नामंजूर (विडंबन)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पुण्याच्या ट्रॅफिकवरचे जुन्या माबोवरील विडंबन *लोकाग्रहास्तव परत एकदा टाकत आहे .... Happy

चाल : नामंजूर

जपत जनांना कार हाकणे - नामंजूर
लाल दिव्याला उगा थांबणे - नामंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची
वनवे म्हणुनी लांबून जाणे - नामंजूर ||

मला फालतू फलकांचा ह्या जाच नको
कुठे कसेही वळण्यावर ह्या टाच नको
थांबवितो मी गाडी जिथे मज हो इच्छा
जागा बघुनी पार्कींग करणे - नामंजूर ||

रस्त्यांवरच्या अपघातांना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी
भले हाडांचा होवो सार्‍या चक्काचूर
मज शिस्तीचे थिटे बहाणे - नामंजूर ||

पडणे-झडणे, भांडण तंटे रोज घडे
संधिसाधू, लोचट मामू मध्ये पडे
'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गार्‍हाणे - नामंजूर ||

(मी गर्दीला ह्या शाप मानले नाही
अन नियम तोडणे पाप मानले नाही
खड्डा ज्यावर एकही पडला नाही
मी पथ असला अद्याप पाहिला नाही ||)

नो एन्ट्री अन स्पीड लिमिट्स ही दूर बरी
मिळता जागा घुसण्याची ही ओढ खरी
परदेशातून नियम पाळणे मज समजे
पण नियमांना इथे पाळणे - नामंजूर

~ मिलिंद छत्रे

* - लोकाग्रहास्तव असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात फक्त इंद्रा आणि डुआय ने विनंती केली आहे Happy

प्रकार: 
शब्दखुणा: 

मिल्या.....

'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गार्‍हाणे - नामंजूर ||

मस्तच रे....

आज सकाळीच ह्याची आठवण झाली.

कर्वे रस्ता वारजे भागात जिथे मुंबई-बँगलोर हायवेला मिळतो त्याच्या थोडं आधी एका वळणावर तिथे - एका दुचाकीवरून तीन जण रस्त्यावर जिथे डिव्हायडरचा दगड गायब असतो तिथे रस्ता आडवा ओलांडत होते. माझी चारचाकी बघितल्यावर वेगाचा अंदाज येऊन दुचाकी चालवणार्‍याने दुचाकीचा अचानक वेग वाढवला आणि त्या प्रत्यत्नात दुचाकीला एक गचका बसला - त्याच वेळी त्यात तीन जणांपैकी सगळ्यात मागे बसलेला घटिंगण (बहुतेक नीट धरुन बसला नसेल) मागच्या मागे पडला तो थेट माझ्या गाडीसमोर. नशीबाने फार वेगात नसल्याने लगेच ब्रेक दाबला नाहीतर.............

बरं हे झाल्यावर सॉरी वगैरे काही नाही......तर फारसं काही नं घडल्याच्या आविर्भावात कपडे झटकत उठला, मला "थांबा" अशा अर्थाचा हात दाखवला, गाडीवर पुन्हा बसला आणि ते तिघे शांतपणे निघून गेले. angry_madbanginghead_2.gif

माझा "आ" वासलेला तसाच Proud

जिंकलसं मित्रा.. भन्नाट आहे ....
'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गार्‍हाणे - नामंजूर ||>>>> नामंजूर Wink

Pages