उन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून "सांधण दरी" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची.. पण हा मार्ग नक्की वाहत्या पाण्यामुळे झालाय की भुगर्भातील हालचालीमुळे झाला आहे हे काही माहित नाही... मागे मायबोलीवर 'डोंगरवेडा' आयडीने या सांधण दरीचे फोटो टाकले होते तेव्हाच आम्हा भटक्यांचा इथे जाण्याचा प्लॅन शिजला होता..
ठरले एकदाचे.. मायबोलीवर कठोर (!!) नियमांसकट बाफ उघडला गेला.. जेमतेम ८-१० च्या आसपास संख्या होईल तेव्हा दोन गाड्या करुन जाता येइल अशी आखणी होती. पण मुंबईकर-पुणेकर मिळून संख्या १२ झाली.. तेव्हा तीन गाडया सज्ज झाल्या.. इंद्रा नि विन्या यांनी हल्लीच नविन गाडया घेतल्या होत्या.. तेव्हा त्या गाडयांना आता बारा गावची माती दाखवणे आवश्यक होते...तर एकीकडे गिरीची गाडी सरावलेली होतीच.. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी शनिवारी रात्री भांडुप स्टेशन गाठले.. नि एकमेकांशी हस्तांदोलन- ओळख करत (बरेचजण एकमेकांना प्रथमच भेटत होते !) पुढे सरावलो..
जाण्याचा मार्ग तसा कोणालाच पक्का ठाउक नव्हता.. पण नकाशे घेतले होते सो टेंशन नव्हते.. पण आमच्या गाडया काही एकत्र येत नव्हत्या.. खो-खो सत्र सुरु होते.. शेवटी आता डायरेक्ट कसारा घाटा अगोदर लागणार्या 'बाबा दा धाबा' इथे एकत्र येण्याचे ठरले.. आम्हा मायबोलीकरांच्या मागे केलेल्या कुलंग ट्रेकमधील येथील आठवणी ताज्या होत्याच.. तेव्हा यावेळी गरमागरम डाल-रोटी ची भक्कम ऑर्डर दिली..
नाश्ता-चहा आटपून पुन्हा मार्गी लागलो..मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाट गेला की टोल नाका लागतो.. तिथूनच पुढे उजवीकडे (मुंबईहून नाशिक रुट) घोटीला जाण्यास मार्ग आहे.. इथून पुढे गेलो असता रेल्वे फाटक लागते.. ते पार केले की उजवीकडे 'अलंग-मदन-कुलंग' या सह्याद्रीच्या उंच त्रिकुटाला भेट देण्यासाठी जाण्याचा मार्ग.. जो आंबेवाडी गावात घेउन जातो.. तर डावीकडे जाणारा मार्ग भंडारदरासाठी.. एकंदर मार्ग ठरला होता.. 'कसारा घाट-घोटी-वसळी फाटा-शेंडी भंडारदरा-उधवणे-साम्रद गाव '
साधारणत: पहाटे तीन-साडेतीन ला पोहोचू असा अंदाज होता.. म्हणजे दोन तास विश्रांती करुन उनाडक्या करायला मोकळे.. घोटीवरून भंडारदर्याच्या रस्त्याला लागलो.. नि मग नुकताच पाउस पडून गेल्याने रस्त्यावर साचलेले पाणी तुडवत, अधुनमधून लागणार्या धुक्यांमधून मार्ग काढत काळोखातून त्या सुनसान रस्त्यांवरून आमच्या तीन गाडया सुसाट सुटल्या होत्या.. कोणी रस्ता चुकू नये म्हणून तिन्ही गाडया ठराविक अंतरामध्ये ठेवत होतो.. पुढे थांबलो ते शेंडी भंडारादर्याला.. जिथून एक मार्ग भंडारदाराकडे वळतो तर एक पुढे उधवणेकडे..
इथे अंधारात गाडीतून सगळे बाहेर पडले नि सगळ्यांचे डोळे चमकले.. !! खरे तर आमच्या डोळ्यांसमोर चमकत होते.. अगणित काजवे.. !! दृश्य अवर्णनिय होते.. सभोवतालच्या झाडांवर लाइटींग केल्यासारखे वाटत होते.. तर बाजूलाच असणार्या दरीत तर बस्स ...तारे जमिनपर !!.. एकाचवेळी चमकणारे नि एकाचवेळी विझणारे. काय तो टायमींग.. सॉल्लिड.. डोळ्यांचे पारणे फिटले.. रोहीत तर या दृश्याला आपल्या कॅममध्ये बंदीस्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.. काही मिनीटांतच पुढे मार्गस्थ झालो..
