शंकरपाळे

Submitted by सशल on 10 July, 2008 - 16:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी दुध,
१ वाटी साखर,
अर्धी वाटी तुप,
चवीला मीठ
मैदा साधारण ३.५ ते चार वाट्या
तळायला तेल/तूप

क्रमवार पाककृती: 

१ वाटी दुध, १ वाटी साखर आणी अर्धी वाटी तुप, चवीला मीठ उकळल्यावर त्यात मावेल तेवढा मैदा साधारण ३.५ ते चार वाट्या मावतो पीठ सैलसर मळून गार झाल्यावर एक तास ठेवायचं आणी मग शंकरपाळी करायची आणी महत्वाचे म्हणजे मंद आचेवर तळायची अगदी खुसखुशीत आणी कुरकुरीत होतात साखरेचे प्रमाण चवीप्रमाणे कमी जास्त करावे तुपाऐवजी तेल वापरले तरी चालते पण तेल वापरले तर एक वाटी घ्यावे

वाढणी/प्रमाण: 
भरपूर होतात :)
अधिक टिपा: 

वेळ बराच लागतो .. लाटणं, कातणं आणि तळणं वेळखाऊ काम आहे ..

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग रोचीन मी वरती मैदा आणी गव्हाचे पिठ समप्रमाणात भिजवते अस लिहल आहे म्हणजेच अर्ध अर्ध होईल.
मला अस दोन्हि मिळून १/२ किलो, १किलो अस सांगता येणार नाही. पण मी दुध्,तुप,साखरेच्या मिश्रणात १ वाटी मैदा आणी १ वाटी गव्हाचे पिठ अस मिसळत जाते. साधारण दोन्ही पिठे समप्रमाणात मावतात.

जमल्या हो जमल्या! Happy
धन्स मुलींनो. पौर्णिमा, प्रमाण एकदम परफेक्ट.. फक्त पहिला घाणा काढल्यावर जरा कमी गोड वाटल्या,म्हणुन मग उरलेल्या पीठात थोडी पीठीसाखर घालुन मळुन घेतले आणि केल्या.
आता तिखट कराव्यात का असा विचार करतेय.. पण इतका मैदा खाणे हेल्दी नाही ना! Uhoh

अनुजय, तुझ्या पध्दतीने अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ वापरलं. आणि तुपाऐवजी तेल वापरलं. खरच फार छान खुसखुशीत झाल्या शंकरपाळी. ( मी शंकरपाळ्या म्हणते. इथे लगेच कोणितरी सांगेल की शंकरपाळीच बहुवचन शंकरपाळी असत म्हणून.) जास्त खाल्या तरी हेल्दी आहेत अस मनाला समजावते. धन्यवाद ग. Happy

आर्च अग नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पण छान होतात. माझी लेक लहान आहे आणी तिला शंकरपाळ्या खुप आवडतात त्यामुळे वरचेवर केल्या जातात तिला सारख्या मैद्याच्या देण पटत नाही म्हणुन आईने सांगीतल गव्हाच पिठ वापरायला आणी आता तर घरात सगळेच मैदा नाही म्हणुन भरपुर खातात. Happy

सोप्पी रेसिपी आणि आता इतक्यांनी केल्यात म्हणजे याच पद्धतीने करायला हव्या Happy
मी कलौंजी घातलेल्या खार्‍या शंकरपाळ्या खाल्ल्यात त्यापण छान लागतात.
तुमच्यापैकी कुणी सुगरणींनी करुन बघा आणि मग कशा करायच्या ते सांगा आम्हाला Happy

अरे वा, मनःस्विनी तु तुझी लिंक दिल्यामुळे मला खार्‍या शंकरपाळ्याची रेसिपी मिळाली खरतर शोधतच होते. धन्यवाद

पूनम जियो... सकाळी तुझ्या पद्धतीने शंकरपाळ्या केल्या. मस्त खुसखुशीत झाल्या आहेत. धन्स. Happy

