहज शक्य आहे.
थोडंसं विषयांतर करतो:
थोडंसं विषयांतर करतो: -
महाभारताचा जर अगदी खोलात न शिरता जरी जमेल तेव्हढा अभ्यास केला, तर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे, महाभारत घडलं ते सध्याच्या 'उत्तर भारतात'... गंगा, यमुना या नद्या देखिल 'उत्तर भारता'तूनच वाहतात... तेव्हा 'यमुने'चे आणि आसपासच्या परिसराचे संदर्भ या गाण्यात येणे स्वाभाविक वाटते...
.
>>तिच्या अंगाला माश्यांचा वास
>>तिच्या अंगाला माश्यांचा वास येत असे म्हणून ती मस्यगंधा आणि तो वास योजनभर येत असे म्हणुन ती योजनगंधा !!!
अरे बाप रे!
>>कधि कोणी डबलबारी हा भजनाचा प्रकार ऐकला असेल तर...
हे असं काही असतं हे निदान मला तरी आज कळलं. काय असतं हे? थोडं सांगता का?
आशूडी, विवेक - पटलं.
तो वास योजनभर येत असे म्हणुन
तो वास योजनभर येत असे म्हणुन ती योजनगंधा >> तो वास म्हणजे माशांचा वास नव्हे तर सुगंध! पराशर मुनींनी सत्यवतीला 'तुझ्या अंगाचा माशाचा वास जाऊन त्या जागी स्वर्गीय सुवास येईल आणि तो योजनभर दूर दरवळेल' असा वर दिला होता.
find 'मशाचा वास' replace with 'सुवास'
Set intensity of 'सुवास' = १ योजन
हाकानाका
दिनेश, मला शास्त्रीय संगीत &
दिनेश, मला शास्त्रीय संगीत & नाट्य संगीत आवडतात रे. कोल्हापुर एफ एम ला दर सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता नाट्यसंगीतांचा कार्यक्रम असतो तो मी न चुकता ऐकतो. माझ्या बर्याच मित्रांना पण नाट्यसंगीत आवडतं. मी कुठे सीडी मिळतेय का चौकशी केली, पण नाही भेटली कुठे.
एक अप्रतिम गाणे आहे, बहुतेक "आँधी" मधलं-
"
"तुम आ गये हो नुर आ गया है
नही तो चौराहो से नाँव जा रही थी
ही ओळ नेमकी कशी आहे?
"तुम आ गये हो नुर आ गया
"तुम आ गये हो नुर आ गया है
नही तो चौराहो से नाँव जा रही थी "
>>
तुम आ गए हो नूर आ गया है
नहीं तो चरागों से लौव जा रही थी.. //अर्थ सांगायची गरज नसावी बहुतेक.
जीने की तुमसे वजह मिल गयी है
बडी बेवजह जिंदगी जा रही थी
नही तो चौराहो से नाँव जा रही
नही तो चौराहो से नाँव जा रही थी
>>नही तो चौराहो से नाँव जा
>>नही तो चौराहो से नाँव जा रही थी
हे काय मुंबईचं पावसाळ्यातलं वर्णन वाटतं
>>तो वास म्हणजे माशांचा वास नव्हे तर सुगंध!
माधव, धन्यवाद! मला उगाच शांतनू राजाच्या (शांतनूच ना तो?) सहनशीलतेचं आणि प्रेमाचं कौतुक वाटत होतं.
>>कधि कोणी डबलबारी हा भजनाचा
>>कधि कोणी डबलबारी हा भजनाचा प्रकार ऐकला असेल तर...
हे असं काही असतं हे निदान मला तरी आज कळलं. काय असतं हे? थोडं सांगता का>>>>>>
"डबलबारी" हा प्रकार विशेष करुन कोकणात (जास्त करुन तळ्कोकणात म्हणजे सिन्धुदुर्गात) प्रसिध्ह आहे.......यात दोन भजनीबुवा (आणि त्यन्चे धरकरी) असे २ गट असतात......
पहिला गट एखादा विषय/कथा घेऊन ते सादर करतो....यातली गाणी ही हमखास नव्या बॉलीवुड चालिन्ची असतात्...पण गाणी कथेला धरुन्.....त्यातुनच दुसर्या बुवाची खिल्ली उडवणे वगैरे चालु असते.....मग पहिला बुवा दुसर्याल काही कोडी घालतो.....
