मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे राणी माझे मोंगा, तुझे दोळ्यात सोधता ठाव
माझे राजा माझे मोंगा,तुझे नावक जोडता नाव
फुलाफुलाक पुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव

काळ्या काळ्या दोळ्यान तुझ्याम माझ्या वाटा वाटा मेळतात माका
तुज्या छातीर ठेवता माथाम फुलाभाशेन भाशेन हलकी दु:खा
तुझे पायात रुतता काटा, माझ्या काळजाक लागता घाव

गोर्‍या गोर्‍या रंगान तुझ्या, माझ्या दोळ्याक दोळ्याक चादण्याराती
तुझ्या ओठार सपना माझी, माझे गाणे गाणे होऊन येती
तुझे भितुर माझे मना दर्यावरल्या किरणाचो भाव

मला पण एक गाणं ऐकुन नेहमी प्रश्न पड्तो
गुलाबी आंखे जो तेरी देखी
शराबी ये दिल हो गया.

खरच एखाद्या माणसाचे डोळे गुलाबी दिसले तर .....

माझी मुलगी (वय वर्षे ३) रोज आंघोळ करताना शेवटी बादली डोक्यावर घेते ..... (ऑल ईस वेल मध्ये ते तिघे एडियट घेतात तशी.) आणि म्हणते........

ऐय्या ऑल ईस वेल्........ऐय्या ऑल ईस वेल.......... Biggrin

"सुहाना सफर और ये मौसम हसी" मधली एक ओळ अशी ऐकायला यायची - ये गोरी नदियोंका चलना उछलकर, के जैसे अल्हड चले पिछे मुडकर. परवा रेडियोवर कान देऊन ऐकलं तर कळलं की ते "जैसे अल्हड चले पी से मिलकर" आहे.

डिसचार्ज झाले मन... पाखरू होऊन >>>>>>>>>>>>> ह. ह. पु. वा..
पण to be frank, मला दिसं चार झाले मन... पाखरु होऊनं... चा अर्थ देखिल नाही कळला नीटसा. मन पाखरु होऊन चार दिवस झालं म्हण्जे नक्की काय झालं ?

अस्मानी, त्याचा अर्थ बहुतेक असा असावा.... मन पाखरु होऊन चार दिस (दिवस) झाले= गेल्या चार दिवसांपासून मन पाखरू झाले आहे. पाखरु= सैरभैर...'पाखरु'चे अनेक अर्थ संदर्भानुसार काढता येऊ शकतात. इथे 'सैरभैर' हा अर्थ काढण्यामागे पुढच्या ओळी आहेत-
पान पान आर्त आणि झाड बावरुन

संदर्भासाठी गाण्याच्या काही ओळी देत आहे

दिस चार झाले मन
पाखरु होऊन
पान पान आर्त आणि
झाड बावरुन

सांजवेळी जेंव्हा येई
आठवं आठवं
दूर कुठे मंदिरात
होई घण्टारव
उभा अंगावर राही
काटा सरसरुन..
दिस चार झाले मन

डिसचार्ज झाले मन... पाखरू होऊन >>>>>>>>>>>>>

सानी आणि अस्मानी,

माझ्या मते इथे "दिस" या शब्दाचा अर्थ दिशा असा आहे. गाण्याचे चित्रिकरण बघाल तर त्यात गाणार्‍या मुलीची आई तिच्या भुतकाळात हरवते (रीमा लागु).
आज मन पाखरु होऊन चारि दिशा फिरतेय म्हणजेच आठवणीत रमलय असा अर्थ असावा. पण इथे दिस म्हणजे दिवस हा अर्थ नसावा.

धन्यवाद भ्रमर! अस्मानी Happy
बरोबर आहे, तार्किकदृष्ट्या दिस चार म्हणजे चार दिशाच असायला हवे...पण कोणी 'दिशा'ला 'दिस' असे म्हटलेले ऐकिवात नाहिये ना! 'दिवस' ला बोलीभाषेत 'दिस' म्हणतात हे मात्र माहिती होते...
असो, पण कवितेत/ गाण्यात चपखल बसण्यासाठी असे शब्दातले बदल, वाक्यरचनेतले बदल, क्वचित पूर्णपणे नवीन शब्दाची निर्मिती झालेली पाहिली आहे...हा ही त्याचाच भाग असावा...

