मासे २५) हलवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 April, 2011 - 05:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रश्यासाठी:
हलव्याच्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
वाटण : ओले खोबरे पाव वाटी, आले, लसुण, मिरची कोथिंबीर
तेल
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
मिठ
चिंचेचा कोळ

तळण्यासाठी :
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
हवे असल्यास आल, लसुण वाटण किंवा लसणाच्या ५-६ ठेचलेल्या पाकळ्या.

क्रमवार पाककृती: 

हलवा कापुन हलव्याच्या डोक्याचा व शेपटाचा भाग रश्यासाठी वापरा व मधला भाग तळण्यासाठी वापरा.
कालवण :
हलव्याच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या. भांड्यात तेल तापवुन त्यावर लसुण पाकळ्यांची खमंग फोडणी द्या. लगेच त्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन वाटण, चिंचेचा कोळ टाका. मग कालवणासाठी च्या तुकड्या त्यात टाका. मिठ टाका. उकळी आल्यावर कालवण ७-८ मिनीटांत तय्यार.

तळण्यासाठी :
साहित्यातले जिन्नस एकत्र तुकड्यांना लावा. तवा चांगला तापल्यावर तेल टाकुन हवे असल्यास लसुण टाकुन त्यावर तुकड्या मस्त मिडीयम गॅसवर खरपुस तळा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी.
अधिक टिपा: 

हलवा पापलेट सारखाच दिसतो पण त्याची खवले काळपट असतात. तर पापलेटला खवलेच नसतात.
हलवा हा चवदार असतो. पण उष्ण असल्याने तो ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना देत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages