वेगवेगळ्या प्रकाराच्या तव्यांबद्दल चर्चा

Submitted by रूनी पॉटर on 27 April, 2011 - 18:53

स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे या धाग्यावर परत परत तेच तेच प्रश्न विचारले जातात म्हणून हा वेगळा धागा काढला आहे.
इथे मुख्यतः पोळ्या, भाकरी, फुलके, पराठे, दोसे, उत्तपा, पुरणपोळी, खाकरा वगैरे प्रकारासाठी वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या प्रकारांच्या (लोखंडी, नॉनस्टीक, हार्ड अ‍ॅनोडाइझ्ड, अ‍ॅल्युमिनियम, माती, कास्ट आयर्न/बिड इ. इ.) तव्यांबद्दल तसेच कुठल्या तव्याची कशी काळजी घ्यावी, कसे वापरावेत इ. चर्चा अपेक्षित आहे.
स्वयंपाकाच्या इतर उपकरणांची चर्चा कृपया वेगळा धागा काढून त्या धाग्यावर करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

burner tawyamule kala padat nasawa.
cylinder sampat ala asel kinwa gas impurities adu shaktat.

माझा फुच्युराचा तवा २-३ वर्षांपूर्वी (१०+ वर्ष वापरून) बाद केला मी. त्यानंतर बाईच पोळ्या कराय्ची आणी तिला लोखंडी तवा हवा होता म्हणून लोखंडी तवा आणला. नॉन स्टीक तवे दोसे, धिरडी आणि कधीतरी मला फुलके करावे लागले तर म्हणून ठेवले होते.
फ्युचुराचा तवा कितपत जड असतो हेसुद्धा आठवत नाहीये. सकाळच्या गडबडीच्या वेळी सगळ्या बर्नर्सवर काही ना काही असतं, त्यामूळे फुलके शेकताना तवा हातातच ठेवावा लागतो. जड असेल तर उगीच अजून चीडचीड व्हायची. Sad
अणि तो बर्नर काळा पडायचा प्रॉब्लेम कशामूळे असेल?

बर्नर स्वच्छ करून बघितलं. ज्या बर्नरवर फुलके करतेय तोच काळा पडलाय. दोन दिवसांपासून दुसर्‍या बर्नरवर फुलके करायला सुरवात केली तर आता त्यावर पण थोडी काजळी आलीये.

हां, सिलेंडर मात्र संपत आला असणार. येत्या ५-१० दिवसात संपायला हवा नेहेमीच्या कॅलक्युलेशन्स प्रमाणे. पण मग फक्त तेवढाच बर्नर का काळा पडतो हा ही प्रश्न आहेच.

तरी, अजून एकदा सगळे बर्नर स्वच्छ करून, नवं सिलेंडर लावून, नव्या तव्यावर फुलके करुन बघते. Proud

बाईंपेक्षा तू जास्त पिठी/कणीक वापरत असशील का फुलका लाटताना? डायरेक्ट भाजताना ते जास्तीचं पीठ बर्नरवर पडून असं होऊ शकेल.

swati +1

तवा ठेवल्यावर किंचीतशी यलो येतेय मधूनच. पण एरवी ब्ल्यु.
बाईपेक्षा जास्त पिठी वापरते का माहित नाही खरं तर. पण बाईनी पोळ्या करून गॅस साफ केल्यावर पण सगळीकडे पीठ दिसायचं, मी केल्यावर तितकंसं दिसत नाही. पण तरी अजून कमी पिठी वापरुन बघते आणि १-२ दिवस फुलक्यांऐवजी चपात्या करून बघते. म्हणजे कळेल नक्की काय होतंय.

थँक्स. Happy

स्वाती+१. अल्पना, लोखंडी तव्याला जास्त मोठा गॅस केला तर फुलके चिकट्तात. तवा गरम झाला कि गॅस लो पेक्षा जरा जास्त ठेवायचा. एकदा तव्याचं तापमान जमलं कि मस्त होतात फुलके, जरा अंदाज यायला ३-४ दिवस लागतात.

