पर्यटकांनो सावध! .... अर्थात टूरीस्ट ट्रॅप्स

Submitted by मामी on 10 May, 2011 - 13:06

देशापरदेशात भटकताना, काही ठिकाणी प्रवाशांना गंडवण्याचे जाणून-बुजून प्रयत्न केलेले दिसतात. किंवा काही ठिकाणी पहिल्यांदा भेट देणार्‍या प्रवाशांना तिथल्या काही खास टिप्स माहिती नसतात. या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात. पण त्यामुळेच कोणी कोणाला सांगायच्या भानगडीत पडत नाहीत. किंबहुना या सांगायला हव्यात असंही आपल्या डोक्यात येत नाही. 'प्रवासात झालेला तात्पुरता मनस्ताप' या सदराखाली टाकून आपण त्या विसरून जातो. पण या गोष्टींमुळेच इतर काही प्रवाश्यांना फायदा होईल की.

काही गोष्टिंची इथे जंत्री केली तर वेगवेगळ्या ठिकाणांच्या अशा महत्त्वाच्या टिप्स इथे एकत्रित होतील आणि सगळ्यांनाच फायदा होईल. 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

त. टि. : जसजशा टिप्स जमत जातील तसतशा त्या ठिकाणांप्रमाणे एकत्र करून ठेवीन.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी - ट्रिपअ‍ॅडवाईजर.कॉम वरचे रिव्यूज इतर देशांतील हॉटेल्स खूप सिरीयसली घेतात व ताबडतोब उत्तरेही देतात. यांनी तसे केलेले नाही हे मोठे आश्चर्य आहे.

प्रीमियम रुमचे देखील १० हजार एका रात्रीचे जास्तच वाटले नाहीत का तुम्हाला?

ओव्हरहाइप्ड प्रकार वाटलाय मला तरी तो गढीचा.

प्रीमियम रुमचे देखील १० हजार एका रात्रीचे जास्तच वाटले नाहीत का तुम्हाला?

>>>> झकासराव, आम्ही तीन रात्रींकरता राहणार होतो त्याचं ते पार्ट पेमेंट होतं. रुमचे एका रात्रीकरता दर ( आता नक्की आठवत नाहीत पण) ठीकच वाटले होते.

मामी - ट्रिपअ‍ॅडवाईजर.कॉम वरचे रिव्यूज इतर देशांतील हॉटेल्स खूप सिरीयसली घेतात व ताबडतोब उत्तरेही देतात. यांनी तसे केलेले नाही हे मोठे आश्चर्य आहे.

>>> फारेण्ड, तिथे त्यांनी इतर काहीजणांना उत्तरं दिली आहेत. तक्रारींना देखिल ठराविक प्रकारची उत्तरं दिली आहेत. माझ्या तक्रारीला काहीही उत्तर आलं नाही.

ओव्हरहाइप्ड प्रकार वाटलाय मला तरी तो गढीचा.

ती गढी खरं तर छान आहे. त्यात एक थीम हॉटेल काढण्याची कल्पनाही छान आहे. परीसर चांगला आहे. आम्ही पावसाळ्याच्या शेवटास गेलो होतो त्यामुळे खूप सुंदर हिरवळ होती. पण इतपतच.

१. जेवण बोअर.
२. थीम नुसार खोल्यांचं अंतरंग नाही. ते नेहमीच्या हॉटेलांसारखंच आहे.
३. महाबेक्कार सर्व्हिस. स्टाफ ट्रेंड नाही.
४. बाहेरच्या लोकांना एक दिवसाच्या पिकनिक करता येता येतं ते येऊन गर्दी करतात.
५. टेन्टस दूर आहेत.
६. स्विमिंगपूल स्वच्छ नव्हता.

एकदम फालतु फसवेगिरी आहे ती गढी.

मध्यंतरी हे साहेब शिवापुरच्या एका मटनभाकरी हॉटेलात जेवत असताना एका ग्राहकाने तुमची हॉटेल अत्यंत फालतु आहेत असे सांगीतले होते.

