पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडदाला ब्लॅक ग्रॅम आणि मटकीला मोठ ( हा गुजराथी शब्द आहे, पण तोच वापरतात ) दुबईची नॅटको, कंपनी सगळ्या भारतीय धान्याचे मसाल्याचे मार्केटींग करते.

फ्लॅक्स सीड्स म्हणजे काय असते?

*******************
तमसो मा ज्योतिर्गमय

Lol

okkk....

मी कुठेतरी वाचले की रोज एक चमचा फ्लॅक्स सीड्स खावे... त्यात ओमेगा ३ असते, त्यामुळे त्वचा चांगली राहते.

*******************
तमसो मा ज्योतिर्गमय

Swati_j,

ती स्वातीची कृती खालील ठिकाणी टाकली आहे. या कृतीने खरंच झटपट छान भात होतो.

http://www.maayboli.com/node/9687

flax seeds म्हणजे जवस, नागपूर कडे खुरासणी आणि कानडीत अगसी

मग कारळं म्हणजे काय ? Proud

नागपूर कडे खुरासणी >> चूक खुरासणी म्हणजे कारळे Happy

हाणा रे शिंडीला Wink
Light 1

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

नागपूरला, कोथिंबीराला सांबार म्हणतात, साबुदाण्याच्या खिचडिला, उसळ म्हणतात, म्हणून मला वाटलं तसच काहितरी खुरासणीबद्दल असणार !!!

नागपूरला (म्हणजे आमचे नातेवाईक हां), ज्याने आपण कपडे वाळत घालतो त्या काठीला 'काडी' म्हणतात. Lol

आमच्या गावी एका पाणसापाला काडी म्हणतात... Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

शिरिष कणेकर, शबाना आझमीला, कपडे वाळत घालायची काठी म्हणतात.
छे फारच भरकटला, हा बाफ.

काल अळुची छोटी छोटी पानं मिळालित. देठ हिरवे आहेत. गेल्या आठवड्यात पण अशीच पण थोडी मोठी पानं मिळाली होती. चिंच वैगरे घालुनही अळुवड्या किंचीतश्या खाजर्‍या वाटल्या. म्हंणुन यावेळी अळुवड्या ऐवजी भाजी करावी असा विचार आहे. पण इथे आंबट चुका दिसत नाही. चुका न घालता करता येते का अळुची भाजी?

येते, चिंचेचा कोळ घाल.

अल्पना - चुका नसला तर पालक घाल मिळून यायला.

अरेच्च्या! माझं आणि रैनाचं एकाच वेळी वेगवेगळं उत्तर! Happy
आंबट चुकाच्या आंबटपणासाठी म्हणत असशील, तर चिंच घाल. मिळून यायला पालक घाल. दोन्ही घातलंस तरी हरकत नाही, दोन्हीचे काम वेगळे Happy अळूच्या वड्यांना चिंचेचा कोळ लावतो, म्हणून भाजीत चुक्याऐवजी आंबटपणासाठी आणि खाजू नये यासाठी चिंच घालता येते.

धन्यवाद रैना, पूनम. पालक मिळेल नक्की अन चिंच तर आहेच. बर्‍याच वर्षांनी अळुची भाजी खायला मिळेल. Happy

अळू खाजरा असेल तर तो चिरुन थोडावेळ चिचेच्या पाण्यात ठेवावा. मग खळबळून धुवुन वापरावा. खाजरा अळू चिरताना, हाताला खाज येते. त्यावेळी देखील हाताला चिंचेचे पाणी लावावे. खाजरा अळू आणि पलक या दोन्हीत कॅल्शियम ऑक्झॅलेट चे स्फटीक असतात. त्यानेच खाज येते. चिंचेच्या पाण्यात ते विरघळतात. अळुच्या भाजीत चण्याची डाळ, दाणे व खोबरे अवश्य घालावे. बेसन किंवा तुरीचे वरणही घालावे. पण किडनी स्टोनचा त्रास असलेल्यानी, जरा जपून.

अगदी मोठ्या पानाचा जो अळू असतो त्याचे कंद कासाळू म्हणुन गोव्यात खातात. तो कंद महिनाभर तसाच ठेवला कि त्याचा खाजरेपणा जातो.

आमच्याकडे भाजीचा अळू नी वडीचा अळू असे असायचे. भाजीचा हा नेहमी हिरवा देठाचा असतो. तर जो जांबळट हिरवट तो वडीला वापरयाचा. हा कमी खाजरा असतो म्हणून वडीला. हिरवा देठाचा नाहीतरी चिंचेत शिजवतो तरच खाज कमी होते. वडीच्या अळूत फक्त पाणी घालतो तेव्हा कमी खाजराच घेतलेला बरा. एक भाजीवाली असे दोन अळू आणून द्यायची दादरला असताना.

हो आणि ज्यास्त ऑकझेलेट ने घसा बसायची शक्यता असते. तेव्हा वडीचा अळू खाजरा कमी असला तरी आधी चिंचेच्या पाण्यात मागच्या जाड शिरा वरच्या वर कापून्(पान न फाडता) बुडवून ठेवते मी. मला इथे चायनीज दुकानात उलट जांबळट अळूच मिळतो.

ह्याच्यावरून आईचा कायम डॉयलॉग जर चूकून हिरवा अळू आणला दुसर्‍या कोणी व आम्ही हट्ट केला की वड्या कर म्हणून, तर ती, काय खाशील तू.... कितीही भिजवा चिंचेत.. तो वडीचा अळू नाहीये.(एकदम कडक आवाजात.)

दोन्हीची अळूची चव थोडी वेगळी असतेच.

वडीचा अळू जरा जाड पानाचा असतो. भाजीच्या अळूत हिरव्या देठाचा आणि काळ्या देठाचा असे दोन्ही प्रकार आहेत. तसेच रामअळू, झाडावरचा अळू पण असतो, हा दुसर्‍या झाडावर वाढतो. भाजीच्या अळूचे देठ मऊ असल्याने भाजीत वापरता येतात. वडीच्या अळूच्या देठांची, देठाळी नावाची भाजी, किंवा उकडून भरित करतात.

हॉट प्लेट रोजच्या स्वयपाकासाठी वापरला तर चालतो का? चान्गली कम्पनी कुठली ?

या वेळेस सामानात चुकून साध्या रव्या ऐवजी इडली रवा आला आहे.
याचं मला काय काय करता येइल? recipe links कुणि देउ शकेल का?
धन्यवाद

या वेळेस सामानात चुकून साध्या रव्या ऐवजी इडली रवा आला आहे
>> इडल्या करता येतील Happy

एक वाटी उडीद डाळ पाच सहा तास भिजत घालायचे. त्यामधे तीन वाटी इडली रवा मिक्स करून मिक्सरला वाटायचे. थोडासा शिजलेला भात पण यामधे घालायचा. आणि घट्ट झाकून ठेवून द्यायचे रात्रभर. सकाळी चवीपुरते मीठ घालून इडली पात्रात घालून इडल्या करायच्या. चटणी सांबार सोबत खायच्या Happy

इडली रव्याच्या इडल्याच चांगल्या होतात !!!
त्याचा भाजून शिरा, खांडवी वगैरे करता येते.
उपम्यासारखा प्रकार पण करता येतो.

मागे मनुनी किंवा अजुन कुणी तरी शिळ्या भाताची काहीतरी पाककृती लिहिली होती. आंबवुन करायची कृती होती बहुतेक. कुणाला आठवतेय का? मला शोधण्यासाठी नाव पण आठवत नाहीये.

Pages