भाचीची 'राधा ही भावरी' गाण्याची व्हर्जनः
रंगात रंग तो शाम रंग पाहण्या न भिरभिर भिरते
ऐकू नका, विसरू नका ही वाट कुणाची बघते

ऐकू नका, विसरू नका ला दोन्ही हातांनी फूली करत नाही ची खूण करते ती..
आपण हसलो की चिडते की मी बरोबरच म्हणतेय.. Lol

नानबा, काय मजेशीर पात्र आहे ही तुझी भाची Rofl

ऐकू नका, विसरू नका ला दोन्ही हातांनी फूली करत नाही ची खूण करते ती.. >>>> Rofl

नानबा........

ऐकु नका विसरु नका.......... घेतला वसा टाकु नका........... Rofl
लहान मुलांच्या गाण्यांच्या बोलांचा वेगळा धागा काढला तर धो धो चालेल........ ते आपल्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह आहेत.

ते दबंग मधलं गाणं आहे ना "मुन्नी बदनाम हुई" त्यात खरंच "ले झंडू बाम हुई" असे शब्द आहेत का मला तसे ऐकू येतायत? Uhoh

आशा पारेख आणि राजेश खन्नाच्या "अच्छा तो हम चलते है" गाण्यात ओळी आहेत. तो तिला म्हणतो "तेरे घरवाले ना कर दे इन्कार" त्यावर ती म्हणते "सब है तय्यार". हे ऐकताना का कोणास ठाऊक मला दरवेळी असं वाट्तं की ही घरातल्या लोकांना इतका त्रास देतेय की ते हिची पीडा कधी टळतेय त्याची वाटच पहाताहेत Happy

मेरे नैना सावन भादो...

या गाण्यातल्या 'भादो' चा अर्थ मला भाने दो - भा जाने दो (पसंतीस पडू दे) वगैरे वाटायचा...
आज समजलं की भाद्रपदाला हिंदीत भादो म्हणतात...

मला वाटायचा तो अर्थ...
माझ्या डोळ्यांनो तुम्हाला सावन पसंत पडू दे
नाहितर परत माझ्या मनाची (श्रावणाची) तहान भागणार नाही...

प्रत्यक्ष अर्थ...
माझे डोळे श्रावण्-भाद्रपदाच्या पावसाप्रमाणे वहाताहेत तरी माझं मन तहानलेलं आहे...

Rofl

ही घरातल्या लोकांना इतका त्रास देतेय की ते हिची पीडा कधी टळतेय त्याची वाटच पहाताहेत <<<<<<<< Rofl

ते दबंग मधलं गाणं आहे ना "मुन्नी बदनाम हुई" त्यात खरंच "ले झंडू बाम हुई" असे शब्द आहेत का मला तसे ऐकू येतायत? >>>>>>> झंडु-बाम Rofl ... लै म्हणजे लै जबरदस्त!!!!! (सॉरी नुसतेच हसले कारण मला ते गाणं महित नाहीये...)

------------------------------------------------------
आजच सकाळी ऐकलं हे गाणं - 'अंगणी पारिजात फुलला...'.
शब्द माहित होते तरिही मला ऐकू येत होतं - 'अंगणी कालिदास फिरला ....'
आता काय म्हणायचं??????

ते दबंग मधलं गाणं आहे ना "मुन्नी बदनाम हुई" त्यात खरंच "ले झंडू बाम हुई" असे शब्द आहेत का मला तसे ऐकू येतायत? अ ओ, आता काय करायचं>>>>

स्वप्ना, बरोबर आहे तुझं. 'मैं झंडू बाम हुई' असेच शब्द आहेत? (गीतकार कोण आहे त्याचा? Happy )

हिंदीत ज्वार-भाटा म्हणून एक चित्रपट येऊन गेला. मला पहिल्यांदा हे नाव ऐकून हा शेतीवर आहे की काय असं वाटलं होतं - ज्वार म्हणजे "जवार" उर्फ ज्वारी असं साधं त्रैराशिक - फक्त सातवीपर्यंत हिंदी घेतलं होतं ना. Happy मग कळलं की ह्याचा अर्थ भरती-ओहोटी असा आहे. तरी ह्यातला ज्वार म्हणजे भरती का ओहोटी हे कनप्यूजन आहेच अजून. बहुतेक भरती असावी. इथे कोणीतरी खुलासा करा प्लीज.