हल्ली त्यांच्या हॉटेलचा दर्जा प्रचंड खालावलेला आहे यावर एकमत. सातारा-पुण्याहुन मुंबईस येताना वाटेत एक लागते तिथे मुद्दाम थांबतो आधी कधीतरी चांगले खाल्लेले स्मरुन. गेल्या दोन्ही वेळी अतीसाधारण जेवण अव्वाच्यासव्वा दराने घेतले. आता परत कधीही थांबणार नाही तिथे.

ट्रिपअ‍ॅडवाईजर.कॉम वरचे रिव्यूज इतर देशांतील हॉटेल्स खूप सिरीयसली घेतात व ताबडतोब उत्तरेही देतात. यांनी तसे केलेले नाही हे मोठे आश्चर्य आहे.>>>>>>> हॉटेल बुक करताना या साईटवरचे रिव्ह्युज जरूर चेक करावेत. खुप उपयोग होतो. मी महाबळेश्वर आणि गोवा ट्रिप ला याचा अनुभव घेतलाय. Happy

सातारा-पुण्याहुन मुंबईस येताना वाटेत एक लागते तिथे मुद्दाम थांबतो आधी कधीतरी चांगले खाल्लेले स्मरुन. गेल्या दोन्ही वेळी अतीसाधारण जेवण अव्वाच्यासव्वा दराने घेतले. आता परत कधीही थांबणार नाही तिथे.>>>साधना, तुम्ही 'प्रांजली' बद्दल बोलत असाल तर अगदी सहमत.

शिवाजी महाराजांचे सरदार जाधवराव यांची ही गढी.अलिकडचे काळात त्यांच्या वंशजांपैकी दादा जाधवराव हे जनता दलाचे आमदार अनेक वर्षे होते. ते फारसे बदमाष राजकारणी नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती फार श्रीमंतीची नाही.या गढीचा मेन्टेनन्सही त्याना शक्य होत नसावा . त्यामुळे बर्‍याच दिवसापासून ते ही गढी विकण्याच्या मागे लागले होते. ऐशीच्या दशकात त्यानी रजनीशआश्रेम वाल्यांशी सौदाही केला होता त्या काळात रजनीश बाबा सम्भोगातून समाधीकडे जाण्याच्या रस्त्यावर चालत होते. त्यांच्या परदेशी शिष्यांनी कोरेगाव भागात अक्षरशः ' नंगा''नाच घातला होता. त्यामुळी ही ब्याद आपल्याकडे नको म्हणून सासवड परिसरातील लोकानी मोठे आन्दोलन करून हा सौदा रद्द करणे भाग पाडले होते.

मध्ये बरेच दिवस काहीच घडले नाही मग हेरिटेज वास्तू जपण्याच्या नावाखाली हा नवीन बाबा तेथे आला आणि लीज की विकत कुठल्या तरी टर्म खाली हे हॉटेल तिथे चालू आहे.... काही दिवसानी किल्लेही बळकावण्याचा विचार असेल... नुकतेच बाबाच्या हॉटेलच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील अनधिकृत बांधकाम मनपाने तोडले आहे.

बाबाच्या करामती चम्पकच्या इडली हॉटेल आणि भामटा या धाग्यावर वाचा.....

साधना...प्रांजली नाव आहे का त्या हॉटेलचे, मला वाटले आडनावावरून आहे नाव... भंकस अन्न थांबायची मजाच जाते, मुंबईला जाताना...

बाकी धागा बुकमार्क करण्यासारखा आहे. प्रवासाला जाताना, गेल्यावर सारखा संदर्भासारखा वापरता येईल..

हॉटेलबाबतीत मला नाशिकला जिंजरचा अनुभव चांगला आला... सर्विस छान, खोल्याही छोट्या पण हवेशीर आणि अन्नही चवीचे होते.

मला नालासोपार्‍याच्या मिनि गोवा रीसॉर्ट मध्ये आलेला अनुभव -

मी त्यांची वेबसाईट वाचून तिथे जाण्याचा निर्णय घेतला. फोनवर खूप चांगली माहिती दिली. मी म्हटले मराठी माणसाचं रीसॉर्ट आहे चला जाऊया. फोनवर त्यांना आम्हाला दोन एसी रूम्स हव्यात म्हणून सांगितले होते. (नवर्‍याला जायचे नव्हतेच तिथे तरी माझ्या हट्टाखातर आला)

नालासोपारा पश्चिमेला गाव संपलं की त्या रिसॉर्टला जाण्याचा रस्ता जेमतेम इंडिका गाडी जाईल एवढा आहे. जरा इकडे तिकडे झालात तर गाडी खाजणात अडकेल असा. गाडी आत नेतानाच नवरा वैतागलेला. आम्ही साडेपाच वाजता पोहोचलो. तिथे पोहोचल्या पोहोचल्या म्हणाला मला पटत नाहीये ही जागा परत जाऊया. तरी मी मूर्ख म्हणून थांबू पाहू बरी वाटतेय रे जागा असे म्हणून थाम्बवले.

