Submitted by रूनी पॉटर on 27 April, 2011 - 18:53
स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे या धाग्यावर परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात म्हणून हा वेगळा धागा काढला आहे.
इथे मुख्यतः पोळ्या, भाकरी, फुलके, पराठे, दोसे, उत्तपा, पुरणपोळी, खाकरा वगैरे प्रकारासाठी वापरण्यात येणार्या वेगवेगळ्या प्रकारांच्या (लोखंडी, नॉनस्टीक, हार्ड अॅनोडाइझ्ड, अॅल्युमिनियम, माती, कास्ट आयर्न/बिड इ. इ.) तव्यांबद्दल तसेच कुठल्या तव्याची कशी काळजी घ्यावी, कसे वापरावेत इ. चर्चा अपेक्षित आहे.
स्वयंपाकाच्या इतर उपकरणांची चर्चा कृपया वेगळा धागा काढून त्या धाग्यावर करावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टाटा स्कायच्या शॉपिंग चॅनेलवर
टाटा स्कायच्या शॉपिंग चॅनेलवर एक डबल साइडेड पॅन दाखवतात. सँडविच टोस्टर सारखं पण आकार पॅनचा. त्यात चपाती पण भाजता येते. चपाती नाही परतायची, तर पॅनच परतायचं! जे पदार्थ परतताना तुटायची शक्यता असते त्यासाठी छान असं सांगितलं. जसं ग्रिल्ड फिश, पनीर टिक्की, कबाब...
सध्यातरी टीव्हीवर बघायलाच छान वाटतोय.
Electric Griddle आपल्या
Electric Griddle आपल्या पदार्थांसाठी (दोसे, धिरडे, पराठे) कितपत उपयोगी आहे? कोणी वापरली आहे का?
पारिजात बहुदा दीपांजलीने
पारिजात बहुदा दीपांजलीने याबद्दल लिहीलय मागच्या पानावर बघा.
डबल साइडेड पॅन इन्ट्रेस्टिंग
डबल साइडेड पॅन इन्ट्रेस्टिंग आहे. पुरणपोळ्या करायला बरा पडेल काय असा विचार करते आहे.
कॉईल असेल तर फ्युचुराचा कुठला
कॉईल असेल तर फ्युचुराचा कुठला तवा जास्त उपयोगी आहे हार्डा अॅनोडाइस्ड कॉनन्केव्ह कि फ्लॅट?? कॉनकेव्ह घेतला तर कॉइलवर नीट तापेल का??
पूर्वा कॉइल असेल तर फ्लॅट तवा
पूर्वा
कॉइल असेल तर फ्लॅट तवा घे. खोलगट घेतलास तर तो फक्त मध्यभागी जास्त तापतो आणि कडेला कमी त्यामुळे पोळ्यांचं तंत्र बिघडते.
माझ्याकडे फ्युचुराचा हा तवा आहे - एकदम सही आहे. अगदी 100% satisfaction, Highly Recommended.
मला देखिल तेच वाटलं.बरं झालं
मला देखिल तेच वाटलं.बरं झालं तू सांगितलंस रुनी
मी बीडाचं आप्पेपात्र घेतलय.
मी बीडाचं आप्पेपात्र घेतलय. पण आता मला ते बीडाचं नाहिये असं वाटतंय. लोखंडाचं असेल असं वाटतंय. ते खरंच बीडाचं आहे का नाही कसं ओळखायचं?
~साक्षी.
नॉनस्टिक भाण्डी किती वेळ
नॉनस्टिक भाण्डी किती वेळ वापरवी? आतले आवरण निघायला लागले की टाकावी का?
हो दीपा नॉनस्टीक भांड्याच्या
हो दीपा नॉनस्टीक भांड्याच्या कोटींगला ओरखडे पडायला सुरूवात झाली की ती टाकून द्यावीत. आरोग्यासाठी हाणीकारक असते. non stick surface+health असे गुगल केलेत तर बर्याच लिंक्स सापडतील.
नॉनस्टीक भांड्यांसाठी लाकडाचे चमचे वापरले व साबणाच्या पाण्याने स्पंजने साफ केले तर ३-४ वर्ष सुद्धा कोटींगला काही होत नाही.
बर्याचदा स्टीलचे चमचे या भांड्यात वापरणे, धुतांना वायरच्या घासणीने भांडे घासले जाणे इ. मुळे ओरखडे पडतात.
हल्ली आलेली Orgreenic किंवा
हल्ली आलेली Orgreenic किंवा StoneDine वापरलीत का कोणी? त्याची खूप जाहीरात असते ..
ध्न्यवाद रूनी
ध्न्यवाद रूनी
लोखंडी तव्यावर गंज आलाय...
लोखंडी तव्यावर गंज आलाय... कसा काढू? की फेकून द्यावा लागेल?
