कोल्हापुरी मिसळ

Submitted by लालू on 10 July, 2008 - 16:24
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ वाट्या मोड आलेली मटकी
४ मोठे कान्दे (पान्ढरे नको!)
२ वाट्या ओले खोबरे
१ वाटी सुके खोबरे
३ इन्च आल्याचा तुकडा
२ लसणाचे गड्डे (सोलून वाटीभर व्हावा)
१ जुडी कोथिम्बीर
२ मोठे चमचे कोल्हापुरी कान्दा लसूण चटणी
१ मोठा चमचा गरम मसाला पावडर
किन्वा अख्खा (५,६ लवन्गा, १ दालचिनीचा २ इन्चाचा तुकडा, ५,६ काळे मिरे, धणे - जीरे १,१ चमचा)
२ बटाटे चिरून.
मीठ, तेल, हिन्ग, हळद, तिखट, पाणी.
फरसाण किन्वा hot mix , ब्रेड, बारीक चिरलेला कच्चा कान्दा, कोथिम्बीर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

पातेल्यात तेल तापवून त्यात हिन्ग, हळद घालावी. मटकी, बटाटे टाकून परतावे, बुडेल इतके पाणी,तिखट, मीठ घालून शिजवून घ्यावी. फ़ार मऊ नको. यात थोडे पाणी राहिले तरी चालेल.

कटाची तयारी - कान्दे उभे पातळ चिरून घ्यावेत. यातला वाटीभर कान्दा बाजूला ठेवून उरलेला कान्दा, खोबरे(दोन्ही), गरम मसाला तेलावर भाजून बारीक वाटावे. आले, लसूण, कोथिम्बीर बारीक वाटावी. वाटताना जास्त पाणी घालू नये.

जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी(!) तेल तापवून हिन्ग, हळद आणि उभा चिरलेला वाटीभर कान्दा, कोल्हापुरी चटणी टाकावी. परतून घेउन मग दोन्ही वाटणे घालून पुन्हा चान्गले परतावे. त्यात मीठ आणि ४ कप पाणी घालून उकळी आणावी.

घेताना एका खोलगट प्लेट मधे २ मोठे चमचे फरसाण घ्यावे. त्यावर मटकी, थोडा कच्चा कान्दा,कोथिम्बीर घालून मग १ पळी कट घालावा. कट घेताना ढवळून घ्यावा. आवडतो त्यानी वरचा तवंग घ्यावा. लिम्बू पिळावा. ब्रेड बरोबर खावे.

वाढणी/प्रमाण: 
५-६ लोकांना पुरेल.
अधिक टिपा: 

ही मिसळ बर्‍यापैकी झणझणीत होते. झेपत नाही त्यानी तिखट कमी करण्यासाठी दही, शेव, टोमॅटो घालावा.तिखट नको असणार्‍यानी मटकी जास्त घ्यावी.

वरील प्रमाणे केलेली मिसळ खाऊन कुणाला काही झाल्यास किन्वा न झाल्यास मी जबाबदार नाही. Happy

अलिकडे 'भोसले यांचे मराठा दरबार मसाले' मिळू लागलेत. कोल्हापुरात मिळतात. पुण्यातही उपलब्ध असल्याचे कळले. त्यांचा मिसळीचा मसाला छान आहे. कटासाठीचे बरेच कष्ट वाचतात आणि चवही चांगली येते. त्यात उसळीसाठीही मसाल्याचे एक छोटे पॅक आहे. पॅकवरच्या सूचनांप्रमाणे करावे.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

कोल्हापूरहून "पिळणकर मिसळ मसाला " म्हणून पाकीट आलं होतं. आज झटपट तर्री साठी वापरलं. झकास झाली मिसळ्.वर्थ् ट्राईंग.

मस्त पाकृ. लालू
आज करुन पाहिली झकास झाली होती. मी कटात ४ कपा पेक्षा थोडे जास्त पाणी घातले होते. कारण कट दाट वाटत होता. (बहुतेक खोबरे ज्यास्त झाले असावे.)

लालु, काल करुन बघितली ही मिसळ. तिखटाचा अंदाज जरा चुकल्याने आणि तेल कमी घालण्याच्या सवयीने तवंग नाही आला.. मग इथेच कुठेतरी वाचलेल्या "गरम तेलात डायरेक्ट तिखट घालुन फोडणी केल्यास छान तवंग येतो" या टीपचा वापर करुन वरुन थोडा तवंग ओतला कटात. Uhoh

पण तरीही मिसळ छान झालेली! Happy

बनवून पाहिली. मस्तच झाली होती.

स्वाती_आंबोळे यांनी सांगितल्याप्रमाणे थोडा चिंचेचा कोळ वापरला. मस्त टीप होती. आभारी आहे.

लालू रेसिपीबद्दल धन्यवाद.. आज ह्या रेसिपीने मिसळ केली... भारी झाली होती एकदम.. (असं सगळे खाणारे म्हणाले.. Happy )
आम्ही सकसचा कांदा लसूण मसाला वापरला..

कट-

kat.jpg

अनकॅनी ,
कट एकदम तोंपासू !!
मी या आधी पण जुन्या माबोवरुन तुमच्या क्रुतीप्रमाणे मिसळ करायचे , नेहमीच छान होते .
धन्यवाद .

तो कट आमच्या बाईंनी केला होता. कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला वापरुन. त्यांनी ओले खोबरे न घेता सगळे सुकेच घेतले आणि थोडासा गूळ घातला होता. ओले खोबरे असेल तर गूळ नाही लागत.

मराठा दरबार कोल्हापुरी मिसळ मसाला रेडी मिक्सच्या पाककृतीने....

मिसळ-पावः

कटः

लालू, मामी....धन्यवाद! Happy
--------------------------------------------------
वरील मसाला पुण्यात खालील पत्त्यावर मिळतो:-
Mohanlal & Sons,
Address: 1080 Sadashiv peth, Bossco House, Shanipar chowk Off Bajirao road, Pune 411030, Maharashtra
Tel: 9604642840

वॉव वॉव. मराठा दरबार मसाला तर नाहीये पण खास कोल्लापूरातून मागवलेली ताजी कांदा लसूण चटणी वापरून मिसळ लवकरच करून बघणेत येईल.

ए ए ए.... मी पण मराठा दरबार मिसळ मसाला वापरून मिसळ केली. एकदम झकास झाली होती. बित्तुच्या मिसळीसारखाच रंग आला होता Wink पण अजिबात जहाल नव्हती आणि एकदम चविष्ट!!

खूप खूप धन्यवाद अन्कॅनी. Happy

मामी, मॅरेथॉन पहायला काही पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी अर्जंटमंदी करावी लागली.
पुन्हा करीन तेव्हा नक्की बोलावणार! Happy

नवी मुंबईत झटपट मिसळ बनवण्यासाठी मसाला कुठे व कोणता मिळेल?
.
.
लवकर सांगा, भुक लागलेय Happy

मस्त फोटो बित्तु! Happy

प्रसिक, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी नक्की मिळेल. ती वापरुन करा, फारसा व्याप नाही आहे. Wink

आज अशा पद्धतीने केली. छान झाली.
मुख्य म्हणजे कट वेगळा केल्यानेमुलाना कमी तिखट कमी रश्श्याचा उसळपाव देता आला.

एरवी मी मालवणी मसाला घालते.
यावेळी लोकमंगल ब्रँडचा कांदा लसूण मसाला घातला तो तितकासा आवडला नाही.
दुसर्या कुठल्यातरि चांगल्या ब्रँडचा आणला पाहिजे.

Pages