पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स

Submitted by मामी on 10 May, 2011 - 13:06

देशापरदेशात भटकताना, काही ठिकाणी प्रवाशांना गंडवण्याचे जाणून-बुजून प्रयत्न केलेले दिसतात. किंवा काही ठिकाणी पहिल्यांदा भेट देणार्‍या प्रवाशांना तिथल्या काही खास टिप्स माहिती नसतात. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. पण त्यामुळेच कोणी कोणाला सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. किंबहुना या सांगायला हव्यात असंही आपल्या डोक्यात येत नाही. 'प्रवासात झालेला तात्पुरता मनस्ताप' या सदराखाली टाकून आपण त्या विसरून जातो. पण या गोष्टींमुळेच इतर काही प्रवाश्यांना फायदा होईल की.

काही गोष्टिंची इथे जंत्री केली तर वेगवेगळ्या ठिकाणांच्या अशा महत्त्वाच्या टिप्स इथे एकत्रित होतील आणि सगळ्यांनाच फायदा होईल. 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

त. टि. : जसजशा टिप्स जमत जातील तसतशा त्या ठिकाणांप्रमाणे एकत्र करून ठेवीन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी - ट्रिपअ‍ॅडवाईजर.कॉम वरचे रिव्यूज इतर देशांतील हॉटेल्स खूप सिरीयसली घेतात व ताबडतोब उत्तरेही देतात. यांनी तसे केलेले नाही हे मोठे आश्चर्य आहे.

प्रीमियम रुमचे देखील १० हजार एका रात्रीचे जास्तच वाटले नाहीत का तुम्हाला?

ओव्हरहाइप्ड प्रकार वाटलाय मला तरी तो गढीचा.

प्रीमियम रुमचे देखील १० हजार एका रात्रीचे जास्तच वाटले नाहीत का तुम्हाला?

>>>> झकासराव, आम्ही तीन रात्रींकरता राहणार होतो त्याचं ते पार्ट पेमेंट होतं. रुमचे एका रात्रीकरता दर ( आता नक्की आठवत नाहीत पण) ठीकच वाटले होते.

मामी - ट्रिपअ‍ॅडवाईजर.कॉम वरचे रिव्यूज इतर देशांतील हॉटेल्स खूप सिरीयसली घेतात व ताबडतोब उत्तरेही देतात. यांनी तसे केलेले नाही हे मोठे आश्चर्य आहे.

>>> फारेण्ड, तिथे त्यांनी इतर काहीजणांना उत्तरं दिली आहेत. तक्रारींना देखिल ठराविक प्रकारची उत्तरं दिली आहेत. माझ्या तक्रारीला काहीही उत्तर आलं नाही.

ओव्हरहाइप्ड प्रकार वाटलाय मला तरी तो गढीचा.

ती गढी खरं तर छान आहे. त्यात एक थीम हॉटेल काढण्याची कल्पनाही छान आहे. परीसर चांगला आहे. आम्ही पावसाळ्याच्या शेवटास गेलो होतो त्यामुळे खूप सुंदर हिरवळ होती. पण इतपतच.

१. जेवण बोअर.
२. थीम नुसार खोल्यांचं अंतरंग नाही. ते नेहमीच्या हॉटेलांसारखंच आहे.
३. महाबेक्कार सर्व्हिस. स्टाफ ट्रेंड नाही.
४. बाहेरच्या लोकांना एक दिवसाच्या पिकनिक करता येता येतं ते येऊन गर्दी करतात.
५. टेन्टस दूर आहेत.
६. स्विमिंगपूल स्वच्छ नव्हता.

एकदम फालतु फसवेगिरी आहे ती गढी.

मध्यंतरी हे साहेब शिवापुरच्या एका मटनभाकरी हॉटेलात जेवत असताना एका ग्राहकाने तुमची हॉटेल अत्यंत फालतु आहेत असे सांगीतले होते.

हल्ली त्यांच्या हॉटेलचा दर्जा प्रचंड खालावलेला आहे यावर एकमत. सातारा-पुण्याहुन मुंबईस येताना वाटेत एक लागते तिथे मुद्दाम थांबतो आधी कधीतरी चांगले खाल्लेले स्मरुन. गेल्या दोन्ही वेळी अतीसाधारण जेवण अव्वाच्यासव्वा दराने घेतले. आता परत कधीही थांबणार नाही तिथे.