बाफ वाचून अजूनच गोंधळ उडाला
बाफ वाचून अजूनच गोंधळ उडाला आहे.
माझ्याकडे पोळ्यांसाठी मस्त लोखंडी तवा आहे. डोसे/धिरडी यांसाठी एक निरालीचा नॉनस्टिक कॉनकेव्ह तवा आहे. पण त्याच्यावर हल्ली डोसे नीट होत नाहीत. म्हणजे एका बाजूला जरा कच्चाच राहतो डोसा. असे कशामुळे होत असेल? तवा कॉनकेव्ह आहे म्हणून होते का? की पॅकिंगमध्ये आकार बिघडला असेल तव्याचा?
तर आता मला नवा तवा घ्यायचा आहे. फक्त डोसे/धिरडी/ आंबोळ्यांसाठी. फ्युचुराचा तवा घेणार हे नक्की आहे, फक्त तो कॉनकेव्ह घ्यावा की फ्लॅट? हार्ड अॅनोडाइज्ड की नॉन स्टिक हा प्रश्न पडला आहे.
बाफवरील सुरुवातीच्या बर्याच पोस्टी कॉपी-पेस्ट असल्याने तिथे दिलेल्या लिंका बघता येत नाहीयेत.
@ प्राची - निर्लेप ची नविन
@ प्राची - निर्लेप ची नविन नॉनस्टिक ची रेंज आहे .. त्यातला डोश्याचा तवा फार्रच मस्स्त आहे, कडेला तेलाचे डाग रहात नाहीत, कुठचाही चमचा वापरला तरी चालतो.
धारा, तेल लावून घासून / चोळून
धारा, तेल लावून घासून / चोळून जातोय का तो गंज?
हेही बघ : http://www.ehow.com/how_114309_remove-rust-cast.html
माझ्याकडे पिजन कंपनीचा
माझ्याकडे पिजन कंपनीचा nonstick तवा आहे, डोसे, आंबोली,ओम्लेट कटलेट सगळे त्यावरच करते. अजून एकही ओरखडा नाही. बाईला देऊनसुद्धा. निर्लेप्पेक्षा स्वस्त आणि prestige पेक्षा टिकाऊ.
http://www.walmart.com/ip/Lod
http://www.walmart.com/ip/Lodge-10-1-2-Cast-Iron-Griddle/5969629
हा Cast Iron Griddle घेतेय पोळयांसाठी. लो़खंडी तवा सीझन कसा करवा?
रोज वापरानंतर काय काळजी घ्यावी?
डोसे, उत्तपे, वगैरे पण करता येतील का यावर?
Hard Anodised Futura tava
Hard Anodised Futura tava पराठा, पोळी,डोसा,धिरडी अशा सगळ्यासाठी वापरता येतो का? कोणाचा काही अनुभव.
इथे लिहायचेच राहिले
इथे लिहायचेच राहिले होते.
मग तो तसाच ठेवुन अजुन एक हँडलवाला साधा लोखंडी मधे किंचीत खोलगट असलेला तवा आणला. मस्त चपात्या , फुलके होतात त्यावर. कोटिंगच्या तव्यापेक्षा सुरुवातीला तापायला किंचीत वेळ लागतो पण नंतर काही त्रास होत नाहीये.

इथल्या चर्चेनंतर अश्विनीने सांगितल्याप्रमाणे मी जांभळी नाक्याचा आसपास मी तवा पाहिला आणि बीडाचा तवा घेतला. नंतर माझ्या लक्षात आले कि त्यावर फुलके करता येणार नाहीत कारण तो सांडशीने एका हाताने उचलतच नाही
हे ब्रँडेड तवे नाहीत. हँडलवाला तवा १२०रु ला आणि बीडाचा ९०रु ला घेतला.
माझ्याकडे साधा अल्युमिनेइमचा
माझ्याकडे साधा अल्युमिनेइमचा तवा आहे. स्वच्छ घासला तरीदेखील, त्यावर बोट फिरवलं की करडा चमकणारा मेटल रस्ट निघतो. काही उपाय आहे का? की तो खराब झालाय आणि नवीन घ्यावा लागेल?
फुचरा चा हार्ड आयोनाइज्ड की
फुचरा चा हार्ड आयोनाइज्ड की नोन स्टिक तवा दणकट आहे ??डोसे वगैरे साठी काय घ्यावे ?? chapati साठी मी लो़खंडीच घेतला आहे ..omlette लो़खंडी तव्यात उत्तम येते . अनुभव आहे .. नोन स्टिक मधेय इकडे तिक्डे जाते .. सगळा आकार बदलतो ..कामवाली बाइ ने नोन स्टिक खराब करुन टाकला आहे ..
