वेगवेगळ्या प्रकाराच्या तव्यांबद्दल चर्चा

Submitted by रूनी पॉटर on 27 April, 2011 - 18:53

स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे या धाग्यावर परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात म्हणून हा वेगळा धागा काढला आहे.
इथे मुख्यतः पोळ्या, भाकरी, फुलके, पराठे, दोसे, उत्तपा, पुरणपोळी, खाकरा वगैरे प्रकारासाठी वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकारांच्या (लोखंडी, नॉनस्टीक, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड, अ‍ॅल्युमिनियम, माती, कास्ट आयर्न/बिड इ. इ.) तव्यांबद्दल तसेच कुठल्या तव्याची कशी काळजी घ्यावी, कसे वापरावेत इ. चर्चा अपेक्षित आहे.
स्वयंपाकाच्या इतर उपकरणांची चर्चा कृपया वेगळा धागा काढून त्या धाग्यावर करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती, तुझा आयडी हॅक झाला समजून मेधाने धन्यवाद गिळले. Proud
बाकी तवा दोन्ही बाजूनी वापरला तर खालच्या बाजूच्या गोष्टी गॅसला चिकटतील ना!

बाकी तवा दोन्ही बाजूनी वापरला तर खालच्या बाजूच्या गोष्टी गॅसला चिकटतील ना! <<< Proud
.. तवा उलटा वापरताना गॅस पण उलटा करायचा हे विसरलास वाटते..

>> बाकी तवा दोन्ही बाजूनी वापरला तर खालच्या बाजूच्या गोष्टी गॅसला चिकटतील ना!

Lol

बहुतेक कुठल्याही बाजूने वापरला तरी चालेल का असा प्रश्न असेल.

बेकन (Bacon) नीट भाजता येईल असा तवा सुचवा प्लीज. नॉनस्टीक मी वापरत नाही आणि लोखंडाच्या तव्याला बेकन चिकटुन राहते किंवा इवनली फ्राय होत नाही.

अमित Lol

बहुतेक कुठल्याही बाजूने वापरला तरी चालेल का असा प्रश्न असेल. >>>> करेक्ट सशल. थॅंक्यु स्वाती. तव्याच्या कडेला तेल साठुन रहाते म्हणुन विचारले.

लोखंडाच्या तव्याला बेकन चिकटुन राहते किंवा इवनली फ्राय होत नाही>> मी नेटवर वाचले होते कि बेकन आधी थंड तव्यावर तेल टाकून पसरवायचे आणि मग गॅस चालू करुन ते भाजावे. त्यामुळे ते तव्याला चिकटणार नाही.

धन्यवाद मेधा. माझ्याकडे एकच कास्ट आयर्न पॅन आहे जो मी फक्त डोश्यांसाठी वापरते (भारतातुन आणलेला). ईथे कुठे मिळेल कास्ट आयर्न पॅन?

हो ना. तेल वापरत नाही मी. भरपुर फॅट ऑलरेडी असते बेकनमध्ये म्हणुनच तवा शोधते आहे. Ikea मध्ये आहे पण तो नॉनस्टीक आहे.

राया,
कास्ट आयर्न पॅन वालमार्ट , टार्गेट , विल्यम सोनोमा वगैरे कुठेही मिळेल. Lodge cast iron म्हणून शोधा.

राया, मी Lodge चा तवा अ‍ॅमेझॉन वरुन मागवलेला १२$ ला होता पण जरी तो सिझन्ड असला तरी पुन्हा नीट घासून सिझन करावा लागतो.

साधा लोखंडी तवा कसा सीझन करावा? एक पोळी चा आणी एक भाकरी चा नविन घेतला आहे. कास्ट आयर्न सारखे तेल आणी कांदा गरम करायचा का?

पोळी आणि भाकरी जर तेलाशिवाय शेकणार असाल तर सीझन करायची गरज नाही. त्या तव्यांवर थालिपीठ / डोसे / पराठे असे काही करु नका. कोमट पाणी आणि भांडी घासायचा सौम्य साबण वापरून स्वच्छ धुवून कोरडा पुसून घेतला तर बस.

कॉस्टको मधले ट्रॅमोंटिना पॅन्स पराठे, थालिपीठ , डोसे या साठी वापरताना अतिशय हलक्या हाताने परतणे महत्वाचे आहे हे अनेक तवे खरवडले गेल्यावर मिळालेले ज्ञान आहे. घरात काही सदस्यांना ते पटत नाही. प्रत्येक गोष्ट जिवाच्या कराराने जोर एकवटून परतायची असते. नॉन स्टिक सेफ उलथणी वापरुन देखील तवे बरबाद झाले.