ट्रिपअ‍ॅडवाईजर.कॉम वरचे रिव्यूज इतर देशांतील हॉटेल्स खूप सिरीयसली घेतात व ताबडतोब उत्तरेही देतात. यांनी तसे केलेले नाही हे मोठे आश्चर्य आहे.>>>>>>> हॉटेल बुक करताना या साईटवरचे रिव्ह्युज जरूर चेक करावेत. खुप उपयोग होतो. मी महाबळेश्वर आणि गोवा ट्रिप ला याचा अनुभव घेतलाय. Happy

सातारा-पुण्याहुन मुंबईस येताना वाटेत एक लागते तिथे मुद्दाम थांबतो आधी कधीतरी चांगले खाल्लेले स्मरुन. गेल्या दोन्ही वेळी अतीसाधारण जेवण अव्वाच्यासव्वा दराने घेतले. आता परत कधीही थांबणार नाही तिथे.>>>साधना, तुम्ही 'प्रांजली' बद्दल बोलत असाल तर अगदी सहमत.

शिवाजी महाराजांचे सरदार जाधवराव यांची ही गढी.अलिकडचे काळात त्यांच्या वंशजांपैकी दादा जाधवराव हे जनता दलाचे आमदार अनेक वर्षे होते. ते फारसे बदमाष राजकारणी नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती फार श्रीमंतीची नाही.या गढीचा मेन्टेनन्सही त्याना शक्य होत नसावा . त्यामुळे बर्‍याच दिवसापासून ते ही गढी विकण्याच्या मागे लागले होते. ऐशीच्या दशकात त्यानी रजनीशआश्रेम वाल्यांशी सौदाही केला होता त्या काळात रजनीश बाबा सम्भोगातून समाधीकडे जाण्याच्या रस्त्यावर चालत होते. त्यांच्या परदेशी शिष्यांनी कोरेगाव भागात अक्षरशः ' नंगा''नाच घातला होता. त्यामुळी ही ब्याद आपल्याकडे नको म्हणून सासवड परिसरातील लोकानी मोठे आन्दोलन करून हा सौदा रद्द करणे भाग पाडले होते.

मध्ये बरेच दिवस काहीच घडले नाही मग हेरिटेज वास्तू जपण्याच्या नावाखाली हा नवीन बाबा तेथे आला आणि लीज की विकत कुठल्या तरी टर्म खाली हे हॉटेल तिथे चालू आहे.... काही दिवसानी किल्लेही बळकावण्याचा विचार असेल... नुकतेच बाबाच्या हॉटेलच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील अनधिकृत बांधकाम मनपाने तोडले आहे.

बाबाच्या करामती चम्पकच्या इडली हॉटेल आणि भामटा या धाग्यावर वाचा.....

साधना...प्रांजली नाव आहे का त्या हॉटेलचे, मला वाटले आडनावावरून आहे नाव... भंकस अन्न थांबायची मजाच जाते, मुंबईला जाताना...

बाकी धागा बुकमार्क करण्यासारखा आहे. प्रवासाला जाताना, गेल्यावर सारखा संदर्भासारखा वापरता येईल..

हॉटेलबाबतीत मला नाशिकला जिंजरचा अनुभव चांगला आला... सर्विस छान, खोल्याही छोट्या पण हवेशीर आणि अन्नही चवीचे होते.

मला नालासोपार्‍याच्या मिनि गोवा रीसॉर्ट मध्ये आलेला अनुभव -

मी त्यांची वेबसाईट वाचून तिथे जाण्याचा निर्णय घेतला. फोनवर खूप चांगली माहिती दिली. मी म्हटले मराठी माणसाचं रीसॉर्ट आहे चला जाऊया. फोनवर त्यांना आम्हाला दोन एसी रूम्स हव्यात म्हणून सांगितले होते. (नवर्‍याला जायचे नव्हतेच तिथे तरी माझ्या हट्टाखातर आला)

नालासोपारा पश्चिमेला गाव संपलं की त्या रिसॉर्टला जाण्याचा रस्ता जेमतेम इंडिका गाडी जाईल एवढा आहे. जरा इकडे तिकडे झालात तर गाडी खाजणात अडकेल असा. गाडी आत नेतानाच नवरा वैतागलेला. आम्ही साडेपाच वाजता पोहोचलो. तिथे पोहोचल्या पोहोचल्या म्हणाला मला पटत नाहीये ही जागा परत जाऊया. तरी मी मूर्ख म्हणून थांबू पाहू बरी वाटतेय रे जागा असे म्हणून थाम्बवले.