उधवणे गाठले.. नि आता पुढचे लागणारे साम्रद गावच म्हणत आम्ही गाडी गावात घेतली.. चार - पाच घर वगळता काहीच दिसले नाही.. गावच्या ओळखीची खूण असलेली शाळा दिसली पण मारुतीचे मंदीर दिसत नव्हते.. तेव्हा थोडा गोंधळच उडाला.. पण काहितरी चुकलोय म्हणत आम्ही पुन्हा आधीचा रस्ता धरला नि पुढे गेलो.. पुन्हा चार- पाच घरांची वस्ती लागली.. पण इथे तर अजून संभ्रमात पडलो.. एकतर रस्त्यावर विजेचे दिवेही नव्हते.. सारा परिसर अंधारात लपला होता.. कोणाची जागही नव्हती..इथे तिथे हुडकून पाहिले पण नक्की त्याच गावात पोहोचलोय का ते कळत नव्हते... एका गावकर्याचा (ज्याला नाश्ता-जेवणाची ऑर्डर दिली होती) त्याचा मोबाईल नंबर होता पण रेंजदेखील नव्हती.. शेवटी उजाडेपर्यंत तिथेच रस्त्यावर आम्ही आडवे होउ म्हणून मॅट टाकली नि मस्तपैंकी झोकुन दिले.. पण मायबोलीकर एकत्र आले की शांतपणे बसतय कोण.. गप्पाटप्पा चालूच राहिल्या..... पाउस नव्हता म्हणून निभावले..
काहिवेळातच एका घरातून टॉर्च बाहेर पडली नि विचारपूस केल्यावर कळले त्याच रस्त्याने पुढे पाचेक मिनीटांवर गाव आहे..! पहाटेचे साडेचार -पाच वाजत असतील.. आम्ही लगेच आवरुन पुढे निघालो.. साम्रद गावात पोहोचताच दोन मोठ्या प्रायवेट बसेस, दोन गाडया असा ताफा बघून आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच.. ट्रेकर्सलोकांची इथे पण जत्रा भरली की काय वाटले.. पण नंतर कळले ते शनिवारीच आले होते नि आता सकाळी परतीला निघणार होते.. म्हटले बरे झाले.. तिथेच मग आम्ही त्या गावकर्याचा (श्री.दत्ता भांगरे) यांचे घर गाठले.. साम्रद गावसुद्धा छोटेच आहे.. एक शाळा, मारुतीचे मंदीर नि जवळपास सात आठ घरे असतील.. इतकाच काय तो विस्तार.. बाकी आजुबाजूला विस्तीर्ण माळरान.. नि क्षितीजाला लपवू पाहणार्या उंचच्या उंच सह्याद्रीरांगा.. !
आम्ही पोहोचलो तेव्हा किंचीतसे उजाडले होते.. पण त्या अंधूक प्रकाशात ह्या सह्याद्री रांगा मात्र लक्ष वेधुन घेत होत्या.. त्या डोंगरांच्या खांद्यावरती निजलेले ढग देखील सुंदरच दिसत होते..
प्रचि १:
(आमचे तीन रथ)
पुर्वेकडे तांबडे फुटले नि सारे काही कुंचल्याने रंगवल्यागत वाटू लागले..
प्रचि २
प्रचि ३
(इंद्रा, गिरी, विन्या नि बॅकग्राउंडला डोकावतोय तो 'अलंग' )
प्रचि ४ : टोपीवाले काका
असली सुंदर पार्श्वभूमी मिळाली की आम्ही क्षणाचाही विचार न करता 'उडीबाबा' कार्यक्रम आटपून घेतो.. दणादण उडया मारून झाल्या.. नि मग आम्ही नाश्त्यासाठी दत्ताच्या घरी वळालो.. चहा-पोहे असा फक्कड नाश्ता झाला नि आमची ढिनच्यॅक तयारी(!!!) सुरु झाली.. डोक्यावर कपडा नाहीतर कॅप, डोळ्यांवर गॉगल, बर्मुडा घाल, ट्रॅक पँट घाल असे अनेक नखरे करत एकदाचे 'लेटस गो' करण्यासाठी सज्ज झालो.. नेहमीप्रमाणे खाण्यासाठी ज्याची सर्वात छोटी सॅक असते तीची निवड करतो.. मग त्यात भरलेले खाणे, पाणी इत्यादी बोझा त्याला उचलावा लागतो.. अर्थातच ती पाळी प्रगोवर आली..