एक विचारायचे होते शेवटच्या घाण्याला थोड्या शंकरपाळ्या तेलात विरघळल्या. आधीचे सगळे घाणे मस्त निघाले. तेल कमी आणि घाणा जास्त झाले असेल का? तेव्हढा घाणा वेगळ्या ताटात काढून घेतला. नंतर थंड झाल्यावर त्यातल्या चांगल्या निवडून बाजूला केल्या. काहींचा अगदी भुगा झाला होता. कशामुळे झाले असेल असे? Uhoh Sad

शेवटच्या घाण्याला थोड्या शंकरपाळ्या तेलात विरघळल्या. >>> मी सांगु Uhoh

शेवटी कंटाळा आला.. म्हणून १.५ घाण्याच्या एकाच घाण्यात टाकल्या... आधीच तेल कमी झालेले.. आणि शंकरपाल्या जास्त.. म्हनून असे झाले.

माझे बर्‍याच वेळा होते Angry

हो ग वर्षा मलाही हेच कारण वाटतंय Happy जास्त नव्हत्या टाकल्या. पण आधी ५-६ घाणे झाल्याने तेल कमी झालेच असेल ना. ते लक्षात नाही आलं.

अरे एक शंका आहे.. मी जास्त तळण करत नाही.. तर गोडाच्या शंकरपाळी तळलेल्या (उरलेल्या) तेलात तिखट/खार्‍या पण तळल्या तर चालेल का? पुष्कळ तेल आहे ..पहिल्यांदाच केल्याने किती लागेल त्याचा अंदाज नव्हता.

मीहि सशल च्या रेसिपीने करते गेले बरेच वर्ष. आईचीहि अशीचं रेसिपी आहे, थोडासा फरक असेल कदाचित. मस्त होतात. आत्ताचं एक बॅच करुन बसलेय. लेक आवडिने खातेय. धन्यवाद सशल.

मी काल शंकरपाळे केले.
मी एक कप दूध, तूप आणि साखर घेऊन ते एलेक्ट्रिक बीटरवर घुसळले. (थोडेसे मीठ. चिरोटी रवा घातला होता) नंतर त्यात बसेल तसा मैदा घालत घालत बीट केले. शेवटी तो गोळा हाताने थोडासा मळला आणि मग तीन चार तास ठेवला.

नंतर त्याचे शंकरपाळे केले. मस्त खुशखुशीत वगैरे झालेत. Happy

सशल तुझ्या पद्धतीने काल शं. पा. केल्या, मस्त खुसखुशीत झाल्यात, माझ्या साबांची पण हीच पद्धत. पण त्या त्यात थोडा vanilaa इसेन्स पण घालतात कधी कधी. मात्र मी तासभर थांबले नाही, लगेच केल्या, तरी मस्तच झाल्या.

मी शं पा ची पोळी जाडसरच ठेवते नेहेमी, त्यामुळे कडक होत नाहीत. धन्यवाद तुला.

सशल, थँक्स. या वर्षी आयुष्यात पहिल्यांदाच दिवाळीचे काही पदार्थ करायचे ठरवले. काल तुझी रेसिपी पहिल्या पानावर पाहिली म्हणुन ओपनिंग त्यानेच केलं. मी सगळी तयारी करुन दिली आणि माझ्या दोन वहिन्यांनी लाटुन तळण्याचं काम केलं. माझाच विश्वास बसत नाहीए की शंकरपाळ्या इतक्या टेस्टी आणि खुसखुशीत होवु शकतात. मैदा फुप्रोवर मळला. बाकी रेसिपी एक कणाचाही फरक न करता सेम तुझीच. थँक्स अगेन.

अवांतर - कॉर्पोरेट्समधे हजारो रुपये फीज भरुन आम्हाला 'टीम बिल्डींग' प्रोग्राम्सना पाठवतात. काल मला वाटलं कि त्याचंच घरगुती उदाहरण म्हणजे दिवाळीचे पदार्थ सगळ्या कुटुंबानी एकत्र बसुन बनवणे. फार मजा आली. Happy काल सगळेच जागे होते आणि प्रचंड गप्पा मारल्या. गेस करंज्या करायला अजुन मजा येइल कारण तेव्हा सगळेच मदत करणार आहेत. Happy

Pages