मी आठवडाभरापूर्वी हँडल असलेला चांगला जड अ‍ॅल्युमिनियमचा ( दिसताना अगदी चांगल्या क्वालिटीचा वाटणारा ! ) तवा घेतला. पोळ्यांच्या बाई गॅस मोठा ठेवून पोळ्या करतात, ऐकत नाहीत तर त्यांना द्यायला बरा पडेल ह्या हिशोबाने घेतला. आईकडे वर्षानुवर्षं अ‍ॅल्युमिनियमचा तवा चालतो आहे म्हणून घेतला.
कास्ट आयर्नसारखा पहिल्यांदा सीझन करावा लागतो का ह्याची कल्पना नव्हती म्हणून नुसताच साबणाच्या पाण्याने धुवून बाईला वापरायला दिला तर पोळ्या चिकटल्याही आणि तव्यावर बरेच काळे डाग पडले. मग दुसर्‍यादिवशी तेलाचा हात फिरवून मंद आचेवर थोडावेळ ठेवला आणि पुसून घेतला तरी पोळ्या केल्यावर काळे डाग ( हाताला जाणवणारे ) आलेच. मग तीन-चार दिवस घाबरुन काढलाच नाही.
चिंचेचं पाणी लावून किंवा तारेची घासणी वापरुन हे डाग सहज गेले नाहीत, खूप जोर लावून घासावे लागले. घासल्यावर बोटांची पेरं काळपट झाली.

बाई पिठीही खूपच जास्त वापरते पण तरी प्रत्येक वापरानंतर इतका काळा पडतो का अ‍ॅल्युमिनियमचा तवा ? काहीतरी वाईट भेसळ असेल का तव्यात ह्या शंकेने मी घाबरले आहे. दुकानदार तवा परत घ्यायला तयार नाही Sad टाकून द्यावा का ?

त्याच तव्यावर मी पोळ्या केल्या तर इतका प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते पण भेसळीची भिती मनात आहेच.

अगो, हे तवे तापवून तापवूनच सीझन्ड होतात. सुरुवातीला गॅस एकदम बारीक ठेवून तवा चांगला तापवून मग वापरायला सांग. म्हणजे आधी तवा गॅसवर चढवायचा मग कणीक भिजवण्याचं काम करायला घ्यायचं. पहिली पोळी लाटून होईपर्यंत तवा चांगला तापतो. मग पोळ्या भाजताना गॅसच्या तंत्रानुसार मोठा-मध्यम-मंद करायचा.
त्यावर घासणीचे थोडे चरे पडू देत. तर सीझन होईल चांगला.
काळे डाग पूर्णपणे जाणार नाहीत, भाकरीसारखा दिसत असेल तवा.. तर दिसू देत.

विकत घेताना तरी अ‍ॅल्युमिनियम असं सांगून विकला त्याने. हे वेगवेगळे कसे ओळखायचे ते ही सांग आता Happy दोन्ही सारखेच दिसतात ना जवळपास ?

सुरुवातीला गॅस एकदम बारीक ठेवून तवा चांगला तापवून मग वापरायला सांग. पोळ्या भाजताना गॅसच्या तंत्रानुसार मोठा-मध्यम-मंद करायचा. >>> इथे खूपच प्रॉब्लेम आहे बाईच्या हातात तवा म्हणजे. गॅसला कमी-जास्त करायला नॉब असतो हेच तिच्या गावी नसतं. रोज तिच्या मागे उभं राहायचं तर पोळ्या मीच का करु नयेत ? असो. पहिल्यांदा तिच्याच हातात दिला गेला हे मेजर चुकलं बहुतेक.

खूप घासल्यामुळे आता थोडे चरे आलेच आहेत त्यावर. तिच्या हातात न देता काही दिवस मीच वापरेन तो. ते काळे डाग, घासताना हात काळे होणं, वापरल्यावर तवा काळा होणं ह्याची काळजी न करता तवा वापरु ना ?