रीसॉर्टच्या समोर जो बीच आहे तो एक्दम भारी आहे, त्याच्या प्रेमात पडलेले मी.

रीसॉर्ट मध्ये गेल्यावर अर्ध्या तासानंतर आम्हाला दोन रूम्स दिल्या एकीचाही एसी चालू नव्हता.एसी रूम्स न मिळाल्याने नवरोबा गाडी चलू करून त्यात एसी लावून बसले. एक तास एसी चालू होतो नाही होत हे पाहिल्यावर त्यांच्याकडे आम्ही रूम्स बदलून मागितल्या. तर नवीन रूम्स द्यायला आठ वाजले. नवीन रूम्सचे एसी देखील चालू नव्हते.

एसी टेक्निशियन येऊन एसी चालू करून देईपर्यंत आम्ही खायला बटाटा भजी आणी बटाटा जिप्स मागवले. एक तर रिसॉर्ट मध्ये पुरेसा उजेड नव्हता. खाजणाच्या बाजूला जागा असल्याने किंवा काही ही कारणाने प्रचंड डास होते, त्या डासांना हाकलत काळोखात भजी आणि चिप्स खाल्ले. चिप्स संपवल्यावर माझ्या लक्शात आले की ज्या प्लेटमध्ये चिप्स दिले होते ती मेलामाईनची प्लेट कळकट आणि चक्क तुटलेली - मध्यभागी तीन इंचाची आरपार चीर गेलेली होती. त्याक्षणी मी तिथून परत फिरायचा निर्णय घेतला. गाडीचे डिझेल किती खर्च करायचे एसी साठी ह्या विचाराने विना एसी च्या खोलीत जाऊन झोपलेल्या नवर्‍याला उठवलं.

अर्थात नंतर त्यावेळच्या केअरटेकर बरोबर वाद. सॉरी मुलाने चूक केली तो नवा आहेम तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला दुसरी प्लेट देतो, मी म्हटलं डॅमॅज इज ऑलरेडी डन आता फुकटात सुद्धा राहाणार नाही इथे. तुम्ही पैसे परत करा. मग आम्ही असे पैसे परत करू शकत नाही रुल नाहीये तसा, नंतर आम्ही पैसे उद्या बँक ट्रान्सफर करतो वगैरे सांगणे. अर्थात माझा विश्वास उडालेला होता. मी पोलिस स्टेशनला जायची तयारी करणे. तुम्ही इमॅजिन कराल तो सगळा वाद झाला. मग ओळ्खीच्या एका इन्स्पेक्टरला फोन केला तर तो नालासोपार्‍यातला राहणारा होता. मग तो त्या केअर्टेकरशी बोलला. नंतर तिथे उभे असणार्‍या एका माणसाशी बोलला. तो माणूस ह सगळा तमाशा तिथे उभं राहून पहत होता. मग ज्या इन्स्पेक्टरला फोन केला होता त्याच्याकडून कळले की तो माणूस त्या जागेचा मालक होत आणि ती जागा डेव्हलप करून रिसॉर्ट म्हणून चालवायला त्याने दुसर्‍या कंपनीला दिली होती. शिवाय तो मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या संरक्षणाला असलेला पोलिस होता. त्या माणसाने इन्स्पेक्टरला शब्द दिला की ह्यांना पैसे देववण्याची जबाबदारी माझी. मग केवळ दोन डिपार्टमेण्टची माणसे एक्मेकांना शब्द देत आहेत म्हणून मी गप्प बसले. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नालासोपारा स्टेशनला जाऊन पैसे घेतले. त्यावेळी आम्हाला कळाले की मॅनेजर आणि केअर्टेकर अत्यंत उर्मट आहेत आणि स्टाफला व्यवस्थित वागवत नाहीत शिवाय रिसॉर्ट वर येणार्‍या लोकांच्या पुढ्यात खुषाल सिगरेट फुंकत पायावर पाय घेऊन बसून राहातात.

ह्याच्यापुढे ऑथेंटिक रीव्ह्यु शिवाय कोणत्याही रिसॉर्ट मध्ये जायचे नाही असे ठरवले आहे.

Pages