रीसॉर्टच्या समोर जो बीच आहे तो एक्दम भारी आहे, त्याच्या प्रेमात पडलेले मी.

रीसॉर्ट मध्ये गेल्यावर अर्ध्या तासानंतर आम्हाला दोन रूम्स दिल्या एकीचाही एसी चालू नव्हता.एसी रूम्स न मिळाल्याने नवरोबा गाडी चलू करून त्यात एसी लावून बसले. एक तास एसी चालू होतो नाही होत हे पाहिल्यावर त्यांच्याकडे आम्ही रूम्स बदलून मागितल्या. तर नवीन रूम्स द्यायला आठ वाजले. नवीन रूम्सचे एसी देखील चालू नव्हते.

एसी टेक्निशियन येऊन एसी चालू करून देईपर्यंत आम्ही खायला बटाटा भजी आणी बटाटा जिप्स मागवले. एक तर रिसॉर्ट मध्ये पुरेसा उजेड नव्हता. खाजणाच्या बाजूला जागा असल्याने किंवा काही ही कारणाने प्रचंड डास होते, त्या डासांना हाकलत काळोखात भजी आणि चिप्स खाल्ले. चिप्स संपवल्यावर माझ्या लक्शात आले की ज्या प्लेटमध्ये चिप्स दिले होते ती मेलामाईनची प्लेट कळकट आणि चक्क तुटलेली - मध्यभागी तीन इंचाची आरपार चीर गेलेली होती. त्याक्षणी मी तिथून परत फिरायचा निर्णय घेतला. गाडीचे डिझेल किती खर्च करायचे एसी साठी ह्या विचाराने विना एसी च्या खोलीत जाऊन झोपलेल्या नवर्‍याला उठवलं.

अर्थात नंतर त्यावेळच्या केअरटेकर बरोबर वाद. सॉरी मुलाने चूक केली तो नवा आहेम तुम्ही जाऊ नका मी तुम्हाला दुसरी प्लेट देतो, मी म्हटलं डॅमॅज इज ऑलरेडी डन आता फुकटात सुद्धा राहाणार नाही इथे. तुम्ही पैसे परत करा. मग आम्ही असे पैसे परत करू शकत नाही रुल नाहीये तसा, नंतर आम्ही पैसे उद्या बँक ट्रान्सफर करतो वगैरे सांगणे. अर्थात माझा विश्वास उडालेला होता. मी पोलिस स्टेशनला जायची तयारी करणे. तुम्ही इमॅजिन कराल तो सगळा वाद झाला. मग ओळ्खीच्या एका इन्स्पेक्टरला फोन केला तर तो नालासोपार्‍यातला राहणारा होता. मग तो त्या केअर्टेकरशी बोलला. नंतर तिथे उभे असणार्‍या एका माणसाशी बोलला. तो माणूस ह सगळा तमाशा तिथे उभं राहून पहत होता. मग ज्या इन्स्पेक्टरला फोन केला होता त्याच्याकडून कळले की तो माणूस त्या जागेचा मालक होत आणि ती जागा डेव्हलप करून रिसॉर्ट म्हणून चालवायला त्याने दुसर्‍या कंपनीला दिली होती. शिवाय तो मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या संरक्षणाला असलेला पोलिस होता. त्या माणसाने इन्स्पेक्टरला शब्द दिला की ह्यांना पैसे देववण्याची जबाबदारी माझी. मग केवळ दोन डिपार्टमेण्टची माणसे एक्मेकांना शब्द देत आहेत म्हणून मी गप्प बसले. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी नालासोपारा स्टेशनला जाऊन पैसे घेतले. त्यावेळी आम्हाला कळाले की मॅनेजर आणि केअर्टेकर अत्यंत उर्मट आहेत आणि स्टाफला व्यवस्थित वागवत नाहीत शिवाय रिसॉर्ट वर येणार्‍या लोकांच्या पुढ्यात खुषाल सिगरेट फुंकत पायावर पाय घेऊन बसून राहातात.