अ‍ॅल्युमिनियम चा तवा खूप तापतो. मोठा गॅस ठेवून तापवण्यासाठी लोखंडाचा तवा बेस्ट. तापून करपत नाही, स्वच्छ पण लगेच होतो. माझ्याकडे चपाती करतात त्या ताई पण मोठा गॅस ठेवतात. जाडा अ‍ॅल्युमिनियम चा तवा खूप तापायचा आधी आणि करपायचा. आता लोखंडाचा तवा वापरल्या मुळे काही फरक पडत नाही.

हिंडालियम आणि अ‍ॅल्युमिनियम मधे काय फरक आहे?

माझ्याकडचा नॉनस्टिक निर्लेपचा तवा स्वैपाकाची बाई आणी आमची नवी भांडीवाली यांच्या कर्तृत्वात शहीद झालाय. सध्या पोळ्यांसाठी नेहेमीचा अ‍ॅल्युमिनियमचा तवा बाईला दिलाय. पण धिरडी आणि डोसे करण्यासाठी एक तवा घ्यायचाच आहे. बहुतांशी एकहाती वापर असेल.

तर परत नॉनस्टिक घेण्यापेक्षा हार्ड अ‍ॅनोडाईज्ड घेऊ का? त्यावर धिरडी, डोसे इ. प्रकाराला किती तेल लागतं? किती चिकटाचिकटी होते? जाणकार अनुभवी मंडळींनी प्रकाश टाकावा.

डोशांसाठी हा.अ‍ॅ.चा उपयोग नाही. त्यावर पीठ 'ठरत' नाही/पसरवता येत नाही. (मलातरी! :P)
डोसा/भाकरी वगैरे प्रकार ज्यात पसरवताना किंवा पाणी फिरवण्यासाठी पदार्थ जागीच ठरावा लागतो ते जमत नाही - सुळसुळ सरकते भाकरी. Happy

कोटिंग न गेलेल्या नॉनस्टिकवर धिरडी, डोसे न चिकटण्याची १०० % खात्री वाटते तशी हार्ड अ‍ॅनोडाईझ्डवर वाटत नाही मला तरी Happy

धन्यवाद, प्रीती.
जड असतो तवा ते माहित आहे पण नॉनस्टिक कोटिंग खूप नाजूक असतं आणि जरा ओरखडे पडले की मग आख्खा तवा कामातून जातो म्हणून चौकशी

अगो, म्हणून तर मीपण चौकशी करतेय. कुणीतरी नेहेमी अ‍ॅनोडाईज्ड वापरणार्‍या मंडळींकडून उत्तराची अपेक्षा आहे Happy

हार्ड अ‍ॅनोडाइज्ड बेस्ट.
असा 'आहाहा!' डोसा होतो, अ‍ॅबसोल्यूट विनातेलाचा. फकस्त मिठाचं पाणी, अन अगदी हवंच असेल तर थोडं तेल शिंपडणे.

बिडाचा तवा घ्यायला जरा शोधमोहीम काढायला लागेल. शिवाय त्यावर धिरडी-डोश्यांना व्यवस्थित तेल घालायला लागतं म्हणून नॉनस्टिक. अ‍ॅनोडाईज्ड वगैरे

इब्लिस, धन्यवाद Happy

http://www.amazon.com/T-fal-A8071584-Specialty-Nonstick-Dishwasher/dp/B0...

हा तवा गेले वर्षभर डोसे, धिरडी, थालिपीठ या करता वापरते आहे.
अगदी जास्त तापू न देणे, तेल बेताचेच वापरणे अन वापरुन झाल्यावर पेपर टावेलने पुसुन मग कोमट पाणी + डिश वॉशिंग सोप वापरुन मऊ स्पाँजने धुणे एवढं तंत्र सांभाळावं लागतंय. पॅनकेक्स पण एकदम मस्त होतात .

हार्ड अ‍ॅनोडाईज्ड बद्दल स्वाती सारखाच माझा पण अनुभव आहे .
डोसा, उत्तपा, तत्सम साठी माझे मत नॉनस्टिकलाच (निर्लेप वगैरे)

Pages