(हा आमचा अप्रकाशित नियम समाजाव... :P) निघेपर्यंत चांगलेच उजाडले होते.. गावाकडची गुरे रतनगडाच्या दिशेने चरण्यासाठी बाहेर पडली..
प्रचि ५:
तर एकीकडे आम्ही सांधण दरीची दिशेने चालू पडलो..
प्रचि ६
ढगांनी आपला मुक्कम उठवल्यामुळे आता सह्याद्री रांग मस्त उठून दिसत होती...
प्रचि ७ : खुटा (डावीकडचा) नि रतनगड
प्रचि ८: माझे सर्वात आवडते.. 'अलंग, मदन नि कुलंग' हे त्रिकुट.. ही रांग मस्तच दिसते इथून..
या त्रिकुटाला पाहिले की आपण हे त्रिकुट सर केले आहे याचे मला अप्रुप वाटते.. नि तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटते..
प्रचि ९ : त्याच त्रिकुटाच्या रांगेत पुढे पसरलेली कळसुबाईची डोंगररांग देखील मस्तच
(वरील फोटोत मध्यभागी जो उंचवटा दिसतोय तेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर.. कळसूबाई शिखर)
आम्ही पंधरा- वीस मिनीटांतच दरीत येउन पोहोचलो.. नि 'लहान मोठाले दगडधोंडे.. जिकडे तिकडे चोहीकडे' गाणे म्हणावेसे वाटले.. आमची जपून वाटचाल सुरु झाली.. आदल्या रात्री भरपूर पाउस पडून गेला होता.. त्यात सकाळची वेळचे पडलेले धुके.. साहाजिकच खडक फार गुळगुळीत झाले होते.. कधी पाय घसरेल याचा नेम नव्हता..
प्रचि १२:
चार-पाच पावले पुढे पडली नि ट्रेक हा प्रांत नवा असलेल्या 'डुआय' या आयडीधारक मायबोलीकराने 'आयकान्ट' हा नविन आयडी धारण केला.. खरे तर आता कुठे ट्रेकला सुरवात झाली होती. पण त्याचे फ्लोटस त्याला काय स्थिर उभे राहू देत नव्हते.. शिवाय त्याला चांगलाच घामटा फुटला होता... पण आमच्यात असले चालत नाही.. तेव्हा 'चल, आम्ही आहोत पाठीशी.. टेंशन मत ले' म्हणत त्याला आमच्या स्पेशल नजरेखाली चालते केले..
इंद्रदेवांनी तर त्याला स्वतःचे शुज देण्याचे ऑप्शन दिले होते.. आम्ही एकमेकांची किती कित्ती म्हणून काळजी घेतो ना..
आमच्यात सर्वात पुढे आनंदयात्री, सुकी जात होते..
प्रचि १३
आम्ही जसजसे पुढे सरकत होतो तशी दरी अरुंद होत होती.. शिवाय ढगांनी दरीमध्ये अचानक शिरकाव सुरु केला.. एकंदर वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्यासरखे वाटत होते..
पुढेच पाण्याचे पहिले डबके लागले.. नि मग उजवीकडून खडकाला धरत तो सोप्पा टप्पा पार केला..
प्रचि १४:
(डेविल कडेकडेने जाताना..)
ढगांचे अचानक झालेले आक्रमण.. त्यामुळे अंधुक झालेला परिसर....कुठल्या तरी पक्ष्याची दरीमध्ये घुमणारी शीळ... वाटेत दिसणारे बेडूक नि खेकडे... नि आम्हा मायबोलीकरांचा आवाज.. यापलिकडे काही नव्हते.. पण अचानक पुढे दगड पडल्याचा जोरात आवाज आला.. ! नि सगळे थबकलेच.. वाटले वरतून माकडं तर नाही ना काही चाळे करताहेत.. शेवटी चाहूल घेउन आम्ही पुढे जाउ लागलो...