ह्याच्यापुढे ऑथेंटिक रीव्ह्यु शिवाय कोणत्याही रिसॉर्ट मध्ये जायचे नाही असे ठरवले आहे.

युरोपातील झेक रिपब्लिक या देशात शेजारच्या देशातून रस्त्यावरून प्रवेश करताना काही पैसे भरावे लागतात. त्यामध्ये स्कॅम होत असते आणि त्यामुळे अर्थातच पर्यटकांची फसवणूक केली जाते. हे कसं करतात हे उघड करणारा व्हिडिओ.

फसवणूक टाळण्यासाठी ऑफिशियल मशिनींमधूनच तिकिटे घ्या. ही ऑफिशियल मशीन सहजासहजी दिसणार नाहीत अशा ठिकाणी असतात. तर फसवणुक करणारे दुकान उघडून अगदी समोरच बसलेले असतात.

Europe's HIGHWAY STICKER SCAM Exposed (Honest Guide) : https://www.youtube.com/watch?v=FsWcc-9KMEc

वरील व्हिडिओ एक वर्षापूर्वीचा आहे. नुकताच त्याचा अपडेट देणारा व्हिडिओही आला आहे. परिस्थितीत काही सुधारणा नाही.

They Sued Us But Failed. Let's Expose Them Again! : https://www.youtube.com/watch?v=9_JfUukoK4k

@आनंद
"मार्तंड मंदिर" माहिती आणि फोटो खूप छान ! नवीन माहिती मिळाली

बिजिंग वरून ग्रेट वॉल ऑफ चायना बघायला गेलो तेव्हा आमच्या चिनी गाईडने निक्षून सांगितले की जिथुन आपण सुरवात करणार आहोत तिथल्या दुकानात काहीही विकत घेऊ तर नकाच पण कुठल्याही वस्तूला हात लावू नका आणि हातात दिली तरी घेऊ नका. नम्रपणे नको असे सांगा.
तो ट्रॅप असतो, त्या वस्तु आधीच तुटलेल्या अलगद कळणारही नाही अशा जोडल्या असतात कुठे धरायचे ते त्यांनाच माहीत असते. तुम्ही हात लावला की तुटल्याच समजा. मग तुम्हाला त्याचे पैसे देण्या शिवाय गत्यंतर नाही.
------
दिल्ली बद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पण मुंबईतही अशा काही गोष्टी होतात हे मला काही वर्षांपूर्वी कळले.
जर्मनीहुन एक कलीग आला होता आणि मुंबईला आम्ही कस्टमर व्हिजिटला गेलो होतो. माझा नेहमीचा टॅक्सी वाला होता, युपीचा. जर्मन कलीगला बायकोसाठी काहीतरी घ्यायचे होते, तेव्हा आम्ही बांद्र्याला पोचतच होतो, टॅक्सी वाल्याला सांगितले चांगला मॉल माहीत असेल तर तिकडे घे.
तो एका मोठ्या गिफ्ट शॉप टाईप दुकानाकडे घेऊन गेला, म्हटले इकडे नको. तर म्हणाला काही घेऊ नका पण दुकान एक राऊंड तर मारून या. मग नेतो मॉल मध्ये. म्हटलं का? तर म्हणे या दुकानात फॉरेनरला आणले की आम्हाला ५००₹ मिळतात मग त्याने काही घेतले नाही तरी.
गंमत म्हणुन आत जाऊन बघावे असा विचार केला तर आत जाताच एवढे दणकून स्वागत झाले जणु आम्ही मुख्य अतिथी आणि ते केव्हाचे आमची वाट पाहताहेत. ते पाहूनच त्याच्याही डोक्यात घंटा वाजली, म्हटले नुसते पाहायलाही नको, लगेच वळून बाहेर आलो. ड्रायव्हरला सांगितले परत अशा दुकानात आम्हाला कधीही न्यायचे नाही.

