वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वारली आदिवासी समाजाने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे. महाराष्ट्राच्या अनेक अनमोल कलांपैकी आहे ही 'वारली चित्रकला' -वारली चित्रलिपी .. जिव्या सोमा मशे या वारली चित्रकार पितामहांनी ही कला भारताच्या सीमेपार नेली. वारली चित्रे ही केवळ भिंती रंगवण्याची कला नसून वारली समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नपत्रिका छापण्याऐवजी त्या घरातील स्त्रिया शेणाने सारवलेल्या भिंतींवर लग्नाचा चौक चितारतात आणि सर्वांना कळते की य घरात लग्न आहे! एक चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते!.. उदाहरणार्थ, लग्नः लग्नाचा चौक, वाजंत्री, वराती, देवी, वरात,नवरा,नवरी.
त्रिकोण, चौकोन, वर्तूळ, रेषा यांनी बनलेल्या या सुंदर चित्रलिपींनी मला भुरळ घातली! सप्टेंबरमध्ये लग्न झाल्यावर मागील ३ महिन्यांपासून मी सध्या पूर्णवेळ 'बायको' च्या भुमिकेत आहे. लहानपणी अभ्यासाच्या आणि नंतर करियरच्या गोंधळात माझा चित्रकलेचा छंद हरवला होता. त्यात नियतीने मला आई होण्याचे स्वप्न दाखवून माझ्यापासून ते सुख दीड महिन्यातच हिरावून घेतले. स्वत:ला सावरताना माझ्या पतीदेवांनी आणि या छंदाने मला खूप मदत केली.
आत्ताच सुरुवात केली आहे......आवडली तर नक्की सांगा... मला आनंद होईल!
याला tree of life म्हणतात.
वारली चित्रकला
Submitted by अबोली on 23 April, 2011 - 09:09
गुलमोहर:
शेअर करा
अभिप्रा, आभार! तुझी चित्रे
अभिप्रा, आभार! तुझी चित्रे निव्वळ अलौकीक , अप्रतीम आहेत!
अदिती, ठँक्यू!!
अभिप्रा, आभार! तुझी चित्रे
अभिप्रा, आभार! तुझी चित्रे निव्वळ अलौकीक , अप्रतीम आहेत!
अदिती, ठँक्यू!!
अभिनंदन अबोली मस्त आहेत
अभिनंदन अबोली
मस्त आहेत चित्रे एकदम.. पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
Pages