प्रचि १५ :
(सांधण दरीमधील मी उभा म्हणणारा रोहीत.. एक मावळा)
प्रचि १६
सगळे जण मस्तपैंकी धमाल करत पायाखालील खडकाळ वाटेला तुडवत जात होते.. घाई कुणालाच नव्हती..
प्रचि १७
कॅमेर्यातून क्लिकींग सुरु होतेच.. पण धुसर वातावरणामुळे हवे तशे फोटो काही निघत नव्हते.. त्यामुळे थोडी निराशाच झाली.. आमचे खरेतर टायमिंग चुकले होते.. भरदुपारी इथे भेट द्यायला हवी होती.. कारण इकडे ऊन-सावलीचा खेळ बघण्याची मजा काही और असते..
असो.. आम्ही जसजसे पुढे जात होतो तसे दरीचा वरतून उघडा असलेला भाग अरुंद होत जात होता... साहाजिकच वाटही अरुंद बनत होती.. नि इकडून चालताना मस्तच वाटत होते..
प्रचि १८
पुन्हा आम्हाला वाटेत दरीमधले पाण्याचे दुसरे डबके लागले.. ह्या दोन्ही डबक्यांमधील पाणी सुर्यकिरणांचा जास्त शिरकाव होत नसल्याने बारामहीने साठून राहते.. पहिले डबके अंदाजे दोन फुटी असावे.. दुसरे डबके मात्र थोडे खोल आहे असे ऐकून होतो.. त्यात आदल्या रात्री पाउस पडल्याने किती फूट पाणी साचलेय याचा अंदाज येत नव्हता... त्यामुळे साहाजिकच धांदल उडणार होती.. इथे मात्र आमच्या सेनेतील 'बाजीराव्_अवि' पुढील वाटेचा ताबा घेण्यास पुढे सरावला.. आम्ही रोप आणला होताच.. तेव्हा एका हातात काठी नि रोप घेउन बाजीराव पुढे गेला.. त्याच्या छातीपर्यंत पाणी लागले तेव्हा पुर्ण भिजणार याची खात्री झाली.. नि सगळे आपापल्या कॅमेर्याची पॅकींग करू लागले.. कॅमेरा मानेभोवती गुंडाळणे भाग होते.. बाजीराव जसा पुढे गेला तसे पाणी कमी होते गेलो सो अडथळा शर्यत फक्त डबक्याच्या मध्यभागीच होती.. पुढे मग रोहीत गेला नि चालताना तोल जाउ नये म्हणून एका टोकीला दोरी घेउन उभा राहीला.. खोली नव्हती.. पण छातीपर्यंत पाणी.. तेदेखिल अगदी बर्फासारखे थंडगार.. पाण्यात पायाखाली लागणार्या छोट्या-मोठ्या खडकांची गर्दी.. तोल गेला तर कॅमसकट पुर्ण भिजणार होतो... शिवाय खाद्य भरून घेतलेली सॅकही होतीच.. शेवटी वाटेचा अंदाज घेत एकेक करून कसरत करत पाण्यातून पुढे जाऊ लागले..
प्रचि १९
प्रचि २०
(वाह.. क्या पोझ है.. ( रोमा, गिरी, विन्या, डेविल, डुआय नि इंद्रा) )
प्रचि २१
(हा 'डुआय' मनापासून हसतोय का ते तुम्हीच ठरवा.. )
इथून पुढे गेलो नि आम्ही दरीच्या मध्यभागी येउन पोहोचलो.. नजरेपुढे दरीचा सर्वोत्तम टप्पा होता.. हे पुढील प्रचिंमधून कळेलच.. सांगणे नकोच..
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
खरच अदभुत दरी... कसे झाले असेल हे सगळे..! इथून जाण्याचा अनुभव आगळाच.. याच दरीमध्ये काही ठिकाणी पाणी ठिबकत होते..
प्रचि२५
लवकरच आम्ही सांधण दरीच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो.. जिथे सांधण दरीचे तोंड उघडते..
प्रचि २६
मी पोहोचलो तर टोकाशी आनंदयात्री मस्तपैंकी पहुडले होता.. इथे जाण्यास मोठमोठ्या खडकांचा सामना करत थोडेसे खाली उतरावे लागते..
