तू कितीही नाही म्हणालीस तरी...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

तू कितीही नाही म्हणालीस
तरी...
माझ्या डोळ्यांत तूच आहेस
डोळे उघडे ठेवू की बंद करू
एवढाच एक पेच आहे

बंद केले,
तर साहेबाचं संकट आहे
उघडे ठेवले -
तर तुझ्याशी प्रतारणा आहे

साहेबाचं संकट ओढावायचं
की डुलकीशी प्रतारणा करायची
एवढाच एक पेच आहे

बाकी,
माझ्या डोळ्यांत तूच आहेस...

प्रकार: 

वाह. याला म्हणतात विशुद्ध प्रेम!

हेच ते प्रेम... जे खरं खरं प्रेम असतं.
तुमचं आणि आमचं सगळ्यांचं सेम असतं.

:ड

Pages