वारली चित्रकला

Submitted by अबोली on 23 April, 2011 - 09:09

वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वारली आदिवासी समाजाने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे. महाराष्ट्राच्या अनेक अनमोल कलांपैकी आहे ही 'वारली चित्रकला' -वारली चित्रलिपी .. जिव्या सोमा मशे या वारली चित्रकार पितामहांनी ही कला भारताच्या सीमेपार नेली. वारली चित्रे ही केवळ भिंती रंगवण्याची कला नसून वारली समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नपत्रिका छापण्याऐवजी त्या घरातील स्त्रिया शेणाने सारवलेल्या भिंतींवर लग्नाचा चौक चितारतात आणि सर्वांना कळते की य घरात लग्न आहे! एक चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते!.. उदाहरणार्थ, लग्नः लग्नाचा चौक, वाजंत्री, वराती, देवी, वरात,नवरा,नवरी.
त्रिकोण, चौकोन, वर्तूळ, रेषा यांनी बनलेल्या या सुंदर चित्रलिपींनी मला भुरळ घातली! सप्टेंबरमध्ये लग्न झाल्यावर मागील ३ महिन्यांपासून मी सध्या पूर्णवेळ 'बायको' च्या भुमिकेत आहे. लहानपणी अभ्यासाच्या आणि नंतर करियरच्या गोंधळात माझा चित्रकलेचा छंद हरवला होता. त्यात नियतीने मला आई होण्याचे स्वप्न दाखवून माझ्यापासून ते सुख दीड महिन्यातच हिरावून घेतले. स्वत:ला सावरताना माझ्या पतीदेवांनी आणि या छंदाने मला खूप मदत केली.
आत्ताच सुरुवात केली आहे......आवडली तर नक्की सांगा... मला आनंद होईल! DSCN1047.JPG
याला tree of life म्हणतात.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर!

वारली आणि मधुबनी चित्रकला जगापुढे आणण्याचं श्रेय संपूर्णपणे (दिवंगत) चित्रकार भास्कर कुलकर्णींचे. जिव्या सोमा मशेची पुढील काळातली लोकप्रियता केवळ त्यांच्यामुळे. आयुष्य वेचलं भास्कर कुलकर्णींनी वारली आदिवासींकरता पण बिचार्‍यांच्या नशिबी दरभंगा येथे एकाकीपणे, विपन्नवस्थेत मरुन जाणेच होते. या उपकारकरत्याला खुद्द वारलीच विसरले तिथे बाकी जग काय लक्षात ठेवणार म्हणा.

खूपच सुंदर. Happy
अबोली, जोमाने चालू ठेव तुझी चित्रकला.
माझ्या एका मैत्रिणीने तिच्या घराच्या अंगणात असलेल्या नारळाच्या ३ झाडांच्या खोडांवर लाल-पांढर्‍या चुन्याने वारली चित्रं काढली होती. फार छान दिसायचं ते. Happy

बस्के, सहीच आहे हा मोर... की हा 'नील' आहे तुझा? Wink Happy

वारली आणि मधुबनी चित्रकला जगापुढे आणण्याचं श्रेय संपूर्णपणे (दिवंगत) चित्रकार भास्कर कुलकर्णींचे.<<<
खरंय शर्मिला. आज वारली आणि मधुबनी पेंटींग्ज करून तुंबळ पैसा मिळवणार्‍या अनेकांना कुलकर्णींचे नाव माहितही नसेल. त्याची गरजही वाटत नसेल. नावच माहित नाही तर त्यांच्या संशोधनाबद्दल आणि कामाबद्दल तर जाऊच देत.

या पार्श्वभूमीवर चिन्हने काढलेल्या भास्कर कुलकर्णींवरच्या अंकाचं महत्व खूप मोठं आहे.

अबोली, मस्तच आहे ट्री ऑफ लाईफ.
तो काळा पॉट मला कुणी बर्थडे गिफ्ट म्हणून दिला असता तर मला खूप आनंद झाला असता (इच्छुकांनी नोंद घ्यावी:) ). खूप सुंदर दिसतोय तो.
तू विकतीस वगैरे का हे सगळं रंगवून?
छंद खूप मदत करतात कशातूनही कुठल्याहे दु:खातून बाहेर पडायला. स्वतःला रमवते आहेस हे ठीकच. खूप शुभेच्छा!
आनंदी रहा!

सुंदर आहेत पेंटिंग्ज! माझ्या एका बहिणीने तिच्या बंगल्याच्या कंपाऊंडची एक अख्खी भिंतच रंगवली आहे वारली पेंटिंगने! हा त्या भिंतीचा काही भाग :

pv3.jpg

आणि हा आणखी एक भाग :

pv3 (1).jpg

अबोलि खुप छान
मि माझ्या लग्नाचे रुखवात वारलि पेंटिंगनेच भरले होते. पॉट पेंटिंग, पिलो कव्हर, फ्रेम खुप काहि बनवलं होत. त्याचिच आठवण झालि

सुरेख आली आहेत सर्वच चित्र.. अतिशय गोड माध्यम आहे 'वारली'.. साध्याच रेशा पण सर्व भाव व्यक्त करता येतील असं सामर्थ्य असलेल्या.. गेल्या दिवाळीत 'कोका-कोला'च्या जाहिरातीत वारली चित्रांचा कल्पक उपयोग करून घेतला होता. माझ्याकडे ठाण्याच्या मुलांकडून करून घेतलेलं मोठं पेन्टिंग आहे वारलीचं.. अप्रतिम सुंदर आहे. तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा..

सर्वांना खूप धन्यवाद. एक चित्र आज पूर्ण होईल. पोस्टेन झाल्यावर. मनकर्णिका, मी आत्ताच सुरूवात केली आहे. काही चित्रे पूर्ण झाल्यावर पुण्यात एक प्रदर्शन भरवायची इच्छा आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छामुळे तेही लवकरच करेन! प्रतिसाद मिळाला तर विक्रीचा मानस आहे.

सर्वांना खूप धन्यवाद. एक चित्र आज पूर्ण होईल. पोस्टेन झाल्यावर. मनकर्णिका, मी आत्ताच सुरूवात केली आहे. काही चित्रे पूर्ण झाल्यावर पुण्यात एक प्रदर्शन भरवायची इच्छा आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छामुळे तेही लवकरच करेन! प्रतिसाद मिळाला तर विक्रीचा मानस आहे.

वॉव.. अबोली.. कित्ता सुरेख काढलीयेस गं.. काही स्पेशल टेकनिक असतं का वारली पेंटिंग साठी??

बस्के..तुझा मोर पण झक्कास आहे
अकु तुझ्या बहिणीचं पण अप्रतिम आहे पेन्टिन्ग Happy

अबोली, अप्रतिम.. Happy काही क्लास वैगरे घेता का तुम्ही?? पण तुम्हाला अगदी लहान मुलाला शिकवावे लागते तसे शिकवावे लागेल. मझी चित्रकला फारच "दिव्य" आहे.. Proud

वा...क्या बात है...!! सगळ्यांचीच चित्रं अप्रतिम आहेत.
वारली चित्रांमधे नेहेमी फक्त आनंद आणि उत्साहच दिसतो ना......!! मी तरी दु:खी वारली चित्रं बघितली नाहीयेत.

सुंदर चित्र सगळीच.

मी भारतातून एक वारली चित्र आणले आहे. मस्त मोठ्ठे पेंटिंग आहे. घरात लावलय फ्रेम करुन. मस्त दिसतं एकदम.

Pages