Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स प्रीती , अभिजित लसून
धन्स प्रीती , अभिजित
लसून घालुन कधी केलं नाही .. करुन बघते..
भारतात क्राफ्ट चीज मिळते (
भारतात क्राफ्ट चीज मिळते ( चेडार ), चवीला ते चांगले आहे. मी भारतात तेच वापरतो. मोठ्या दुकानात, ब्री पासून सगळी चीज उपलब्ध आहेत. देशी पनीरसुद्धा चालेल.
अहो इथे कून्नूर( उटी जवळ) एक
अहो इथे कून्नूर( उटी जवळ) एक जोड्पे आहे ते चीज बनवतात त्यान्चा धंदाच आहे.ते कसे असते माहित नाही. धन्यवाद.
अरवीची भाजी कशी बनवतात? मी
अरवीची भाजी कशी बनवतात? मी अजुन कधी खाल्ली पण नाहीये. गेल्या आठवड्यात मोठ्या दिरांनी भाजी घेतली होती, त्यात अरवीपण आहे. कशी बनवायची माहित नसल्याने इतकेदिवस ति भाजी करायचे ताळले होते. आता मात्र तेवढी एकच भाजी घरात शिल्लक आहे.
अल्पना, उकडलेल्या
अल्पना, उकडलेल्या बटाट्यांसारखी करतात. उकडून साल काढून, धूवून करावी. गुळमट लागते पण.
हं.. बघते आज करुन.. सासरी फोन
हं.. बघते आज करुन.. सासरी फोन केला होता, कशी करतात अरवी विचारायला.. तर चुलत सा.बाईंचे उत्तर, छिलके उतारके काट के फ्राय करो और फिर हम जैसी सब्जी बनाते है वैसी बनाओ.. खुप खोदुन खोदुन विचारल्यावर सांगितले, प्याज्-टमाटर का मसाला बनाना और थोडा आमचुर भी डालना..
काळजी घे, कधी कधी खाजरे पण
काळजी घे, कधी कधी खाजरे पण असु शकते. आमचुर त्यासाठीच सांगितली असणार...
हो..
हो..
खुप खोदुन खोदुन विचारल्यावर
खुप खोदुन खोदुन विचारल्यावर सांगितले, प्याज्-टमाटर का मसाला बनाना और थोडा आमचुर भी डालना..
>>>>>>
हे म्हणजे जुने खां साहेब काही 'चीजा' शिष्यांपासून चोरून ठेवायचे तशातलाच हा प्रकार दिसतोय
माझ्या आते सासुबाई आणि दीर
माझ्या आते सासुबाई आणि दीर येतायत माझ्याकडे ८ दिवस रहायला ,मला टिकाउ असे काय काय पदार्थ करुन ठेवता येतील आगोदरच्.जे ब्रेकफास्ट किवा मधल्या वेळच खाण होउ शकतील?
आदरतिथ्य करायलाच हवय्,कारण भारतात परत गेल्यावर त्या सगळ्या नातेवाइकान्ना सान्ग्णार्.....सो इज्जत का सवाल है!
अल्पना अरवीची भाजी इथे आहे बघ
अल्पना अरवीची भाजी इथे आहे बघ दिनेशदां नी लिहिलेली.
तोशवी, १. मिसळिसाठी मटकी मोड
तोशवी,
१. मिसळिसाठी मटकी मोड आणून आणि बाकी तयारी करून ठेवू शकतेस.
२. दाबेली मसाला असेल तर सारण अगदी झट्पट होतं. आणि दाबेली पोटभर होते / बाहेर न्यायला सोपी पडते.
३. ब्रेकफास्ट ला इडली-सांबार करता येईल. सध्या उन्हाळ्यामुळे पीठ आंबेल पण व्यवस्थित.
४. रवा भाजलेला असल्यास शिरा/ उपमा लवकर होईल.
५. चिवडा, भडंग, हे करून ठेवू शकतेस.
अजून आठवेल तसं सांगते.
६. ठेपल्यांचे किंवा
६. ठेपल्यांचे किंवा थालीपिठाचे पीठ भिजवुन ठेवु शकतेस.
७. गिट्स किंवा दीप चे ढोकळ्याचे पाकिट आणुन ठेवु शकतेस. ऐन्वेळी २०-२५ मिनिटात नाष्टा तयार.
८. सगळे देशीच पदार्थ करायचे असे नसेल तर जेवणात पास्ता, फहिता असे सुटसुटीत पदार्थ करता येतील. त्यासाठी लागणार्या भाज्या आणुन चिरुन झिपलॉक मधे ठेवल्या तर पटकन काम होईल.
९. दुधी/झुकिनीचे मुठिया/मुटके वाफवुन ठेवु शकतेस.
१०. दोनेक डाळी शिजवुन ठेवु शकतेस. ऐनवेळी साधी आमटी/रस्सम्/सांबार करणे. डाळ-पालक करणे यासाठी अत्यंत उपयोग होतो.