प्रचि २७
प्रचि २८
(क्षणभर विश्रांती)
हे टोक गाठले म्हणजे सांधण दरी ट्रेक पुर्ण होतो.. पुढे वाट खालच्या बाजूने उतरत जाते.. जिथे दोन तीन रॉक पॅचेस आहेत.. तिथूनच मग करोळी घाट गाठता येतो.. आम्ही इथूनच माघारी फिरणार होतो तेव्हा पेटपूजेचा कार्यक्रम सुरु केला.. डुआयने वरतीच राहणे पसंत केले होते.... त्यामुळे 'त्याला खायला ठेवा रे' असे एकीकडे फॉर्मेलिटीने सांगत सगळेच सरळ आडवा हात मारत होते... वाटले डुआय आता तर कर्माने उपाशी राहणार.. खरच आम्ही किती कित्ती म्हणून काळजी घेतो ना..
अर्ध्यातासातच परतीचा प्रवास चालू केला.. येताना मात्र वातावरण बर्यापैंकी सुधारले होते.. त्यामुळे दरी अधिकच खुलून दिसत होती..
प्रचि २९
प्रचि ३०
(वरील प्रचिमध्ये दिसणार्या दगडधोंडयांमध्ये 'प्रगो'ला शोधा.. )
प्रचि ३१
प्रचि ३२
(दिनेशदांनी खालून दरीचा वरच्या भागाचा फोटो घेण्यास सांगितले होते.. तेव्हा हा झेंडा टिपला गेला.. )
प्रचि ३३
परत येताना वाटेचा अंदाज आल्याने त्या दुसर्या डबक्यात रोप वापरलाच नाही.. खरेतर तशी गरजच नव्हती..
प्रचि ३४
संपूर्ण दरी धुंडाळून आम्ही सकाळी अकराच्या सुमारास बाहेर आलो.. दमछाक न झाल्याने ट्रेक कधी सुरु झाला नि संपला ते कळलेच नाही.. साम्रद गावाकडे परतताना आकाशातील ढगांचे तांडवनृत्य लक्ष वेधून घेत होते.. सह्याद्रीरांगेलादेखील ढगांचे ग्रहण लागले होते...
प्रचि ३५
(ढगांनी गिळंकृत केलेला अर्धा अलंग)
प्रचि ३६
(उजवीकडील 'आजोबा' डोंगर गरम झाल्यागत ढगांच्या वाफा सोडत होता)
एकंदर पावसास अनकुल वातावरण बनत होते.. साहाजिकच गावाकडे शाकारणीचे काम जोमाने सुरु होते..
प्रचि ३७
आम्ही जेवण तयार होईपर्यंत कपडे बदलून घेतले नि तिन्ही गाड्यांना आमच्या ओल्या कपडयांनी सजवून टाकले.. त्यानिमित्ताने गाडीवरची धूळही पुसली जात होती.. काही वेळातच मस्त जेवण झाले... नि मग वामकुक्षी घेणे क्रमपाप्त झाले.. काहींनी झोप घेणे पसंत केले.. इथूनच आम्हाला कोकणकडा बघायला जायचे होते.. शेवटी पंधरा- वीस मिनिटांच्या विश्रांतीनंतर वामकुक्षीवाले मोजके मायबोलीकर उठले नि कोकणकडेच्या दिशेने चालू लागलो..
या कोकणकडयाची तुलना जरी हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडयाशी होत नसली तरी हा कोकणकडा मस्त आहे.. इथून आजोबा डोंगर, बाण पिनॅकल अगदी जवळून दिसतात..
प्रचि ३८
प्रचि ३९
(इथे इंद्राला क्लिकींगची ड्युटी देउन मी कोकणकडा न्याहाळू लागलो )
प्रचि ४०
(हाही फोटो इंद्राने क्लिक केलाय.. इथूनच समोरील विस्तीर्ण प्रदेशात पडणारा पाउस दिसत होता...)