मग दुसर्या बुवाची बारी आली कि तो एक कथा घेउन त्यातुन आधिच्या प्रश्नान्ना उत्तरे देतो आणि पहिल्याची टान्ग पण खेचतो......
त्यानन्तर पुन्हा पहिल्या बुवाला चान्स आणि मग पुन्हा दुसरा बुवा शेवट करतो.......
यात रागदारी पासुन फिल्मि गान्यान्पर्यन्त सर्व वापर होतो...... एकदतरी ऐकण्यासार्खा पण हळुहलू लोप पावत चाललेला भजन प्रकार...... यात असलेले भजनीबुवा खुप कसलेले लागतात.......
जुन्या मराठी चित्रपटात ते तमाशात असायचे तसे "सवाल जवाब" थोडक्यात्....फक्त इथे जयश्री गडकर येउन नाचत नाही.......झालिच मारामारी २ गटात (बा चा बा ची) तर तर्र्र्र झालेले गावकरी नाचतात कधीकधी.....
आजही मुम्बईच्या कही भागात जिथे कोकणवासी भर्पुर आहेत तिथे असे कर्यक्रम आयोजित केले जातात्...पण खुप कमि प्रमाणात्....पुर्वी या डबल्बारीच्या कॅसेट भारी खपायच्या.....
मला उगाच शांतनू राजाच्या
मला उगाच शांतनू राजाच्या (शांतनूच ना तो?) सहनशीलतेचं आणि प्रेमाचं कौतुक वाटत होतं>>>

य वरुन हे पुरु राजे क्षत्रिय नसून सारस्वत असावेत असे आमचे संशोधन सांगते
मी भ्रमर, खूप खूप धन्यवाद
मी भ्रमर, खूप खूप धन्यवाद माहितीबद्दल
मी भ्रमर, खूप खूप धन्यवाद
मी भ्रमर, खूप खूप धन्यवाद माहितीबद्दल
नही तो चौराहो से नाँव जा रही
नही तो चौराहो से नाँव जा रही थी >>>> हसून हसून मी लोटपोट झालेय इथे........
मला ते नेहमी "नही तो चरागो से
मला ते नेहमी "नही तो चरागो से वो जा रही थी" असे ऐकु यायचे...... असम्बद्ध वाटायचे पण कधी शोधले नाही नक्कि काय अहे ते....
वो जा रही थी >>> नाँव जा रही
वो जा रही थी >>>
नाँव जा रही थी >>
अशक्य तारे तुटतायत
साक्षात्कार.......... आतच
साक्षात्कार..........
आतच गाणे ऐकले....कान देऊन.
"हसले आधी कुणी तु का मी".........इतके दिवस मला ते वटायचे.."हसले काही कुणी तु का मी"
हो,......... मला ही "नही तो
हो,......... मला ही "नही तो चौराहो से नाँव जा रही थी" असंबंध वाटायचं, पण मला असं वाटायचं की "चौराहोसे नाँव जाणे" हा हिंदीतला एखादा वाक्प्रचार असावा. असं वाटायचं की नायिका नसल्याने नायक एव्हढा दु:खी झाला की त्याला दृष्टीभ्रम होऊन रस्त्यावरुन नावा जाताना दिसायला लागल्या. असं काहीतरी लॉजिक मी लावायचो.
वा कुलु, रस्त्याने नाव जातेय,
वा कुलु, रस्त्याने नाव जातेय, आणि नायिका त्यात बसलिये....सहिच...
"चौराहोसे नाँव जाणे"हा
"चौराहोसे नाँव जाणे"हा हिंदीतला एखादा वाक्प्रचार असावा
----------
हिन्दीतला तर नाही कदाचीत इटालियन मधे असावा!
कुलु, माझ्याकडे संग्रह आहे
कुलु, माझ्याकडे संग्रह आहे नाट्यगीतांचा. भेटलास कि देतो.
भ्रमर मी फक्त नाव ऐकले होते. (मी सिंधुदूर्गामधलाच, पण आता हे सांगायला लाज वाटते, इतका मी अनभिज्ञ आहे या प्रकारांबद्दल.) छान झाले हे कळले ते.