प्राजा ,कराड्कर आभार! आज
प्राजा ,कराड्कर आभार!
आज चिवडाच घेतलाय करायला.
मुठीया दाबेली ची आयडीया झक्कास्.प्रवासात तर छानच होइल.
आणि कुणाला घारगे/भोपळ्या च्या पुर्यान्ची रेसिपी माहित आहे का?
त्या टिकतील का?१-२ दिवस?
कोणी मला मेत्कुटाची रेसीपी
कोणी मला मेत्कुटाची रेसीपी सन्गु शकेल का?...मी अमेरिकेत असते आनि मला इथे कुठल्याही ग्रोसरी स्टोर मधे मिळालं नाही.
सायली एवढे सगळे करण्यापेक्षा
सायली एवढे सगळे करण्यापेक्षा सुमा फुड्स कडून मागव मेतकूट न्यु जर्सीहुन. मला वाटते त्यांची साइटपण आहे सुमाफुड्स.कॉम म्हणुन
केप्रचे मेतकुट बर्याच देसी
केप्रचे मेतकुट बर्याच देसी ग्रोसरीस्टोर मधे पाहिलेय मी.
तोशावी, ही बघ जुन्या
तोशावी, ही बघ जुन्या हितगुजवरची बी ने लिहिलेली आंबुसघार्या/भोपळ्याच्या पुर्यांची रेसिपी:
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/122107.html?1170458939
घारगेची रेसीपी ह्याच बीबी वर
घारगेची रेसीपी ह्याच बीबी वर मी कुठेतरी मागी लिहिली होती वाटते. मलाच मिळत नाही:)
कुणाला सफरचंदाचं लोणचं कसं
कुणाला सफरचंदाचं लोणचं कसं करतात माहित आही का?
चिन्नु, चिरुन फोडी कर, त्यात
चिन्नु, चिरुन फोडी कर, त्यात थंड केलेली मेथि, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी घाल. मीठ, लाल तिखट घाल. पण हे टिकणारे लोणचे नसते. पण मस्त लागते.
मिळाली मला घारग्यान्ची
मिळाली मला घारग्यान्ची रेसिपी,माय्बोली वरच!
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/82228.html?1112188852
मी मेतकूट लिहिले होते.
मी मेतकूट लिहिले होते. खालच्या चौकोनात ते लिहिल्यास ते सापडेल.
धन्यवाद मिनोती. टिकणारं
धन्यवाद मिनोती. टिकणारं सफरचंदाच लोणचं हवं आहे. खूप आहेत सफरचंद,
सफरचंद टिकवायचे बाकि काहि
सफरचंद टिकवायचे बाकि काहि प्रकार आहेत. ज्याम, चटणी करता येते, तसेच चकत्या करुन त्या वाळवता येतात.
OTG रेसिपी आहेत का कुणाकडे?
OTG रेसिपी आहेत का कुणाकडे? OTG मधे काय काय करु शकतो. मी केक आणि पिझ्झा केलाय. अजून काय करता येईल ?
पेस्ट्री शीट वापरून व्हेज पफ
पेस्ट्री शीट वापरून व्हेज पफ करायचे आहेत. कोणाला त्यातल्या भाजीची रेसिपी माहितेय का? मसाला कोणता घालायचा? कोण कोणत्या भाज्या वापरायच्या?
सोहा समोश्याचे (बटाटा+ मटार)
सोहा
समोश्याचे (बटाटा+ मटार) सारण घातले तरी चांगले लागतात व्हेजी पफ आणि सगळ्यांना आवडतात पण. त्या सारणाची कृती इथे असेलच कुठेतरी. याच पानाखालचा सर्च पर्याय वापरुन बघीतला का?
नाहीतर पालक + चीज, मश्रुम + चीज असेपण पर्याय आहेत आवडत असतील तर.
मी ह्य प्रकरे करते veg puff
मी ह्य प्रकरे करते veg puff stuffing:
Mix भाज्या - 1 cup (मटार्,गाजर्,कोर्न)
कान्दा-उभा चिरलेला.
बटाटा-उकडुन स्मश करुन.
फ्लोवर -बारिक चिरून
धणेजिरे पाउडर- 1 tbsp
जिरे - 1 tsp
गरम मसाला- 1 tsp or to taste
आल लसुण हिरवि मिरचीpaste - 1 tsp
कढिपत्ता - a few
तेल फोडणी साठी- 1 tbsp
सखर - चिमुट भर
मीठ चवीनुसार
या प्रमाणे फोड्णी करुन भाज्या परतून मसाले ई. टाकून्,सारण थन्ड झाल्यावर मग भरावे.
तू काहीही स्टफ करु शकतेस
तू काहीही स्टफ करु शकतेस त्यात पालक आणि चीज चे ही छान होतात.
Pages