अॅल्युमिनिएम हवेशी रिअॅक्ट
अॅल्युमिनिएम हवेशी रिअॅक्ट झाले कि ऑक्साइडचा थर जमणारच. तो सूक्ष्म स्वरूपात पोळीस लागून रोज पोटातही जाईल. लोखंडी तवा वापरलेला बरा. किंवा फ्युचुराचा अॅनोडाइज्ड.
नॉन स्टिक तवा मी आता घासतच नाही. स्वच्छ पुसून घेते. सेल्यूलोज वाइप आणी टिश्यूने.
खूप धन्यवाद अश्विनीमामी
खूप धन्यवाद अश्विनीमामी
लोखंडाचा किँवा हार्ड अनोडाइजड् तवा घेते लवकरच.
नॉन स्टिक तवा न घासण्याची आयडीआ पण चांगली आहे. पण मग तो फक्त पोळ्यासाठीच वापरावा लागेल ना? थालीपीठ, धपाटे, ऑम्लेट, अंबोळी केल्यास फक्त पुसुन घेतल्याने स्वच्छ होईल का?
माफ करा मी नुकतीच स्वयंपाकाला सुरुवात केलीय त्यामुळे एवढे प्रश्न पडतायत.
नॉन्स्टिक चे विक्रेते सांगतात
नॉन्स्टिक चे विक्रेते सांगतात की तवा गरम असताना तो अजिबात पाण्यात बुडवू नका. थंड झाल्यावर पाण्याने साफ करा हवं तर. शिवाय फार तापवू नका असंही सांगतात. दोन पोळ्यांच्या मध्ये तवा रिकामा राहू नये या साठी पाच सहा पोळ्या लाटून तयार ठेवाव्या आणि एकापाठोपाठ एक अश्या भाजाव्या. आमच्या बाई असंच करतात. बाकीचे माहीत नाही.
आंबोळ्यांसाठी वेगळा तवा मिळतो
आंबोळ्यांसाठी वेगळा तवा मिळतो का? बिडाचा नकोय.
घरात एक निर्लेपचा तवा आहे पण साबांच म्हणणं आहे की या डोशाच्या तव्यावर आंबोळी नीट होत नाही. त्या कोणाकडे तरी आंबोळी स्पे तवा बघुन आल्यात. मला तरी असे काही असते हे माहीत नाही. इथे कोणाला माहीत आहे का?
तुम्ही लोक डोशाच्या तव्यावरच आंबोळ्या करता का?
रोटीमेकरची चर्चा कोणत्या
रोटीमेकरची चर्चा कोणत्या धाग्यावर झाली होती ?
इथल्या रिव्ह्यूजबद्दल
इथल्या रिव्ह्यूजबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
इथले रिव्ह्यू वाचून आज मी,
http://www.walmart.com/ip/Lodge-10-1-2-Cast-Iron-Griddle/5969629
हा तवा घेतला. वापरून मग कसा वाटला ते लिहिन.
Thanks मैत्रिणींनो
माझ्याकडे सध्या फुलक्यांसाठी
माझ्याकडे सध्या फुलक्यांसाठी एक लोखंडी आणि २ जुने (वर्ष- दिड वर्ष) स्टिक तवे आहेत. इतके दिवस पोळ्याला बाई होती, ती लोखंडी तवाच वापरायची. आता मी फुलक्यांसाठी लोखंडी तवा वापरून बघितला पण तो कायच्या काय जड असल्याने, एका हातात पकडून आचेवर फुलके शेकणं मला जमत नाहीये. आणि त्यात तवा गरम होवून मधूनच फुलका चिकटण्याचे प्रकार पण होतात.
गेले काही दिवस नॉन स्टीक तवा वापरून बघितला. फुलके तर छान होतात पण गॅसचं बर्नर आणि तवा खालून काळा होतोय काजळी साठून. नवर्याचं मत हे तव्यामूळेच होतंय. मला एकदा वाटलं की डायरेक्ट बर्नरवर फुलके शेकल्यामूळे होतंय की काय, पण पोळ्यावाली बाईसुद्धा तसेच फुलके शेकायची आणि त्यावेळी बर्नर काळा होत नव्हता.
नक्की कशामूळे असं होत असेल? जर तवा बदलायचा झाल्यास कोणता वापरावा? ख॑रंतर अजून एक कोराकरकरित निर्लेप तवा आहे, पण तोसुद्धा खालून काळा होईल की काय भितीने अजून वापरायला काढलाच नाहीये.
पुर्वी फ्युच्य्राचा तवा वापरून बघितला आहे. पण तो पण बर्यापैकी जड असतो म्हणून फुलक्यांसाठी घ्यावा की नाही कळत नाहीये.
फ्युचुराचा तवा फुलक्यांना
फ्युचुराचा तवा फुलक्यांना मस्त पडतो. माझ्या घरी आणि आईकडे २००५ पासून वापरतोय तो आम्ही. पण त्याने बर्नर काळा होतो की नाही हे नाही पाहिलं.
Pages