"मै झंडू बाम हुई"? म्हणजे ग काय? गीतकार शोधलाच पाहिजे ह्या गाण्याचा.

मै झंडू बाम हुई >>>> हे काय बकवास लॉजिक. ?? Uhoh

आज समजलं की भाद्रपदाला हिंदीत भादो म्हणतात... >>> अँक्या, काय हे घोर अज्ञान!

ऐकू नका, विसरू नका ला दोन्ही हातांनी फूली करत नाही ची खूण करते ती.. >>>> Rofl
ऐकु नका विसरु नका.......... घेतला वसा टाकु नका...........>>> भुंग्या, Biggrin

स्वप्ना, ते "मुन्नी बदनाम हुई मधे "मै झंडु बाम हुई डार्लिंग तेरे लिये असेच आहे.......

मी पहिल्यांदा ऐकले तर "दारासिंग तेरे लिये" असे ऐकले होते........ मलिश्काच्या क्रुपेने ते गाणे पुन्हा ऐकले तेव्हा कळले.
बादवे, त्यातली काही गाणी ही दस्तुरखुद्द "सलमान खान" ने लिहिलित्.....हे त्याचेच का ते माहित नाही.

मुन्नी बदनाम हुई गीत संगीत ललित पंडित (जतीन ललितपैकी?)
या चित्रपटातले 'हम यहा के रॉबिन हुड है' हे सलमानने गायलेय(?).
आणि काही गीते जलीस शेरवानी असे नाव असलेल्या माणसाने लिहिलीत.
हे सगळे मला वर लिहिलेले वाचून गुगलल्यावर कळले. अशी काही गाणी ऐकू येण्यापुरता मी बहिरा होऊ शकतो.

>>मी पहिल्यांदा ऐकले तर "दारासिंग तेरे लिये" असे ऐकले होते

Proud टू मच!

ललित पंडित म्हणजे जतीन ललितपैकीच असणार. त्या सुलक्षणा आणि विजयता पंडितचे भाऊ हे दोघे. हे म्युझिक द्यायचे ना? गाणी कधीपासून लिहायला लागले?

'जलीस शेरवानी' हे बहुतेक 'सलमान खान' हया आचरट माणसाचे टोपणनाव असावे. अंगात काही घालायची त्याला अ‍ॅलर्जी आहे. निदान कपड्यांचा आणि त्याचा संबंध असा तरी यावा अशी इच्छा असेल त्याची.

एफ्.एम. वर सांगितले की "तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गये चैन" ह्याचे बोल म्हणे सल्लुने लिहिलेत........... शिवाय त्या दबंग मधले काही डायलॉगही त्याला सुचलेले आहेत.
उद. नायकः "प्यार से दे रहे है तो रखलो, वर्ना थप्पड मारके भि दे सकते है"
नायिका: "थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है..........." Rofl

हे भगवान! हे डायलॉग्ज आहेत? असलं काहीतरी सलमानच लिहू जाणे. रच्याकने, "दबंग" म्हणजे काय? लहान मुलं 'च'च्या भाषेत बोलायची (आता बोलतात की नाही माहित नाही, मी लहान असताना काही मुली ह्याच भाषेत मराठीपेक्षा जास्त फटाफट बोलायच्या!) तसं काहीशी "द" ची भाषा वाटतेय. हा शब्द पण सलमाननेच नाही ना शोधून काढलेला?

स्वप्ना, दबंग ह्या उर्दु शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे "निर्भिड".......... Happy

सलमाननेच शोधले असणार्.....तसाही हरणे, माणसे मारुन तो "दबंग" बनुनच फिरत असतो...... आता ह्यावरुन आपण "दबंग्"चा अर्थ "मोकाट" असा पण समजायचा काय???? Proud Rofl

Pages