हार्मनी म्हणजे काय?

Submitted by गजानन on 24 April, 2011 - 11:26

पाश्चात्य संगीतातली हार्मनी (Harmony) म्हणजे काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसरंगी जुगलबंदीत एक पुरुष आणि एक स्त्री एक बंदिश षडज बदलून दोन रागात एकाच वेळी गातात.. स्वर तेच असतात, राग वेगळे-कारण षडज बदलतो.

http://www.youtube.com/watch?v=7rszGSATskw&feature=related

हे हार्मनीचे उदाहरण होऊ शकेल का?

जामोप्या,
मला असे वाट्टे की, जसरंगी जुगलबंदी हार्मनी होवू शकत नाही तत्त्वतः. मुळात पाश्चात्य संगीतात षड्ज बदलू शकत नाही. उदा. C हा नेहेमी पांढरी एकच रहातो. भारतीय संगीतात षड्ज बदलू शकतो.

<<मला असे वाट्टे की, जसरंगी जुगलबंदी हार्मनी होवू शकत नाही तत्त्वतः. मुळात पाश्चात्य संगीतात षड्ज बदलू शकत नाही. उदा. C हा नेहेमी पांढरी एकच रहातो. भारतीय संगीतात षड्ज बदलू शकतो.>>

ते दोन रागच हार्मनी मधे असतात ना !!

हार्मनी बद्द्ल अजुन थोडे .

काही गण्यात ताल वाद्य सा सोडून दुसर्याच स्वराशी जुळवलेला असतो. हा सुध्धा हार्मनी चाच प्रकार नाहि का ? उदाहतण म्हणून ही गाणी ऐका.
http://youtu.be/BBituRMF4ww
http://youtu.be/-7aFyFRcqXc

काही गण्यात गाण्याच्या ओळी बरोबर पार्श्व्सन्गीत चालु असते ते मूळ ओळीशी हार्मनी मधे असते. याचे सुन्दर उदाहरण म्हणजे "ने मजसी ने परत मात्रुभूमीला" हे गाणे आणी विशेश्तहा या गाण्यातील हीच ओळ.
http://youtu.be/5yKu1lOvMeA
अजून खूप काहि आहे बोलण्या सारखे.

Pages