कास्ट आयर्न चे वजन ज्ये नांना झेपणारे नाही. ते तवे हाताळण्याच्या भानगडीत त्यांनाच कुठेतरी दुखापत होण्याची शक्यता जास्त. शिवाय ते जड तवे आणि ग्लास कूक टॉप हे समीकरण देखील काळजी करण्यायोग्यच.

गेल्या महिन्यात कॉस्टकोमधेच सिरॅमिक तवे दिसले. जराशा अनिच्छेनेच ते तवे आणलेत. डोसे , पराठे, थालिपीठ, फिश वा श्रिंप फ्राय, केळ्याच्या फोडी, फ्रिटाटा वगैरे प्रकार करुन पाहिले आतापर्यंत.. सर्व काही कमी तेलात आणि अजिबात न चिकटतात सुटून येतात. साफ करायला पण एकदम सोपे आहेत.

गॉथम स्टील सिरॅमिक पॅन्स असे नाव आहे. कॉस्टको कडून अथवा त्या निर्मात्याकडून कसलेही कमिशन मिळालेले नाही, मिळणार नाही Happy

मेधा - लगेच उत्तर दिल्याबद्द्ल धन्स... तव्यावर काळा थर दिसतो, लिंबाने साफ करावा का?
जर पोळी भाकरी शिवाय बाकी पदार्थ करायचे असतील तर?
ट्रॅमोंटिना - पाहेन कसे आहे ते
मराठी लिहिणे आवघड जातय...

आजी, लोखंडी तव्यात चिंच भिजत घालायची रात्रभर. स्वच्छ होण्यासाठी.
मेधा Happy नॉन स्टिक तवा मी दर दोन महिन्याला एक आणायचा अस ठरवून टाकलय. अ‍ॅमेझॉन वर ऑटो डिलिव्हरीवर टाकेन थोडे दिवसानी. Happy
सुगरण नसल्यामुळ ,खराब होतातच ते. Sad

लॉज चा कास्ट आयर्न तवा चान्गला आहे मी पोळ्याना वापरतेय त्यावरच, पराठे, थाळिपिठ वैगरे होतात.

लॉज चा कास्ट आयर्न तवा चान्गला आहे मी पोळ्याना वापरतेय त्यावरच, पराठे, थाळिपिठ वैगरे होतात.>>>
हो. मी लिहिलेलं पुर्वी इथे कुठेतरी. तापमान व्यवस्थित ठेवल तर बेस्ट आहेत ते. डोसा पण चांगला होतो त्यात. रवा डोसा करून बघ.
पण तरीपण मला एक नॉन स्टिक लागतो. पॅटीस, पॅन केक ,कटलेट वगैरे साठी. आणि कधी कधी कास्ट आयर्नचा कंटाळा येतो. असाच .काही कारण नाही. Happy
मुळात भांडी गोळा करण्याची भारी हौस आहे. परवा एक जाळी घेवून आली आहे. बहुदा किचनएड ब्रँड. नविन घरातला स्टोव्ह मोठा आहे. फोडणी टाकली कि पुसु पर्यंत नाकी नऊ येत होते. ही जाळी ठेवली कि पदार्थ स्प्लॅटर होवून स्टोव्ह मेसी होण्याचे प्रमाण ५०% तरी कमी झाले आहे.

नव्या लोखंडी कढया आणल्या आहेत. त्याला काळे वर्निश लावले आहे . कितीही घासून धुतले तरी अजून काळा रंग निघतोच आहे. काही उपाय?

@ सीमा
परवा एक जाळी घेवून आली आहे

कशी असते ते सान्गाल का ?

कढई special धागा आहे काय? मला कढई घ्यायची आहे. अलुमिनिम? स्टील? लोखंडी? Hard anodized होती आधीची 5 वर्ष वापरली आता खाचे पडलेत आणि nonstick प्रमाणे आतील white material दिसू लागला आहे. So आता hard anodized घेण्याचा मन होइना.
लोखंडी कढई बद्दल लिहा कोणी तरी. तसेच आई सासू वर्षानुवर्षे अलुमिनिम वापरात आहेत so त्या दोघीही मला अलुमिनिमच suggest करताहेत.

Pages