माधव, या सुगंधाचे मला विसरायला झाले होते. हिच सत्यवति भीष्माला प्रतिज्ञा करायला लावते ना ?
विवेक यमूनेचा संदर्भ आला लक्षात आता. त्या काळात कुठली नदी वहाती होती, याबद्दल पण काहीसे वाचले होते. इतिहासात भारताचा कधी वायव्य भाग नांदता होता तर कधी ईशान्य.
वा कुलु, रस्त्याने नाव जातेय,
वा कुलु, रस्त्याने नाव जातेय, आणि नायिका त्यात बसलिये....सहिच...>>>>>>>
अजुन बरीच माझे ज्ञान पाजळणारी
अजुन बरीच माझे ज्ञान पाजळणारी गाणी आहेत.
देवदास मधलं "धाई शाम रोखलै" गाण्याच्या सुरुवातीला एक तराणा(त्याला काय म्हणतात माहित नाही म्हणुन तराणा हे नाव) आहे. तो कसाय्?मी असा म्हणायचो (अजुनही म्हणतो)-
"मलबीर बु आय
केशो प्यार गुगवारी
मुखदामिनीसीदा मकेत चार मतवारी"
कुलु, माझ्या माहिती प्रमाणे
कुलु, माझ्या माहिती प्रमाणे देवदासच्या त्या गाण्याचे सुरुवातीचे बोल असे आहेत:
मालती गूंधाय केश प्यारे घुघवारे
मुख दामिनीसी दमकत, चाल मतवारी
अमी
"ये पर्बतोंके दायरे ये शामका
"ये पर्बतोंके दायरे ये शामका धुआ" हे मस्त गाणं एफएमवर ऐकत होते. त्यात "जरासी जुल्फ खोल दो, हवामे इत्र घोल दो" ही ओळ ऐकली. हे "इत्र" काय आहे? "अत्तर"चा अपभ्रंश आहे का?
इत्र म्हणजे अत्तर.
इत्र म्हणजे अत्तर.
थॅक्स अनीशा
थॅक्स अनीशा
मलबीर बु आय केशो प्यार
मलबीर बु आय
केशो प्यार गुगवारी
मुखदामिनीसीदा मकेत चार मतवारी >>>>>>>
अशक्य हसतेय.....
बादवे त्याचे नक्की बोल मलाही कळायचे नाहीत. धन्यवाद peacelily2025....पण अर्थ पण सांगा ना माहीत असेल तर्.....दुसर्या ओळीचा अर्थ लागतोय पण पहिल्या ओळीचा अर्थ काय?
<<<<बादवे त्याचे नक्की बोल
<<<<बादवे त्याचे नक्की बोल मलाही कळायचे नाहीत. धन्यवाद peacelily2025....पण अर्थ पण सांगा ना माहीत असेल तर्.....दुसर्या ओळीचा अर्थ लागतोय पण पहिल्या ओळीचा अर्थ काय?>>>>
हे त्या स्त्रीचे वर्णन आहे.........
फुलान्च्या गन्धाचा शॅम्पु लावुन केस धुतले असावेत बहुतेक तिने....... स्क्रब लावल्याने मुख पण चमकत आहे......!
निम्बे, जरा हलकेच घे......
निंबुडा मी खरेच तसे म्हणत
निंबुडा मी खरेच तसे म्हणत होतो. पण त्या ओळी अस्पष्ट असल्याने कुणाला कळायचेच नाही मी काय म्हणतोय ते.
खरेच अमी अर्थ माहित असेल तर सांगा.
फुलान्च्या गन्धाचा शॅम्पु लावुन केस धुतले असावेत बहुतेक तिने....... स्क्रब लावल्याने मुख पण चमकत आहे......!>>>>>>>>

>>मालती गूंधाय केश प्यारे
>>मालती गूंधाय केश प्यारे घुघवारे
मी पण प्रयत्न करून पहाते अर्थ लावायचा
मालती हे फुलाचे नाव आहे. त्यामुळे त्याचा सुवास येणारे केस. मला वाटतं "घुघवारे" हे "घुंगराले" चं अपभ्रष्ट रूप असेल. म्हणजे कुरळे केस.
Pages