तिथला पाऊस इथे पोहोचेस्तोवर आम्हाला पुन्हा गावाकडे जाणे भाग होते.. परतताना दिसणारी डोंगररांग मात्र काही नजरेआड होत नव्हती.. आम्हाला भेट द्यायलाच पाहिजे असे ते डोंगर सारखे खुणावत होते.. मग आम्हीसुद्धा जायचेच म्हणून कट शिजवलाय.. कधी ते माहीत नाही..:P
प्रचि ४१
आम्ही गावात पोहोचेस्तोवर बाकीच्यांनी आवारायला सुरवात केली होती.. सुकत घातलेले कपडे एव्हाना कोरडे झाले होते.. काही अवधीतच आम्ही सुंदर अश्या या साम्रद गावाच्या परिसराला अलविदा केला.. आता इथून घाटघरजवळचा कोकणकडा नि डॅम बघून मुंबईत परतीला निघायचे ठरले.. नि वाटेत नदी लागली तर पाण्यात डुंबण्याची संधी दवडायची नव्हती..
घाटघरजवळील कोकणकडा देखील मस्तच.. इथून घाटघर डॅमचा परिसर नजरेस पडतो..
प्रचि ४२
(इथे वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे..)
काही मिनीटांतच आम्ही परतीला निघालो.. म्हटले इथे आलो तर घाटनदेवीचे मंदीर देखिल बघूया.. तिथे जाण्यास गाडी वळवली पण वाटेत कळले की ते एकदम टोकाला आहे... तेव्हा पुन्हा मागे फिरलो.. याच परिसरात 'भंडारदराचे बॅकवॉटर नि मागे उभे असलेले कुलंग, मदन, अलंग हे त्रिकुट नि कळसुबाईची डोंगररांग' हे दृश्य मस्तच वाटते..(इकडचा फोटो घेण्यास विसरलो.. पण विन्याने घेतलाय
)
आम्हाला नशिबाने लवकरच साम्रद गावाअलिकडच्या पुलाखाली डुंबण्यासाठी मस्त जागा सापडली.. मग काय.. लगेच पुलाच्या कडेला गाडया पार्क करून गेलो डुंबायला.. खोल नसल्याने माझ्यासारख्या न पोहता येणार्यांची चंगळच झाली.. सुक्याने तर माझ्यासाठी लागलीच 'दोन मिनीटात फटाफट पोहायला शिका' असा कोर्स काढला... पण जल्ला कितीही हात मारले तरी मी काय पुढे जात नव्हतो...
पण थंड पाण्याने आम्ही मस्तच फ्रेश झालो.. फक्त डुआयने मात्र आग्रह करूनही काठावर ठाण मांडून सनबाथचा आस्वाद घेण्यात धन्यता मानली...
प्रचि ४३: मौजाही मौजा !
इथेच मग काठावर बसून आणलेले कलिंगड खाल्ले नि अंतिम प्रवासास सुरवात केली.. आमच्यावर वरुणराजा भलताच खुष होता.. संपुर्ण ट्रेकमध्ये कुठेही त्रास दिला नाही.. मुंबईला परतण्यास निघालो तेव्हा कुठे सुरवात केली.. साहाजिकच परतीच्या वाटेत सुंदर नजारा पाहण्यास मिळाला.. कसारा घाट ओलांडला नि मग जवळच लागलेल्या एका धाब्यावर आम्ही शेवटचा एकत्रित चहा-नाश्त्याचा कार्यक्रम उरकून घेतला... भर पावसात नाश्त्याचा मेनू हा गरमागरम भजी नि वडापाव असल्याने अख्ख्या ट्रेकमध्ये करण्यात आलेल्या पेटपूजेचा शेवट मस्तच झाला..
इथेच मग गाडयांसकट आतापर्यंत न घेतलेला ग्रुप फोटो झाला.. 'मस्त मस्त झाला ट्रेक... पुन्हा केव्हातरी भेटू' म्हणत एकमेकांचा निरोप घेण्यात आला..
प्रचि ४४
(उभे :डुआय, बाजीराव्_अवि, डेविल, रोहीत.. एक मावळा, आनंदयात्री, प्रगो(टग्या, पंत), गिरीविहार
बसलेले: विनय भीडे, यो रॉक्स, कुणाल (इंद्राचा मित्र), सुर्यकिरण नि इंद्रधनुष्य )
धन्यवाद _/\_
मस्तच यो !!
मस्तच यो !!
झकास झज्कास ट्रेक फार भारी
झकास झज्कास ट्रेक
फार भारी
काय सही फोटो काढलेत एक number
काय सही फोटो काढलेत एक number मस्तच आहेत real nature. आणि त्या सगळ्याच description पण भारी केलय. ती दरी आणि तो वीजनिर्मितीचा प्रकल्प त्याचे फोटो , ते तर लै लै भारी. एकंदर ट्रेक भारी झाला
नाचिकेत सर भारी वाटल वाचून 
झक्कास!
