वेगवेगळ्या प्रकाराच्या तव्यांबद्दल चर्चा

Submitted by रूनी पॉटर on 27 April, 2011 - 18:53

स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे या धाग्यावर परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात म्हणून हा वेगळा धागा काढला आहे.
इथे मुख्यतः पोळ्या, भाकरी, फुलके, पराठे, दोसे, उत्तपा, पुरणपोळी, खाकरा वगैरे प्रकारासाठी वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकारांच्या (लोखंडी, नॉनस्टीक, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड, अ‍ॅल्युमिनियम, माती, कास्ट आयर्न/बिड इ. इ.) तव्यांबद्दल तसेच कुठल्या तव्याची कशी काळजी घ्यावी, कसे वापरावेत इ. चर्चा अपेक्षित आहे.
स्वयंपाकाच्या इतर उपकरणांची चर्चा कृपया वेगळा धागा काढून त्या धाग्यावर करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्युचुरा १००%. अगदी डोळे झाकुन घ्या. हा तवा आवडणार नाही असे होतच नाही. Futura is like Apple. एकदा त्यांचे प्रॉड्क्ट वापरले की परत कधीही दुसरे काही वापरावेसे वाटत नाही.
गेल्या ४-५ वर्षात मी इतक्या लोकांना फ्युचुरा तवे घ्यायला लावलेत की फ्युचुराने मला कमीशन द्यायला सुरूवात करायला हवी.

रचु, स्वयंपाकात वापरून झाली की लोखंडाची आणि बिडाची भांडी स्वच्छ धुवून अगदी कोरडीठाक पुसून तेलाचा हलका हात लावून ठेवावीत. नाही गंजत.

एक नॉन्स्टिक तवा घ्यायचाय. फार महागातला नकोय. पण सिरॅमिक कोटिंग, अ‍ॅल्युमिनियम, आणि काय काय दुनिया आहे, कंपन्या पण न ऐकलेल्या. पेपरफ्रायवर खूप जाहिराती आहेत सेलच्या, पण व्हरायटी पाहून जाम म्हणजे जामच कन्फ्युज झालेय. प्लीज मदत करा ना.

काल तुळशीबागेतुन बिडाचा एक आिण लोखंडी एक असे दोन तवे आणले आहेत. ते इथुन स्वच्छ आिण सिझन करून सिंगापुर ला घेउन जायचे आहेत. दुकानदारानी विटकरीनी घासुन तेल लावुन मग वापरायला सांगीतलय. कांदे व तेलानी पण सिझनींग करु का? शिवाय बिडाचा तवा दोन्ही बाजुंनी वापरला तरी चालेल का?

. कांदे व तेलानी पण सिझनींग करु का? >>>>>>> ५-६ दिवस तवा तापवून मीठ घातलेल्या पाण्यात कांदा बुडवून तवाभर फिरवा.त्यावर तेल घाला.जरावेळ राहू द्या.तवा थंड झाल्यावर घासा.शेवटच्यावेळी तवाएकदम साफ करू नका.जरासा तेलकट राहू द्या.

शिवाय बिडाचा तवा दोन्ही बाजुंनी वापरला तरी चालेल का?>>>>>>> एकाच बाजूने वापरतात.

अप्पे करायचा तवा असतो तत्सम काही अमेरिकेत मिळेल का ? काय नावाने शोधू ? ऑफिसात एकाला अप्पे पात्रात फलाफल करायची आयडीया सांगितली. तर तो म्हणे मला तवा मागवून दे Happy

मेधा, Ebelskiver pan या नावाने शोधा. ॲमॅझाॅनवर मिळेल.

>>शोनू, टाकोयाकी (Takoyaki) मेकर/पॅन म्हणून सर्च कर अ‍ॅमेझॉनवर.>> आधी ताकोयाकी असे दहा वेळा म्हणून मगच ऑर्डर टाका. Wink

सायो, रत्ना, धन्यवाद. इथे पोस्ट टाकल्या नंतर सहज appe pan असे गूगल केले. भरपूर लिंका मिळाल्या त्या सर्च मधून सुद्धा.

न्यु यॉर्क मधे जपानी टॅक्सीवाला Happy

बेकन (Bacon) नीट भाजता येईल असा तवा सुचवा प्लीज. नॉनस्टीक मी वापरत नाही आणि लोखंडाच्या तव्याला बेकन चिकटुन राहते किंवा इवनली फ्राय होत नाही.

Pages