आत जाताच एवढे दणकून स्वागत झाले जणु आम्ही मुख्य अतिथी आणि ते केव्हाचे आमची वाट पाहताहेत. >>> Lol

पुण्यात वाढल्यामुळे दुकानात मुळात स्वागत झाले किंवा कोणी दखल जरी घेतली तरी अवघडल्यासारखे होते आणि विश्वास फॅक्टर थोडा कमी होतो. दुकानातील पदार्थांची क्वालिटी आणि दुकानदाराने दाखवलेले अगत्य याचे व्यस्त प्रमाण असते हे डोक्यात लहानपणीपासून फिट्ट बसलेले आहे Happy पुलंनी म्हंटल्याप्रमाणे खालच्यासारखे उत्तर हे क्वालिटीचा दाखला लगेच देते
"जिलब्या ताज्या आहेत का?"
"आम्ही इथे शिळ्या जिलब्या विकायला बसलेलो नाही"!

काय बोललास! वरची पोस्ट लिहिताना वॉलमार्ट मध्ये देसी लुकिंग व्यक्ती नव्या बकऱ्याशी अगत्याने वागून घरी जेवायला बोलावत आहे अगदी हेच डोळ्यासमोर होत!

आपण किती फसणारे आहोत हे आपला चेहराच सांगतो. आपण किती पैसे बिनदिक्कत खर्च करणारे आहोत हे आपली देहबोली सांगते.

"जिलब्या ताज्या आहेत का?"
"आम्ही इथे शिळ्या जिलब्या विकायला बसलेलो नाही"!
>>> Lol

एकदा ग्रीन बेकरीत माझ्या मामाने "ब्रेड ताजा आहे ना?" विचारलं होतं. तर तिथला माणूस म्हणाला,"शिळा ब्रेड हवा असेल तर आधी ऑर्डर द्यावी लागेल!" Wink

पहिले अ‍ॅमवेच येते डोक्यात >> हे मला अमेरीकेत मॅाल मधे फिरताना जेव्हा कोणी भारतीय हसून चौकशी करायला येतो तेव्हा नेहमीच डोक्यात येतं

फसवणूक करण्या साठी गोड च बोलले जाते,ओळख च दाखवली जाते.
असे काही नाही.
ह्याची गरज लागत नाही.
. आपले काम होईल ( योग्य,सरळ,कायदेशीर) म्हणून माणसं ओळख असणाऱ्या व्यक्ती कडे आशे नी बघतात.
किंवा तशी अपेक्षा ठेवतात
ते तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत नसतात.

तुम्ही लॉजिक विषय ऑप्शनला टाकला होता का हो?
एक चौकोन काढा. त्यात फसवणूक असं लिहा. त्या चौकोनाच्या बाहेर नॉट फसवणूक असं लिहा. आता त्या चौकोनात एक वर्तुळ असं काढा की अर्ध त्या चौकोनात आणि अर्थ बाहेर असेल. त्या वर्तुळात गोड बोलणे लिहा. आता फसवणूक चौकोनाचा जो भाग वर्तुळाने व्यापला नाही तिकडे गोड न बोलता फसवणूक होते. आता वकुबा प्रमाणे पहिल्या वर्तुळाला छेदणारी आणि काही भाग आत आणि काही बाहेर असणारी ओळख, तोंड वेंगाडणे, आशाळभूत पणे पहाणे, हात पसरणे, थापा मारणे अशी अनेक वर्तुळं काढा.

इथे वर्तुळ का काढायची आयत किंवा त्रिकोण का नाही असा काही प्रश्न असेल तर तो ही विचारा.

एकदा मुंबईला गेले होते.
हात दाखवला, थांबली टॅक्सी.
पत्ता विचारला तर सांगणारा बरोबर येऊन येऊन पत्ता दाखवत होता.
अरे काय चाल्लंय काय.
अॅन्टीडोट घेण्यासाठी पुण्याला आले
चांदणी चौकात उतरले
रिक्षाला हात केला....नन्ना....चार रिक्षा ...नन्ना....
मग लक्ष्मी रोडला गेले
एका जुन्या दुकानात.
अमूक अमूक द्या
पाचशे रु.
बापरे !!! एवढं महाग?
"सक्ती नाही..."
मग कुठं जिवाला बरं वाटलं.

Pages