झक्कास!
जबरॅन्ग लोक्स. न्येक्ष्ट कुठे
जबरॅन्ग लोक्स.
न्येक्ष्ट कुठे ?
भारी फोटो... १ नंबर. राहून
भारी फोटो... १ नंबर. राहून गेलेला अजून एक ट्रेक...
धन्यवाद दिनेशदा.. आम्हालाही
धन्यवाद


दिनेशदा.. आम्हालाही बघायची इच्छा होती.. तिथे जाउ शकलो असतो.. पण वेळेअभावी नाही जमले..
पक्क्या तुला मिसले रे..
बाबू.. ल व क र च ठरवू..
आनंद.. अहूपे घाट तर आहेच लिस्टवर..
मस्त वृत्तांत. भारी जागा आहे
मस्त वृत्तांत. भारी जागा आहे एकदम.. आधी ऐकलं नव्हतं ह्याबद्दल...
मलाही १२७ अवर्सची आठवण झाली..
यो, वृ अन् फोटो भारी
यो, वृ अन् फोटो भारी आहे!
माझा अनऑफिशिअल टाकतो उद्या
त्याआधी प्रशस्तिपत्रक देणार की नंतर 
ज ब री आहेत फोटो आणि
ज ब री आहेत फोटो आणि वृत्तांत.
ट्रेक जरी जमला नाही तरी सांधण दरी बघायला जावं वाटतय.
खर्यांची ऑफलाईन माफी
खर्यांची ऑफलाईन माफी मागून... :p
वर वर नभपार कडियाच्या डोक्यावर
निळ निळ काळ काळ सावलीचे घरदार
दरीवर दरी... सांदण दरी
व्वा इंद्रा क्या बात है
व्वा इंद्रा क्या बात है
जबरी योगेशदा. मस्त
जबरी योगेशदा. मस्त फोटो.
इंद्रादा सहीच.
इंद्रा, मस्त जमलंय
इंद्रा, मस्त जमलंय
मस्त!
मस्त!
वॉव!! कमाल थ्रिल!! मस्त रे!!
वॉव!! कमाल थ्रिल!! मस्त रे!!
एकदम झकास!! सगळे फोटो मस्तच
एकदम झकास!! सगळे फोटो मस्तच आणि वर्णनपण सहीच.
एकदम खऽतऽरा फोटो. खूप मजा
एकदम खऽतऽरा फोटो. खूप मजा आली असणार सगळ्यांनाच इथे.
मस्त. फोटो अतिशय छान आलेत.
मस्त. फोटो अतिशय छान आलेत.
मस्त इमेजेस!
मस्त इमेजेस!
जबरी दिसतोय हा सांधण दरीचा
जबरी दिसतोय हा सांधण दरीचा भाग.... मस्त!
धन्यवाद
धन्यवाद
वर्णन मस्त! फोटो सुपर मस्त!!!
वर्णन मस्त! फोटो सुपर मस्त!!! यावेळी कोणी उडीबाबा नाय गावलो?
मस्तच... जाम मजा आली.... आणि
मस्तच... जाम मजा आली....
आणि हो हेवा सुधा वाटला....
beautiful pics yo...ani
beautiful pics yo...ani pravas varnan tar tumhi khupach chan shabdat kelet...tyamule pratyaksha tithe alyasarakhe vatale...apratim...m sorry mala marathit ithe lihita yet nahi mi next time try karen...
सही आहे रे मित्रा... फोटोज्
सही आहे रे मित्रा...
फोटोज् खास आले आहेत. सुर्योदयाचा फोटो अफलातुन...
क्या दिन थे वो यार!!! पुन्हा
क्या दिन थे वो यार!!!
पुन्हा वाचून काढलं आत्ता... सगळं आठवलं पुन्हा
खल्लास फोटो !!!
खल्लास फोटो !!!
बहोत बढिया यो भारतवारीत
बहोत बढिया यो
भारतवारीत सांधण दरी आणि हरिशचंद्र फिक्स
कृपया सांधण दरी येथील कोणाचा
कृपया सांधण दरी येथील कोणाचा ही संपर्क क्रमांक असेल तर द्या.
Pages